सत्कर्म फ़ळा यावे

गतजन्मांचे, सत्कर्म फळाला यावे
जन्मुनी जगती मानव जन्मी जन्मावे...

सकल शक्तीचे, घेवुनी दान विवेकी
नरदेही, हरिहराने वाजतगाजत यावे...

असुरी, प्रवृत्तिंच्या निर्दालनासाठी
सर्वेश्वराने, आता ब्रह्मांडा सावरावे...

रामराज्याची सुखस्वप्ने जगण्यासाठी
प्रभुरामाने, पुन्हा जगती जन्मा यावे...

आत्मरंगी तृप्तलेल्या आत्मारामा
मोक्षामृत, पाजीत नारायणाने यावे...

गतजन्मांचे ते सत्कर्म फळाला यावे
जन्मुनी जगती मानव जन्मी जन्मावे...

--वि.ग.सातपुते( भावकवी)

9766544908

रचना क्र. २६७

२१/१०/२२



गतजन्मांचे, सत्कर्म फळाला यावे
जन्मुनी जगती मानव जन्मी जन्मावे…

सकल शक्तीचे, घेवुनी दान विवेकी
नरदेही, हरिहराने वाजतगाजत यावे…

असुरी, प्रवृत्तिंच्या निर्दालनासाठी
सर्वेश्वराने, आता ब्रह्मांडा सावरावे…

रामराज्याची सुखस्वप्ने जगण्यासाठी
प्रभुरामाने, पुन्हा जगती जन्मा यावे…

आत्मरंगी तृप्तलेल्या आत्मारामा
मोक्षामृत, पाजीत नारायणाने यावे…

गतजन्मांचे ते सत्कर्म फळाला यावे
जन्मुनी जगती मानव जन्मी जन्मावे…

–वि.ग.सातपुते( भावकवी)

9766544908

रचना क्र. २६७

२१/१०/२२

Author