(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • दैवी देणगी

    लुळा पांगळा बसूनी एकटा, गाई सुंदर गाणे ।
    आवाजातील मधूरता, शिकवी त्याला जगणे ।।

    जगतो देह कशासाठी, हातपाय असता पांगळे ।
    मरण नसता आपले हाती, जगणे हे आले ।।

    लुळा असला देह जरी, मन सुदृढ होतेस ।
    जगण्यासाठी सदैव त्याला, उभारी देत होते ।।

    गीत ऐकता जमे भोवती, रसिक जन सारे ।
    नभास भिडता सुरताना, शब्द उमटती वाह ! वा रे ।।

    असमान्य ते एकचि मिळता, उणीवतेची खंत कशी ।
    दुबळ्या देही कला श्रेष्ठ ती, वीज चमकते रात्री जशी ।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      June 21, 2017


  • अपेक्षांचा डोंगर (मुक्तछंद)

    अपेक्षांचा डोंगर वाढतच जातो
    त्या मागे माणूस धावतच राहतो
    अपेक्षांचा ओघ वाहवत असतो
    कुठेतरी विश्राम द्यायचा असतो
    आणि ...........
    इथच चुकतं,नव्वद टक्के मार्कस् मिळाले
    आई म्हणे बाळा
    थोडा अभ्यास केला असतास तर......
    तर नक्कीच वाढले असते टक्के
    पाच लाखाचं पॅकेज
    अमुक कंपनी जास्त देईल पॅकेज
    तृप्ती नाहीच........
    अपेक्षांचा नाही.....
    तृप्तीचा डोंगर वाढू दे
    प्रयत्न सोडू नको रे,
    अपेक्षा ठेव रे,
    पण मिळालेल्या यशास
    तुच्छ लेखू नको रे

    -- सौ.माणिक शुरजोशी
    नाशिक

      December 15, 2019


  • आशिर्वाद

    मिळवलेस तूं जे जे काही,
    कौतूक त्याचे सारे करतील
    स्तुती सुमनातील भाव जमूनी,
    हृदयामधले दालन भरतील....१

    उचंबळूनी जाशील जेव्हां,
    बांध फुटेल नयनामधुनी
    ओघळणारे अश्रू सांगतील,
    भाग्य तुझे ग आले उजळूनी....२

    दरवळू दे सुंगध सारा,
    नभांत जातील यश तरंग
    स्वर्गांमधुनी 'भावू 'बघतील
    भीजव त्यांचे सारे अंग...३

    (चि. वर्षा विद्यापीठांत सर्व प्रथम आल्याबद्दल)

    -- डॉ. भगवान नागापूरकर

      May 17, 2016


  • नियतीचा फटका

    (भोपाळ येथे विषारी वायुमुळे एका रात्रीत सहस्त्रावधी लोक मृत्यूमुखी पडले. ४.१२.८४ ची रात्र)

    एक भयानक रात्र अशी, सहस्त्रावधींचा घेई बळी
    नियतीच्या खेळामधली, कुणा न समजे ही खेळी...१,

    मध्यरात्र होवून गेली, वातावरण शांत होते
    गादीवरती पडून सारे, स्वप्ने आपली रंगवीत होते,

    तोच अचानक विषारी वायू, पसरला त्या वातावरणी
    हालचालींना वाव न देता, श्वास रोखीले स्वप्न थांबवूनी,

    कित्येक जनांचे बळी घेतले, सुलभ रितीने काळाने
    शांत निद्रेची महा निद्रा, करूनी टाकीली क्षणात त्याने,

    भरडून गेले सारे परि, पापी वा पुण्यवान ते
    कळला नाही हिशोब त्याचा, मोजमाप ते काय असते

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०

      May 15, 2019


  • ती पण तशीच

    ती पण तशीच
    तो पण तसाच..
    दोघेही विकृतच
    म्हणावे लागतील...
    त्याने समाजाची,
    पैसा मिळावा म्हणून
    वाट लावली तर तिने
    स्वतःच्या भुकेसाठी...
    दोघांच्या भुका घातकच
    आज दोघांचे चेहरे
    त्यांच्या विकृतीमुळे
    संध्याकाळी विझू पाहत आहेत
    अजूनही लंगडत लंगडत
    तो त्याची विकृती सांभाळून आहे...
    त्याला माहित आहे..
    आपला शेवट जवळ आहे..
    तरी पण विकृतीला चिकटून आहे
    त्याची सत्तेची हाव..पैशाची हाव
    तशीच आहे...
    हे पण स्वतःवरचेच
    प्रेम आहे पण विकृतच
    असे अनेक तो आणि ती
    आपल्याला आपल्याच
    आजू-बाजूला
    दिसतात तेव्हा जाणवते...
    कालाय तस्मे नमः.....

    -- सतीश चाफेकर.

      December 6, 2021


  • सिकंदरची शांतता

    दिग्वीजयाच्या स्वारीवरती, निघे सिकंदर सैन्य घेवूनी
    जग जिंकण्या ध्येय मनाशीं, महान आशा उरी बाळगूनी

    आश्वा रुढ ते सैनिक सारे, सिकंदराच्या मागें धावती
    लगाम खेचूनी वृक्षा पाशीं, एक साधू तो बघूनी थांवती

    पृच्छां करितां साधू म्हणाला, शांत चित्त तो बसला असे
    मिळविण्यास ते कांहीं नसतां, शोध प्रभूचा घेत दिसे

    सिकंदर वदे देश जिंकूनी, संपत्ती घेई लुटून सारी
    जगत् जेता नांव कमवूनी, जाईन माझ्या देश दरबारी,

    काय करशील नंतर तू गे? प्रश्न विचारी तो साधू जन
    "शांत राहण्या प्रयत्न करित, अखेरचा मी काळ घालविन”

    मिस्कीलतेने साधू विचारी, मी तर आजच शांत आहे
    धडपड सारी करूनी एवढी, माझ्याच मार्गे तुम्ही जाए

    ध्येय विसरूनी सारे आपण, धावत असतो वेड्या परी
    प्रभू मिलनाचे कार्य खरे, ते मनास जागविते केंव्हां तरी

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०

      November 2, 2019


  • लाडक्या नातीस

    जन्मापासूनी बघतो तुला,
    परि जन्मापूर्वीच ओळखले,
    रोप लावले बागेमध्ये,
    फुल तयाने दिले ।।१।।

    चमकत होती नभांत तेंव्हा,
    एक चांदणी म्हणूनी,
    दिवसाही मिळावा सहवास,
    हीच आशा मनी ।।२।।

    तीच चमकती गोरी कांती,
    तसेच लुकलुकणे,
    मध्येच बघते मिश्कीलतेने,
    हासणे रडणे आणि फुलणे ।।३।।

    चांदणीचा सहवास होता,
    केवळ रात्रीसाठी,
    दिवस उजाडतां निघून गेली,
    आठवणी ठेवून पाठी ।।४।।

    नको जाऊस जरी ही इच्छा,
    परि जाशील सोडून दुजा घरी,
    आठवणीसाठा देत जा मजला,
    दिलासा तोच हे समाघान धरी ।।५।।

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      May 19, 2016


  • जागतीक पर्यटन दिवस

    इथली तरुणाई स्वतंत्र आणि स्वावलंबी विचारांची आहे. शैक्षणिक सुट्टीत इथली मुलं आवर्जून जॉब करतात. कोणतंही काम हे काम आहे, त्यात छोटं-मोठं वगैरे काही नसतं, ही त्यांची मानसिकता असते. कामाच्या वेळी काम आणि वीकएण्डला पार्टीज एन्जॉय करतात.

      September 27, 2021


  • भिडे वाडा

    भिडे वाडा
    साक्ष देतो
    शिक्षणाची
    महती गातो
    सावित्रिने
    वसा घेतला
    ज्ञानदान
    यज्ञ पेटला
    अन्यायाला
    तोंड दिले
    साक्षरतेचे
    द्वार खुले
    रात्र शाळा
    मुलींची शाळा
    शिकविण्याचा
    तिला लळा
    ज्ञान ज्योती
    क्रांती ज्योती
    ज्योतिबांची
    तेजस्वी मुर्ती
    घडविला
    इतिहास
    साक्षरतेचा
    नवा प्रवास
    निर्भय,निडर
    ज्ञान फुला
    अभिवादन
    करते तुला
    सौ.माणीक शुरजोशी.
    नाशिक.
    भिडे वाडा
    साक्ष देतो
    शिक्षणाची
    महती गातो
    सावित्रिने
    वसा घेतला
    ज्ञानदान
    यज्ञ पेटला
    अन्यायाला
    तोंड दिले
    साक्षरतेचे
    द्वार खुले
    रात्र शाळा
    मुलींची शाळा
    शिकविण्याचा
    तिला लळा
    ज्ञान ज्योती
    क्रांती ज्योती
    ज्योतिबांची
    तेजस्वी मुर्ती
    घडविला
    इतिहास
    साक्षरतेचा
    नवा प्रवास
    निर्भय,निडर
    ज्ञान फुला
    अभिवादन
    करते तुला
    -- सौ.माणीक शुरजोशी.
    नाशिक.

      January 3, 2021


  • जीवन घटते सतत

    क्षणा क्षणाला घटते जीवन, जाण त्याची येईल कोठून

    मोठे प्रसंग आम्ही टिपतो, तेच सारे लक्षांत ठेवतो,

    जीवनाच्या पायऱ्या मोजता, मना विचारा काय राहता

    ढोबळतेचा विचार होतो, सूक्ष्मपणाला विसरूनी जातो,

    मृत्यू येई तो हर घडीला, जाण नसते त्याची कुणाला

    गेला क्षण तो परत न येई, आयुष्य तेवढेच व्यर्थ होई,

    समाधान जे मिळे तुम्हाला, देता किंमत प्रत्येक क्षणाला

    घटनांची क्रिया चाले सतत, झिजवावा देह प्रभू सेवेत,

    -- डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      September 10, 2018