(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • हलकेच सख्या मी रानात

    हलकेच सख्या मी रानात
    चोर पावलांनी अशी येते
    वाट तुझी पाहता मी
    बैचेन जराशी मग होते
    येतो तू असा समोरुन
    भान हरपून माझे जाते
    जवळ येता तू माझ्या
    मी मोहरुन पुरती जाते
    घेता मिठीत अलवार तू मजला
    क्षण फुलून अलगद जातो
    ओठ ओठांनी अधर तू टिपता
    साखर चुंबनात भाव गंधाळतो
    सोडशी गाठ तू मग चोळीची
    पदर लाज सोडून वाऱ्यावरी जातो
    न उरले बंधन कसले दोघांत काही
    नजर खुणावे माझी अर्थ तुजला लागतो
    तो शृंगार खुलला त्या धुंद वेळी
    सैलावली मी मोहक भावनांनी
    डोळे मिटले मी त्या लाज वेळी
    एकरुप झाले दोन मन मोहरुनी
    साखर मिठीत मज तू घट्ट घेता
    मी समर्पित तुझ्यात अलवार होते
    तृप्त झालास तू त्या धुंद मिलनी
    ती पहाट गोड गुलाबी नशिली होते
    -- स्वाती ठोंबरे.

      February 1, 2022


  • शक्य आहे का ते ?

    आज हे आकाश मजला, थोटके का भासते ।

    झेप घेण्या पंख फूटतां, हाती येईल काय ते ?

    उंच हा गिरीराज देखूनी, शिखर चढावे वाटते ।

    चार पावले टाकतां क्षणी, चढणे सोपे काय ते ?

    अथांग सागर खोल जरी , डूबकी घ्यावी वाटते ।

    जलतरण कला अवगत होता, सूर मारणें जमेल कां ते?

    काव्य सरिता वाहात आहे, ज्ञान गंगोत्री भासते ।

    केवळ कविता चार रचूनी, त्यात डूबनें शक्य कां ते?

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      November 27, 2017


  • सूड वलय

    उत्साहाने आला होता, मुंबई बघण्याकरिता,
    रम्य स्थळांना भेट देणे, ही योजना मनी आखता ।।१।।

    मान्य नव्हती त्याची योजना, नियतीच्या चाकोरीला,
    पाकीट पळवूनी त्याचे, घाला कुणीतरी घातला ।।२।।

    धन जाता हाता मधले, योजना ती बारगळली,
    अवचित त्या घटनेने, निराशा तेथे पसरली ।।३।।

    जात असता सरळ मार्गी, दुष्टपणाला बळी गेला,
    समाजाला धडा शिकवण्या, सूडाने तो पेटून गेला ।।४।।

    वाम मार्गी जावून त्याने, तेच धन पुन्हा कमविले,
    सूड घेतला असून देखील, समाधान ते नाही लाभले ।।५।।

    दुष्ट वृत्तीची वलये ती, फिरत असती सभोवती,
    सूड अहंकार लोभही, त्यानाच गतीमान करती ।।६।।

    एका वरचा राग तुम्ही, फैलविता सहजपणे,
    तोडून टाका ही वलये, प्रेम दया या भावनेनें ।।७।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      October 16, 2015


  • जेवण आणी राशीचे स्वभाव

    थोडेसेच जेवण का असेना
    मेष आवडीने खाणार..
    गरम, चमचमीत पदार्थांवर
    यांची पहिली नजर जाणार.. ।।१।।

    वृषभेची व्यक्ती दिलखुलास पणे
    दाद देऊन जाते..
    लोणची-पापडासारखे पदार्थही
    अगदी चवीचवीने खाते.. ।।२।।

    कधी मारुनी मिटक्या,
    कधी नन्नाचा चाले पाढा..
    मिथुनाचे कौतुक मधाळ
    तर टीका कडवट काढा.. ।।३।।

    'अन्न हे पूर्णब्रह्म' म्हणत
    कर्केचे होते पूर्ण जेवण..
    रुचकर पण थंड अन्नही हे
    कसे पटकन करतात सेवन? ।।४।।

    राजस जेवणाच्या सिंहेचा
    केवढा राजेशाही थाट..
    थोड्याथोड्या सर्वच पदार्थांनी
    यांचे भरुन जाते ताट.. ।।५।।

    'कमी-जास्त नाही ना?'
    याची उगाच बाळगून भीती..
    इतरांकडे पाहून ठरते
    कन्येची जेवायची नीती.. ।।६।।

    भात-भाजी-आमटीबरोबर
    पचतील तेवढ्याच पोळ्या..
    अशा संतुलित आहारानंतर
    तूळ खाते पाचक गोळ्या.. ।।७।।

    काही Missing आहे का
    कधी कळतही नाही..
    साधे नेहमीचेच जेवण
    पण वृश्चिकेला रुचत नाही.. ।।८।।

    कधी पटपट-झटपट जेवण
    तर कधी अगदीच वेळकाढू..
    धनू काढत नाही जेवताना खोड्या
    पण वेळ मिळताच संधीसाधू.. ।।९।।

    ना कधी कौतुक
    ना कसली नकारघंटा..
    गपगुमानं जेवतो मकर
    करत नाही कधी थट्टा.. ।।१०।।

    निश्चित वेळ जेवणाची
    पार्टी असो वा एखादे लग्न..
    कुंभेची चिकित्सक वृत्ती
    नेहमी रेसिपी जाणण्यात मग्न.. ।।११।।

    कधी-कुठेही जमते
    मीनेची खाण्याशी गट्टी..
    पोटभर खाताना घेतात
    'डाएट' नावाशी कट्टी.. ।।१२।।

    आहे ना गंमत !

    स्वतःची रास तपासून बघा

      September 22, 2016


  • शल्य

    आता सारेच नावापुरते
    आस्था आपुलकी नाही
    हास्य केवळ तोंड देखले
    मनस्वी खरा आनंद नाही

    " या, या, कसे आहात ?
    बरेच दिवसात गाठ नाही
    सारे काही ठीक आहे नां ?
    शब्दात या कुठे प्रेम नाही

    सारेच आता भावशून्य
    ओढ अंतरी उरली नाही
    भावनांचीच पायमल्ली
    नाती तशी उरली नाही

    दिवस येतो आणि जातो
    आपले कुणी वाटत नाही
    ऋतुऋतुही सारे बदलले
    चैतन्य कुठेच उरले नाही

    स्वार्थापोटी नित्य धावणे
    याविण जीवन उरले नाही
    श्वासात केवळ उद्विग्नता
    हे शल्य मनीचे संपत नाही

    -- वि.ग.सातपुते (भावकवी)

    (9766544908)

    रचना क्र.२९९

    २०/११/२०२२

      November 26, 2022


  • पावसाचा थेंब तूं

    धुवाधार तो घनमेघ बरसता
    चिंब भिजविणारा पावसाचा थेंब तूं
    मनह्रदयीच्या पागोळ्यातुनी
    अलवार रिमझिमणारा प्रीतस्पर्श तूं
    ओले ओले मृदगंधले मनांगण
    मनी दरवळणारा पावसाचा थेंब तूं
    कोसळणाऱ्या, सरिसरितुनी
    झरझरणाऱ्या, पावसाचा थेंब तूं
    प्रीतयुगुलांना, हा ऋतुराज हवासा
    चिंब बरसणाऱ्या पावसाचा थेंब तूं
    सृष्टिचे रूपरंग, वादळी सप्तरंगले
    नभा खुलविणारा पावसाचा थेंब तूं
    प्रीतभारला, मनामना भावणारा
    अवीट रेशमस्पर्शी पावसाचा थेंब तूं
    भक्त! राधा मीरा, मग्न पावरीत
    स्वरी, निनादणारा पावसाचा थेंब तूं
    -- वि.ग.सातपुते. (भावकवी)
    9766544908

      May 30, 2022


  • प्रभू नामस्मरण

    नामघ्या हो तुम्ही, प्रभूचे सतत ।
    नामस्मरण ते, अशू द्या मुखांत ।।१।।

    काय सांगावी मी, नामाची थोरवी ।
    दगडही जेथे, तरंगून जाई ।।२।।

    राम नामामध्ये, प्रभुचा संचार ।
    बनून कवच, रक्षती शरिर ।।३।।

    नामाची लयता, मन गुंतवून ।
    एकहोता चित्त, जाई आनंदून ।।४।।

    अंतीम ते ध्येय, ईश समर्पण ।
    नामानी साधती, प्रभू सर्वजण ।।५।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      March 9, 2019


  • त्यागवृत्ती

    जीवनाच्या सांज समयीं । उसंत मिळतां थोडीशी ।।
    हिशोब केला स्वकर्माचा । वर्षे गेली कशी ।।१।।

    दिवसामागून वर्षे गेली । नकळत अशा वेगानें ।।
    सुख दुःखाच्या मिश्रणीं । जीवन गेले क्रमाक्रमानें ।।२।।

    आज वाटे खंत मनीं । आयुष्य वाया दवडिले ।।
    ऐहिक सुखाच्या मागे जातां । हातीं न कांहीं राहिले ।।३।।

    ' घेणे ' सारे आपल्यासाठीं । करीत जीवन घालविले ।।
    ' देण्या ' मधल्या आनंदाला । मन सदा वंचित राहिले ।।४।।

    सुधारुन घे आतां तरी । अनुभवाने चूक आपली ।।
    उर्वरित वर्षे जाऊं दे । त्यागवृत्ती मध्यें सगळी ।।५।।

    भोगातले सुख कसे ते । क्षणांत येई क्षणांत जाई ।।
    त्यागातील समाधान परि । उशीरा लाभून सदैव राही ।।६।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      December 20, 2015


  • तुझे तुलाच देवून मोठेपण

    वेडे आम्ही सारे,
    तुझेच घेवूनी तुला देतो,
    त्यातच मोठेपण मिरवितो...१,

    जाण आहे याची
    सर्व जगाला चकमा देतो,
    स्वत:लाही फसविता असतो....२,

    फुले बागेमधली
    तोडून तुजला वाहतो,
    हार त्यांचे करूनी घालतो....३,

    गंगेतील थोडे पाणी,
    अर्घ्य आम्ही तुला देतो,
    भक्तीभावाने अर्पण करितो....४,

    सारे असूनी तुझे,
    मीपणा हा सतत राहतो,
    परी हा भाव दुजासाठी असतो...५

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      July 26, 2016


  • आशिर्वाद

    प्रतिबिंब तुझे रे घरात माझ्या
    आशिर्वादच हा अरे कल्पवृक्षा
    तुझी कृपादृष्टी सदैव राहो
    मनीमानसी एवढीच इच्छा

      August 18, 2026