(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • खळाळत्या पाण्यात सूर प्रवाही आहे

    खळाळत्या पाण्यात सूर प्रवाही आहे
    केशर पहाट वेळी प्राजक्त दरवळून आहे
    मिटल्या नयनात स्वप्न अलगद मिटून आहे
    सोन सकाळी किरणांचे सडे अंगणी रेघून आहे
    मूक ओठांत शब्दांचे चांदणे मधुर आहे
    लाजणाऱ्या गालावरी मंद स्मित पसरुन आहे
    भिजल्या गात्र देही रोमांच शहारुन आहे
    डोक्यावर पदर बाईचा नयनात स्निग्ध भाव आहे
    देहाच्या बाहेर मन पिसारा मोहरुन आहे
    मी कोण प्रश्न पडता अनामिक चाहूल आहे
    विश्वातील अगम्य सारे चराचर तो व्यापून आहे
    पाषाणाच्या काळ रेघा नशीब बदलून आहे
    मंद उजेड संध्या समयी ज्योत अनामिक आहे
    पडतील प्रश्न अंतरी काही उत्तरे हरवून आहे
    देहाच्या झिजल्या कुडीत श्वास बंदिस्त आहे
    न कळल्या भावनांचा पूर अश्रूंत मिटून आहे
    मन ओल हळव्या क्षणी वारा स्तब्ध आहे
    पर्णातल्या कळीला घट्ट कवळून मन बेभान वाहून आहे
    -- स्वाती ठोंबरे.

      March 8, 2022


  • ईश्वरी इच्छेनेच

     

      October 15, 2012


  • रवि – उदयाचे स्वागत

    उठा उठा हो सकळजन

    स्वागत करु या रविउदयाचे

    फूलून जाते जीवन ज्याने

    त्या सूर्य आगमनाचे //धृ//

    उषाराणीची चाहूल येता

    चंद्रतारका ढळल्या आतां

    चराचराना जागे करण्या

    चाळवी निद्रा हलके हाता

    वंदन करु या लिन होऊनी

    चरण स्पर्शुनी उषाराणीचे //१//

    स्वागत करुया रविउदयाचे

    रंगबेरंगी सुमने फुलली

    वाऱ्यासंगे डोलू लागली

    दरवळूनी तो सुगंध सारा

    वातावरणी धुंदी आणली

    मकरंदापरि चंचल होऊनी

    स्वाद घेवूया त्याच फुलांचे //२//

    स्वागत करुया रविउदयाचे

    पक्षी येती किलबील करिती

    उठा उठा ते सांगुन जाती

    कुजबुज करिती राघू मैना

    ताना मारित कोकीळ गाती

    कुक्कुटाची ती बांग तुतारी

    आरंभ करिती पक्षीगीतांचे //३//

    स्वागत करुया रविउदयाचे

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      February 5, 2021


  • रंगीत स्टेटस, काळं-पांढरं आयुष्य

    सध्या सगळ्यांचे स्टेटस रंगीत दिसतात,
    पण आयुष्य मात्र काळं-पांढरंच असतं.

    चेहऱ्यावर हसू, डोळ्यांत स्वप्नांची झळाळी,
    मनात मात्र दडलेली असते वेदनांची कहाणी.

    फिल्टर लावून क्षण सुंदर करता येतात,
    पण नशिबावर फिल्टर कधीच लावता येत नाही.

    क्षणभराच्या पोस्टला हजारो लाईक्स मिळतात,
    पण दुःखाच्या क्षणी हात मोजकेच पुढे येतात.

    दिसतं सगळं उजळ, आकर्षक, झगमगणारं,
    पण वास्तव मात्र शांत, कठीण आणि संघर्षमय असतं.

    रंग पडद्यावर नाही, तर माणुसकीत असतात.
    खरी श्रीमंती पैशात नाही, तर नात्यांत असते.

    म्हणून स्टेटस रंगवण्यापेक्षा मन रंगवा,
    दिखावा मिरवण्यापेक्षा माणुसकी जपा.

    कारण...

    स्टेटसचे रंग काही क्षणांचे असतात,
    पण चांगल्या कर्मांचे रंग आयुष्यभर टिकतात.

    •ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
    मो:- 9011841212

      July 7, 2026


  • दोन मृत्यू: एक व्यक्तीचा, एक हुद्याचा

    बड्या धेंड्याचा देहान्त जाहला,
    राजकारणी खुर्च्याचा त्राता निवर्तला,
    जनसागर अवघा शोकसागरात बुडाला
    अश्रूंचा (कोरड्या) अन् पूर लोटला
    का कोण जाणे कुणास कसला
    पत्ताच नव्हता शोक कशाला?
    शोकग्रस्त जीवांनी गच्च भरले
    तरीही राजमहाल अपुरे पडले
    हार वाहिले, पुष्पचक्र अर्पिले
    तरी बरेच काहीसे अजूनी उरले

    एकाकी तू असा निजलास का रे
    कुणी न तुजला वारस का रे
    शोक न कुणाचा, पाठिंब्याचा
    हुद्याचा वा मुद्याचा
    एकही न कसले फूल बिचारे
    तुजवर पडले; काय अरेरे!!

    अहा रे त्याचे जीवनही प्यारे, मरणही न्यारे
    तूच अभागी मग असा कसा रे
    तुला सजविले, मरणही बिचारे
    प्रमाद एकच घडला तवहाती रे
    असशील वेचले, देशासाठी प्राणा रे
    कधी न इच्छिलेस तू अभाग्या
    मोल तुझे अधिकार हुद्यात रे

    हो जागाही नगण्य तुझ्या चिरनिद्रेतून
    हसतमुखाने; आश्चर्य लपवून
    हो सामील या मिरवणुकीत
    जबरदस्तीच्या तीनतेराच्या दुखवट्यात
    हा दोष न कुणाच्या माथी रे
    देश अपुला हुद्दासत्ताक रे

    तुला न मिळावा हा मान उपेक्षिता
    फुका खपलास भूमिसाठी या करंट्या
    जरी न केले त्याने काही देशासाठी रे
    हुद्दा त्याचा होता फार मोठा रे
    असता जर तो तुझ्याही जवळी
    तो मान मग तुलाही मिळता रे
    अनमोल तुझ्या कार्यापेक्षा
    होता विचार हुद्याचा तुझ्या रे
    हुद्याचा तो मान वेड्या रे
    तुझा न् माझा नव्हता रे

    घडले दोन मृत्यू: मात्र एक फरकाचा
    होता एक व्यक्तीचा दुसरा मात्र हुद्याचा

    -यतीन सामंत

      September 18, 2022


  • भाषा जिला गौरवते

    भाषा जिला गौरवते,त्या मातीचेच गान ,
    मातेहूनही ती मोठी,
    भाषा देतसे अधिक वेलांटी,!

    ती आहे सृजनांत ,
    सर्वांची काळी आई,
    तिच्या कुशीतून जन्म घेतो,
    आपण सारे, पक्षी, प्राणी, --!

    ती करते जसे संगोपन,
    जिवांचे नित्य जतन,
    म्हणूनच तिला रोज करावा,
    नेमाने आपण प्रणाम,---!

    काय तिची महती वर्णावी, कणातही आहे सत्व,
    जीवनातील संजीवनी,
    तिच्याविना सृष्टी निर्जीव,--!

    जोडीदार आभाळाची,
    विशाल त्यांचा संसार
    लेकुरे उदंड जाहली,
    गोकुळ सगळा परिवार,--!

    माती पोटी जन्मते बीज,
    आणि विशाल वृक्ष होती,
    कित्येक वर्षानंतर पुन्हा बिजे,
    हीच बिजे मातीत रुजती,--!

    फळे-फुले रसरशीत,
    कधी पिकून पडती,
    त्यातूनच पुन्हा जन्मती
    मातीतून परत वरती,--!

    मानवी शरीर पार्थिव,
    मातीतच शेवट अंत,
    तिच्यातून असे जन्म,
    तिच्यात एकरूप परत,---!!

    © हिमगौरी कर्वे.

      March 1, 2020


  • जीवन संगीत

    शब्दभावनांची झाली उधळण

      August 31, 2021


  • संशयी मन

    भरवशाची घेऊन शिदोरी, पाऊलवाट ती चालत होता
    कुणीतरी आहे मार्गदर्शक, ह्यापरी तो अजाण होता

    बरसत होती दया त्याची, जात असता एक मार्गानी
    आत्मविश्वास डळमळला, बघूनी वाटेमधल्या अडचणी

    संशय घेता त्याचे वरती, राग येई त्याच कारणें
    विश्वासाला बसतां धक्का, आवडेल कसे त्यास राहणे

    ओढून घेई मृत्युचि आपला, अकारण तो त्यास दुरावूनी
    जागृत होता पुनरपि विश्वास, संशय जाई दूर पळूनी

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      January 1, 2019


  • भरताचा जाब

    ज्याच्यासाठीं व्याकूळ झाली, उभी अयोध्या नगरी,

    कां धाडिला राम वनीं ? कैकयीला भरत विचारी ।।धृ।।

    आम्ही बंधू चौघेजण,

    झालो एका पिंडातून,

    कसा येईल भाव परका ?

    असतां एकची जीव, चार शरीरीं

    कैकयीला भरत विचारी ।।१।।

    वचनपूर्ती ब्रीद ज्याचे,

    आदर्श जीवन रघूवंशाचे,

    कसली शंका मनांत होती ?

    पारख ना केलीस, त्या हिऱ्याची परी,

    कैकयीला भरत विचारी ।।२।।

    सर्व जणांचे प्राण होता,

    जगणे कठीण झाले आतां,

    रोष कशाला घेसी त्याचे,

    अकारण ते आपल्या शिरावरी ?

    कैकयीला भरत विचारी ।।३।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      April 17, 2021


  • जखमांचे वण

    किती खाल्ला मार, किती खाल्या शिव्या याची गणतीच नव्हती.
    एकच गोष्ट सतत कानी पडत होती.
    उनाड आहे, बावळट आहे, धडपड्या आहे, तडफड्या आहे, मूर्ख कुठचा.
    भडीमार होत होता आईकडून शब्दांचा..
    आम्ही होतो बालपणीच गांधीवादी.
    एका गालांत कुणी मारली तर दुसरा गाल पुढे करणारे.
    मुकाट्यानें मान वर न करता सारे शब्द पचविणारे.
    खेळणें, कुदणें, उड्या मारणें,
    त्यातच ढोपर, कोपर, हातपाय फुटून जाणें, भळभळा रक्त वाहायचे.
    पण सांगा रडून कुणाला ?
    कारण ते असायचे स्वतःच्याच प्रतापाचे...
    निमुटपणें बाजूस बसून, सहन करायचे
    आणि कुणास समजू नाहीं म्हणून माती टाकायचे.
    भरत होत्या साऱ्या जखमा हलक हलके.
    न भरून कसे चालायचे ?
    मस्तीची रग, खेळातील धडपड आणि स्वत:च डॉक्टर बनून जखामाबद्दल वाटणारी मायेची कढ.
    सारे तुटून पडायचे, घाव बरे करण्यासाठी.
    ... संध्याकाळची वेळ, सूर्य अस्ताला चाललेला.
    किती घटका राहील्या होत्या त्याला डुबण्यासाठी !
    विचार करितो मी. शांत बसून पंचाहत्तरीच्या काठी.
    हातपाय खाजवितो, कुरवाळीतो सुरकुतलेल्या कातड्याकडे बघतो.
    मध्येच नजर खिळून राहते ती जखमांच्या वणावर.
    कितीतरी लहान मोठ्या आकाराची.
    ज्यावर दिसत होती चित्रे आठवणीची.
    प्रत्येक वणावर होता एक इतिहास, एक घटना, एक जबरदस्त प्रसंग.
    कोडगे बनून केलेली मस्ती, आईचा मार, शिव्या आणि बाबांचा राग.
    पण आज सारे काही मनाला आनंदीत करून टाकणारे.
    शरिरावरले वण बनले होते एक जीवन आलबंम.
    नेत होते भूतकाळांत.
    जो होता निश्चित आणि उपभोगलेला.
    त्यात भविष्यकाळाची अनिश्चितता नव्हती कि वर्तमान काळाची क्षणिकता.

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०

      September 25, 2019