विसरून साऱ्या ताणतणावां ,देवा तुझ्या कुशीत यावे,
करून निश्चिंत आपुल्या मनां, वरूनच पृथ्वीला बघावे,--!!!
कलंदर वावरणाऱ्या ढगां,
सोबत घेत दूरवर हिंडावे,
चहूकडे अन् चहूदिशांना,
आनंदाने गात फिरावे,--!!!
ताऱ्यांसवे फेर धरतां,
गगनाला मुठीत घ्यावे,
पिऊन आधी रजतकणां,
धरणीकडे अभिमानें बघावे,--!!!
नकोत भय भीती चिंता,
विद्युतलतेसह हिंडावे,
कुणी कुठे दहशत माजवतां, लख्खकन कसे चमकून उठावे,-!
पाहण्या सूर्य चंद्राला,
मेघांच्या मऊ दुलईत शिरावे,
पिट पिट करती जेव्हा पापण्या, प्रखर तेजाने भानही विसरावे,--!
वार्याबरोबर दाही दिशा, आपणही सुसाट सुटावे ,
झुगारत सगळ्याच बंधना,
अतुल वेगे मस्त फिरावे,--!!!
वादळासह पृथ्वीवर फेरा,
मनमुराद जिकडेतिकडे घुसावे भयकंपित करत साऱ्या जनां, दराऱ्यात कसे बांधून ठेवावे,
हिरवा गार पसरला गालिचा, नभातून विहंगम दृश्य दिसावे
शक्य तेवढे वसुंधरेला,
वरून प्रदूषणमुक्त करावे,--!!!
© हिमगौरी कर्वे
January 7, 2020
मिळवलेस तूं जे जे काही,
कौतूक त्याचे सारे करतील
स्तुती सुमनातील भाव जमूनी,
हृदयामधले दालन भरतील....१
उचंबळूनी जाशील जेव्हां,
बांध फुटेल नयनामधुनी
ओघळणारे अश्रू सांगतील,
भाग्य तुझे ग आले उजळूनी....२
दरवळू दे सुंगध सारा,
नभांत जातील यश तरंग
स्वर्गांमधुनी 'भावू 'बघतील
भीजव त्यांचे सारे अंग...३
(चि. वर्षा विद्यापीठांत सर्व प्रथम आल्याबद्दल)
-- डॉ. भगवान नागापूरकर
May 17, 2016
दु:खाचे तूं देवूनी चटके, सत्वपरिक्षा ही बघतोस
प्रतिकूल ती स्थिती करूनी, झगडत आम्हां ठेवतोस.. १
खेळामधली रंगत न्यारी, खेळ खेळणे चुके कुणा
खेळातूनि अंग काढतां, जगण्याच्या मिटतील खुणा...२
खेळगडी तो असूनी तुम्हीं, मैदानासम विश्व भासते
तन्मयतेनें खेळत असतां, खचितच यश तुम्हा येते...३
विना खेळण्या पर्याय नसे, एक चित्त ते करूनी खेळा
बसू नका हतबल होवूनी, गमवाल त्या अमूल्य वेळा....४
-- डॉ, भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
March 26, 2019
सागर किती ही विशाल असला तरी त्याची एक लाट ही सुखद अनुभव करून जाते तसेच आपल्या दिवसभराच्या कारोबारात ही एखादा सुखद क्षण ही पुरेसा असतो. विशाल हृदयाने, मुक्त मनाने विचारांना प्रकट करण्याची सवय लावावी कारण विचारांचे दमन हे अतिशय नुकसानकारक आहे. शुद्ध विचारांचा स्पर्श जीवनाला सुखद बनवण्यासाठी मदत करतो.
October 18, 2021
ध्यान स्थिती
जेव्हां मजला कळत होते, निद्रेत आहे मी
जागृत स्थिती असूनी मनाची, शरीर होते निकामीं ।।
निद्रेमधल्या स्थितीत जाता, जाग न राही तेथे
जागेपण आणि निद्रा दोन्हीं, एकत्र न येते ।।
निद्रावस्था नि जागेपणा, याहून दुजे कोणते ?
ध्यान स्थिति ही आगळी असूनी, मध्य बिंदू साधते ।।
देह मनाला विश्रांती देई, ध्यान अवस्था ही
ध्यानामधली ऊर्जा सारी, ईश्वरार्पण होई ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
November 2, 2016
मैत्र एकमेव ऋणानुबंधी नाते
September 12, 2021
January 12, 2023
प्रीये, सखे मनस्वामीनी
ये नां, सत्वरी सांजवेळी
नको नां, आता प्रतीक्षा
भेट नां, सत्वरी सांजवेळी।।
गोधुळीची धूळ गोकुळी
जित्राबांचे, ठसे गोखुरी
छुमछुम नादती घुंगराळे
भेट नां, राधिके सांजवेळी।।
सावळबाधा तूंच सावळी
ब्रम्हांडी! तुझी पडछाया
पावरीची, रुणझुण कंठी
नेत्री घन:श्याम सांजवेळी।।
वृंदावनी तेवते दीपज्योती
वैखरी, झरते शुभंकरोती
तूच मूर्त, प्रसन्न मनगाभारी
भेट नां, राधिके सांजवेळी।।
अस्ताचलीच्या, वेदिवरती
नयनमनोहर, अस्त केशरी
सोहळा हाच मनमिलनाचा
भेट नां, राधिके सांजवेळी।।
भेट नां गे राधिके सांजवेळी
-- वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. २९.
२९ - १ - २०२२.
February 6, 2022
जरी मी संपलो इथे
प्रवास संपणार नाही
चार लाकडांसोबत
माझा ध्यास जळणार नाही
राख निजेल मातीच्या कुशीत
स्वप्ने निजणार नाही
राहतील रेंगाळत येथेच
पण सावली दिसणार नाही...
मायमराठीचे काव्यरत्न
कविवर्य मंगेश पाडगावकर
प्रथम पुण्यस्मरण
३० डिसेंबर २०१६
January 1, 2017
उत्साहाने करित होता, सारे कांहीं इतरांसाठी
क्षीण होवूनी जाता शरीर, आधार तयाला झाली काठी...१,
धनाचा तो प्रवाह वाहतां, गंगाजळीचे पाणी पाजले
दुजाकरिता त्याग करूनी, समाधानी ते इतरा केले....२,
धन संपत्तीचे झरे आटतां, प्रेमळपणाचे शब्द राहीले
कालक्रमणाच्या ओघामधल्या, दुर्बलतेस कुणी न जाणले...३,
अपेक्षा ती सदैव असते, मिळत रहावा सहयोग
अवमूल्यन ते केले जाते, दुर्लक्ष करूनी दुर्बल अंग...४
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
November 13, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti