प्रेम करावे मनामनाने, प्रेम करावे क्षणाक्षणाने
नसावे ओझे दडपणाने, प्रेम करावे कणाकणाने
प्रेम नसावे प्रभावळीचे घनघोर वा वर्षावाचे
घुसमटवणारे, गुदमरवणारे बिचकून टाकत दिपवण्याचे
प्रेम फुलावे प्राजक्तकळ्यांनी सतत सुगंधित या क्षणांनी
प्रेम करावे करांगुलीने, निर्व्याज्य अशा निखळतेने
प्रेम ना व्हावे शिकवणुकीने, शिस्तीने - जबरदस्तीने
प्रेम वहावे अंतउर्मीने, कळकळ आतुर आपुलकीने
प्रेम नाही सोपस्कार, उरकून कोरडा उपचार
प्रेम नाहीच उपकार, उपहार, तोलमोलाचा व्यवहार
प्रेम नव्हे केवळ बाह्यखुणा, भाबडा प्रांजळ चांगुलपणा
प्रेम आहे समर्पित गुंतणूका, जीवापाडच्या जपणूका
नाहीच विषय तडजोडीचा, तुझ्यामाझ्यातील देवघेवीचा
भाव असे हा जिव्हाळ्याचा, जागृतशा जाणीवांचा
प्रेम करावे समरसतेने, भान हरपित तन्मयतेने
मनामनांच्या तादात्म्याने एकरुप ध्यान, एकतानतेने
तरलतेने, तत्परतेने, नि अनिवार्य अशा अनिवारतेने
ओढीने, जोडीने झोकून देऊन उत्कट अशा उत्कंठतेने
प्रेमाचा हर एक क्षण व्हावा आकंठ ओथंबलेला
आसक्त, अनुरक्त, नि ओतप्रोत चिंब भिजलेला
छोट्या छोट्या दवबिंदूंना मग येई अमृताचा अर्थ
इवल्याशा करंगळीला जो देई गोवर्धन सामर्थ्य
प्रेमाचे क्षण हे वेचक, जोडा, जागवा जोजवा
लागणार का मग, प्रेमापायी 'वणवण' वा जोगवा
(हल्ली प्रेमाचे संदर्भ सुटत चालले आहेत. माणसांना बांधून ठेवणारे हृदयाचे रज्जातंतू तुटत चालले आहेत. प्रेमाऐवजी सोपस्कार, उपचार, शिष्टाचारच जास्त दिसतात किंवा एकमेकांशी चांगुलपणा म्हणजे प्रेम अशी कदाचित भाबडी समजूत आहे. प्रेमापायी 'इन्व्हॉलमेंट', समर्पण, ओढ, आपणहून काही करणं या ऐतिहासिक गोष्टी झाल्या आहेत.)
--यतीन सामंत
ऋणानुबंध या कविता संग्रहातून
(३/१/२०००)
June 14, 2022
जातो छापील अभ्यासक्रमाच्या बाहेर
काळजी घेतो ” मानसिक ” आरोग्याची
हळुवार शब्दांनी फुलवतो मने
विकासाच्या फुलांना गंध देतो
May 3, 2021
देव देव राहतो कुठे ?
सांग आई, सांग आई !
चंद्रावरती, सूर्यावरती
आभाळी की धरेवरती?
सागरात , पर्वतशिखरी
जंगलात की पाण्यामध्ये
दगडगोट्यात,धातूमध्ये
देवळात की मठामध्ये?
शाळामध्ये, घरामध्ये
रानीवनी की मुर्तीमध्ये
मंत्रतंत्र की ग्रंथामध्ये
महाली की कोपीमध्ये ?
तुझी वात माझ्यामध्ये
माझा दीप तुझ्यामध्ये
दिसला गं देव माझा
आई, मला तुझ्यामध्ये
देव देव राहतो कुठे?
-- विठ्ठल जाधव
शिरूरकासार, जि.बीड
सं.९४२१४४२९९५
October 22, 2019
April 2, 2022
सतत फिरत राही, चक्र जीवनाचे ।
विविधता पाही , रंग आयुष्याचे ।।१।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
विवीध-अंगी ***२८
एकदा माझ्या तोंडून शिवी बाहेर पडली, तेंव्हा मुलांने टोकलं.
शिकवल्यापैकीं फक्त चागलंच त्यानी घेतलं, हे मला जाणवलं
-- डॉ. भगवान नागापूरकर
May 25, 2014

नदीचा काठ पाहुनी
बिंब केशरी प्रसन्न झाले
नभाचा रंग लागुनी
अंग नदीचे तयांत न्हाले...
June 30, 2026
इथली तरुणाई स्वतंत्र आणि स्वावलंबी विचारांची आहे. शैक्षणिक सुट्टीत इथली मुलं आवर्जून जॉब करतात. कोणतंही काम हे काम आहे, त्यात छोटं-मोठं वगैरे काही नसतं, ही त्यांची मानसिकता असते. कामाच्या वेळी काम आणि वीकएण्डला पार्टीज एन्जॉय करतात.
September 27, 2021
चंद्र आज एकला नभी उगवला ।
रात पुनवेची मधूर भासला ।।
मेघांचा गालीचा आज नाहीं दिसला ।
शितल वारा अंगी झोंबू लागला ।।
उलटून गेली रात्र मध्यावरती ।
लुक लुकणारे तारे आतां दिसती ।।
पेटल्या गगनीं असंख्य फुलवाती ।
तीव्र-मंद प्रकाशानें त्या चमकती ।।
त्या असंख्यात चंद्रमा एकची सापडे ।
जो लोभसवाणा म्हणूनी सर्वा आवडे ।।
उघडूनी देई मनाची प्रेम कवाडे ।
निघूनी जाई रात बघतां त्याजकडे ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
March 2, 2016
तू जवळ होतीस, पण कधीची निघून गेलीस,
मी स्टेटस अपडेटमध्येच अडकून पडलो.
चॅट ब्लू टिकवर थांबली कायमची,
मी “seen” मध्येच हळूहळू विरलो.
सोबत होतो, पण वेळच वेगळा होता,
तू पुढे गेलीस, मी मागेच राहिलो.
तुझ्या “busy” मध्ये दिवस संपून गेले,
माझं “miss you” ड्राफ्टमध्येच झोपलं.
स्पर्श होता, पण कनेक्शन तुटलेलं,
हातात फोन, मन मात्र रिकामं झालं.
तू जवळ असूनही दूर वाटू लागलीस आणि गर्दीतही मी एकटा झालो.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे
July 13, 2026
॥आम्ही भारताचे शिल्पकार॥
आम्हीच घडवतो भविष्य
आम्हीच घडवतो वर्तमान
नव्या भारताच शिल्पकार
आम्ही नव्या भारताचे शिल्पकार
राजनेत्यांचे गुलाम आम्ही
पत्रकारांचे भक्त साकार
देशाचे ना आम्हाला काही
ना स्वप्नांना आकार
नव्या भारताचे शिल्पकार....
दंगे घडवु नेत्यांपायी
फोडु दुसरर्यांचे घरदार
सामान्यांचे आवाज दाबु
ना करु त्यांना सहकार
नव्या भारताचे शिल्पकारंं......
असुरक्षित भारत लक्ष आमुचे
अयोग्य मतदान
भविष्यात आमच्या अंधकार
तरीहि नव्या भारताचे शिल्पकार आम्ही
नव्या भारताचे शिल्पकार
— रुग्वेद जानभोर
March 7, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti