(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • उतावीळ

    अनुत्तरीत असंख्य प्रश्नांनी
    पोकळ मनाच्या भरगच्च ज्ञानानी
    उतावीळ उतावीळ
    मिळालेल्या अनुभवांनी ...

    संघर्षाची नकोय शक्ती
    नाही गाठलेली कुणाची भक्ती
    उतावीळ उतावीळ
    तरीही येथे प्रत्येक व्यक्ती

    विलंबाकडे करुनी पाठ
    उद्द्येशाची लावूनी वाट
    उतावीळ उतावीळ
    त्रिशंकुंचा हा सारीपाट

    चाले तंद्री झपाझप
    बहिरा असावा जणू प्रत्येक
    हेरून संकटांची पोटली
    पुन्हा रस्ता त्याच चौकात...

    -- सौ. देवयानी खरे

      March 11, 2019


  • या कातरल्या क्षणांना

    या कातरल्या क्षणांना,
    सय तुझी येते,--
    उन्हाची तप्त काहिली,
    चटकन् दूर होते,
    वारा धुंद वाही,
    ढग जाती प्रवासी,
    अधूनमधून बिजलीही,
    उगा आपुले दर्शन देई,
    अशा वेळी आठवे मज,
    सोनेरी प्रभेची सांज,
    याच समुद्रकिनारी,
    वाजली मिलनाची गाज,
    नभ सुंदर सोनबावरे,
    होते भेटीस साक्षी,
    कूजन करीत बागडती,
    पक्षी आनंदें वृक्षी,
    किनारा दूरवर तटस्थ,
    उभ्याने राखी सागराला,
    मिलनाची किती उदाहरणे,
    ठेवून समोरी चंद्राला,---!!!
    या मंतरलेल्या क्षणांना,
    आठवे चांदणी उगवती,
    प्रेमाखातर सुधाकराच्या,
    नशेत त्या नाचती -गाती,
    तिच्यावर चढली धुंदी,
    आजही मज नीट स्मरे,
    इकडे धरणीवर खाली,
    कुणी प्रेमवीर गात फिरे,
    अशी चांदणी नाचती-गाती,
    इथेच त्याला ओढत आणी,
    खळाळूंन उत्तेजित होई,
    निळ्याशांर लाटांचे पाणी,--!!!!

    ©️ हिमगौरी कर्वे.

      March 31, 2020


  • मी प्रेमभाव जागवला

    माझ्यातला चांगुलपणा
    मी पुन्हा जागवला
    प्रेमभाव अंतरीचा
    पुन्हा मी जोपासला
    मनातली वैरभावना ती
    कशी कावरी-बावरी झाली
    प्रेमाच्या सानिध्यात
    फार काळ नाही टिकली
    खूनशी वृत्ती ती
    मन पोखरत राहीली
    चांगुलपणाला घाबरून
    प्रेमाला शरण आली
    तिरस्काराचे ते पेटते बाण
    होते जरी सुटलेले
    आपुलकीच्या ओलाव्याने
    आपसुकच ते विझलेले
    रोषानेही मग आपला
    रस्ता तेंव्हा बदलला
    द्वेषालाही अस्तित्वाचा
    जणु उबग आला
    स्वार्थाला स्वतःचीच
    लाज वाटू लागली
    मानवतेची ओळख मनाला
    नव्याने पटू लागली
    अहंकारानेही आपली
    मान खाली घातली
    सुंदरता माझ्या मनाची
    तेव्हा मला दिसली
    तुटलेले दूखावलेले
    जवळ आले ते सारे
    जिवन जगण्याचे सूत्र
    सापडले मला ते खरे.

    - डॉ. सुभाष कटकदौंड

      July 31, 2018


  • किनारा..

    शब्दांच्या पल्याड लपलेला
    चंद्र ओंजळीत घेऊन तू जा...
    टपोरं डोळ्यात चांदण्याची
    बरसात साठवून तू जा..

    धुंद लहरी वाऱ्याच्या
    संगती वहावत तू जा...
    पहाटेची स्वप्न कलिका
    खुलवत तू जा..

    कुंतली गजरा अन्
    शब्द फुले माळत तू जा..
    प्रतिक्षेच्या वाटेवरची
    लाट मी अन् तू
    किनारा होवून जा.

      July 24, 2026


  • मन

    मनाला जुळती मन....
    नाते उदयास येते....
    'माना'ची मातंबरी
    मन गुंतुनि जाते....

    भावनांचा खेळ....
    'मान'ली तरच नाती....
    आज करावा गोड...
    उद्या कुणाचे हाती....

    दु:ख ही गोड मानावे..
    गोड ही विष ठरते......
    कुण्या 'मधुमेही'च्या
    मनात शिरून जाणावे....

    बिंदुला जोडुनिया बिंदु....
    रांगोळी बनते.....
    तयासी रंगत
    आपले 'जीवन' रंगते.....

    लाभता ध्येय....
    अन् उद्देश....
    हा 'जीव' भरतो रंग....
    जगण्याचे तरंग...
    भाव बुडबुडे....अन्
    मानलेले 'गोता'वळे....

    कधी अर्थ....
    सर्वार्थाने निरर्थक.....

    अथांग....
    अबोध.....
    अनंत.....

    न उमजे मज....
    बिंदु शी बिंदु.....
    जीवनाचे कोडे....
    न उलगडे मज.....

    डॉ.दीपक सवालाखे....
    यवतमाळ.

    आम्ही साहित्यिक फेसबुक ग्रुपचे लेखक

      November 3, 2024


  • संपदाऽभिषेक

    सुमनांजली या काव्यसंग्रहातून….. 

      June 8, 2012


  • क्षण !!

    प्रदीर्घ प्रवासानंतर आणि दमवणाऱ्या कष्टांनी थकलेले आपण
    उभे राहतो खोलीच्या मध्यावर किंवा घर- अर्धा एकर , मैलभर, बेट ,देश

      August 26, 2021


  • गंभीर बनू नका

    फार गंभीर बनून जगू नका. हे विश्वकरोडों वर्षापासून आहे. कित्येक आले आणि गेले. कुणावाचून कुणाचे काही थांबत नाही. जे व्हायचे ते होत राहणार आहे. तुम्हाला विचारुन काही घडणार नाही.

      September 9, 2023


  • तुला जमलं नाही सहज

    तुला जमलं नाही सहज
    नाजूक भावनांना फुलवणे
    जमलं फक्त तुला सहज
    रागाने अवचित मला बोलणे..
    मिठीतल्या गोड भावना
    तुला कळल्या नाही
    रागाच्या बोलण्यावर तुला
    दुसरं काही दिसलं नाही..
    तुला सोडवता आला नाही
    मधुर नाजूक मनाचा गुंता
    मला मात्र मिळाला अलगद
    वेदनेचा काटेरी ओला कोपरा..
    हवे तेव्हा मी समीप हवे तेव्हा लांब
    तुला सगळं सहज सार हे जमलं
    मनाचा विचार न करता तुला
    ब्लॉक करणं ही हलकेच जमलं..
    भावनासाहित मात्रेचा गंध
    तुला कळला कधीच नाही
    नाजूक गुंता झाला मोहाचा
    कोष हा गुंतलेला तुला सुटला नाही..
    हवे तेव्हा बोलून तोडले
    हवे तेव्हा रागाचे शब्द दिले
    अलवार तरल हळुवार अर्थांचे
    शब्द तुला न कधी समजले..
    झटकून टाकावे झटक्यात
    तसे तू दूर दूर झटकले
    दुःख एकच उरले अंतरी
    घाव वर्मी नाहक मिळाले..
    गोड नाजूक भावनांची
    ओढ तुला कळली नाही
    वेदना मिळाल्या बोलून
    तरी वीण तुला कळली नाही..
    खेळच झाला भावनांचा
    मनही तुला कळले नाही
    सगळे खोटे वाटले तुला
    मोहक गुंतणे तुला कळले नाही..
    शांत ओढ प्रीत सरितेची
    सागरास न खुणा कळल्या
    केशरी सांज सरणारी मधुर
    बंध मोहक तू अलवार तोडला..

    -- स्वाती ठोंबरे.

      December 1, 2021


  • वास्तव आणि स्वप्न

    स्वप्नातही बघताना ज्याची भीती वाटते
    ते वास्तव असते

    वास्तव आणि स्वप्न
    एकाच नाण्याच्या दोन बाजू
    एक चमकते दुसरे भासते

    वास्तव आणि स्वप्न
    दोन विरुद्ध गोष्टी
    एक खरी दुसरं खोटी

    वास्तवात जगायला हिम्मत लागते
    स्वप्नातही वास्तव नकोसे वाटते
    स्वप्नात मन स्वैर होते
    वास्तवात मन बंदिवान होते

    स्वप्नात कल्पनांचे डोंगर रचले जातात
    वास्तवात ते सर्व कोसळतात

    वास्तव हे वास्तव आहे पटल्यावर
    स्वप्न हे स्वप्न आहे मानल्यावर

    स्वप्नही कधीकधी वास्तवाशी लढायला बळ देते
    वास्तवही कधीकधी स्वप्न वाटायला लागते

    वास्तवातील स्वप्न आणि स्वप्नातील वास्तव
    संसारातील बेरजा, वजाबाक्या, भागाकार आणि
    गुणाकार करताना दोघांचे भान ठेवते !

    जगदीश पटवर्धन

      October 20, 2017