आज-उद्या

उद्या' साठी जगतो आम्हीं राहून मृत्युच्या दाढी ।

भविष्यांतील सुख कल्पूनी आज सारे कष्ट काढी ।।

'आज' राहतो नजिक सदैव 'उद्या' चालतो पुढे पुढे ।

आज नि उद्या यांची संगत कधीही एकत्र न पडे ।।

कष्ट 'आज' चे शिरीं वाहूनी ध्येय 'उद्या' चे बघती ।

हातीं न कांही पडते तेव्हां निराश सारे होती ।।

समाधान चित्तीं आणण्या प्रयत्न सारे 'आज' व्हावे ।

'आज क्षणाला' अस्तित्व असतां भविष्याला सोडून द्यावे ।।

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

उद्या’ साठी जगतो आम्हीं राहून मृत्युच्या दाढी ।

भविष्यांतील सुख कल्पूनी आज सारे कष्ट काढी ।।

‘आज’ राहतो नजिक सदैव ‘उद्या’ चालतो पुढे पुढे ।

आज नि उद्या यांची संगत कधीही एकत्र न पडे ।।

कष्ट ‘आज’ चे शिरीं वाहूनी ध्येय ‘उद्या’ चे बघती ।

हातीं न कांही पडते तेव्हां निराश सारे होती ।।

समाधान चित्तीं आणण्या प्रयत्न सारे ‘आज’ व्हावे ।

‘आज क्षणाला’ अस्तित्व असतां भविष्याला सोडून द्यावे ।।

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

Author