ती आणि तो
खरे चर्चेचा विषय असतात
अर्थात दुसऱ्याच्या दृष्टीने
त्यांना विचारा..
ते सहजतेने म्हणजे ईझींली घेतात
पण…..हा पण महत्वाचा असतो
जेव्हा ब्रेंक अप होतो तेव्हा मात्र
चर्चा सुरु होतात..
त्या दोघांच्या मनात देखील
ब्रेंक अप हा शब्द इतका रूढ होतो
त्यातला तो किवा ती
कधीकधी
ह्या शब्दापार असतात….
काहीच वाटत नाही
आणि मग दोघांच्या बाबतीत शेवटी कधीतरी
फक्त व्यवहार उरतो
जो लग्न नावाच्या
मांडवाखाली उरकला जातो……..
— सतीश चाफेकर.
Author
Post Views: 12