(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मर्म जीवनाचे

    सत्यशाश्वत आणि अशाश्वत
    अनुभवल्याविना कळत नाही
    सत्यप्रेम म्हणजे काय असतं ?
    केल्याविना कधी कळत नाही...

    विरह देखील काय असतो ?
    भोगल्या शिवाय कळत नाही
    सुख, दुःख, वेदना देखील
    जगल्या शिवाय कळत नाही...

    फक्त मीच, हा व्यर्थ अहंभाव
    कधीच, कुणाचा टिकत नाही
    परदुःख नेहमी शीतल असते
    स्वदुःखाचा दाह साहवत नाही...

    जीवन पुर्वकर्माचा हिशेब सारा
    चुकविण्या शिवाय पर्याय नाही
    प्रेम घेणे, प्रेम देणे मर्म संचिती
    त्याविण जीवा मोक्षमुक्ती नाही..

    -- वि.ग.सातपुते (भावकवी)

    9766544908

    रचना क्र. २९०

    ७/११/२०२२

      November 18, 2022


  • झगडणारे जीवन

    गर्भामधूनी बाहेर पडतां,

    स्वतंत्र जीवन मिळे ।

    जीवन रस हा शोषित होती,

    आजवरी त्याची मुळे ।।१।।

    निघून गेला पदर मायेचा,

    डोईवरूनी त्याचा ।

    झेप घेयी तो आज एकला,

    पोकळीत नभाच्या ।।२।।

    दु:ख क्लेशाचे वार झेलले,

    कुणीतरी त्याचेसाठीं ।

    आज दुवा नसता

    सारे पडती पाठी ।।३।।

    तेच रक्त परि फिरत होते,

    शरीरी त्याच्या सारे ।

    वंशाने जे मिळे त्याला,

    जीवन झगडा देणारे ।।४।।

    --डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      April 20, 2016


  • काव्य कलश

    ही दया कुणाची झाली, सापडे शब्दांचा झरा ।

    उपसतो जरी सतत, होत नसे निचरा ।।

    गोड पाणी शब्दांचे, ओठी अमृत वाटे ।

    पेला भरता काठोकाठ, काव्य हृदयी उमटे ।।

    पेला पेला जमवूनी, कलश भरून आला ।

    नाहून जाता त्यात, देह भान विसरला ।।

    सांडता पाणी वाहे, परसते चोहीकडे ।

    आस्वाद घेई जो जो, विसर जगाचा पडे ।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      December 30, 2019


  • समस्त दारू पिणार्‍यांना सादर अर्पण

    ।। विषय जरी दारु असला तरी !
    ।। कविता सुंदर आहे न घेणाऱ्यालाही हसवेल !

    ।। पिऊन थोडी चढणार असेल
    ।। तरच पिण्याला अर्थ आहे
    ।। एवढी ढोसून चढणार नसेल
    ।। तर आख्खा खंबा व्यर्थ आहे

    ।। मी तसा श्रध्दावान
    ।। श्रावण नेहमी पाळतो
    ।। श्रावणात फक्त दारू पितो
    ।। नॉनव्हेज मात्र टाळतो

    ।। ज्याची जागा त्याला द्यावी
    ।। भलती चूक करू नये
    ।। पिताना फक्त पीत रहावं
    ।। चकण्यानं पोट भरू नये

    ।। वेळच्या वेळी आपण ओळखावी
    ।। आपली आपली आणिबाणी
    ।। लाज सगळी सोडुन देऊन
    ।। ग्लासात घ्यावं लिंबुपाणी

    ।। पिऊन तर्र झाल्यानंतर
    ।। काय खातोय ते कळत नाही
    ।। खाल्ल्यानंतर बिलामधली
    ।। टोटल कधी जुळत नाही

    ।। अशीही वेळ असते जेंव्हा
    ।। कोणीच आपला नसतो
    ।। म्हणून आपण प्यायला जातो
    ।। तर नेमका ड्राय डे असतो

    ।। असं उगीच लोकांना वाटतं
    ।। की दुःख दारूत बुडून जातं
    ।। दुःख असतं हलकं हलकं
    ।। अल्कोहोलसोबत उडून जातं!

    ।। एकदा प्यायला बसल्यानंतर
    ।। तुझं-माझं करू नये
    ।। तुझी काय, माझी काय
    ।। नशा कधी सरू नये

    ।। तुला जायचंच असेल तर निघून जा ,
    ।। जाण्यासाठी भांडू नकोस
    ।। प्यायची नसेल तर पिऊ नको ,
    ।। पण दारू अशी सांडू नकोस

    ।। स्कॉच प्यावी कोरी, कच्ची
    ।। बर्फ नको, सोडा नको
    ।। उंच आभाळी उडण्यासाठी
    ।।पंख हवे... घोडा नको !

    ।। फॉरीन लिकर कितीही प्यावी
    ।। काही केल्या चढत नाही
    ।। देशी आपली थोडीशीच प्यावी
    ।। दोन दोन दिवस उतरत नाही

    ।। पिणं असतं आगळा उत्सव
    ।। त्याचा उरूस होऊ नये
    ।। प्यायला नंतर आपला कधी
    ।। वकार युनूस होऊ नये

    ।। घरी बसून दारू प्यायचे
    ।। खूप सारे फायदे असतात
    ।। हॉटेलमधे, बिल भरायचे
    ।। काटेकोर कायदे असतात

    ।। आम्ही कधीच दारूमधे
    ।। दुःख आमचं बुडवत नाही
    ।। दारू नेहमी शुध्दच ठेवतो
    ।। भेसळ आम्हाला आवडत नाही

    ।। हवा तसा मी चालतो आहे
    ।। कोण म्हणतंय ' जातोय तोल ?
    ।। माझ्या मित्रा, माझ्या इतकी
    ।। पचवून दाखव, नंतर बोल!

    ।। प्रत्येक पार्टीत आपण बोलवावे
    ।। काही ' न ' पिणारे मित्र
    ।। पार्टीनंतर आपल्याला
    ।। आपल्या घरी नेणारे मित्र

    ।। पिणाऱ्यांनी समाजाचा
    ।। कुठलाच कायदा पाळू नये
    ।। जेंव्हा, जिथे, जशी वाटेल
    ।। प्यायचा मोह टाळू नये

    ।। ग्लासी लागेल ते ढोसत असतो
    ।। पानी लागेल ते चरत असतो
    ।। जेंव्हा माझं बिल कोणी
    ।। दुसराच माणूस भरत असतो

    ।। काय होतंय, कुठे होतंय
    ।। काही केल्या कळत नाही
    ।। एकदातरी वेळ अशी
    ।। पिणाऱ्यांना टळत नाही

    ।। प्रत्येकानंच आपला आपला
    ।। जसा घ्यायचा असतो श्वास
    ।। तसा प्रत्येकानं आपला
    ।। सांभाळायचा असतो ग्लास....

    ।। समस्त दारू पिणा-यांना सादर अर्पण

      May 16, 2019


  • दर्शनाची ओढ

    पांडूरंगाचे दर्शन घेण्या, गेला पंढरपूरी ।

    चुकली नाही कधीही, आषाढी कार्तिक वारी ।।

    आजपरी शरीर दुबळे साथ देईना ।

    मन तजेले दर्शन घेण्या हट्ट सोडीना ।।

    आधार घेऊनी आज कुणाचा गेला पंढरपूरी ।

    भरून आले डोळे त्याचे बघता शिखर मंदिरी ।।

    आशा नव्हती थोडी देखील दर्शन मिळण्या तेथे ।

    अंगणीत जमले भक्त गण नाचत सारे होते ।।

    चार दिवस पडून होता विठ्ठल विठ्ठल गजरी ।

    फिरणे नाही मागे अशी मनीची तयारी ।।

    गेला नाही कण अन्नाचा चार दिवस पोटी ।

    ध्यास लागला मनी एकची त्याच्याच भेटीसाठी ।।

    टाळ मृदुंग विठ्ठल नामी एक रूप झाला ।

    नाचत नाचत प्रभू चरणी येऊन तो पडला ।।

    विलीन झाला अनंतात तो फिरूनी नाही उठला ।

    देह सोडूनी पांडूरंगी चरणी वैकूंठी गेला ।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      August 10, 2016


  • निद्रिस्त ज्वालेचा अंगार फुलला

    निद्रिस्त ज्वालेचा अंगार फुलला
    कवितेचा जन्म कवी कल्पनेत साकारला
    तमा न कसली न फिकीर कशाची
    कवीच्या अंतरी नसते कमी शब्दांची
    कवी मन असते वेगळे हळवे हृदयी
    म्हणुनच सुचतात काव्यमाला कवी मनातुनी
    वेदनांचे अंगार भावनांचा कोरडा बाजार पाहता
    मोहरतात जाणिवा कवीच्या अलगद मनात तेव्हा
    कुठलेही काव्य करतो कवी अंतरातुनी
    शब्दांची मात्रा चालते कवीच्या श्वासातुनी
    पेटतो दाह उडतात अनेक जळत्या ठिकऱ्या
    कोमजते कवी मन न कळते कुणास कवी भावना
    परी कवितेवर प्रेम करतो कवी शब्दातुनी जरा
    इतरांच्या अव्यक्त भावनांना साकार करतो सदा
    दुःखाचे उमाळे मनाचे करपणे भावना विरता
    कवीच्याही आयुष्यात असतात अनेक वेदना
    परी कवी निर्मितो शब्द सांधून काव्यांला
    रसिकांना आनंद देतो कवी कवितेतून हलकासा
    -- स्वाती ठोंबरे.

      November 19, 2021


  • डबक्यातले बेडूकराव

    (भारताने न्यूझीलंडमध्ये सपाटून मार खाल्ला. साउथ आफ्रिकेत चालू असणाऱ्या वर्ल्ड कप २००३च्या पहिल्याच सामन्यात आपल्या टीमने ऑस्ट्रेलियाकडून पुन्हा नामुष्कीचा पराभव खाल्ला. काय म्हणावे या कर्माला?)

    वाघाची डरकाळी
    सिंहाची गर्जना
    कागदी वाघ
    करतात वल्गना

    चिखलातले बेडूकराव
    करतात डराव डराव
    तट्ट फुगले तर काय
    नंदीश्वर होतील काय?

    गाढवाने पांघरले
    वाघाचे कातडे
    म्हणून काय त्याचे
    लपेल ओरडणे?

    आपलाच डंका
    आपणच पिटायचा
    मूर्खाचे लक्षण
    विकत आताचा तमाशा

    -- विनायक अत्रे.

      July 10, 2022


  • देह

    देह - बाळपणीचा सुखावणारा
    मातापित्यांना
    घरच्यांना दारच्यांनाही
    मऊ, रेशिमस्पर्शी
    पहाटेच्या कोवळ्या दवबिंदूसारखा..
    देह - यौवनातला ...सुखवणारा
    इतरांना....स्वत:लाही
    रेशिमस्पर्शी सुख देणारा
    भोगणारा
    भर्जरी वस्त्रालंकारांनी मिरवणारा
    गर्वोन्नत - टपोऱ्या गुलाबपुष्पासारखा...
    देह - मावळतीचा काहीच न सोसणारा
    दुःखच नव्हे तर सुखही...
    जर्जर.. सायंकालीन सूर्यफुलासारखा..
    मान्य आहे, तसा कुठल्याच संबंधांना
    देहावाचून अर्थ नाही
    तरीही तुझ्या-माझ्यात असावं
    देहापलिकडचं काही
    हातात घेतलेले हात नि आलिंगन
    ही असावी फक्त लिपी
    पण भाषा असावी आत्म्याची..
    तरच...
    रिझू विझू डोळ्यांनी
    एकमेकांकडे पाहताना

    कडवट औषधांच्या गंधात
    नि जीव वाचवणाऱ्या शस्त्रांच्या सोबतीत
    जाणीव होईल
    संगमरवरी सौंदर्याच्या आड
    दडलेल्या रक्त-मांस-अस्थिच्याच फक्त अस्तित्वाची
    तेव्हाही आपण गाऊ वसंतातली प्रीतीगीतं
    त्याच उत्कटतेनं
    जशी गाईली होती.
    देहाला वसंताची पहिली पालवी फुटताना…..

    -सौ. राजलक्ष्मी देशपांडे

      May 10, 2023


  • तुझ्याच स्वप्नात रंगले मी

    "तुझ्याच स्वप्नात रंगले मी"

    साजणा, तुझीच स्वप्ने पाहत होते

    तुझ्या स्वप्न-प्रेमात मी दंग होते

    अवचित नयन उघडता नवल घडले,

    साक्षात तुझ्या मिठीत मी उभी होते.

    अजुनी अर्धोन्मीलित नेत्र माझे

    त्या आवडत्या धुंदीत विसावलेत

    ही तुझी मिठी, हा तुझा स्पर्श,

    अजुनी मला स्वप्नवत भासताहेत.

    नको करूस आग्रह डोळे उघडण्याचा

    असेच मला तुला पाहू दे

    तुझ्या हाताची कव माझ्या कटीभोवती,

    अशीच आयुष्यभर राहू दे.

    ..मधु दारसेवाड..

      May 22, 2022


  • भेटीगाठी

    अशाच येती भेटीगाठी
    गतजन्मीची घेऊनी नाती
    मित्र म्हणा वा म्हणा सोबती
    ओळख ती ती आतापुरती llधृll

    कितीक असुनी अवतीभवती
    चारांचीच मग होते गणती
    अंतरातले प्रेम नांदते
    विश्वासाच्या बांधून भिंती ll१ll अशाच येती भेटीगाठी ...

    झुरणे मरणे नाही वायदे
    इथे न कसले नियम कायदे
    प्रेमच भाषा प्रेमच मनीषा
    प्रेमच केवळ आदी अंती ll२ll अशाच येती भेटीगाठी ...

    खेळ चालतो असा निरंतर
    कुणी हरवती कुणा शोधती
    हरवणेच परी उरते नंतर
    शोधशोधुनि भेटीअंती ll३l lअशाच येती भेटीगाठी ...

    ....मी मानसी

      June 5, 2019