ध्यानाने काय साधले
ऐका सगळे लक्ष्य देऊनी
हेच साधले ध्यान लावूनी ।।धृ।।
संसारांत रमलो,मोहांत गुंतलो
सुख दुःखात अडकलो
उकलोनी जीवन कोडे समर्पित झालो प्रभू चरणीं ।।१।।
हेच साधले ध्यान लावूनी
जाई पैशाच्या पाठीं देह सुखासाठीं
समाधानापोटीं
धडपडीतील चुक दिली दाखवूनीं ।।२।।
हेच साधले ध्यान लावूनी
धानाची समज उपदेशिला मज
ऐक मनाचा आवाज
तोड सर्व विचार चित्त एकाग्र करुनी ।।३।।
हेच साधले ध्यान लावूनी
एकाग्रतेची स्थिति ही ध्यानाची शक्ति
समाधान मिळविती
शांत करी मन देई चंचला घालवुनी ।।४।।
हेच साधले ध्यान लावूनी
सुख दुःखाची जाण,तीव्रता कमी करुन
देऊनी तर्क ज्ञान
करी मनाची समज वाढवूनी ।।५।।
हेच साधले ध्यान लावूनी
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
February 4, 2017
सर्वांचा विश्वास । सहजी बसेल
ऐसे शुद्ध शील । ठेवीन मी ।॥।१॥।
देव, देश, राजा । गुरु आप्त दृष्ट
यांशी एकनिष्ठ । राहीन मी ।॥।२॥।
अनाथांच्या साह्या । जाईन धावून
त्यासाठी झिजवीन । काया माझी ।॥॥३॥।
सानां कुरवाळीन । वंदीन थोरांना
बंधु सकलांना । मानीन मी ।॥४।।
सौजन्य दावीन । स्त्रिया-बालकांशी
वृद्ध-निर्बलांशी । निरपेक्ष ।।५॥।
मुकी जनावरें । गणूनिया मित्र
भूतदया व्रत । आचरीन ।।६॥।
गुरु, आईबाप । अधिकारी खरे
आज्ञा त्यांच्या त्वरे । पाळीन मी ।॥७॥।
कोसळो संकटे । कर्तव्य कठीण
मनाने प्रसन्न । राहीन मी ।॥८॥।
शरीराने शुद्ध । मनाने निर्मळ
कृतीने सरळ । राहीन मी ।।९।।
June 11, 2026
अवतीभोवती सारे तुझ्या, आहेत गुरू बसलेले
जाण तयांची येण्यासाठी, प्रभूसी मी विनविले ।। १
निसर्ग शक्तीच्या सर्व अंगी, काही तरी असे गुण
आपणासची ज्ञान असावे, घेण्यास ते समजून ।।२
उघडे ठेवूनी डोळे तुम्ही, बघाल जेंव्हां शेजारी
काही ना काही ज्ञान मिळते, वस्तूच्या त्या गुणापरी ।।३
सारे सजिव निर्जिव वस्तू, गुरू सारखे वाटावे
तेच आहेत ईश्वरमय, तुम्हीच समजावे ।।४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
March 4, 2020
पूर्वी चार भिंतींमध्ये
जखडलेली स्त्री होती.
रांधा वाढा उष्टे काढा
आयुष्य ती जगत होती.
कावळा तिला शिवत होता
चार दिवसाची हक्काची
सुट्टी तिला मिळत होती.
स्त्री आज स्वतंत्र आहे
घरा बाहेर पडली आहे.
ऑफिसात जात आहे
धंधा हि पाहत आहे.
मुलांना शिकवत आहे
स्वैपाक हि करीत आहे.
थकलेल्या शरीराने
अहोरात्र खटत आहे.
कावळा आज शिवत नाही
हक्काची चार दिवसाची
सुट्टी हि मिळत नाही.
-- विवेक पटाईत
February 9, 2016
नाम घ्या हो तुम्ही, प्रभूचे सतत
नामस्मरण , असू घ्या मुखांत ...१
काय सांगावी, नामाची थोरवी
दगडही जेथे, तरंगून जाई...२
रोम रोमामध्यें, प्रभूचा संसार
बनून कवच, रक्षती शरिर...३
नामाची लयता, मन गुंतवून
एक होतां चित्त, जाई आनंदून...४
अंतीम ध्येय, ईश समर्पण
नामानी साधती, प्रभू सर्वजण...५
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
November 17, 2015
लेखक : सिद्धू चिलवंत – आम्ही साहित्यिक फेसबुक ग्रुप
September 14, 2019
निसर्गाचा अप्रतिम ठेवा, नदीकाठच्या पर्वत शिखरीं ।
बाह्य जगाचे वातावरण, धुंदी आणिते मनास भारी ।।१।।
त्याच वनी एकटे असतां, परि न लाभे एकांत तुम्हांला ।
चित्तामध्यें वादळ उठतां, महत्त्व नव्हते बाह्यांगाला ।।२।।
खडखडाट सारा होता, दैनंदिनीच्या नित्य जीवनी ।
समाधानी जर तुम्हीं असतां, शांतता दिसते त्याच मनीं ।।३।।
एकांततेची खरी कल्पना, मनावरती अवलंबूनी ।
अंतर्मन शांत असतां, बाह्य एकांत बघेना कुणी ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
October 11, 2018
इजिप्तमधले राजाराणी झाडांमध्ये सुखावले
July 12, 2026

किती मिळाले तरी कमी हे
हे माझे अन ते माझे
जग सगळे हे पुढे धावू दे
निवांत मी अन घर माझे...
August 18, 2026
नातवंड म्हणजे काय चीज असतं ,
आजी आजोबा मध्ये दडलेलं सँडविच असतं.
नातवंड म्हणजे काय चीज असते ,
आई रागावली की आजी कडील धाव असते.
नातवंड म्हणजे लोण्याचा गोळा,
पाळण्यातून अलगद काढून घ्यावा.
नातवंड म्हणजे गुलाबाची पाकळी
पुस्तकात जपलेली पानावरची जाळी.
नातवंड म्हणजे विड्यातला गुलकंद
सगळ्या चवींना बांधतो एक संध.
नातवंड म्हणजे खव्याचा पेढा
अखंड आनंद घ्या हवा तेवढा.
नातवंड म्हणजे त्रिवेणी संगम
तिस-या पिढीचा असतो उगम.
नातवंड म्हणजे आनंद तरंग
आनंदाच्या डोहात डुंबते अंतरंग.
October 17, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti