हपालेल्या निष्ठूर काळा, समाधानी तू कसा होशील
बळी घेण्याचे सत्र तुझे ते, केंव्हां बरे तू थांबवशील ?...१,
नित्य तुला तें भक्ष्य लागते, वेध घेई तू टिपूनी त्याचा
मिस्कीलतेने हासत जातो, गर्व होई तो स्वकृत्याचा....२,
अवचित कशी ही भूक वाढली, मात करूनी त्या वेळेवरी
सुडानें तूं पेटूनी जावूनी, बळी घेतले गरीबांचे परी....३,
काळ येई परि वेळ न आली, म्हणून सदा तूं हताश होतो
वेळेची ही ढिलाइ बघूनी, तांडव नृत्य ते करितो...४,
शांत होऊ दे क्रोध तुझा तो, बळी कुणाचा राग कुणावरी
‘वेळवरती’ अवलंबूनी तूं, जाण ठेव मनी याची तरी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
July 6, 2019
जीवनाच्या सांज समयीं ।
उसंत मिळतां थोडीशी ।।
हिशोब केला स्वकर्माचा ।
वर्षे गेली होती कशी ।।
दिवसामागून वर्षे गेली ।
नकळत अशा वेगानें ।।
सुख दुःखाच्या मिश्रणीं ।
जीवन गेले क्रमाक्रमानें ।।
आज वाटे खंत मनीं ।
आयुष्य वाया दवडिले ।।
ऐहिक सुखाच्या मागे जातां ।
हातीं न कांहीं राहीले ।।
'घेणे' सारे आपल्यासाठीं ।
करीत जीवन घालविले ।।
'देण्या' मधल्या आनंदाला ।
मन सदा वंचित राहिले ।।
सुधारुन घे आतां तरी ।
अनुभवाने चूक आपली ।।
उर्वरित वर्षे जाऊं दे ।
त्यागवृत्ति मध्यें सगळी ।।
भोगातले सुख कसे ते ।
क्षणांत येवून क्षणांत जाई ।।
त्यागातील समाधान परि ।
उशीरा लाभून सदैव राही ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
May 17, 2017
-- स्वाती ठोंबरे.
December 3, 2021
कळत नाही कुणाचं का पुन्हा नाव येतं आहे,
शांत ओठांवर तुझंच नकळत नाव येतं आहे.
विस्मृतीच्या वाटेवरती ठेवले कितीही पहारे,
आठवणींचे मोडुनी सारे ठाव येतं आहे.
टाळतो मी चांदण्यांना, टाळतो सुगंधी वारे,
का पुन्हा प्रत्येक श्वासात भाव येतं आहे?
रोज माझ्या हासण्यामागे लपविले किती मी अश्रू,
जखम जुनी जागी करून घाव येतं आहे.
शोधताना मी स्वतःला दूर गेलो सर्वांपासून,
तुझ्याच दारी शेवटी हे पाऊल येतं आहे.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
July 14, 2026
१
परि न कळला ईश
इच्छा राहिली अंतर्मनीं
प्रभू भेटावा एके दिनीं ।।
करुनी अभ्यास नि खेळ
मनाची एकाग्रता
केली शरीरा करीता ।।
जिंकू वा मरुं ही जिद्द
करुनी प्रयत्न्यांची पराकाष्ठा
बनवी जीवनमार्ग निष्ठा ।।
इतरासाठी समर्पण
वाढविता आपसातील भाव
जाणले इतर मनाचे ठाव ।।
दाखवी मार्ग अनुभवाचा
भजन पूजेत जाई वेळ
ज्ञान गोष्टी सांगे सकळ ।।
प्रभू चिंतनांत जाई वेळ
वाट बघतो निरोपाची
ओढ फक्त जगदंबेची ।।
खंत येवून मन विचारे
कां न प्रभू भेटला ?
ह्याची रुख रुख मनाला ।।
२
आत्मचिंतन करिता
जाणले मी भगवंता
ईश्वर निर्गुण निराकार
कर्म करी त्यास साकार ।।
ह्याच ईश्वराच्या शक्ती
आयुष्यातील आनंदी क्षण
हीच ईश्वरी खूण ।।
ईश्वरप्राप्तीचे लक्षण
नसावी मनी खंत
' आनंद ' हाच भगवंत ।।
May 30, 2013
आत्म्याला ओढ असते ईश्वराच्या मिलनाची
जाण सदेव राहते प्रभुमय स्वरुपाची ।।१।।
अंशात्मक भाग असे आत्मा हा परमात्म्याचा
उत्कंठ ते आकर्षण गुणस्वभाव तो त्याचा ।।२।।
आत्म्यास पडले असे बंधन ते शरीराचे
जीवन कार्ये करुनी प्रयत्न करी मुक्तीचे ।।३।।
मुक्त होई त्या क्षणीं अनंतात सामवतो
परमेश्वरि रुपांत विलीन होऊन जातो ।।४।।
आत्मा मुक्त होत असे देहकर्म फळावर
चांगले कर्म नसता नविन देह घेणार ।।५।।
दोन प्रकारांनी आत्मा प्रभू समर्पण होतो
देह मृत वा सजीव असतांना हे साधतो ।।६।।
ध्यान साधना करणारे उतरती समाधीत
त्याच क्षणी शरिराला आत्मा असे सोडित ।।७।।
देह सोडूनी भुवरी आत्मा येई बाहेरी
क्षणिक काळा करितां मीलन होई ईश्वरी ।।८।।
समाधी असे साधन प्रभु मिलन होण्याचे
देह समाधीत जाणें सार असते जिवनाचे ।।९।।
जीवंतपणीच तुम्हीं प्रभुमय होत असे
आनंदी नितांत क्षण खराखुरा तोच असे ।।१०।।
आत्म चिंतन करुनी आत्म ज्ञान प्राप्त होई
तोच ईश्वर असूनी दुजा ठिकाणीं तो नाहीं ।।११।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
April 23, 2019
“सुमनांजली” या काव्यसंग्रहातून…
June 11, 2012
गंधाळ प्रीतीचा अजरामर
चाफा प्राजक्त बकुळ मोगरा
गुलाब जाई निशिगंध लाजरा
तो तुच माळलेला गं गजरा...
धुंद बेधुंदले आसमंत सारे
आजही तोच माहौल न्यारा
ओढ़ प्रीतीची आसुसलेली
लोचनी तुझा प्रसन्न चेहरा...
तुच गंधाळ सुमनी कुसुम सुगंधा
दरवळ तो मनास भुलविणारा
मी सारे सखये विसरू कसे
गंधाळणारा तो तुझा गजरा...
********
-- वि.ग.सातपुते (भावकवी)
(9766544908)
रचना क्र. ३१०
२८/११/२०२२
December 9, 2022
भगवान श्रीकृष्ण
September 21, 2010
मानव जीवन तुम्हां लाभले, महत् भाग्य ते समजावे
कर्म दिधले पाठी तुमच्या, सद्उपयोगी यांसी करावे....१,
जीवन रेखा मर्यादेतच, ठेवली असती तुमचे हातीं
जाणीव त्याची मनीं असावी, कर्म कार्ये जेव्हां करिती...२,
हाती घेतल्या कार्यामध्ये, एकचित्त तो प्रयत्न व्हावा
काळ केवढा तुमचे जवळी, याचा विचार सतत यावा...३,
कार्ये राहता अपूर्ण अशी, वेळ न उरे तुमचे हाती
अभाव असता योजनेचा, अपयश ते पदरी पडती....४
कार्य व्याप्तीची दिशा असावी, शक्ती साधन काळ बघूनी
जीवन यशाचा आनंद खरा, लुटाल तुम्ही हे ध्या जाणूनी.....५
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
September 18, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti