(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • वकील जातचं लय चतूर

    वकील जातचं लय चतूर

    प्रसंग - काल सकाळी...
    स्थळ - सांगली स्टेशन...

    फस्ट क्लास ए.सी. बोगीत आपला एक वकील एकटाच.

    कोल्हापूर जवळ असल्याने बोगी जवळपास रिकामी...

    एक स्त्री त्यांच्या कंपार्टमेंट मध्ये आली...

    "तुमच्या जवळचा सगळा किंमती ऐवज काढा नाही तर मी आरडा ओरडा करेन की तुम्ही माझी छेड काढली म्हणून !!"

    वकीलांनी साहेबांनी शांतपणे कागद पेन काढला...

    त्यावर लिहीलं...

    "मी मुकबधीर आहे...मला बोलता येत नाही ;ऐकू येत नाही... तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते या कागदावर लिहून द्या.."

    बाई जे बोलली ते तिनं लिहून दिलं...

    त्या वकीलांनी ते वाचलं...
    कागदाची घडी करुन खिशात ठेवला आणि म्हणाले..

    "हं...

    बोंबला जोरात आता कि मी तुमची छेड काढली म्हणून,

    माझ्याकडे तुमच्या हस्ताक्षरातली चिठ्ठी आहे पुरावा म्हणून "

    बाई पळाली ना सैराट !!!!
    वकिलांचा नाद करायचा नाय !

  • मा की दाल/ साबूत उडीदाची डाळ

    (उडीद डाळ- पारंपारिक मसाले वापरून, कमी तेलात व कमी वेळात कशी करायची).

  • पार्सल टेप आर्ट

    पार्सल टेप आर्ट

    काही कलाकार इतके प्रतिभावंत असतात की त्यांना कला साकारण्यासाठी कोणत्याही माध्यमाचा उपयोग करुन घेता येतो. चित्रकला ही साधारणपणे कागदावर ब्रशने किंवा इतर माध्यमातून रंगरंगोटी करुन साकारली जाते. मात्र ब्रश किंवा रंगाचा वापर न करता एकाद्याने अप्रतिम चित्रे साकारली तर आपण काय म्हणाल?

    mark-khaisman-p19r5i5जगावेगळा आणि प्रसिद्धीपासून दूर असलेला मुळचा युक्रेनमध्ये जन्मलेला आणि सध्या अमेरिकेतील फिलाडेल्फियामध्ये वास्तव्याला असलेला चित्रकार मार्क खैसमन याने एक वेगळीच कला विकसित केली आहे. हा चित्रकार जे माध्यम वापरतो ते ऐकूनच तुम्ही थक्क व्हाल. आपण पॅकिंगसाठी जी दोन इंच रुंदीची, खाकी रंगाची टेप वापरतो, तीच टेप म्हणजेच या मार्क खैसमनचं कलाकृती सदर करण्याचं मुख्य माध्यम. या टेपचेच लहान-मोठे तुकडे करुन, ते एकावर एक चिकटवून त्याने काही अफलातून पेंटिंग्ज तयार केली आहेत. ज्याप्रमाणे स्टेन्ड ग्लासमधून प्रकाश आरपार जातो आणि त्यातून त्रिमितीसारका इफेक्ट मिळतो तसाच इफेक्ट या चित्रांमधूनही मिळतो.

    सोबतच्या चित्रातील ही खुर्ची पहा. ही कलाकृती स्पेनमधल्या एका चित्र संग्राहकाने तब्बल ८६,९८० डॉलर्स मोजून विकत घेतली.

    या कलाप्रकाराला म्हणतात “पार्सल टेप आर्ट” या कलाप्रकाराविषयी अधिक जाणून घ्या http://www.khaismanstudio.com या वेबसाईटवर. इथे तुम्हाला पहायला मिळतील एकापेक्षा एक कलाकृती.

    या मार्क खैसमनच्या कलाकृती दाखवणारा हा एक व्हिडिओसुद्धा बघा.

    https://www.youtube.com/watch?v=LSvZE8gZAyM

    -- निनाद अरविंद प्रधान

  • वक्तशीरपणा

    "तिसरी कसम' या चित्रपटाचे चित्रीकरण बिहारमधील पूर्णिया जवळच्या जंगलात सुरू होते. दिग्दर्शक बासू भट्टाचार्य यांना अगदी पहाटेचे एक दृश्य चित्रित करायचे होते म्हणून त्यांनी नायक राजकपूर यांच्या स्वीय सहाय्यकाला दुसऱ्या दिवशी पहाटे साडेपाचला हजर राहण्यास सांगितले.

    त्याने राजकपूरना हा निरोप देण्यास साफ इन्कार केला. "त्यांचा दिवस सकाळी अकरा वाजता सुरू होतो हे मला ठाऊक असताना माझी हिंमतच होणार नाही त्यांना पहाटे या म्हणून सांगायला.'

    मग दिग्दर्शक बासू भट्टाचार्य यांनीच ते काम स्वीकारले. ते राजकपूरला म्हणाले, "उद्या मला दोन मोठ्या लोकांना बरोबर घेऊन काम करायचे आहे. वेळ पहाटे साडेपाचची आहे. मात्र, ती चुकली तर त्यातला एक मोठा माणूस निघून जाईल... एक मोठा माणूस म्हणजे साक्षात्‌ सूर्यनारायण व दुसरे आपण स्वत: आहात.'

    दुसऱ्या दिवशी पहाटे साडेपाचला सर्वांच्या आधी राजकपूर स्वत: पोहोचलेले होते. एवढेच नाही तर संपूर्ण युनिटसाठी त्यांनी चहादेखील तयार ठेवलेला होता. सर्वांना शरमल्यासारखं झालं. राजकपूर कामात आपलं भान हरपून जातात हे साऱ्यांना पुन्हा एकदा कळलं.

    कथा उपदेश : मोठी माणसं आपल्या कामाला नेहमी सर्वोच्च अगक्रम देतात.

    -- दीपक गायकवाड

  • काँग्रेसी सफाई मोहिम काय साधणार ?

    अखेर मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा राजीनामा सोनिया गांधींनी मंजूर केला. विधिमंडळात प्रश्नांच्या सरबत्तीला तोंड द्यावे लागू नये यासाठी हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच पक्षाने हा निर्णय घेतला. सुरेश कलमाडींनाही पक्षाच्या सचिवपदावरून हटवण्यात आले. काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत सफाई मोहिम राबवण्यात आली असली तरी ती कितपत परिणामकारक ठरणार हा खरा प्रश्न आहे.

  • आनंदी आनंद | नाट्यप्रयोग | एक हास्य यात्रा

    “आनंदी आनंद” हे एक कौटुंबिक नाटक, कुटुंबातील प्रत्तेकाने सामील व्हाव अशी एक ‘हास्य यात्रा’.

    शेजाऱ्यांनी मला हसून हसून जाम बेजार केल. मला मध्ये त्यांना सांगावस वाटल, “काका आपण आपल राक्षसी हास्य आवरल तर मला या नाटकाचे संवाद ऐकू येतील”

  • जहाजांची दुनिया

    जगात विकासाची गंगा आणली ती वाहतुकीच्या साधनांनी. म्हणून कोणत्याही अर्थव्यवस्थेचे वर्णन करताना अर्थचक्र हा शब्द वापरला जातो. चक्र है वाहतुकीचे आणि गतीचे प्रतीक होय. वाहतुकीच्या साधनांचा हा एक आढावा.

  • मकान डुलु

    कितीही महत्वाचे काम असले तरी त्यांच्या नमाज पठणाची वेळ झाली की ते काम थांबवून जातात असं ऐकलं होतं पण मला तसा अनुभव कोणाकडूनच आला नाही. उलट कॉफी ब्रेक किंवा जेवणाची वेळ होतं आली की मीच त्यांना त्यांच्या भाषेत बोलायचो, मकान डुलु,मकान डुलु म्हणजे जेवायला चला जेवायला चला.

  • राशी व त्यांचे स्वभाव – सिंह

    राशी :- सिंह
    स्वामी :- सूर्य
    देवता :- भगवान मुकुंद
    जप मंत्र :- ॐ बालमुकुंदाय नमः
    उपास्यदेव :- सूर्य देवता
    रत्न :- माणिक
    जन्माक्षर :- म मृ मा मि मी मू मेमो ट टा ट्र टि टी ट्री टे ट्रे टै टौ ट्रा अग्नीतत्व राशी आहे. या ग्रहावर रवि (ज्योतिष) ग्रहाची मालकी आहे. ही राशी वंध्या राशी म्हणूनही ओळखली जाते. कुंडली मध्ये ५ आकड्याने ही दर्शवली जाते. सूर्य व मंगळ हे या राशीचे कारक ग्रह आहेत. ही अग्नितत्व, पुरुष राशीराशी आहे.
    राशीचा स्वामी सूर्य (ज्योतिष) आहे. यांना अधिकार गाजवणे आवडते. भरपूर स्फूर्ती तत्वनिष्ठता आकर्षता, आशावाद असलेली ही राशी आहे. जिद्दीने उभारी घेण्याची हिम्मत ठेवतात. मिरवण्याची हौस असते, मान सन्मान आवडतात. ताकद आणि चपळाई भरपूर असते.

  • तात्पुरता सदस्य

    तात्पुरता सदस्य म्हणजे नेमकं काय? त्या संदर्भातील इत्थंभूत माहिती देणारा हा लेख.