जीवन

विसरुनिया अस्तित्वाला
निसर्गात एकरूप व्हावे
क्षणक्षण प्रगाढ़ शांततेचा
एकांती आत्ममुख व्हावे....

शमता अशांत कोलाहल
हळूच मागे वळूनी पहावे
शिशुशैवव, पौगंड यौवन
पुन:, पुनः,पुनः आठवावे....

वास्तव, हे भाग्य भाळीचे
ते, वात्सल्यप्रेम आठवावे
व्याकुळ उर, भरूनी येता
मौनी अश्रुंना प्राशित रहावे....

जे लाभले ते दान प्राक्तनी
अंतर्मुख ! सदा होत रहावे
सुख,दुःख, संवेदनां, चिंता
रेतीवरच्याच, रेषा समजावे....

वास्तवता ! विरणाऱ्या लाटा
क्षण जीवनाचे मीठीत घ्यावे
सावरणारा, तो एक विधाता
त्या कृपावंताला शोधत रहावे....

–वि.ग.सातपुते.( भावकवी )

9766544908

रचना क्र. १९६

१२/८/२०२०



विसरुनिया अस्तित्वाला
निसर्गात एकरूप व्हावे
क्षणक्षण प्रगाढ़ शांततेचा
एकांती आत्ममुख व्हावे….

शमता अशांत कोलाहल
हळूच मागे वळूनी पहावे
शिशुशैवव, पौगंड यौवन
पुन:, पुनः,पुनः आठवावे….

वास्तव, हे भाग्य भाळीचे
ते, वात्सल्यप्रेम आठवावे
व्याकुळ उर, भरूनी येता
मौनी अश्रुंना प्राशित रहावे….

जे लाभले ते दान प्राक्तनी
अंतर्मुख ! सदा होत रहावे
सुख,दुःख, संवेदनां, चिंता
रेतीवरच्याच, रेषा समजावे….

वास्तवता ! विरणाऱ्या लाटा
क्षण जीवनाचे मीठीत घ्यावे
सावरणारा, तो एक विधाता
त्या कृपावंताला शोधत रहावे….

–वि.ग.सातपुते.( भावकवी )

9766544908

रचना क्र. १९६

१२/८/२०२०

Author