हपालेल्या निष्ठूर काळा, समाधानी तू कसा होशील
बळी घेण्याचे सत्र तुझे ते, केंव्हां बरे तू थांबवशील ?...१,
नित्य तुला तें भक्ष्य लागते, वेध घेई तू टिपूनी त्याचा
मिस्कीलतेने हासत जातो, गर्व होई तो स्वकृत्याचा....२,
अवचित कशी ही भूक वाढली, मात करूनी त्या वेळेवरी
सुडानें तूं पेटूनी जावूनी, बळी घेतले गरीबांचे परी....३,
काळ येई परि वेळ न आली, म्हणून सदा तूं हताश होतो
वेळेची ही ढिलाइ बघूनी, तांडव नृत्य ते करितो...४,
शांत होऊ दे क्रोध तुझा तो, बळी कुणाचा राग कुणावरी
‘वेळवरती’ अवलंबूनी तूं, जाण ठेव मनी याची तरी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
July 6, 2019
हे यंत्रा !
तुझी जात कोणती?
तुझा धर्म कोणता?
तुझा पक्ष कोणता?
तू सनातन आहेस?
कि पुरोगामी आहेस?
तू सजीव आहेस?
कि निर्जीव आहेस?
का बनवतोस रस्ता?
धर्मनिरपेक्ष तुझे काम
संविधानावर तर चालतोयस..
मानवी कल्याणासाठी तू..
यंत्रयुगातील तू..
कोणती घ्यावी शिकवण?
हे यंत्रा !
विठ्ठल जाधव
शिरूर, जि.बीड
सं.९४२१४४२९९५
November 21, 2018
नयनमनोहर सृष्टी वैभव
निरवताच ही शांत सुंदर
जीव! जिथे जातो गुंतुन
ओघळतो, लोचनी ईश्वर
सभोवताली रम्य परिसर
साक्षी गगन सरीतासागर
लोभस अलौकिक नजारा
हृदयी सुखद अमृती पाझर
अगम्य हा ब्रह्मांड रचियता
चैतन्यात्मा चराचरी निरंतर
वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. ९५.
२७ - ३ - २०२२.
April 6, 2022
हे शारदे ! रूसलीस कां तू, माझ्या वरती ।
लोप पावली कोठे माझी, काव्याची स्फूर्ती ।।
दिनरात्रीं तव सेवा केली, मनोभावें ।
कळले नाहीं आज शब्द ओठचे, कोठे जावे ।।
दिसत होते भाव मजला, साऱ्या वस्तूमध्यें ।
उचंबळूनी जाई मन तेव्हां, नाचत आनंदे ।।
तेच चांदणे तारे गगनी, आणिक लता वेली ।
पकड येईना टिपण्या सौंदर्य, परि या वेळी ।।
जागृत केली मम हृदयांतील, सुप्त जी शक्ति ।
अखंडित वाहूं दे शब्द प्रवाह, हे श्री सरस्वति ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
February 12, 2017
आगमनाची प्रतीक्षा मज
तू श्वासांची शृंखला..
भावनांची विश्वस्त ठेव
तू सागरीचा शिंपला ..
काट्यात अडते पाऊल
तू फुलांचा सडा..
ह्रदयाच्या काठोकाठ
भरला प्रेम घडा..
रात्र चांदण्यांची नक्षी
तू चंद्र शीतल..
सांज आठवांची मैफिल
तू क्षितीज तरल..
सूर ताल लय संगीत
तू छेडीता तारा..
सप्तरंगी सजते इंद्रधनु
तू रंगांचा नजारा..
उन्मळून पडल्या पानांची
तू नवी पालवी..
जुन्या वळणावरती
तू वाट नवी..
फुला पानांत निजलेल्या
तू दवांच्या ओळी..
सुख स्वप्न साकार व्हावे
पहाटेच्या वेळी..
पुसटशी हातावरची
तू माझी जन्मरेख..
जन्मभर आखला हा
प्रेमाचा आलेख..
July 14, 2026
चल सये ग झणीं,
मांडू या खेळ अंगणी,
लहान वयातली भातुकली,
धांदल बाहुलीच्या लग्नाची,--!!!
लग्न करण्या त्यांचे,
घालत होतो घाट,
धावपळ करत सगळी,
मांडायचा सर्व थाट,----!!!!
इवले इवले बाहुला बाहुली,
सुंदर गोंडस खूप छोटुकली,
मुंडावळ्या बांधून त्यांना,
उभे सगे घेऊनी हाती,--!!!
सासर माहेर सगळे मिळुनी,
अंगण जायचे गजबजुनी,
ठुमकत येई वरमाई,
नाकात झोकात नथ घालुनी,--!!!
देण्याघेण्यावरून गोष्टी,---
मात्र सगळ्या फिस्कटती,
सासरकडच्या आयाबाया,
एकदम सगळ्या रुसून' बसती, --!!
मग आजोबा मोठे ,
उगा मध्यस्थी करती,--!!!
सनई चौघडा घेऊन उभे
त्यांना कशा "खुणा" करिती,--!!!
बाहुल्या'च्या घरचे सांगती,;---
सासरकडची इटुकली पिटुकली,
म्हणती मिळेल का असा जावई,-?जरा जास्तच फणकारुनी,--!!!!
मग तोडगा मधे निघे,
आई आजी म्हणतील तसे ,
पुसावया" जाती, -सगळे,
वधू-वर' पण, इकडे एकटे,--!!!!
पाहून त्यांना हळूच असे,
मोठे आजोबा युक्ती करिती, एकत्र आणून दोघांनाही,--!!!
लग्न लावून मोकळे होती,--!!!
आज आठवते सयी,"
त्या प्रसंगाची लगीन -घाई
असे लग्न लावण्या पण,---
कुणी आजोबा उरला नाही,--!!
हिमगौरी कर्वे.
May 7, 2019
मोहीनी शरद् पोर्णिमेची
की पापण्यांच्या अर्धोन्मिलीत चंद्राची
अतृप्ततेचा भास हा
की चांदण छायांची बाधा ही
विखार यौवनाचा असा
शोषतो अभिशाप जाणिवांचा
बेभानतेचा अंगार हा
मंत्रचळातला विखार जसा.. खरंच रेंगाळतोस का रे मनांत..?
अस्पष्टसा.. अंधुकसा...
कुठेतरी धुक्यातल्या इंद्रधनुसारखा
मखमली मलमली तारुण्याचा
पिसारा उलगडत...
स्वप्न झुल्यांची तोरणं
पापण्यावर झुलवत
सोसांचा इतका आवाका
अवखळ होणं ,बेभान होणं
कधी थांबवशील..?
अनुरक्त होण्याची
मुभा कधी देशील..?
सांवरतीय आता
नको भुलींचे बहाणे
नको विरहीणीं चे तराणे
एका समृद्ध लयींत बांधशील का ..?
वेडेपणातले सारे उखाणे...
-- © लीना राजीव.
October 13, 2019
अनुत्तरीत असंख्य प्रश्नांनी
पोकळ मनाच्या भरगच्च ज्ञानानी
उतावीळ उतावीळ
मिळालेल्या अनुभवांनी ...
संघर्षाची नकोय शक्ती
नाही गाठलेली कुणाची भक्ती
उतावीळ उतावीळ
तरीही येथे प्रत्येक व्यक्ती
विलंबाकडे करुनी पाठ
उद्द्येशाची लावूनी वाट
उतावीळ उतावीळ
त्रिशंकुंचा हा सारीपाट
चाले तंद्री झपाझप
बहिरा असावा जणू प्रत्येक
हेरून संकटांची पोटली
पुन्हा रस्ता त्याच चौकात...
-- सौ. देवयानी खरे
March 11, 2019
निष्पाप फुलांचा ताटवा सुंदर
गंधाळ, सुगंधी त्याचा मनोहर...
अवीट, स्पर्श लाघवी कोमल
मनोमनी जागविती भाव सुंदर...
जगी जगावे निर्मळ फुलांसारखे
काटयासवे फुलत रहावे निरंतर...
क्षणाक्षणांना नित्य वेचित रहावे
भावनांनी उजळीत जावे मनांतर...
अर्थ जीवनाचा उलगडित जावा
मनामना,सुखवित रहावे निरंतर...
मोहपाश, हे आसक्तीचे मृगजळ
त्यातूनी, जीवा सावरावे निरंतर...
युगायुगातुनी लाभे जन्म मानवी
सत्य, विवेकी आत्मसाक्षात्कार
सांध्यपर्वी मन हळवेहळवे कातर
स्मरावा, एकची तो कृपाळू ईश्वर...
-- वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. २३६
१६ /९ /२०२२
September 21, 2022
जीवंतपणी घेई समाधी, ज्ञानेश्वर राजा ।
दु:खी होऊनी हळहळली, विश्वामधली प्रजा ।।
सम्राट होता बालक असूनी, राज्य मनावरी ।
हृदय जिंकले सर्व जणांचे, लिहून ज्ञानेश्वरी ।।
आसनीं बसत ध्यान लावता, समाधिस्त झाले ।
बाह्य जगाचे तोडून बंधन, प्राण आंत रोकले ।।
निश्चिष्ठ झाला देह जरी , बाह्यांगी दर्शनी ।
जागृत आसती प्राण तयांचे, आजच्याही क्षणी ।।
संचार त्यांच्या आत्म्याच्या , सदैव होत राही ।
ज्ञान भुकेल्या भाविकाला, चेतना ते देई ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
February 5, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti