(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मार्ग मुक्तिचा

    तहानलेली नदी
    पाण्याच्या शोधात
    भटकत होती
    भयाण वाळवंटात.उडणार्या गिधाडास
    विचारले तिने
    भाऊ मिळेल का कुठे
    जीवनदायी पाणी.

    पाण्याचे विचारू नको
    सापडेल तुला पुढे
    ताई मार्ग मुक्तिचा.

    एका वळणावर
    नदीने पहिले
    शुष्क वडाच्या फांदीवर
    लटकलेले होते एक प्रेत.

    झाडाखाली साचलेला होता
    एक ढीग मोठा कवट्यांचा
    खेळत होती त्यांच्या सवे
    गिधाडांची गोंडस पोरे
    फुटबॉल फुटबॉल.

    टीप: कवितेचा अर्थ शोधण्यास वाचक स्वतंत्र आहे.

      March 31, 2016


  • चक्र चित्रपटाच्या प्रदर्शनाची ४१ वर्षे

    मुंबईत या चित्रपटाचे मेन थिएटर नाझ हे होते. या चित्रपटाची निर्मिती एनएफडीसीच्या वतीने करण्यात आली आहे. मुंबईतील झोपडपट्टीतील जीवन संघर्ष या चित्रपटात अतिशय प्रभावीपणे साकारला आहे. या चित्रपटात स्मिता पाटील (अम्माच्या भूमिकेत), नसिरुद्दीन शहा (लूका), कुलभूषण खरबंदा (अण्णा), अंजली पैंजणकर (चैन्ना) तसेच रोहिणी हट्टंगडी, रणजित चौधरी, सलिम घोष इत्यादींच्या प्रमुख भूमिका आहेत. विशेष म्हणजे अलका कुबलचीही या चित्रपटात भूमिका आहे. तेव्हा ती शाळकरी वयात होती.

      April 17, 2022


  • दैवी देणगी

    लुळा पांगळा बसूनी एकटा, गाई सुंदर गाणे ।

    आवाजातील मधूरता, शिकवी त्याला जगणे ।।

    जगतो देह कशासाठी, हातपाय असता पांगळे ।

    मरण नसता आपले हाती, जगणे हे आले ।।

    लुळा असला देह जरी, मन सुदृढ होतेस ।

    जगण्यासाठी सदैव त्याला, उभारी देत होते ।।

    गीत ऐकता जमे भोवती, रसिक जन सारे ।

    नभास भिडता सुरताना, शब्द उमटती वाह ! वा रे ।।

    असमान्य ते एकचि मिळता, उणीवतेची खंत कशी ।

    दुबळ्या देही कला श्रेष्ठ ती, वीज चमकते रात्री जशी ।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      January 3, 2021


  • त्यांचे नाते

    कोण लागतात माझे, नाते ते ठावूक नाहीं
    देऊनी जातात मात्र, बरेच मजला काहीं....१,

    विठ्ठल- रामाचा नाद, गुंजन करितो येथें
    पवित्र वातावरण, येण्यानी होवून जाते....२,

    देवण घेवण आत्म्याची, आपसामध्यें चालती
    शब्द फुलांची गुंफण, त्वरीत होऊन जाती....३,

    फूले देऊनी मजला, हार गुफूंन घेतात
    दोघे मिळूनी तो हार, प्रभूस अर्पूं सांगतात....४

    अदृश्य असले नाते, असावे दोघांमध्ये
    भाषा आत्म्याची जाणतां, मन नाचते आनंदे....५

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      February 12, 2019


  • केला एवढा अट्टाहास

    केला एवढा अट्टाहास,रसिका केवळ तुझ्यासाठी,
    मांडली काव्याची आरास,
    तुझ्याच फक्त आशीर्वादासाठी,

    दत्तगुरूंचे धरून बोट,
    लेक लिहीत गेली,
    आईवडील, भाषाईने,
    समृद्धी तिज दिधली,--!!!

    माया करती मित्रवर्य,
    शिक्षकांचे आशीर्वाद मागुती,
    असे संस्कार,सहकार्य,
    उभे राहिले बघा पाठी,--!!!

    काव्यप्रेमी देती दाद,
    त्यांची ममताच उदंड,
    पावती देती रसिक,
    कृपा त्यांची भरभरून, --!!!

    त्यांच्या सदिच्छा-भेटी,
    पत्रे शिवाय, संदेश खास,
    खाऊ, फुले, आशीर्वादाची, मजजवळ जमली रास,--!!!

    खरेतर हा सन्मान,
    आपुल्या मराठी आईचा,
    "मी"तर एक निमित्तमात्र,
    माध्यम माझे फक्त समजा,--!!!

    राहिले काही चुकून माकून,
    तर, मीही एक मानव अपूर्ण, उदार अंत:करणाने माफ,
    करावे रसिकजन हो आपण,--!!

