(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • गेले ते दिन गेले !

    असले जरी शिक्षण बेताचे

    वागलो नाही कधी विचित्र,

    चाळीतील मध्यमवर्गी आम्हीं

    राहत होतो एकत्र !

    चाळीने आम्हांला शिकविले

    भेदभाव विसरायला,

    प्रसंग कोणावर बिकट आला

    शिकविले प्रथम मदत करायला !

    चाळीत कॉमन नळाला

    पहाटे पाचला पाणी,

    सातवाजता पाणी गेल्यावर

    मिळणार नाही थेंब पाणी !

    ब्रशने दात घासता घासता

    भरभर प्रातर्विधी उरकायचे,

    दुधासाठी सेंटरवर धावायचे

    मध्येच घुसून दुध आणायचे !

    पाण्यासाठी सगळ्यांची लगबग

    सकाळी भांडणं कायमची,

    पाणी जायच्या आत

    सगळी आन्हिके उरकायची !

    चाळीतील कॉमन नळाने

    शिस्त लावली लौकर उठायची

    पाण्याची काटकसर करण्याची

    पाणी जपून वापरायची !

    थंडीचे दिवस म्हणून

    उठलो नाही लौकर,

    शाळेला उशीर होईल

    म्हणून अंघोळी केली भरभर !

    देवापुढे जोडून हात

    घाईघाईत नाष्टा केला,

    पँटीत शर्ट कोंबून

    शाळेचा रास्त घराला !

    आदल्या दिवशी विसरलो

    दप्तरात पुस्तके भरायला,

    पहिला तास गणिताचा

    भलताच भारी पडला !

    येउदे प्रसंग कोणावर काही

    एकजुटीने लढणारच,

    आमची चाळ आहे म्हंटल्यावर

    त्यात वाचाळ काही असणारच !

    चाळीतल्या गमतीजमती वेगळ्या

    फॅल्याट सिस्टीम मध्ये कुठे दिसायला !

    भांडलो जरी किती तरी

    शेजारी येती सोडवायला !

    -- जगदीश पटवर्धन

      January 13, 2017


  • दुष्टाचा मृत्यु

    सारे दुर्गुण अंगी असूनी, गुंड होता तो

    इतर जनांना त्रास देत, तुच्छ लेखितो

    शक्ति सामर्थ्य त्यांत असतां, फार मातला

    आया बहिणीना अपमानुनी, त्रासू लागला

    बळजबरीनें पैसे घेई, स्वार्था करिता

    हतबल होऊनी देऊ लागली, निराश होता

    केवळ त्याच्या अस्तित्वाने, सारे घाबरती

    पिसाट संबोधूनी तयाला, दुर्लक्ष करिती

    एके दिवशीं अवचित ती, दुर्घटना झाली

    उंचावरनी त्याची स्कूटर, खाली कोसळली

    त्याच्या देहा भोवती जमले, सारे गांवकरी

    आज शब्द जे बाहेर पडती, स्तुती त्याची करी

    निच वृत्तीची पकड होती, त्याच्या देहाला

    देहाबरोबर दुष्टपणा तो, नाश पावला

    सुटका झाली आत्म्याची, त्याच्या हीन देहातूनी

    स्तुति सुमनें उधळली गेली, हेच जाणोनी

    जेव्हां कुणाचा मृत्यु होई, गुण गातो त्याचे

    रुप ईश्वरी उरते जातां, वेष्टन देहाचे

    डॉ. भगवान नागापूरकर

    9004079850

      June 23, 2019


  • भिंती

    ऐका गं भिंतींनो
    ऐका माज गाऱ्हाणं
    ऐकून बी समजून घील
    असं न्हाई कोण इथं शानं
    परत्येक जण गढलाय
    जगाच्या कुटाळक्यांत
    कुटं कोण लढत्यात
    तर कुटं कोण जागा लढवित्यात
    खोपीतला छुपा वडवानल
    कुणालाच दिसतं न्हाई
    समदं पाह्यजे आलबेल
    कुणालाबी परवा न्हाई
    भिंती तेवड्या निब्बर नायत
    दारं, झडपांनी मोकळं हुत्यात
    ल्हाही ल्हाही जळत ऱ्हातं
    काळजा अल्लद फुंकर घालत्यात
    नाती खाती येती जाती
    'मी' चं वारं पाया पोखरती
    बडेजाव त्यो लबाड बेगडी
    उतरंडीस आवताण देती
    किडुक मिडूक रं कशापायी
    सारं सारं पून्ना येतं
    जीव तेवडा जपतं ऱ्हाई
    कुडीतलं तेल संपत जातं
    कुडीतलं तेल संपत जातं!!
    -- वर्षा कदम.

      May 1, 2022


  • Dance रे मोरा, Mango च्या वनात

    सेमी ईंग्लिश मिडियम च्या आईने आपल्या मुलाला शिकविलेलि कविता...!

    Dance रे मोरा, Mangoच्या वनात
    Dance रे मोरा Dance...

    ढगांशी wind झुंजला रे..
    काळा काळा cotton पिंजला रे..
    आता your पाळी, तुला give टाळी..y
    फुलव पिसाराss Dance..

    Dance रे मोरा, Mangoच्या वनात
    Dance रे मोरा Dance..

    झरझर edge झरली रे..
    झाडांची leaves भिजली रे.. Rainमध्ये न्हाउ, Something गाऊ
    करुन पुकारा Dance,

    Dance रे मोरा, Mangoच्या वनात
    Dance रे मोरा Dance...

    थेंब थेंब तळ्यात dancing रे
    टप टप पानांत sounding रे..
    Rainच्या रेघांत, Play खेळु दोघांत Blue सवंगड्या Dance,

    Dance रे मोरा, Mangoच्या वनात
    Dance रे मोरा Dance...

    Rainची रिमझिम stopली रे
    तुझी माझी pair जमलीरे
    Skyमध्ये छान छान Seven रंगी कमान
    कमानीखाली त्या Dance,

    Dance रे मोरा, Mangoच्या वनात
    Dance रे मोरा Dance

    ?☺???

      February 22, 2017


  • ऊर्जेचा करा योग्य उपयोग

    खर्च करावी ऊर्जा आपली, योग्य कामांकरीता,
    शक्तीस द्यावी दिशा चांगली, जीवन यशाकरीता ।।धृ।।

    बागेतील फुले सुंदर,
    फुलपाखरांचे रंग बहारदार,
    मोहक इंद्र धनुष्याकार,
    निसर्गातील रम्यतेमध्यें शोधा, ईश्वरी गुणवत्ता,
    खर्च करावी ऊर्जा आपली, योग्य कामांकरीता ।।१।।

    भजन पूजन प्रभूचे,
    भक्ति-भाव मनाचे,
    उपवास करी देहशुद्धीचे,
    तपसत्वाच्या शक्तीनें करा, आत्म्याची मुक्तता ,
    खर्च करावी ऊर्जा आपली, योग्य कामांकरिता ।।२।।

    गरिबासी मदतीचा भाव,
    दुःखितांसाठीं प्रेमळ स्वभाव,
    घ्या इतरांच्या मनाचे ठाव,
    मिळवा कल्याण करुनी, त्यांच्यात समाधानता,
    खर्च करावी ऊर्जा आपली, योग्य कामांकरिता ।।३।।

    धनसंपत्ती गंगाजळ,
    मोहमोयांचे जाळ,
    षड्-रिपू विकार सकळ,
    विवेक बुद्धीने नष्ट करा, ही मनाची मलिनता,
    खर्च करावी ऊर्जा आपली योग्य कामांकरिता ।।४।।

    सर्वत्र आहे प्रभू संचार,
    अणूरेणूत झाला साकार,
    ब्रह्मांडही त्याचा आकार,
    विलीन व्हा ईश्वरी तत्वांत, त्यास सर्व अर्पिता,
    खर्च करावी ऊर्जा आपली, योग्य कामांकरिता ।।५।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      March 2, 2015


  • तन मनातील तफावत

    देह मनातील, तफावत दिसून येते ।
    चंचल असूनी मन सदैव, शरीर परि बदलत राहते...१,

    चैतन्ययुक्त मन सदा, स्थिर न राहते केव्हांही ।
    जन्मापासूनी मृत्यूपर्यंत भाग दौड ती चालत राही...२,

    परिस्थितीच्या चौकटीमध्यें, विचारांचा दबाव राहतो ।
    शरीराच्या सुदृढपणाचा, मनावरती परिणाम होतो...३,

    दिसून येते केव्हां केव्हां, मन अतिशय उत्साही ।
    परि शरीराचा अशक्तपणा, मनास त्याक्षणी साथ न देई....४

    विचित्र होते वातावरण ते, जेव्हां मनास साथ ना मिळे ।
    विचारांच्या चुका होऊनी, दु:खी होते जीवन सगळे...५

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      October 5, 2015


  • कळतंच नाही आजकाल

    कळतंच नाही आजकाल काय झालोय आपण, कसे झालोय आपण !! तेच तेच रहाटगाडगं ढकलत “रटाळ” झालोय आपण !!

      August 16, 2021


  • कर्तृत्वाचे कल्पतरू

    जीवन गंगा वहाते ,
    फुलवित सारी जीवने ।
    पडेल प्रवाहीं कुणी,
    लागते त्याला वाहणे ।।१।।

    काही काळ वाहतो देह,
    डुबून जाणे अंतीम,
    कसा वाहतो केंव्हा डुबतो,
    प्रवाही वेगाचे हे काम ।।२।।

    बुडूनी जाती देह प्रवाही,
    कर्मे आतील तरंगती ।
    वाहत वाहत नदी किनारी,
    स्थीर होऊन काठी राहती ।।३।।

    देह क्षणाचा जरी,
    कर्मे राहती निरंतर ।
    कर्तृत्वाच्या कल्पतरूची,
    आठवण काढती इतर ।।४।।

    त्या कर्माच्या राही आठवणी,
    मार्गदर्शक बनती इतरा ।
    डुबणाऱ्या देहाकडूनी,
    सावध राहूनी कर्म करा ।।५।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      January 10, 2016


  • सळसळली पाने ऋतू हिरवा बावरा

    सळसळली पाने ऋतू हिरवा बावरा
    फुलांत उमलला गंध मोहक साजीरा
    नटली वसुंधरा शेला हिरवा ल्याला
    उमलल्या कळ्या धुंदीत चैतन्य सळसळला
    आनंदाचे गाणे पक्षी उंच आकाशी विहारता
    बगळ्यांची माळ फुले एका ओळीत बद्धता
    पानोपानी बहरला निसर्ग भवताल सारा
    खुणावे मन अलगद हे पाहून नजर फुलोरा
    उधळून मोती सौंदर्य मोहक खुलवी नजारा
    देवाने निर्मिली ही सुंदर मनोहर निसर्ग सत्ता
    कोण न यावर अधिकारी माणूसही असे खुजा
    निसर्गाचे लेणे सुरेख हे पहावे नतमस्तक होता
    सृजनाचा सोहळा सारा रंगीत बेधुंद नटला
    नजर थबकेल पाहून हा रंगीत बेधुंद निसर्ग सोहळा

    -- स्वाती ठोंबरे.

      November 29, 2021


  • पाऊस

    पाऊस असा हा पडताना
    वर्षाव, आठवांचा होतो
    बरसणाऱ्या सरिसरितूनी
    तू बिलगल्याचा भास होतो
    स्मरते, अजुनही ती पिंपर्णी
    अंतरी मी चिंब भिजुनी जातो
    पाऊस असा हा पडताना
    तुझा, गंध बकुळी दरवळतो
    रिमझिमता भावनांच्या स्मृती
    अंतरास, आजही मोहर येतो
    पाऊस असा हा पडताना
    तुझ्याच, आठवात मी दंगतो
    पाऊस,असा हा पडताना
    गड़गडाट, गतस्मृतींचा होतो
    मनभावनांची, ओढ़ अनावर
    जीव, व्याकुळ होवूनी जातो
    -- वि.ग.सातपुते.(भावकवी)
    9766544908
    रचना क्र.१२६.
    २९ - ४ - २०२२.

      May 27, 2022