(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • वेड लावतोस तूं कुणां कुणां !

    हे मुरलीधर मनमोहना

    वेड लावतोस तूं कुणां कुणां ? //धृ//

    तुझ्या भोवती नाचती गौळणी

    भान त्यातर गेल्या हरपूनी

    थकूनी गेल्या नाच नाचुनी

    विसरुनी गेल्या घरदारानां //१//

    वेड लावतोस तूं कुणां कुणां ?

    हे मुरलीधर मनमोहना

    रमले सारे गोकूळवासी

    पेंद्या, गोंद्या, सख्या, बन्सी

    बागडती सारें तव सहवासी

    करमत नाही तुजविण त्यांना //२//

    वेड लावतोस तूं कुणां कुणां ?

    हे मुरलीधर मनमोहना

    संसार सोडला राधेने

    भारुनी गेली तव प्रेमानें

    ध्यास घेतला तुझाच तिनें

    तुजविण नव्हती दूजी भावना //३//

    वेड लावतोस तूं कुणां कुणां ?

    हे मुरलीधर मनमोहना

    मीरेचे तर प्रेम निराळे

    विषालाही प्राशन केले

    तुजसाठी सर्वस्व अर्पिले

    कसा तारशी तुं भक्तांना //४//

    वेड लावतोस तूं कुणां कुणां ?

    हे मुरलीधर मनमोहना

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      December 20, 2019


  • खरे ग्रह

    तुमचे जीवन अवलंबूनी, ग्रहराशीच्या दशेवरती

    तेच होई जीवनी तुमच्या, जसे ग्रहमंडळ फिरती...१,

    मित्र मंडळी सगे सोयरे, शत्रू असोत वा प्रेमाचे,

    जीवनातल्या हालचालीवरी, परिणाम ते होई सर्वांचे...२,

    हेच सर्व ते ग्रह असूनी, सतत स्थान ते बदलती

    परिस्थिती बघूनी तुमची, वागण्यात तो फरक करती...३

    अपयशाला कारणीभूत तो, असतो कुणीतरी नजीकचा

    राहू-केतू शनि वा मंगळ, ग्रहमान बनतो त्या घडीचा...४,

    यशाची चालता घौडदौड ती, मदत लाभते काही जणांची

    हे तर सारे इष्ट ग्रह ते, फूलवी सुमने जीवनाची...५

    डॉ.भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      August 22, 2019


  • कोण ती स्फूर्ती देवता ?

    मजला नव्हते ज्ञान कशाचे, पद्यामधल्या काव्य रसाचे ।
    कोठून येते सारी शक्ती, काव्य रचना करूनी जाती ।।

    अवचितपणे विचार येतो, भावनेशी सांगड घालीतो ।
    शब्दांचे बंधन पडूनी, पद्यरूप जातो देऊनी ।।

    सतत वाटते शंका मनी, हे न माझे, परि येई कोठूनी ।
    असेल कुणी महान विभूती, माझे कडूनी करवून घेती ।।

    तळमळ आता एक लागली, जाणून घ्यावी शक्ती आगळी ।
    अर्पीन माझे प्राण त्याला, स्फूर्ती देवता जो मज झाला ।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      September 19, 2017


  • प्रवाही जीवन

    वाहत असते जीवन सारे,
    वाहणे जीवनाचा गुणधर्म,
    स्तब्ध राहता जीवन आपले,
    कसे घडेल हातून कर्म ।।१।।

    वाहत होते, वाहत आहे,
    भविष्याते वहात जाईल,
    सतत चाले ही प्रक्रिया,
    जीवन करण्यास सफल ।।२।।

    आजही शास्त्रज्ञ हेच सांगतो,
    निर्जीव वस्तूसुद्धा प्रवाही,
    अणूची ती बनली असूनी,
    प्रचंड हालचाल आत होई ।।३।।

    अणूत असूनी तीन भाग,
    अतिशय वेगाने फिरती,
    केवळ त्यातील वेगामुळे,
    स्थिर साऱ्या वस्तू त्या भासती ।।४।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      December 19, 2016


  • वर्तमानीच करा

    नियोजनाच्या लागून मागें, भविष्याची आखतो चौकट
    कल्पकतेच्या आहारी जावून, चालण्या विसरे पावूल वाट....१,

    अनेक वाटा दिसूनी येती, भविष्यामधळ्या कल्पकतेला
    वर्तमान त्या काळाकरिता, जावे लागते एकाच दिशेला...२,

    उठूनी करा त्याच क्षणीं ते, वृत्ति असावी अशीच सदा
    उद्यांवरती कार्य टाकतां, मनीं उमटती विचार द्विधा...३,

    वर्तमान हा निश्चीत असता, यश लाभते अनेकदा
    केवळ तुमची बघुनी धडपड, साथ देईल ईश्वर सदा....४

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      May 5, 2017


  • वस्तूतील आनंद

    आनंद दडला वस्तूमध्यें, सुप्त अशा त्या स्थितीत असे
    सहवासाने आकर्षण ते, होऊन बाहेरी येत दिसे....१

    प्रेम वाटते हर वस्तूचे, केवळ त्यातील आनंदाने
    बाहेर येता नाते जमते, आपुलकीचे पडून बंधने...२

    तोच लूटावा आनंद सदैव, अंवती भंवती वस्तूतला
    दूर न जाता दिसले तुम्हां, आनंदच भोवती जमला...३

    जेव्हा कुणीतरी म्हणती, ईश्वर आहे अणू रेणूत
    वस्तूमधील आनंद बघतां हेच तत्त्व ते येई ध्यानात...४

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      November 17, 2015


  • चक्र

    मरूनी पडला एक प्राणी, जंगलामधल्या नदी किनारी ।

    कोल्ही कुत्री आणि गिधाडे, ताव मारती त्या देहावरी ।।१।।

    एके काळी हेच जनावर , जगले इतर जीवांवरी ।

    आज गमवूनी प्राण आपला, तोच दुजाची बने भाकरी ।।२।।

    निसर्गाचे चक्र कसे हे , चालत असते सदैव वेगे ।।

    एक मारूनी जगवी दुजाला, हीच त्याची विशेष अंगे ।।३।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      September 17, 2018


  • तुझ्याविना

    उगाच हे नसूनही, दिसायचे असायचे
    तुझ्याविना कसे कसे, जगायचे उरायचे !!

    मनीच भाव आतले, जरा जरा जपायचे
    हळूच पापणीतले, दुःखही पुसायचे !!

    नवेच काही लाडके, तुझ्यापरी नसायचे
    तरीहि दंगदंगुनी, फुलात फुल व्हायचे !!

    रंग जीवनातले, जाहले फिकेफिकें
    खुळेच श्वास चंदनी , स्मरायचे, भरायचे !!

    -- ..... मी मानसी

      June 20, 2019


  • गळ्यातल्या एका मंगळसूत्राने

    गळ्यातल्या एका मंगळसूत्राने
    तिची वाट सोयीस्कर वाटते
    डोळ्यांतल्या अश्रुंचे मोजमाप
    काळ्या मण्यात सुख झाकून ती
    सोन्याच्या वाट्यात दुःख लपवते
    झोपडपट्टीतील बाई नवरा मारतो
    हे टॉवरमधील बाईला सांगते
    टॉवरमधील उच्चशिक्षित स्त्री त्यावेळेस
    नवऱ्याचा मार मेकअपच्या आधारे लपवते
    अशिक्षित किंवा उच्चशिक्षित
    दोघींची दुःख सारखी असतात
    नवऱ्याने दिलेल्या जखमा की वेदना
    एक बोलून एक न बोलून सहन करतात
    काळ बदलला बदल झाला
    वारे नवीन वाहत राहिले
    काही बायकांचे आयुष्य मात्र
    काळ्या मण्यात व्यापून निःशब्द राहिले
    तो छान मस्त वागला बाहेर तरी
    घरी वेगळा नक्कीच वागतो
    दुसऱ्यांसाठी असतो साधा पुरुष तो
    पण तिच्यावर हक्क गाजवणारा नवरा असतो
    झोपडपट्टीत, ब्लॉक, बंगला सगळीकडे
    हे सार सहज घडत असते
    तिच्या दुःखाचे नावं फक्त त्यावेळी
    हक्काची त्याची बायको असे असते
    तिच्या दुःखाशी त्याला जाणीव नसते
    हक्क गाजववणारा पुरुषार्थ त्याचा उरतो
    कितीक स्त्रिया आहेत अशा समदुःखी
    नशीब नावाचे लेबल आयुष्य कपाळी सांधतो
    गिधाड आणि लांडगे पावलोपावली भेटतात
    घरचाच नवरा बरा यात बिचाऱ्या मूक होतात
    मंगळसूत्र हे एक जन्मीचे न धागे तुटतात
    कोण न समजणार तिला खरीखुरी मग
    नाच ग गुमा हा खेळ संसारी रडवतात
    मंगळसूत्रात बांधली जाते ती
    हक्क त्याचा तिच्यावर कायम राहणार
    कितीक दुःख ती सहन करते संसारी
    अनेक सावित्री या अव्यक्त अशा घुसमटणार
    -- स्वाती ठोंबरे.

      May 26, 2022


  • जखमा उरातल्या ! (नशायात्रा – भाग ४३)

    मलकापूरला प्रशिक्षण दोन दिवस नीट झाले कारण माझ्याजवळ माझा ब्राऊन शुगर )चा साठा होता , पण तिसऱ्या दिवशी मला टर्की सुरु झाली पण मी अंगावर सगळे त्रास सहन करत होतो दिवसभर , मात्र रात्री जास्त त्रास होऊ लागला मला उलट्या झाल्या ते पाहून सोबतचे काळजीत पडले , कदाचित बाहेरचे खाणे , पाणी सहन झाले नसावे असे त्यांना वाटले , इस्माईल भाईंजवळ डोकेदुखी , सर्दी , ताप वगैरेंच्या गोळ्या होत्या त्यांनी मला डोकेदुखीची गोळी दिली ,व आराम करण्यास सांगितले , अतिशय भयानक होती ती रात्र , माझ्या खोलीतील सगळे झोपले होते आणि मी बिछान्यावर तळमळत होतो , सारखे हात पाय गरम होत होते म्हणून मी बाथरूम मध्ये जाऊन हातपाय थंड पाण्याने धुवत होतो , मध्येच एकदम थंडी वाजे , मग कुडकुडत ब्लँकेट घेत होतो अंगावर , जुलाब आला की संडासला पळत होतो , केव्हा एकदा सकाळ होते असे झाले मला कारण आसपास काहीच जाग नसल्याने वेळ जाता जात नव्हता .

    इतर सर्व सुखाने झोपलेले पाहून अश्या वेळी त्या लोकांचा खूप हेवा वाटतो . स्वतची चीड येते , स्वतच्या असहायपणा टोचत राहतो .सकाळ झाल्यावर त्रास सुरूच होता पण आसपासच्या लोकांशी बोलण्यात तो त्रास फारसा जाणवत नव्हता . त्या दिवशी इस्माईल भाईनी मला लॉजवरच आराम करण्यास सांगितले . सर्व निघून गेल्यावर मी कसातरी बाहेर पडलो आणि मलकापूर मध्ये ब्राऊन शुगर मिळते का याचा शोध घेऊ लागलो , पण तेथे फक्त गांजा आणि दारू मिळू शकत होती , शेवटी मी ऐक गांजाची पुडी घेतली आणि ऐक देशीची निप घेऊन लॉजवर आलो , दारू पिऊन , गांजाची सिगरेट भरली आणि ओढत बसलो या नशेत सुमारे ३ तास बरे गेले , पुन्हा दारू उतरल्यावर जास्तच त्रास सुरु झाला , तसाच पडून राहिलो . पोटात काही नसल्याने खूप अशक्तपणा आला होता . असे दोन दिवस काढले , तिसऱ्या दिवशी मला थोडी हुशारी वाटली . पण आतल्याआत त्रास होतच होता ..

    मलकापूरच्या आसपासची बहुतेक गावे करून झाली होती म्हणून मग , खामगावला जाण्याचे ठरले तेथे उरलेले दोन दिवस राहून मग पुन्हा नाशिकला जाणार होतो . खामगावला आमचे लॉज एका थेटरला लागूनच होते म्हणजे अगदी इतके जवळ की थेटर मध्ये सुरु असलेल्या सिनेमातील संवाद आणि गाणी देखील आम्हाला ऐकू येतील , खामगावला संध्याकाळी लॉज वर आल्यावर आम्ही रूम वर बसलो होतो सुमारे रात्रीचे ९.३० झाले असावेत . माझा त्रास जरा कमी होता तरी मन अतिशय अवस्थ होते , बाजूच्या थेटर मध्ये सिनेमा सुरु झालेला होता , काही संवाद अर्धवट कानावर पडत होते व मग गाणे सुरु झाले ' मेरे नैना सावन भादों फिरभी मेरा मन प्यासा ' ' मेहेबुबा ' सिनेमा लागला होता बाजूला . ते गाणे सुरु झाले तसा मी अधिकच अवस्थ झालो , मन एकदम व्याकुळ झाले .. पाहता पाहता मन भूतकाळात जाऊन पोचले ..

    मी आठवीत होतो तेव्हा ..उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु होत्या .दिवसभर नुसती धमाल करायचो आम्ही मित्र ..क्रिकेट, सूरपारंब्या . चोर पोलीस , विष -अमृत , जोडीची शिवाशिवी , हत्तीची सोंड , कबड्डी कितीतरी मैदानी आणि बैठे खेळ खेळण्यात दिवस भुर्रकन संपत असे ..त्याकाळी शिवजयंती , डॉ . आंबेडकर जयंती वगैरे च्या वेळी सुमारे तीन चार दिवस कार्यक्रम असत आणि मुख्य कार्यक्रम म्हणजे रस्त्यावर दाखवला जाणारा सिनेमा हा असे . सिनेमा जरी उशिरा सुरु होत असे तरी रात्री ९ लाच आम्ही मित्र बसायला पोती वगैरे घेऊन सिनेमाच्या ठिकाणी जागा धरून बसत असू . रस्त्यावर मध्ये पांढरा पडदा टांगूला जाई , सुमारे २० फुट अंतरावरून प्रोजेक्टर वरून सिनेमा दाखवला जाई पडद्याच्या दोन्ही बाजूला लोक बसत , एका बाजूस स्त्रिया आणि दुसऱ्या बाजूला पुरुष अशी व्यवस्था असे , बहुधा तेच तेच सिनेमे दाखवले जात नेहमी . जय संतोषी मां , जंजीर , धर्मकन्या , गंगा जमुना , वगैरे , त्या वयात घरून थेटर मध्ये जाऊन सिनेमा पाहायला परवानगी मिळत नसे,म्हणून हे रस्त्यावारचे सिनेमे आम्ही सोडत नव्हतो , मध्ये रील तुटले की हल्ला गुल्ला होई , प्रोजेक्टर समोर हात नाचवले जात ..कोणीतरी गर्दीत बेडूक सोडे , मग पळापळ , पुन्हा आयोजकांचे शांततेचे आवाहन ..

    तर त्या दिवशी असाच शिवजयंती निमित्य ' गंगा जमुना ' सिनेमा दाखवला जात होता ..मध्येच रील तुटले आणि ते काही केल्या पुन्हा नीट जोडले जाईना , वारंवार रीळ तुटल्याने शेवटी आजचा सिनेमा रद्द असे जाहीर झाले , आमचा सर्वांचा विरस झाला . सिनेमाला माझे शाळेतील अनुराधा थेटर जवळ राहणारे काही मित्र देखील आले होते ..

    सिनेमा दाखवला जाणार नाही म्हंटल्यावर इतक्या लवकर आम्ही घरी जाणे शक्यच नव्हते , तेव्हा एका दिलीप नावाच्या माझ्या वर्गातील मुलाने म्हंटले चला आपण आमच्या घराजवळ जाऊ तेथे गप्पा ..गाणी म्हणत बसू . झाले आम्ही आठदहा जण सुभाष रोड वरून त्याच्या घराकडे निघालो . समोर ऐक मोठी दोन मजली इमारत मध्ये छोटी गल्ली आणि पलीकडील बैठ्या चाळीत दिलीप राहत असे , उन्हाळ्याचे दिवस असल्याने कोणीच लवकर झोपत नसत तर आम्ही त्या इमारतीच्या खाली पायऱ्यांवर बसून गाण्याच्या भेंड्या खेळू लागलो , आमचे आवाज वाढले होते त्यामूळे आसपासचे आणि इमारतीतील जागे असलेले लोक आमची गम्मत पाहत होते .मला लहान पणापासून गाण्याची आवड होती , व गळाही गोड होता त्यामूळे माझा आवाज लक्षवेधी होता . जरा वेळ भेंड्या खेळून झाल्यावर आता एकेकाला आम्ही गाणे म्हणण्याचा आग्रह करू लागलो , इमारतीच्या वर लावलेल्या ट्यूबलाईटच्या हलक्या प्रकाशात आम्ही सर्व बसलो होतो ..जेव्हा मला गाणे म्हणण्याचा आग्रह झाला तेव्हा आधी मी . केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा ' हे भक्तीगीत म्हंटले , गाणे संपल्याबरोबर सर्वानी टाळ्या वाजवल्या व मला हिंदी गाणे म्हणायचा आग्रह झाला आता इमारतीतील लोक देखील मुलांची ही गाण्याची मैफिल ऐकायला जमले होते , मी दुसरे गाणे त्यावेळी सगळीकडे गाजत असलेल्या ' महेबुबा ' सिनेमातील म्हणू लागलो ' मेरे नैना ..सावन भादो .." किशोर कुमारने गायिलेल्या अनेक गीतांपैकी हे अतिशय सुंदर गाणे आहे . मी मग्न होऊन गाणे म्हणत होतो ..आवाज टिपेला पोचला होता. त्याच वेळी जाणवले की गर्दीतून कोणीतरी आपल्या कडे रोखून पाहत आहे जरी नीट चेहरा दिसला नाही तरी ती मुलगी सारखी आपल्याकडे पाहते आहे हे जाणवले ..ट्युबलाईट च्या अंधुक प्रकाशात देखील तिचे ते रोखून पाहणे मला स्पष्ट जाणवत होते ...

    ( बाकी पुढील भागात )

    -- तुषार पांडुरंग नातू

      June 29, 2020