(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • तन्मयतेत आनंद – प्रभू

    सतत गुंतलो आहो सारे
    शोध घेण्यास त्या 'आनंदाला'
    युगानूयुगे प्रयत्न होतो
    मिळवण्यासाठींच प्रभूला...१

    बाह्य जगाचे सुख आगळे
    लागले सारे त्याच्या पाठीं
    'देह सुख' अंतीम वाटे,
    खरा 'आनंद' देण्यापोटी...२

    'ज्ञानामध्ये' भरला 'आनंद'
    समजूत झाली ही कांहींना
    लेखक, कवी, साहीत्यिक हे
    पाठ त्याची कांहीं सोडीना...३

    साधू संत हे थोर महात्मे
    आनंद शोधूती 'विश्रमांत'
    'ध्यान' लावून एक मनानें
    शांत होवूनी डूबती त्यांत...४

    आनंदची 'मोक्ष' असून
    ध्येय साऱ्यांचे त्याजकडे
    मार्ग सर्वांचे वेगळे असून
    'तन्मयता' खेची प्रभूकडे...५

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      October 21, 2015


  • शिळा झालेल्या अहिल्या

    आजही बऱ्याच अहिल्या पडल्या शिळा होऊनी
    कांहीं पडल्या वाटेवरी कांही गेल्या उद्धरुनी

    कित्येक होती अत्याचार अबला स्त्रीयांवरी
    उध्वस्त करुनी जीवन शिळा त्यांची करी

    काय करील ती अबला डाग पडता शिलावरी
    दगड होऊनी भावनेचा फेकला जातो रस्त्यावरी

    भेट होता तिची अवचित् कुण्या एखाद्या रामाची
    शब्द मिळता सहाऱ्याचे अंकुरे फुटती आशांची

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    e-mail- bknagapurkar@gmail.com

      January 4, 2015


  • गरीब-श्रीमंत

      February 17, 2014


  • दिलासा

    ज्योतिष्याची चढूनी पायरी, जन्म कुंडली दाखवी त्याला ।

    अडले घोडे नशिबाचे, कोणते अनिष्ट ग्रह राशीला ।।१।।

    नशिबाची चौकट जाणूनी, आशा त्याची द्विगुणित झाली ।

    मनांत येतां खात्रीं यशाची, जीव तोडूनी प्रयत्ने केली ।।२।।

    प्रयत्नांती असतो ईश्वर, म्हणूनी मिळाले यश त्याला ।

    आत्मविश्वास जागृत करण्या, 'भविष्य' शब्द कामी आला ।।३।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      September 28, 2018


  • भरताचा जाब

    ज्याच्यासाठीं व्याकूळ झाली, उभी अयोध्या नगरी,
    कां धाडिला राम वनीं ? कैकयीला भरत विचारी ।।धृ।।

    आम्ही बंधू चौघेजण,
    झालो एका पिंडातून,
    कसा येईल भाव परका ?
    असतां एकची जीव, चार शरीरीं
    कैकयीला भरत विचारी ।।१।।

    वचनपूर्ती ब्रीद ज्याचे,
    आदर्श जीवन रघूवंशाचे,
    कसली शंका मनांत होती ?
    पारख ना केलीस, त्या हिऱ्याची परी,
    कैकयीला भरत विचारी ।।२।।

    सर्व जणांचे प्राण होता,
    जगणे कठीण झाले आतां,

    रोष कशाला घेसी त्याचे,
    अकारण ते आपल्या शिरावरी ?

    कैकयीला भरत विचारी ।।३।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०

      October 14, 2019


  • मयुरा तूं आहेस गुरु

    मयुरा तूं आहेस गुरु, तुला आम्हीं वंदन करु ।।धृ।।

    नदी कांठच्या वनीं

    थुई थुई नाचूनी

    पिसारा फुलवुनी

    तुझे पाहूनी नृत्य, नाचाचे ताल धरु ।।१।।

    मयुरा तूं आहेस गुरु तुला आम्हीं वंदन करु

    मोरपिसे सुंदर

    रंग बहारदार

    दिसे चमकदार

    बघुनी रंगाची विविधता, कुंचल्यांनी सप्तरंगी छटा भरुं ।।२।।

    मयुरा तूं आहेस गुरु तुला आम्हीं वंदन करु

    रुप डौलदार

    चाल ऐटदार

    भासे रुबाबदार

    बघुनी तुझा आनंद, सुखी जीवनाची कला अंगीकारुं ।।३।।

    मयुरा तूं आहेस गुरु तुला आम्हीं वंदन करु

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      December 27, 2020


  • काव्याची सफर

    पिंपात मेले ओले उंदीर त्यांचे जहर कडू पिऊन होतील
    आत्मे ज्यांचे स्तब्ध शांत मडू ।।१।।

