April 30, 2022
एक भिकारीण तालावरती, गात होती गाणे
पुढे करुनी एक हात, आळवित होती भजने
तंद्रित होती गाण्याच्या, एकाग्र चित्त करुनी
कसा मिळेल आनंद इतरां, हीच काळजी मनीं
मिळेल ते धन हाती घेऊनी, गेली ती परत
निराश न होता हास्य मुखाने, आशीर्वाद देत
भिक नव्हती तिने जमविली, ती तर कदर कलेची
आनंद मिळे इतरांना, हीच पावती समाधानाचीं
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
December 4, 2016
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर…यांचं नाव घेऊन राजकारण करून सामान्य माणसाला स्वातंत्र्यानंतर पासून दूर ठेवलेल्या अनु याची खदखद व्यक्त करणारी मुक्त छंद कविता
April 16, 2017
प्रत्येकाचेच जग वेगळे
सुखदुःखही वेगवेगळे
संवेदनांची जाणीव एक
तिथे नसते काही वेगळे
सृष्टीही सारी एकसारखी
काही नसते कुठे वेगळे
ऋतुंचे आविष्कार सारखे
सुखावणारे क्षण आगळे
नित्य पांघरित चैतन्याला
भोगावे जगण्याचे सोहळे
जन्म मरण हे एकची सत्य
याहुनी जीवन नाही वेगळे
जीवाजीवा सुखवित जावे
कृतार्थ जीवन हेच आगळे
-- वि.ग.सातपुते (भावकवी)
(9766544908)
रचना क्र. ३०५
२५/११ २०२२
December 4, 2022
November 3, 2021
सीतेकरता व्याकुळ झाला
अवतारी चक्रपाणी
अजब ही रामप्रभू कहानी ।।धृ।।
पत्नीहट्ट हा त्याला सांगे
कांचनमृग शोभेल अंगे
मृगयेच्या तो गेला मागे
प्रसंग घेई रावण साधूनी ।।१।।
अजब ही रामप्रभू कहानी
रावण नेई पळवूनी सीता
दिसेन रामा कोठे आता
तरुवेलींना पुसत होता
वाहत होते अश्रु नयनीं ।।२।।
अजब ही रामप्रभू कहानी
बाणी ज्याच्या शक्ती शिवाची
ह्रदयामाजी दया सागराची
त्यालाही दिसे नियती खेची
सामान्यतेच्या मापी तोलूनी ।।३।।
अजब ही रामप्रभू कहानी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
विवीध-अंगी
१***
Path of Knowledge- ज्ञान मार्ग अर्थात ह्या मिथ्या, सत्य नसलेल्या जगाला ओळखण्याचा प्रयत्न करणे. त्याच वेळी स्ववर ' मी कोण ' ह्याचा शोध घेण्यासाठी लक्ष केंद्रित करणे, मनामधले विचार नष्ट करुन निर्माण होणाऱ्या शांततेची जाणीव ठेवणे हे असेल. ह्यालाच Objectless Awareness म्हणता येईल. अर्थात ध्येय रहीत जाणीव
-- डॉ. भगवान केशवराव नागापूरकर
January 30, 2013
जे जे मजला हवेच होते, मिळवित गेलो यत्न करूनी
चालत असता जेव्हा पडलो, उठलो होतो धीर धरूनी
आतंरिक ती शक्ती माझी, पून्हा पून्हा तो मार्ग दाखवी
शरिराला ती जोम देवूनी, वाटेवरती चालत ठेवी,
निराश मन हे कंपीत राही, विश्वालासा तडे देवूनी
दु:ख भावना उचंबळता, देह जाई तेथे हादरूनी
परि विवेक हा जागृत होता, विश्लेषन जो करित राही
सुख, दु:खाचा अर्थ लावूनी, मनास तेव्हा धीरच देयी
गीळून घेता अपयश सारे, खंत वाटली कधी न त्याची
समज आली मनास ही की, चूक असावी मार्ग निवडीची.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
February 23, 2020
सरोवरात कमलिनी फुलतां,
भ्रमर भोवती विहरू लागे, पाकळ्यांचे सौंदर्य पाहता,
त्याचा मनमोर नाचू लागे,--!
मोह पडे अगदी त्याला,
टपोऱ्या मोहक कमळाचा, गुणगुणत मस्त मजेत,
वाऱ्यावरती झोके घेत,
उतावीळ एकदम तो,
झटकन तेथे आला,--!!!
ती आपल्याच नादात असे,
ना तिच्या गावी त्याचे येणे,
डुलता डुलता झुळकेबरोबरी, तारुण्याचा तो आनंद उपभोगणे,--!!!
मोहित भुंगा जवळी येता,
गुंजारव सारखा करे,--
निरागस निष्पाप कमला,
जवळ जाऊन तो एकटक बघे,--!!
पराग कण टिपण्या आतून
भृंगराजा जरी वेडावला,--
कमलिनीचे नाजूक तन ,
पाहून अधिकच चक्रावला,--!!!
*सौंदर्याची मूस जशी,
लावण्याची खाणच असे की*,---
पुटपुटतच स्वतःशी मग तो,
म्हणे, मर्जी राखेन तुझी खाशी,--!!
पाहून त्याला ती उद्गारली,
जन्म माझा ना तुझ्यासाठी, प्रेमभावना कळते मजला,
वाहून घेतले प्रभूचरणांसाठी*,--!!!
हिमगौरी कर्वे.©
June 18, 2019
भेटावसं वाटलं तर भेटता यावं,
कुठलंच कारण न लागावं.
मनात आलं, हसू उमटलं,
आणि दार आपोआप उघडावं.
न सांगताही सगळं कळावं,
नात्यात शब्दांची गरज नसावी.
हक्क नको, अटी नको,
फक्त आपुलकीची ओढ असावी.
ना अपेक्षांचा ओझं असावं,
ना गैरसमजांची भिंत.
भेटावसं वाटलं तर भेटता यावं,
नातं इतकं साधं… सरळ… नितांत सुंदर असावं.
* कीर्तिराज आगलावे
July 13, 2026
चिव् चिव् करित बोलतां तुम्ही सारी भाषा
दोन स्वरातून विचारांना देत असता दिशा
शब्द आमचे सप्तसुरांतून येती बाहेरी
व्यक्त करिती भाव सारे असती जे अंतरी
दोन अक्षरी किमया सारी तुमच्या भाषेची
त्याच चिव चिवे समजुन घेता धडधड ह्रद्धयाची
भाव मनीचे टिपून घेण्या शब्द लागती थोडे
चेहऱ्यावरल्या हलचालीनी प्रश्न उकलूनी पडे.
समज तुमची आपसांतली कौतूक करणारी
शब्द मोजके असून देखील भाव दाखविणारी
चिमण्यानो तुम्ही शिकवा सारे मानव जातीला
व्यर्थ बडबड करुन सारी वाहूनी तो गेला
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
April 2, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti