कडाक्याची थंडी, दात कुडकडुती,
हात-पाय गार, काटे अंगी येती
नकोसा वाटतो, मजला हिवाळा,
वाट मी बघतो, येण्या तो उन्हाळा
सुकूनची जाते, हिरवे ते रान
शरिर राहते, घाम निथळून
लाही लाही होता, त्रस्त होई जीव,
शोधण्या ते ढग, मन घेई धाव
थांबवितो कामे, वादळी तो वारा,
पर्जन्याचा मारा, पडताती गारा
पाणी चहूकडे, वाटते सुकावे,
वर्षा ती जावूनी, सुक्यात खेळावे
आपल्या जे हातीं मन नसे त्यांत
सुख त्यांच्यांत पाही, नसे जे हातात
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
February 14, 2019
मित्रांनो, “हारूनी पाहू या , जिंकुनी पाहू या ” ही मराठी गझल आपल्यासाठी सादर करीत आहे.
June 28, 2018
तेच दिवाळीचे दिस
तोच आनंद उल्हास
परि बाबा-आई माझे
मज दिसले उदास.....
कसे जुळावे गणित
नव्या खाऊ कपड्यांचे
अन् खुलेल मानस
सान कोवळ्या जीवाचे
इथे वाढती असोशि
तिथे मन कासावीस
तेच दिवाळीचे दिस....
कधी आईचा दागिना
कधी एखादा ऐवज
जाई सावकारा हाती
खुल्या मनाने सहज
अन् सजली दिवाळी
मला हवी तशी खास
तेच दिवाळीचे दिस...
आज काही नाही उणे
तरी उरलेच देणे
आई-बाबांनी दिलेले
सहजची मुकपणे
मग ओलावती डोळे
मनी उरतात भास
तेच दिवाळीचे दिस...
आणि आई- बाबा माझे
होते दिसले उदास...
.....मी मानसी
October 31, 2019
भोपाळ येथे विषारी वायुमुळे एका रात्रीत सहस्त्रावधी लोक मृत्यूमुखी पडले. ४.१२.८४ ची रात्र...
एक भयानक रात्र अशी,
सहस्त्रावधींचा घेई बळी ।
नियतीच्या खेळामधली,
कुणा न समजे ही खेळी ।।१।।
मध्यरात्र होऊन गेली,
वातावरण शांत होते ।
गादीवरती पडून सारे,
स्वप्ने रंगवीत होते ।।२।।
तोच अचानक विषारी वायू,
पसरला त्या वातावरणी ।
हालचालींना वाव न देता,
श्वास रोखीले स्वप्न थांबवूनी ।।३।।
कित्येक जनांचे बळी घेतले,
काळ्या काळाने ।
शांत निद्रेची महा निद्रा,
करूनी टाकीली क्षणात त्याने ।।४।।
भरडून गेले सारे परि,
पापी वा पुण्यवान ते ।
कळला नाही हिशोब त्याचा,
मोजमाप काय असते ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
December 9, 2015
टीप : माझी ही रचना, पुणे आकाशवाणीकेंद्रावरून प्रसारित झाली आहे, तसेच माझ्या काव्यसंग्रहामध्ये प्रसिद्ध झाली आहे.
ये रे ये घना | तोषवी तना |
तुझी ही धरा | करी प्रार्थना || ध्रु ||
हाय ! त्या ग्रिष्माने, केली रे होळी |
पुरे पुरे आता, राख-रांगोळी |
सुकल्या माझिया देहावरी,
जल शिंपना | ये रे ये घना | ये रे ये घना .....|| १ ||
व्याकुळ मी ही, तरु-वेलीही |
आटले सारे, नद्या-नालेही |
वाट पाहुनी, तुज हाकारी |
तुझी मेघना | ये रे ये घना | ये रे ये घना . || २ ||
तापल्या तनुला, तुझीच आंस |
तुझिया स्पर्शाचा, ओला सुवास |
अधिर, आतुर, मिलन क्षणाची |
भूक भागवना | ये रे ये घना | ये रे ये घना ... || ३ ||
तुझ्यावाचुनी, कोंब ना उगे |
पक्षी पाखरे, कोण रे जगे ?
कैसे विनवू ? तूची सांग ना |
पुरवी कामना | ये रे ये घना | ये रे ये घना .. .|| ४ ||
केव्हांची तुला , साद घालते |
ये रे ये झणी, तुज झेलते |
रिमझिम त्या, तालावरी |
करी नर्तना | ये रे ये घना | ये रे ये घना.... || ५ ||
सखया अंबरी, कां रे थांबला ?
लपंडाव हा, फार लांबला |
विरह, वेदना, सोसू मी कशी ?
सोसे न यातना | ये रे ये घना | ये रे ये घना ..|| ६ ||
क्षमावंत तू, क्षमाशील तू |
हाकेला देवा, धावशील तू |
चुकला मानव, तो ही आळवी |
हे दयाघना | ये रे ये घना | ये रे ये घना....... || ७ ||
©कवी : उपेंद्र चिंचोरे
May 9, 2016
थोडंसं झुकून माझ्या डोळ्यांवर , तुझ्या पापण्या ठेव,---
त्यांच्यातील ओलावा घे टिपून, अलगद हृदयापर्यंत थेट,---
जखमी मनाला असा दिलासा,
तूच देऊ शकशील बघ,
घायाळ मनाची करूण व्यथा, तुलाच फक्त समजेल,---!!!
त्यातली शल्यें, टोंच, बोंच, त्यातला सगळा आक्रोश,
तुझ्यापर्यंतच ना पोहोचेल,-? रक्ताळलेला तो प्रत्येक अश्रू , बघण्याची, पुसण्याची कुवत,--- तुझीच असते नेहमीच,---!!!
त्या दुःखाला जीवघेण्या,
सुखात करतोस परावर्तित,
ही अशी जादू विलक्षण,
येते तरी तुझ्याकडे कुठून,--? वाटते कधी,-- सगळं संपलं,
कडेलोटाकरता उभे आपण,
पण तुझा जादू - ई-- स्पर्श,
थरारून उठते सगळे तनमन,--
लहान वाटतं दुनियेचं वर्तुळ,
इतकं मोठ्या आकाराचं,
माझं तुझं प्रेमावकाश,--!!!
कधीतरीच छळतं एकटेपण,
आसवं गळतात डोळे मिटल्यावर, यातना वेदनांची ती सरमिसळ, मध्ये भासतोस तू ,-उभा पहाड, खडा होतो कोसळता जीव, सामावण्यासाठी तुझ्या मिठीत यातना वेदना पडतात मागेच,
येऊन तू करतोस अमृतस्पर्श,--!!!
© हिमगौरी कर्वे.
October 21, 2019

(काहीं मुक्तक)
या ‘गटारी’च्या सुमुहूर्तीं, चला रे पीत बसूं
दाखवून चुस्तीफुर्ती, चला रे पीत वसूं ।।
मंजूरच साऱ्या शर्ती, चला रे पीत बसूं
श्रेष्ठ फक्त इच्छापूर्ती, चला रे पीत बसूं ।।
ही मदिरा चिंताहर्ती, चला रे पीत बसूं
ती जीवन-रक्षणकर्ती, चला रे पीत बसूं ।।
ती चिरहर्षाची मूर्ती, चला रे पीत बसूं
ती नित्य देतसे स्फूर्ती , चला रे पीत बसूं ।।
ती जगाचीच उद्धर्ती, चला रे पीत बसूं
ती सार्यांची संस्कर्ती, चला रे पीत बसूं ।।
अमुच्या भाराची धर्ती, चला रे पीत बसूं
ती राज्ञी चक्रवर्ती, चला रे पीत बसूं ।।
शकात होउन भर्ती, चला रे पीत बसूं
नच पर्वा, ‘को जागर्ती’, चला रे पीत बसूं ।।
पोचूं स्वर्गीं वा गर्तीं, चला रे पीत बसूं
वाढेलच अंतीं कीर्ती, चला रे पीत बसूं ।।
गटारी: ‘गटारी अमावस्ये’चा सण
चुस्ती: चापल्य, चपळपणा
फुर्ती: शीध्रता, घाई
शर्ती: अटी
उद्धर्ती: उद्धार करणारी
संस्कर्ती : संस्कार करणारी
भाराची धर्ती: भार उचलणारी / वाहणारी
राज्ञी: राणी
प्राशक: पिणारे
भर्ती: प्रविष्ट, सामील
‘को जागर्ति’: ‘कोण जागें आहे ?
गर्तीं : खड्ड्यात , पाताळात
-- सुभाष स. नाईक.
December 28, 2024
आला, आला, आला श्रावण
August 17, 2021
रिक्त झालीस तू , लुटवूनी प्रेमाचा घट //
भावंडाचे संगोपन
रमवूनी त्यांचे मन
आईच्या कामी मदत देऊन
आनंदिले बालपणी, गीत गावूनी नीट //१//
रिक्त झालीस तू , लुटवूनी प्रेमाचा घट
लक्ष्य संसारी
प्रेम पतीवरी
मुलांची जोपासना करी
संसार सुखाचे प्याले, भरी काठोकांठ //२//
रिक्त झालीस तू , लुटवूनी प्रेमाचा घट
होता मुले मोठी
संसार त्यांचा थाटी
राहुनी त्यांचे पाठी
सुखासाठी त्यांच्या, करी देहकष्ट //३//
रिक्त झालीस तू , लुटवूनी प्रेमाचा घट
ईच्छा उरली नसे मनी
लक्ष्य सारे प्रभू चरणी
सर्वस्वी त्यासी अर्पुनी
विनवी ईश्वारासी, डोळे आता मिट //४//
रिक्त झालीस तू , लुटवूनी प्रेमाचा घट
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
September 13, 2020
एकाच दिशेने जातां,
प्रभू मिळेल सत्वरी,
रेंगाळत बसाल तर,
गमवाल तो श्री हरी ।।१।।
तुम्ही चालत असतां,
अडथळे येती फार,
चालण्यातील तुमचे,
लक्ष ते विचलणार ।।२।।
ऐष आरामी चमक,
शरिराला सुखावते,
प्रेम, लोभ, मोह, माया,
मनाला ती आनंदते ।।३।।
शरिराचा दाह करी,
राग द्वेष अहंकार
मन करण्या क्षीण,
षड् रिपू हे विकार ।।४।।
सुख असो वा ते दु:ख,
बाह्यातील अडथळे
सारेच सारता दूर,
प्रभू तुम्हास मिळे ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
November 3, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti