विचारांची उठती वादळे ।
अशांत होते चित्त सदा ।।
आवर घालण्या चंचल मना ।
अपयशी झालो अनेकदां ।।
विषण्णतेच्या स्थितीमध्यें ।
नदीकांठच्या किनारीं गेलो ।।
वटवृक्षाचे छायेखाली ।
चौरस आसनावरी बसलो ।।
डोळे मिटूनी शांत बसतां ।
अवचित घटना घडली ।।
विचारांतले दुःख जाऊनी ।
आनंदी भावना येऊं लागली ।।
एक साधूजन ध्यान लावीत ।
बसत होता त्या आसनावरी ।।
पावित्र्याची वलये फिरती ।
आसन दिसले रिकामें जरी ।।
वातावरणाची ही किमया ।
अनुभवते प्रखरतेनें ।।
शुद्ध अशुद्ध विचार येती ।
सभोवतालच्या जाणिवेने ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
June 6, 2020
खरं सांगू तुझ्या विना
जीवन जसा एक थंड तवा
आणि भुकेला एक मुलगा
भाकरी शोधीत फिरावा ,
चंद्र अर्धा आहे
एका मुलीला कमी मार्क्स मिळाले आहेत
ती रडत आहे,
आणि सूर्य एखाद्या
आळशी शिक्षका प्रमाणे
सर्वा देखत घोरत पडला आहे,
आशा एखाद्या पुजारीन प्रमाणे
थकून पायरीवर बसली आहे,
आणि मंदिरात देव पारोसे
पूजे विना राहिले आहे,
दुस्वप्न वीजे समान
त्याच फांदीवर कोसळले आहे
जिथे माझ्या व्याकूळ तृष्णेने
घरटे बसवले आहे,
खरं सांगू तुझ्या विना,
आस ठेवत एक म्हातारी
आणीबाणीतील योजना मोजत आहे
तो सांगून गेला होता तीन दिवस
आज तीन युग लोटून गेले आहेत,
नाव व पत्ता ज्या चिठ्ठीवर
लिहून गेलास ती हरवली आहे,
तन मनाचे संपन्न कोश
हाय आता रीते होत आहे !!!
खरं सांगू तुझ्या विना
माझी नाही कोणतीच कहाणी
गीत माझे जसे उंच फांदीवर
लहडले आहेत आंबे,
बाल चमू नेम धरून दगडाने
तोडत आहेत आंबे,
आणि त्यांचे खरे मूल्य
कोणीच देऊ इच्छित नाही
खरं सांगू तुझ्या विना !
*****
मूल हिंदी कविता -
सच कहूँ तेरे बिना
शार्दुला झा नोगजा, सिंगापुर
मराठी अनुवाद - विजय नगरकर
March 18, 2022
मग त्याचे काम नाही का जुने खरेदी खताची सत्यप्रत जमा करून घेण्याची. हि नसती उठाठेव मला का ?
January 29, 2011
हासत आली सूर्य किरणे, झरोक्यातून देव्हाऱयात
न्हाऊ घालूनी जगदंबेला, केली किरणांची बरसात
पूजा केली किरणांनी, जगन्माता देवीची
प्रकाश स्पर्शूनी चरणाला, केली उधळण सुवर्णाची
तेजोमय दिसूं लागले, मुखकमल जगदंबेचे
मधूर हास्य केले वदनीं, पूजन स्विकारते सूर्याचे
रोज सकाळी प्रातःकाळीं, येऊनी पूजा तो करितो
भाव भक्तिने दर्शन घेऊनी, सृष्टीवर किरणे उधळितो
कोटी कोटी किरणांनी, तो देवीची पूजा करितो
केवळ त्याची पूजा बघूनी पावन मी होतो.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
December 30, 2013
November 23, 2021
मी आलो रे तुझ्या दारीं, मला म्हणतात श्रीहरी
झोपलो होतो सागरी, तंद्री मोडी कुणीतरी, ।।१।।
शांतीने पडू देईना, तुझी ती तपसाधना,
लक्ष माझे खेची कुणी, प्रश्न पडला मना ।।२।।
तूच दिसला पुंडलीका, आई-बापा मांडी देऊनी,
माझे लक्ष तुझकडे, परि तेच तूझ्या नयनी ।।३।।
आई – बापाच्या सेवेत, गुंगलास तूं सतत,
सेवा शक्ति मला छळे, तुला कांहीं न कळे, ।।३।।
थांबव पुंडलिका सेवा, सहन न होई तो ठेवा,
तुजकडे बघ आलो, मनी समाधानी झालो ।।४।।
उभा केलेस मजला तू टाकलेल्या विटेवरी,
मग्न आई-बाप सेवेत, निघूनी गेला दूरी ।।५।।
होऊनी गेली, अठ्ठावीस युगे,
आज देखील, मी वाट बघे ।।६।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
October 29, 2016
तू तर काहीच कसे बोलत नाही
ना सुख, ना दुःख सांगत नाही
मन, नेहमी मुक्त मोकळे करावे
भावनांचा उद्वेग त्रस्त करत नाही
जगती जगणे हे क्रमप्राप्त आहे
तटस्थतेत, मना मन:शांती नाही
सहोदरी भावनांच निश्चिंती आहे
अलिप्ततेत जीवनी सुखदा नाही
पराधीनता हा जीवाला शाप आहे
भोग भोगण्या दूजा उ:शाप नाही
तो एक अनामिक सृष्टिचा निर्माता
त्या शरण जाण्यावीण पर्याय नाही
मित्रत्वाचा सुखद संवाद चैतन्यदायी
त्यावीण इथे जगण्यासही अर्थ नाही
-- वि. ग. सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र १३९.
२२ - ५ - २०२२.
June 8, 2022
बंधन मुक्तीसाठीं असतां,बंधनात ते पाडून टाकी
कर्मफळाचे एक अंग ते,टिपतां राही दुसरे बाकी...१,
साध्य करण्या जीवन ध्येय,देह लागतो साधन म्हणूनी
सद्उपयोग करूनी घेतां,साध्य होईल हे घ्या जाणूनी...२,
हिशोब तुमचा चुकून जाता,तोच देह बनतो मारक
विनाश करितो मागें लागतां,मिळविण्यास ते ऐहिक सुख....३,
बंधन पडते आत्म्याभोंवती,शरिरांतल्या वासने पायी
वासनेच्या आहारी जातां,बंधनास ती बळकटी येई.....४,
तपसाधनेचे कष्ट करूनी,देह करितो आत्म्यास मुक्त
देहाचे ते बंधन पडते,जेव्हां बनतो वासनायुक्त...५
डॉ. भगवान नागापूरकर
२८९- ११०५८४
June 21, 2017
बहूमोल निसर्ग ठेव, निरनिराळे स्वभाव
उमटविती भाव मनावर आमच्या ||१||
चांदण्याची शितलता, मनाची प्रफूल्लता
देहाची आल्हादकता लाभली चंद्राचे ठायी ||२||
नाजूक सहवास, मधूर मिळे वास,
कोमलतेचा भास जाणविला फूलांनी ||३||
रंगाची विविधता, छटाची आकर्षकता,
मनाची वेधता इंद्रधनुष्य देई || ४||
पळण्याची चपलता, फिरण्याची चंचलता,
वेगाची तीव्रता, भासे हरिणाच्या पायी ||५||
प्रवाहाची संथता, पाण्याची खळखळता,
स्वभावाची निर्मलता, समजली नदीमुळे ||६||
शक्तीचे दर्शन, क्रूरता भयान,
निर्दयतेची जाण, दिसली हिंस्त्र पशूत ||७||
जीवनाची प्रेमलता, हृदयातील अक्षरता,
भावनेची कोमलता मातेच्या रुपाने मिळाली ||८||
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
March 16, 2020
लक्ष आपले जात असते,
सदैव प्रभूकडे,
मार्ग सारे ठरलेले,
जे मिळती तिकडे ।।१।।
‘को S हं’ शब्दाचा निनाद होतो,
प्रथम मुखातून,
जन्मताच तो प्रश्न विचारी,
“मी आहे कोण?” ।।२।।
मार्ग हा तर सुख दु:खाने,
भरला आहे सारा,
राग लोभ मोह अंहकार,
याचा येथे पसारा ।।३।।
वाटचाल करिता यातून,
कठीण होवून जाते,
जीवन सारे अपूरे पडून,
अपूर्ण ज्ञान मिळते ।।४।।
आयुष्य तुमचे थोडे असूनी,
काळ वेळीच जाणावा,
मिळेल जो क्षण तुमचे हातीं,
प्रभूसाठी तो असावा ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
April 16, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti