(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • भिकारीण

    मधूर आवाज मिळूनी, उपकार झाले तिजवर

    सुंदर गाणे गाऊनी, आनंदीत करी इतर ।।

    हातपाय दुबळे होते, दृष्टी नव्हती तिजला

    कष्ट करण्या शक्ति नव्हती, कसा मिळेल घास तिला ।।

    परी ती होती आनंदी, गाण्याच्या ओघांत

    उचलित होती पैसे, पडता तिच्या पदरांत ।।

    जरी झाला देह दुर्बल, जगण्याची होती आंस मनी

    मिळालेल्या आवाजाला, ऋणी समजे ती मनी ।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      July 20, 2019


  • निसर्ग सुख!

    आनंदाचे झरे वाहतां, आवती भवती सारे
    रे माणसा खिन्न वाटतो, जीवन उदास कां रे?

    निसर्गाच्या ठेव्या मधल्या, सर्व वस्तू सुखदायीं
    निवडून घे तूं त्यातील, आनंद देतील काहीं

    केवळ तुझी दृष्टी हवी, टिपण्यास ते सौंदर्य
    आनंद तो देण्याकरितां, करिते सतत कार्य

    मनाचा हा खेळ जहाला, सुख दुःख समजणें
    निसर्ग प्रयत्न करितो, सदैव सुख देत जाणें

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      November 14, 2017


  • बांध्यावरच्या घाटावरील पूल

    बांध्यावरच्या घाटावरील पूल
    मनाचा तळ अलगद सांधतो
    डोळ्यांतील अश्रूंचा थेंब
    हलकेच अनामिक होतो
    भावनांच्या बेरजेत का
    वजाचा हिशोब अधिक लागतो
    ओल भरल्या अंतरात तेव्हाच
    भाव आल्हाद व्याकुळ होतो
    जन्मोजन्मीच्या रहाट संसारात
    का जीव तिचाच कळवळतो
    स्वप्नांच्या मखमली शालीवर
    काटेरी सल अलगद बोचतो
    रोज नव्याने मरते ती संसारी
    तिच्या किंमतीचा हिशोब नसतो
    रडणाऱ्या थेंबातही तिचा वाटा
    हक्काचा असा कधी नसतो
    युगे लोटली काळ पावली
    तिचा देह संसारात गुरफटतो
    मनाच्या काच तड्यावर एक
    ओरखडा मग सहज उमटतो
    संसार असतो तिचा नेहमी
    कर्तव्य भाव ओलावतो
    येते मरणं अकल्पित अवचित
    शांत देह तेव्हाच तिचा होतो
    न कळते वेल्हाळ स्त्री कधी
    मंगळसूत्र मण्यांत धागा रुततो
    स्त्री जन्मा ही कहाणी तुझी खरी
    स्त्री नावं तिचे अध्याय कुठे न हा संपतो
    नाजूक फुलांच्या बागेत भाव
    मोहक मलमली अलवार गंधाळतो
    अजूनही आहेस बाई तू धाकात
    दुःख काळजात निःशब्द भाव स्तब्धतो
    सप्तपदीत बांधली तू अलगद
    भावनांचा डोह होतो मलीन
    स्त्री असते तू कोमल मर्यादेत
    सीता ही न सुटली या फेऱ्यातून
    -- स्वाती ठोंबरे.

      April 3, 2022


  • मन मुक्त मोकळे

    तू तर काहीच कसे बोलत नाही
    ना सुख, ना दुःख सांगत नाही

    मन, नेहमी मुक्त मोकळे करावे
    भावनांचा उद्वेग त्रस्त करत नाही

    जगती जगणे हे क्रमप्राप्त आहे
    तटस्थतेत, मना मन:शांती नाही

    सहोदरी भावनांच निश्चिंती आहे
    अलिप्ततेत जीवनी सुखदा नाही

    पराधीनता हा जीवाला शाप आहे
    भोग भोगण्या दूजा उ:शाप नाही

    तो एक अनामिक सृष्टिचा निर्माता
    त्या शरण जाण्यावीण पर्याय नाही

    मित्रत्वाचा सुखद संवाद चैतन्यदायी
    त्यावीण इथे जगण्यासही अर्थ नाही

    -- वि. ग. सातपुते. (भावकवी)

    9766544908

    रचना क्र १३९.

    २२ - ५ - २०२२.

      June 8, 2022


  • निळ्या काळ्या यमुनेतीरी

    निळ्या काळ्या यमुनेतीरी,
    कृष्ण राधेशी अनुनय करी, अंधारातून वरून बघती,
    चंद्र- चांदणी चमकू लागती,||१||

    संधिकाली नीरवताही,
    निर्जनताही भोवताली,
    कान्हा वाजवी मुरली,
    राधा भान हरपली,--!!,||२||

    बघतां बघतां तम लागे चढू,
    ओढ जिवांची की आत्म्यांची,
    दोघांसह येईना मुळी कळू,
    मागे टाकला संसार पती,
    टाकून सारे तिथेच ती,
    धावली कशी यमुनातीरी,--!!||३||

    काय आहे कृष्ण म्हणजे,
    अशी ओढ कशी अनावर,
    घडते तरी का असे,--?
    नाद मुरलीचा ऐकून,सत्वर-!! ||४||

    शरीर आणि मन तिचे
    उगी थरकांपू लागे,
    इतक्या बोचऱ्या थंडीतही,
    कसा घाम फुटू लागे,--||५||

    भीतीने बावरे, थरथरे,
    गालांतच हसे कान्हा,
    पुढे येऊनी कवेत घेई,
    प्रसंग विहंगम हा,---!!!||६||

    मोह-माया असे भेटती,
    प्रणयाची खेंच न्यारी,
    गोरीपान राधा लाजरी,
    धीट किती कृष्णमुरारी,--!!||७||

    शृंगाराची तऱ्हा वेगळी,
    सहवासाची गंमत फाकडी,
    एकरुपता समागमाची,
    बघून मिटे संकोचून कळी,--!!||८||

    हिमगौरी कर्वे.©

      June 17, 2019


  • खेळण्या नसे पर्याय

    दु:खाचे तूं देवूनी चटके, सत्वपरिक्षा ही बघतोस
    प्रतिकूल ती स्थिती करूनी, झगडत आम्हां ठेवतोस

    खेळामधली रंगत न्यारी, खेळ खेळणे चुके कुणा
    खेळातूनि अंग काढतां, जगण्याच्या मिटतील खुणा...२,

    खेळगडी तो असूनी तुम्हीं, मैदानासम विश्व भासते
    तन्मयतेनें खेळत असतां, खचितच यश तुम्हा येते...३,

    विना खेळण्या पर्याय नसे, एक चित्त ते करूनी खेळा
    बसू नका हतबल होवूनी, गमवाल त्या अमूल्य वेळा....४

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      April 9, 2017


  • ब्रेक्झिट (१) (लघुकाव्यें)

    1

    पाहिजे तेवढं Brain-Storm
    पण, How will you avoid a storm
    Brexit नावाचं ?


    2

    Brexitच्‍या प्रत्‍येक विकल्‍पाला
    MP म्‍हणतात, ‘Not OK’.
    अन् इकडे, फासावर चढलाय UK.


    3

    MP बसलेत डोकं खाजवत
    UK च्‍या नांवाला लागतोय् बट्टा.
    अरे, Brexit आहे की थट्टा !


    4

    ब्रेक्झिटचा प्रश्न असा आहे गूढ
    की, मतदानावर मतदान चाललंय्
    पण निघतच नाहीं तोड.


    5

    ब्रेक्झिट तर हवं
    पण Backstopचा लागलाय फास
    अन् प्रत्‍येक विकल्‍प होतोय्
    Parliament मधें नापास.


    6

    डोकेफोड, उरस्‍फोड
    सगळं सगळं व्‍यर्थ
    ‘House’ मधल्‍या ब्रेक्झिट-चर्चेला
    उरला नाही अर्थ.


    7

    लंडन ते ब्रुसेल्‍स
    किती तंगडतोड !
    पण थेरेसा मे चं Deal
    कुणालाच लागत नाहीं गोड.


    8

    ‘House’ मधे बोलून बोलून
    आवाज बसला
    पण MPs घेत नाहींत
    निर्णयच कसला!


    9

    हें ही नको तें ही नको
    काय हवें तें मात्र कळेना
    Deadlineचा लागला फास
    तरी ब्रेक्झिट फळेना.


    10

    UK आणि EU
    कोण रावण कोण सीता ?
    मात्र दोघेही हरतील
    लक्ष्‍मणरेषा ओलांडतां.
    (- लक्ष्‍मणरेषा : ब्रेक्झिटसाठीची Deadline)


    11

    ‘Quie..e..e..t’ ओरडून Speaker चा
    घसा कोरडा झाला
    तरी ब्रेक्झिट-मतदानाचा
    पुरता राडा झाला.


    12

    ब्रिटिश राज्‍यावरती पूर्वी
    सूर्य मावळत नसे
    आतां indecisive UK चें
    होई जगतीं हसें.


    13

    अर्धं जग होतं जागत
    अन् लंडनकडे होतं बघत
    पण Brexit चऽ जहाज
    किनार्‍याला नव्‍हतं लागत.


    14

    भाष्‍यं सतराशेसाठ
    अठरापगड गट
    सगळे भुईसपाट.
    Brexit सकट.


    15

    ‘House’ च्‍या आंत अन् बाहेर
    सगळेच anxious, भावुक
    Brexit मध्‍यें काय हवंय् MPs ना,
    तें त्‍यांनाही नाहीं ठाऊक.


    16

    Brexit साठी Deal
    बनवुन तर आणली नामी
    पण पार्लियामेंटचा feel
    पडला कमी.


    17

    UK मध्‍यें आली ‘जगबुडी’
    ‘House’ मधील विस्‍कटली घडी
    इकडे तळमळतेय्
    Brexit ची कुडी.


    18

    Brexit च्‍या दोरावर हिंदकळतेय्
    UK ची anxious कुडी
    टीका करतायत् धेंड बडी बडी
    ते ‘वैद्य’ बनून तपासतायत् UK ची नाडी.


      October 22, 2019


  • पंढरीचा राणा – ११ : माझा सखा पांडुरंग

    उठतां बसतां भेटे मज सारखा पांडुरंग
    माझा सखा पांडुरंग ।।

    नेत्र पाहती मूर्ती श्यामल
    जिव्हा जपते ‘विठ्ठल विठ्ठल’
    गातो हृदयाचा प्रत्येकच ठोका ‘पांडुरंग’ ।।

    काम-क्रोध-मद-मोह बांधती
    लोभ नि मत्सर हरती शांती
    नाशतसे त्या सहा रिपूंचा धोका पांडुरंग ।।

    संकटांचिया काट्यांमधुनी
    नेई विठ्ठल बोट पकडुनी
    दूर करितसे चिंता-भीती-शोका पांडुरंग ।।

    अज्ञानाची अवस काज़ळी
    विठू न येऊं देतो भाळीं
    जीवनआभाळीं पसरी आलोका पांडुरंग ।।

    मार्तंडाहुन तेजस दीप्ती
    बह्मांडाहुन विस्तृत व्याप्ती
    अनंत, उरतो भरुनी साती लोकां पांडुरंग ।।

    आनंदाचें पेव विठू हा
    चिरहर्षाची ठेव विठू हा
    हृदयीं चिन्मय उन्मादाचा झोका पांडुरंग ।।

    एकमेव-गणगोत विठ्ठलू
    माझी जीवनज्योत विठ्ठलू
    जन्ममृत्युच्या पल्याड जाण्यां मोका पांडुरंग ।।

    - - -

    - सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
    सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz(W), Mumbai.
    Ph-Res-(91)-(22)-26105365. M – (91)-9869002126
    eMail : vistainfin@yahoo.co.in
    Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com

      July 15, 2016


  • जखमांचे वण

    किती खाल्ला मार, किती खाल्या शिव्या याची गणतीच नव्हती.

    एकच गोष्ट सतत कानी पडत होती.

    उनाड आहे, बावळट आहे, धडपड्या आहे, तडफड्या आहे, मूर्ख कुठचा.

    भडीमार होत होता आईकडून शब्दांचा..

    आम्ही होतो बालपणीच गांधीवादी.

    एका गालांत कुणी मारली तर दुसरा गाल पुढे करणारे.

    मुकाट्यानें मान वर न करता सारे शब्द पचविणारे.

    खेळणें, कुदणें, उड्या मारणें,

    त्यातच ढोपर, कोपर, हातपाय फुटून जाणें, भळभळा रक्त वाहायचे.

    पण सांगा रडून कुणाला ?

    कारण ते असायचे स्वतःच्याच प्रतापाचे...

    निमुटपणें बाजूस बसून, सहन करायचे

    आणि कुणास समजू नये, म्हणून माती टाकायचे.

    भरत होत्या साऱ्या जखमा हलके हलके.

    न भरून कसे चालायचे ?

    मस्तीची रग, खेळातील धडपड आणि

    स्वत:च डॉक्टर बनून जखामाबद्दल वाटणारी मायेची कढ.

    सारे तुटून पडायचे, घाव बरे करण्यासाठी.

    * * *

    ... संध्याकाळची वेळ, सूर्य अस्ताला चाललेला.

    किती घटका राहील्या होत्या, त्याला डुबण्यासाठी !

    विचार करितो मी. शांत बसून पंचाहत्तरीच्या काठी.

    हातपाय खाजवितो, कुरवाळीतो, सुरकुतलेल्या कातड्याकडे बघतो.

    मध्येच नजर खिळून राहते, ती जखमांच्या वणावर.

    कितीतरी लहान मोठ्या आकाराची.

    ज्यावर दिसत होती चित्रे आठवणीची.

    प्रत्येक वणावर होता एक इतिहास, एक घटना, एक जबरदस्त प्रसंग.

    कोडगे बनून केलेली मस्ती, आईचा मार, शिव्या आणि बाबांचा राग.

    पण आज सारे काही मनाला आनंदीत करून टाकणारे.

    शरिरावरले वण बनले होते एक जीवन आलबंम.

    नेत होते भूतकाळांत.

    जो होता निश्चित आणि उपभोगलेला.

    त्यात भविष्यकाळाची अनिश्चितता नव्हती, कि वर्तमान काळाची क्षणिकता.

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      May 3, 2021


  • हाक

    दे हाक आपल्या जन्मदात्या
    संकटात धावून येती ते
    दे हात तयांना वृद्धपणी
    कृतकृत्य होतील नक्की ते
    हाक जन्मदात्यांसी

    सौ.माणिक शुरजोशी
    नाशिक

      January 9, 2020