गजानना, सृष्टि ही चराचर तुझेंच प्रिय लेकरू
विश्वपसारा तुझी कृती, तव स्तवन चहुंकडे सुरूं ।।
‘न’ चें रक्षी द्वित्व. नारि-नर, भूचर, तरु-लतिका
‘ज’कार रक्षी, गजानना, जलचर अन् कृमि-कीटकां
‘ग’कार तव रक्षी गगनींचें प्रत्येकच पाखरूं ।।
संथ करत तव मंत्र-पठण, गायी ‘ॐ गँ गणपती’
नित करतो तव जप पोपट, कुक्कुट काकड-आरती
कोकिळ-कंठा लागे सुमधुर अथर्वशीर्ष स्फुरूं ।।
शिशूमुखातुन भाषेआधी ‘गँ’ उच्चार फुटे
दर कंठीं निद्रेत, लयीनें ओंकारच उमटे
नाद-अनाहत मृत्युपथीं ‘गँ गँ’ लागे बहरूं ।।
गातें जग, तूं मातृ-पिता, सर्वस्वच गणदेवा
मित्र-बंधु तूं, तूं विद्या , तूं ओजस ज्ञानदिवा
ने मोक्षाप्रत, हे गजमुख पथदर्शक परमगुरू ।।
- - -
- सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
September 6, 2016
रंग गुलाबी शराबी,गाली तुझ्या फुलले,
मदनबाण नयनातुनी, पाहता-पाहता निसटले,--!!!
जाई जुई कोमलांगी,
नाजूक तन साचे,
अंगकाठी शेलाटी,
सोनचाफ्याचे फूल नाचे,--!!!
वर्ण तुझा केतकी,
मिठास शब्द बोले,
कुंदकळ्यां नाजूकही,
दंतपंक्ती जणू भासे,--!!!
वाटे चालते-बोलते,
फूल तू सायली,
गेंद टपोरे झेंडूचे,
केशरवर्खी उरोजही,--!!!
जाता तू जवळुनी,
मनमोगरा फुलतसे,
उमलत हरेक पाकळी,
जिवाचे कमळ बहरतसे,--!!!
मंजुळ स्वर ऐकुनी,
भोवती सडा प्राजक्ती,
फुलांचा सुगंध येई,
सुंदरी तुझ्या सहवासें,--!!!
हिरवा चाफा दडुनी,
लज्जेत तुझ्या बसे,
प्रीत फुले मात्र फुलती,
काळजांची पर्वा नसे ,--!!!
सौंदर्याचा मी पुजारी,
विनवतो तुला प्रेमे,
प्रसन्न हो ग देवी,
भक्तकल्याणा कारणें,--!!!!
© हिमगौरी कर्वे
February 20, 2020

कृष्ण पक्षातील चतुर्थीला
चला करूया गणेशाची आराधना
संकटातूनी मुक्ती देणारा
दिवस आजचा करू साजरा
विघ्नहर्ता तू गणेशा
वाहतो तुला एकवीस दुर्वा
कर आमचा तू गणेशा
संकटांचा मार्ग मोकळा
मोदकाचा घास भरवितो
जास्वंदीचे फुल वाहतो
रक्तवर्णा श्री गणेशा
तुझ्या पायी मी नतमस्तक होतो
उमेश तोडकर
June 9, 2026
(काव्य, १५ ऑगस्ट २०१८ स्वातंत्र्यदिनाप्रीत्यर्थ )
आम्ही स्वतंत्र झालो , आम्ही स्वतंत्र आहो
स्वातंत्र्य हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
गर्जलो, “गटापुढती कुठल्या न नमवुं माथा”
अन् ‘पंचशील’-तत्वीं विश्वास पूर्ण होता
बदललो परी नंतर, नाहीं ‘अलिप्त’ उरलो
त्या पंचशील-तत्वा पुरते अम्ही विसरलो
निज राजकारणाचा अभिमान , परी, लाहो ।।
‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
प्रगतिचें नांव घेउन वाढत ‘आयात’ राही
परकीय-चलन सरलें, आश्चर्य यात नाहीं
गंगाजळीच संपे , हातीं कटोरा धरला
जागतीकरण मारी देशी उद्योगाला
इंडस्ट्री ग्रस्त अजुन, ऐशीच ध्वस्त राहो ।।
‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
मुठभर सुदूरदेशीं ‘आय्. टी.’ मधून जाती
झालें भलेंच, होवो, पण लाख अन्य मरती
जणुं बनवतां न येती ‘कंझ्यूमर-गुडस्’सुद्धा
परदेश धरत लावुन ‘आयात-शुल्क’-मुद्दा
उणवलें शुल्क, प्रार्थत, ‘चलनी-प्रवाह वाहो’ ।।
‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
बेकायदाच रस्ते भूमीत बांधुनीया
साळसूद-देश म्हणे, ‘आमुच्या संगतीं या’
शेजारी, जो अपुला ‘व्यापार-पार्टनर’ही
घुसती दहशतवादी, त्यांना आधार देई
कळुनही विसंगति, कां, तूं गप्प वज्रबाहो ।।
‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
परदेशी-कंपन्यांची चंगळ बहू जहाली
देशी उत्पादनांचा आलेख जाइ खाली
बेरोजगार वाढत , पसरते हलाखीही
डोळ्यावरील अमुच्या हटतच ‘झापड’ नाहीं
वदतो , ‘शाबास ! ऐशा प्रगतीत देश नाहो !’
‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
कळलेंच ना अम्हांला दुर्दैव हाय ! अमुचें
बनलो ‘अधीन’ आम्ही परदेशवासियांचें
पश्चिम व पूर्व इथुनी ‘कंटेनर’ रोज येती
नागरीक बेपर्वा , तो विकत माल घेती
‘टोचणी’स निजलेल्या, निद्रा अशीच वाहो ।।
‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
निज चालते न मर्जी, कैसा असे स्वतंत्र ?
परकीय गारुड्यांचे चालती येथ मंत्र
राष्ट्रें पुढारलेली पिरगाळतात हाता
उघडलें दार आम्हिच, सार्या उगाच बाता
बोळ्यानें दूध पितो, त्या काय म्हणावें हो ?
‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
किति ही अदूरदृष्टी ! लांबचा विचार नसे
पत्ता न, पतन-खड्डा पायाखालीच असे
शेतें उजाडलेली , पुरते न वीज, पाणी
आयुष्य जाहलें हें, ‘अघोषित-आणिबाणी’
‘जयकार’ झाकतो की - जन फोडतात टाहो ।।
स्वातंत्र्य हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
ऐसे नव्हे , कुणाला कांहींच ठावकी ना
प्रतिसाद मिळेल कसा कोणाचिया प्रयत्नां ?
करण्यांस साध्य, कोणां उरली न संधि कांहीं
लागली चटक, त्याला रोखणें शक्य नाहीं
एकल्या-यत्नवंतां लोभी-जगत् न दाहो ।।
‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
सगळेंच सत्य, दोस्ता, अतिशयोक्ती न कांहीं
सारेच आपण दोषी, तूंही, तसाच, मीही
चकमा न खाउं, जोखूं अपुलेंच आपण स्वत्व
दावूं ममत्व कोठें , देऊं कशां महत्व
ठरवूं या - हृदयिं खरें निजदेशहितच राहो ।।
स्वातंत्र्य हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
- - -
लाहो : लाभो, मिळो, प्राप्त होवो
वज्रबाहू : ज्याचे हात वज्राप्रमाणें आहेत असा
(अर्थात्, आपल्या सेनेमधील वीर सैनिक )
-
- सुभाष स. नाईक
( M- 9869002126).
August 16, 2018
करूं म्हटले करूं न शकलो रोकू म्हटले रोकू न शकलो
जे जे स्फूरले येईल ते ते ठरले असते होईल ते ते १
बघूनी बाह्य जगला ठरवी मिळवीन तेच सुख भावी
त्याचेसाठी स्थिती आगळी उमज न येई ती सगळी २
धडपड करीतो गडबड करीतो त्याच चाकोरीतूनी जाऊ लागतो
सुप्त गुण हे अंगी लपले उभारून ते येतील सगळे ३
मात करूनी विचारावरती सुप्त गुण हे विजयी होती
गुणधर्म ही ईश्वरी योजना घडते तेच म्हणूनी क्षणाक्षणा ४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
March 21, 2021
दिसत नाही काय तुला, त्याच्या मधला ईश्वर ।
‘अहं ब्रह्मास्मी’ सूत्र कसे मग, तुजला कळणार ।।
देह समजून मंदिर कुणी, आत्मा समजे देव ।
त्या आत्म्याचे ठायी वाहती, मनीचे प्रेमळ भाव ।।
आम्हा दिसे देह मंदिर, दिसून येईना गाभारा ।
ज्या देहाची जाणीव अविरत, फुलवी तेथे मन पिसारा ।।
लक्ष केंद्रीतो देहा करीता, स्वार्थ दिसे मग पदोपदी ।
विसरून जातो सहजपणे, अंतर्मनातील देव कधी ।।
माझ्यातील देवही विसरणे, स्वभाव असेल जर माझा ।
कशी दिसेल दुजामधली, मग ती ईश्वरी ऊर्जा ।।
जाणून घे तू अस्तित्व त्याचे, सर्व जीवांच्या अंतर्यामी ।
म्हणशील त्याला ईश्वर तू , अन् ईश्वर आहे मी ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
February 17, 2016
सासू : अगं अगं सूनबाई
सून : काय म्हणता सासूबाई?
सासू : माझा गाऊन तू, काय गं केला ?
सून : भांडीवाल्या बाईच्या मुलीला दिला.
सासू : अगं अगं सून बाई
सून : काय म्हणता सासूबाई?
सासू : माझं घड्याळ तू, पाहिलेस का गं ?
सून : चुन्याची डबी रोज जातं मागं.
सासू : अगं अगं सूनबाई
सून : काय म्हणता सासूबाई?
सासू : माझा विग तू, काय गं केला ?
सून : क्लबच्या नाटकात हिरॉईनला दिला.
October 17, 2018
कुसुमे कल्पनांची,
तुझ्या चरणी वाहिली,
शब्दांची मांदियाळी,
तुजसाठी मांडली,---!!!
अर्थपूर्ण रचनांचे,
हार तुज घातले,
रसिकांची पावती,
तुज चरणी अर्पियली,---!!!
प्रतिभा देवी तुला वंदिते,
दिनरात कशी मी,
वरदहस्त तुझा राहो,
इतुकी चरणी विनंती,---!!!
हात माझे "थोटेच" की,
तुझ्या "यथासांग" पूजेसाठी,
"चूकभूल' घडता देवी ,
लेकरू" म्हणुनी पदरात घेई,---!!!
काव्याची सर्व बंधने,
दिली मी झुगारूनी,
भावली ती कविता,
प्रांजळ शब्दी मांडली,---!!!
प्रामाणिक भाव त्यात,
नाहीत शब्दांचे खेळ,
अंतरांना स्पर्श करणे,
एवढाच हेतू एक,----!!!!
कृपास्पर्शे, तुझ्या,
होते मी धन्य,
चरणी लीन अशी,
भावनाही अनन्य,---!!!
तुझ्या कारणे,
हृदये जिंकली,
दाद देत कशी,
मने जवळ आली,---!!!
तुझिया प्रसन्नतेने,
कविता माझी झाली,
दुसरे काय मागावे ,
पुण्याई फळास आली,---!!!
भाषाई माझी थोर,
मस्तक तिच्यापुढे झुकवते,
माध्यमातून तिच्याच,
तुज काव्यकुसुमे वाहते,---!!!!
हिमगौरी कर्वे.©
February 10, 2019
एक दिवस असा येतो,
की मन रडतं... पण डोळे रडत नाहीत.
ओठांवर हजारो शब्द असतात,
पण ते उच्चारण्याची इच्छाच उरत नाही.
कारण अनुभव शिकवून जातो...
प्रत्येक गैरसमज दूर करता येत नाही,
प्रत्येक नातं शेवटपर्यंत टिकत नाही,
आणि प्रत्येकाला आपल्या मनाची किंमत कधीच कळत नाही.
खूप समजावून पाहिलं,
खूप वेळा स्वतःलाच चुकीचं ठरवलं,
फक्त नातं टिकावं म्हणून
स्वतःचं मन हजारदा मोडलं.
पण एक क्षण असा येतो,
जेव्हा मन थकून म्हणतं
"आता पुरे...
ज्यांना माझं मौनही समजत नाही,
त्यांना माझे शब्द तरी काय समजणार?"
मग राग संपतो,
अपेक्षा विरघळून जातात,
आणि उरते फक्त एक शांत स्मितरेषा,
जी खूप काही सहन करूनही
कुणालाच दोष देत नाही.
आजही मनात प्रेम आहे,
आदर आहे, आठवणी आहेत.
पण मागे वळून हाक मारण्याची
सवय मात्र कायमची सुटली आहे.
कारण आता समजलंय...
जिथे आपल्या भावनांची किंमत राहत नाही,
तिथे शब्दांचाही अर्थ उरत नाही.
म्हणून काही नाती सोडून द्यावी लागतात...
आणि काही माणसं
फक्त आठवणीतच ठेवावी लागतात.
•ॲड. कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो.: ९०११८४१२१२
June 23, 2026
ही पुण्यदा गंगामाई
हिचाच अगम्य डोह
डुंबता मनी प्रसन्नता
तिचाच मजला मोह
सुखदुःखा गिळूनिया
अविरत तिचा प्रवाह
नाही कुणाचाच द्वेष
तिचाच मजला मोह
ती विरक्तीचा सागर
तिच्यात शमतो दाह
ती भगिरथाची गंगा
ठायी तिच्या निर्मोह
जीवनांतीगंगोदक
दृष्टांत मुक्तीचा सोहं!
(सोहं --- ब्रह्मानंद!)
-- वि. ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र.१५०.
१३ - १२ - २०२१.
December 18, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti