तुझी ती भेट
अंतरंगात जपली
तुझ्या विरहाने
आग मनात लागली.
तुझे ते रुप
चंद्रमा नभात
तुझी ती वाणी
हसरी प्रभात
भेटण्याची वेळ असे
तुझ्या मनाची
मी सदेेेैव पाहतसे
वाट तुझ्या येण्याची
वचन तु दिलेस
सा ठेवुन प्रेमाची
फसवून तु गेलीस
लाज ठेव तया वचनाची
ना दुसरीचे रुप
माझ्या निरमल मनात
निघून येशील पुन्हा
हेच असावे माझ्या नशीबात……
— भालचंद्र हादगे
Author
Post Views: 11