    अशाच भाही लहरी येती लहरी घुमून जाती
    अशाच काही काव्यकल्पना जीवा घेरुन जाती ।।२।।

    परंतु राही अमर जगामधी गाथा तुकारामाची आणि स्मरती
    अभंगवाणी नाम्या ऐक्याची ।।३।।

    अजुन ऐकवी कुणी वैराणी वाणी मिरेची
    ज्ञानदेव तो अमृत पाजी बोधसत्व यासी ।।४।।

    --- द्वारकानाथ शंकर (जयंत) वैद्य

      October 4, 2025


  • तलवार आणि लेखणी !

    लेखणी व तलवारीची
    आमनेसामने भेट झाली,

    दोघात मग श्रेष्ठतेवरून
    बरीच वादावादी रंगली !

    सांगे तलवार लेखणीला,
    इतिहासाच्या वाच कथा,

    वाचून बघ समजतील तुला
    माझ्या पराक्रमांच्या गाथा !

    जिंकली अनेक वीरांनी
    युद्धे माझ्याच बळावर,

    ठेवून भरवसा माझ्याच,
    धारधार तलवारीवर !

    बोले तलवारीस लेखणी,
    रक्तरंजित तुझी कहाणी,

    झाल्या तुझ्यामुळे विधवा
    नाहक गरीब सवाशिणी !

    माझ्या शब्दांच्या माऱ्यापुढे
    धार ठरते तुझी बोथट,

    मी रक्तहीन करून क्रांती
    *उलटवते जुलमी राजवट !*
    *उलटवते जुलमी राजवट !*

    -प्रमोद वामन वर्तक,

    २८-०५-२०२३
    Mauritius?
    Mob.9892561086

      May 29, 2023


  • देह समजा सोय

    जेव्हां मी म्हणतो माझे,

    सोय माझी असते त्यांत,

    देह जगविण्या कामीं,

    प्रयत्न हे सारे होतात ।।१।।

    देह वाटते साधन,

    प्रभूकडे त्या जाण्याचे,

    त्यासी ठेवतां चांगले,

    होते चिंतन तयाचे ।।२।।

    भजन करा प्रभूचे,

    सुख देवूनी देहाला

    परि केवल सुखासाठीं,

    विसरूं नका हो त्याला ।।३।।

    देह चांगला म्हणजे,

    ऐष आरामीं नसावे,

    ती एक सोय असूनी,

    त्यांने प्रभू मिळवावे ।।४।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      October 3, 2016


  • सुखाला माहीत नसते

    सुखाला माहीत नसते
    दुःखाचे दुःखद उमाळे
    अर्थाला माहीत नसते
    अनर्थाचे घातक सोसणे
    शब्दांना माहीत नसते
    वाक्यांचे अर्थ सारे
    वाक्यांना माहीत नसते
    शब्दांचे भाव सारे
    प्रेमाला माहीत नसते
    मायेचे पड वेगळे
    मायेला माहीत नसते
    प्रेमाचे आंधळे वागणे
    सुराला माहीत नसते
    लयाचे बोल न्यारे
    लयाला माहीत नसते
    सुराचे स्वर सारे वेगळे
    आनंदाला माहीत नसते
    वाईटाचे दिवस वेगळे
    वाईटाला माहीत नसते
    आनंदाचे हसणे आगळे
    डोळ्यांना माहीत नसते
    पापण्यांचे अश्रू खारे
    पापण्यांना माहीत नसते
    डोळ्यांचे ओल हळवे भिजणे
    पुरुषाला माहीत नसते
    स्त्रीचे मन नाजूकसे
    स्त्रीला माहीत नसते
    पुरुषाचे भाव तरंग वेगळे
    -- स्वाती ठोंबरे.

      March 7, 2022