नियतीचा फटका

(भोपाळ येथे विषारी वायुमुळे एका रात्रीत सहस्त्रावधी लोक मृत्यूमुखी पडले. ४.१२.८४ ची रात्र)

एक भयानक रात्र अशी, सहस्त्रावधींचा घेई बळी ।

नियतीच्या खेळामधली, कुणा न समजे ही खेळी ।। १

मध्यरात्र होवून गेली, वातावरण शांत होते ।

गादीवरती पडून सारे, स्वप्ने रंगवीत होते ।। २

तोच अचानक विषारी वायू, पसरला त्या वातावरणी ।

हालचालींना वाव न देता, श्वास रोखीले स्वप्न थांबवूनी ।। ३

कित्येक जनांचे बळी घेतले, सुलभ रितीने काळाने ।

शांत निद्रेची महा निद्रा, करूनी टाकीली क्षणात त्याने ।। ४

भरडून गेले सारे परि, पापी वा पुण्यवान ते ।

कळला नाही हिशोब त्याचा, मोजमाप काय असते ।। ५

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

Author