      September 12, 2019


  • आठवण

    अनामिक जे होते पूर्वी,

    साद प्रेमाची ऐकू आली ।

    योग्य वेळ येतां क्षणी,

    हृदये त्यांची जूळूनी गेली ।।१।।

    शंका भीती आणि तगमग,

    असंख्य भाव उमटती मनी ।

    विजयी झाले ऋणानुबंध,

    बांधले होते हृदयानी ।।२।।

    उचंबळूनी दाटूनी आला,

    हृदयामधला ओलावा ।

    स्नेह मिळता प्रेम मिळाले,

    जगण्यासाठी दुवा ठरावा ।।३।।

    मनी वसविल्या घर करूनी,

    क्षणीक सुखांच्या आठवणी ।

    जगण्यासाठी उभारी देतील,

    शरीर मनाच्या दु:खी क्षणी ।।४।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      August 23, 2016


  • वडिलांचा आशिर्वाद

    नव्हतो कधींही कवि वा लेखक कसे घडले कांहीं न कळले

    साहित्य सेवेचा गुण मिळूनी काव्य मजला सूचू लागले १

    वाङ्‍मयाविषयी प्रेम होते वडीलांना त्या काळी

    अथांग ज्ञान त्यांनी मिळविले पुस्तके वाचूनी सगळी २

    खो – खो मधल्या खेळा सारिखे खो देत ते गेले बसूनी

    साहित्याची ठेव सोपवूनी मज ते गेले चटकन निघूनी ३

    गोंधळून गेलो होतो मनीं नव्हते ज्ञान कांहीं मजला

    बरसत असतां त्यांचे ज्ञान छिद्रे होती मज झोळीला ४

    कुणीही नसता मार्गदर्शक घडत होते सारे अवचित

    चेतना देण्यास मज लागी आशिर्वाद त्यांचा होता सतत ५

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      November 16, 2019


  • गाठोडे चोरणारा साधू

    निराश असा एक माणूस नदीकाठी बसला होता. बाजूला त्याचे गाठोडे पडले होते. नदीच्या प्रवाहाकडे तो उदासपणे पहात होता. तेवढ्यात एक साधू तिथे आला आणि त्याच्या शेजारी उभा राहिला. दोघांची दृष्टादृष्ट झाली. त्या माणसाच्या डोळ्यात अश्रू आलेले पाहून साधू सहानुभूतीने त्याची विचारपूस करू लागला.

    तो माणूस म्हणाला, 'माझे नशीबच वाईट आहे. जवळ पैसे नाहीत, कष्ट उपसूनही वीट आला आहे. जगण्यात आता रस उरला नाही. आपल्या बोलण्यावर साधू काही तरी उपदेश करील, कदाचित एखादा आशीर्वाद देईल, एखादा चमत्कारही घडविल ज्यायोगे आपली स्थिती सुधारेल, या अपेक्षेने तो माणूस साधूकडे पहात होता. साधूच्या चेहऱ्यावर मात्र कोणतेही भाव दिसले नाहीत. काही न बोलता साधूने एकवार इकडेतिकडे नजर टाकली आणि त्या माणसाला काही कळायच्या आत अचानक त्याचे गाठोडे उचलून धूम ठोकली. साधूच्या या अनपेक्षित वागण्याने तो माणूस एकदम गोंधळला, बावरला, उठला आणि आपल्या चपला तिकडेच टाकून जीवाच्या आकांताने त्या साधूमागे पळत सुटला. साधूचा बराच पाठलाग केला तरी त्याला काही गाठता येईना.

    बऱ्याच अंतरावर रस्ता एका बाजूला वळला होता. आता तर साधूने गति वाढविली तो दिसेनासाही झाला. तो माणूस वळणावर आला तर एका झाडाखाली आपले गाठोडे पडलेले त्याला दिसले. धापा टाकतच तो गाठोड्याजवळ आला आणि संशयाने त्याने ते उघडूनही पाहिले. सर्व वस्तू तशाच असल्याचे दिसल्यावर तर त्याला आश्चर्य वाटले. तोच झाडामागून तो साधूही पुढे आल्यावर तर तो अधिकच कोड्यात पडला.

    साधू हसत हसत म्हणाला, जीवनाला कंटाळला असताना आणि निराशेने घेरले असतानाही या यःकिंचित गाठोड्यासाठी तुला माझा पाठलाग करावासा वाटला. त्या पाठलागात तुझ्यातले नैराश्य, तुझ्यातले दुर्मुखलेपण आणि जगण्यातली उदासी तर कुठल्याकुठे दूर पळाली! हे गाठोडे मिळविण्यासाठी जसा तू प्रयत्न केलास तसाच प्रयत्न एखादे ध्येय समोर ठेवून तू मोठ्या उमेदीने केलास तर तुला जीवनात रस वाटेल!

    ध्येयाशिवाय जीवनाला दिशा नाही की जीवनात रसही नाही!

      July 8, 2016


  • आकाशातील कापूस

    कपाशीचे ढीग अगणित

    विखुरले दिसती आकाशीं

    मानव येथें उघडा असूनी

    वस्त्र अपुरें दिसे अंगाशी ।।१।।

    कोठे आहे कापड गिरणी

    वस्त्र जेथें बनत असें

    दयावान तूं मालक असतां

    त्रोटक कापड निघे कसे ।।२।।

    पाठव तूं तो वस्त्रांचा कोठा

    लाज राखण्या मानवाची

    गरीब बिचारा विवस्त्र तो

    कीव करावी वाटे त्याची ।।३।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      September 23, 2020


  • दोन मनें द्या प्रभू

    आपल्याला इच्छा आहे | प्रभू तुमच्या नामस्मरणाची | परंतू ऐकून घ्या |कहाणी आमच्या अडचणींची ।।

      April 8, 2015