(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • ही आवडते मज…..

    एप्रिल-मे हे सर्वांचे आवडते महिने! मुलांना शाळेला सुट्टी म्हणून-तर आई-बाबांना मुलांना सुट्टी म्हणून. खरंतर सगळेच रिलॅक्स! मौजमजा, सहली, मामाचागाव इत्यादीमध्ये सुट्टी कधी संपते ते कळतही नाही. मे संपून जून सुरू झाला की मंडळी भानावर येतात. चिमणीपाखरं आपापल्या घरट्याकडे परततात. नकळत शाळेची घंटा साद घालू लागते, मुलांना आणि पालकांनाही! हल्ली तर बाळ जन्माला येण्यापूर्वीच त्याची शाळा ठरते. शाळेचे तास जेवढे अधिक, डोनेशन जेवढे जास्त तेवढी शाळा दर्जेदार हे समीकरण पक्के होत आहे. आपल्या स्टेटसनुसार जास्तीत जास्त चांगली शाळा निवडली जाते. त्यामुळेच तर दोन वर्षाचे बोबडे बोल 'ए फॉर अॅपल'ने सुरू होतात आणि ट्विंकल ट्विंकलने चमकतात. ड्रॉईंग, क्राफ्ट ही तर मम्मीची आर्ट असते. अपटूडेट युनिफॉर्म, नेकटाय, आयकार्ड, शूज सगळे कसे टापटीप असते. त्या निष्पाप चेहऱ्यावर उत्सुकता असो वा नसो, मात्र सारे घरदार त्याच्या शाळेची पूर्वतयारी एन्जॉय करीत असते. आईबाबा आपल्या लाडक्यासोबत मनाने पुन्हा एकदा शाळेत प्रवेश घेत असतात. खरच त्यांनाही प्रवेश परीक्षा द्यावीच लागते. त्यांच्या ज्ञानाबरोबर तिजोरीचा अंदाज घेऊनच अॅडमिशनचे मिशन पूर्ण होते. युनिफॉर्मच्या दुकानासमोरची रांग पाहून लक्षात येते नवीन शैक्षणिक वर्षाची सुरूवात होत आहे. लग्नसराईत जसे वधुवरांपेक्षा यजमानांची धावपळ अधिक तशीच धावपळ आणि टेन्शन आता सुध्दा आईबाबांना असते. नवी कोरी वह्यापुस्तके, पाठीवरच्या ओझ्याचा भाग बनतात. पाटी अाण श्रीगणेशा दोन्ही आऊटडेटेड झाले असल्याने वह्या पुस्तकांनाच यथासांग कव्हरचा युनिफॉर्म आणि नामदर्शक लेबल लावले जातात. मात्र शाळेच्या गेटमध्ये मम्मीचा हात घट्ट धरून भोकाड पसरण्याची परंपरा आजही नकळत जपली जाते. तिचाही जीव क्षणभर गलबलतो. मात्र काही दिवसातच चित्र पालटते. स्वत:च्या हाताने खाणे, शर्टला लटकवलेल्या रुमालाने नाक- तोंड पुसणे, स्वत:च्या वस्तू सांभाळणे या सगळ्या गोष्टींचे प्रशिक्षण शिशू वर्गात पूर्ण होते. खरंतर बाललीलांनी भरलेले बालपण शिस्तीच्या कोंदणात बसविण्याचे कामच या बालवर्गांमधून केले जाते. नंतरच्या काळात हीच पाखरे एकमेकांच्या संगतीत इतकी रमतात की शाळा आणि घर यातले अंतर मिटून जाते. मग मात्र दरवर्षी एप्रिलमध्येही मनातल्या शाळेला सुट्टी नसते. भातुकलीच्या खेळातही शाळेचा वर्ग भरतो. जूनमध्ये शाळा सुरू होण्याआधीच मन शाळेकडे धाव घेते. सगळ्या नव्या कोऱ्या वस्तू घेऊन पहिल्या दिवशी शाळेत पोहोचणे यात खूप मोठे सुख असते. तर नवा वर्ग, नवी जागा, नव्या बाई यांची अनामिक ओढ लागते. नव्या वह्या-पुस्तकांचा सुवास सुखावत असतो. त्याच मित्रमैत्रिणींना पुन्हा नव्याने भेटण्याची उत्सुकता असते. सुट्टीतल्या गमती जमती मनात साठलेल्या असतात. खरंतर हा रेशीमकिडा घराच्या रेशमी कोशातून सुरवंट हेाऊन बाहेर पडत असतो. पुढे या सुरवंटाच्या पंखात बळ येते आणि ते फुलपाखरू स्वच्छंद विहार करू लागते. पण हा सगळा प्रवास मात्र जून ते एप्रिल या शैक्षणिक वर्षाच्या मार्गावरून होत असतो. शाळा आणि बालपण हातात हात घालून फुलपाखराच्या पंखात रंग भरतात. त्याला उडण्याची उर्मी देतात. आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न देतात. सर्वात महत्वाचे म्हणजे आयुष्याच्या इमारतीचा पाया मजबूत करतात. आत्मविश्वास, माणुसपणा, संस्कार, जीवनावरची निष्ठा या सगळ्यांची रुजवण करतात. म्हणूनच तर जीवनाच्या दगदगीत 'माझी शाळा 'कधीही विसरली जात नाही. हृदयाच्या कप्प्यात ती अत्तराच्या कुपीसारखी जपली जाते. नकळत कधी उघडली जाते, तेव्हा शाळेच्या आपारातल्या आठवणींचा सुगंध मनाला सुखावतो. हल्ली 25-30 वर्षामागचे वर्गमित्र-मैत्रिणी एकत्र येऊन आपल्या जीवनातील ती सोनेरी पाने पुन्हा उलगडण्याचा प्रयत्न करतात. एकपकारे यामध्ये शाळेविषयीची कृतज्ञता व्यक्त केली जाते आणि पुन्हा एकदा मन उड्या मारीत शाळेत जाऊन पोहोचते. तो वर्ग, तो बेंच, तो फळा, ती खिडकी सगळे बोलू लागतात आणि नकळत हसता हसता डोळ्यांच्या कडा पाणावतात. अशावेळी त्या शाळेलाही कृतकृत्य वाटत असेल ना? 'बालपणाचा काळ सुखाचा' ही उक्ती शालेय जीवनाशिवाय पूर्ण होत नाही. जसे कॉलेज म्हणजे तारुण्य तसे शाळा म्हणजे बालपण. बोबडे बोल ते अस्खलित वक्तृत्व, वेड्यावाकड्या रेघोट्या, ते डौलदार लेखन, आईचा हात सोडून शाळेतला प्रवेश, ते आयुष्याच्या खुल्या प्रांगणात दमदार प्रवेश करणारी पावले. हा सारा प्रवास म्हणजे 'माझी शाळा' असते. कदाचित त्यामुळेच तर सुट्टी इतकीच दरवर्षी शाळा सुरू होण्याची वाट पाहिली जाते. खूप अभ्यास करण्याचा संकल्पकरूनही दरवर्षी शाळा आणि विद्यार्थी यांची पुनर्भेट होत असते. दरवर्षी तोच नवा उत्साह शाळेला चिरतरुण करीत असतो. तेच नवचैतन्याचे दिवस कालपरवापासून सुरू झाले आहेत. तुमच्या आमच्या मनातली 'आपली शाळा' आपल्याला आजही खुणावतेय ना? म्हणूनच नवीन शैक्षणिक वर्षासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

    ही आवडते मज मनापासुनी शाळा, लाविते लळा ही जशी माऊली बाळा

    ("ठाणे वैभव" च्या सौजन्याने)

    -- नूतन बांदेकर

  • कसाबदादा, कसाबदादा !!!

    आमच्याकडे पूर्वी सिनेमांचे आठवडे मोजले जायचे. १००-१०० आठवडे चालणारे सिनेमापण होते तेव्हा. आता ते दिवस नाही राहिले रे… पण तू मात्र १०० आठवड्यांचा झालास आमच्याकडे. आमच्याकडे आलेला प्रत्येक पाहूणा आमचा खास पाहूणचार घेतल्याशिवाय घरी जाउच शकत नाही. अगदी वर्षानुवर्ष तू आमचा पाहूणा बनून रहा. कोणीही तुला काहीही बोलणार नाही.

  • डार्विनचा अुत्क्रांतिवाद

    डार्विनच्या अुत्क्रांतीवादाने बर्‍याच धार्मिक संकल्पनांना धक्का दिला. आनुवंशिक तत्वाच्या (जेनेटिक मटेरियल) अुत्क्रांतीमय बदलांमुळे सजीवांच्या प्रजाती निर्माण होतात हे सिध्द झाले. आनुवंशिक तत्वच शरीर धारण करू शकते म्हणजे आनुवंशिक तत्वच सजीवांचा आत्मा असला पहिजे. या तत्वानुसार मी आत्म्याचा आनुवंशिक तत्व सिध्दांत मांडला आहे.

  • शेअर ट्रेडिंग स्कुल

    shares-trading-school

  • पाश हे गुंतलेले

    आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे,

    मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे...

    भैरवीला, आप्पा ठाकूरांच्या सुप्रसिद्ध गजलेच्या ओळी दस्तुरखुद्द आप्पांच्याच करारी वाणीतून, कानावर पडताच श्रोतृवृंदातून जोशपूर्ण टाळ्यांचा एकच गजर होत ‘गुंतलेले पाश’ हा लालित्याने नटलेला कार्यक्रम संपन्न झाला आणि प्रेक्षकांमधून आज भरून पावलो अशी लखलखित प्रतिक्रिया उमटली.

    दिनांक २४ नोव्हेंबर २०१८ रोजी ‘बांधण जनप्रतिष्ठान’ आणि मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ’ वाशी आयोजित, ज्येष्ठ गजलकार श्रीयुत आप्पा ठाकूर यांचा ‘गुंतलेले पाश’ हा मराठी गजलांचा हृदयस्पर्शी कार्यक्रम वाशी येथील साहित्य मंदिर सभागृहात मोठ्या दिमाखात सादर झाला.

    गुंतलेले पाश थोडे सैलसे करणार आहे,

    आणि काही रंग गहिरे त्यात मी भरणार आहे...

    या संमोहित करणाऱ्या गजलेने कार्यक्रमाची नांदी झाली. येथून पुढे कवयत्री शिल्पा देशपांडे या आकर्षक युवतीने तितक्याच मनभावनं निवेदनाद्वारे गजलचे, आप्पांच्या भावविश्वाचे, मानवी जीवनातील द्वैत-अद्वैताचे, सुख दु:खाचे, कधी बोचणारे तर कधी लोभस आलिंगनासम भासणारे शब्दकळ्यांच्या सुगंधित आभूषणाने अलंकृत अदाकारीने नटलेल्या समयोचित निवेदनाद्वारे गजलविश्वाचे रेशीमबंध अलगद उलगडत नेले.

    आयुष्याचे अवघड ओझे खूप दिवस मी पेलत आहे,

    आणिक त्याच्या मोहापायी वृद्धत्वाला झेलत आहे...

    सांजवेळी, उन्हाच्या उतरणीच्या शांत पर्वाला, लांबलेल्या सावल्या जसजशा धूसर होत जातात, परंतु कुठेतरी तळ्यामध्ये पाण्यात पिकलेले पान पडते आणि चकचकणारे तरंग उमटत जातात, तशाच!

    ते तरंग का प्रवाहित होत असतील बरे? याच आशयाच्या पुढच्या ओळींमध्ये आप्पा म्हणतात...

    बालपणीची स्वप्ने माझ्या मागे मागे धावत होती,

    आणि आता मी मावळताना स्वप्नामागे धावत आहे...

    उलिग्नतेतून लगेचच श्रोत्यांना सावरत, दर्दी प्रेक्षकांसाठी प्रेमभरल्या विद्रोहाची पुढची गजल पेश होते...

    तुझे ऋतू...

    सरळपणाने राहावयाचे तुझ्यात कुठे इमान होते

    मी जन्माचा फकीर आणिक तुझे इरादे महान होते...

    या विरक्तीने आप्पा मनमानातल्या प्रेयसीला आव्हानात्मक साद घालतात.

    आप्पांचा पत्नीवियोग सर्व सुजाण श्रोत्यांनी अनुभवाला तो प्रौढत्व आलं त्याचं काय, या पुढील सादरीकरणात...

    आपल्या सुविद्य पत्नीप्रती कृतज्ञतेने व्यक्त होताना ते म्हणतात...

    तिच्या सावलीत सदा बहरलो कधीच गलबललो नाही

    वादळ वारे होते, तरीही थरथरलो नाही...

    आठवांच्या कळवळ्याने भावविवश होत, आपल्या सुसंस्कृत पत्नीकडून अलौकिक विवेकाची शिकवण मिळाल्याचे ते आवर्जून नमूद करतात,

    संस्काराने हळूहळू मग विवेक मजला तिने दिला

    म्हणून तर मी अतिमोहाने कधीच भरकटलो नाही...

    हृदयातून प्रसवलेल्या या ओळीतील आत्मिक रुदनाने, आप्पांसह सर्व सभा गलबलून गेली, अन् श्रोत्यांच्या पापण्या नकळत ओलावल्या.

    दु:खालापाचे अश्रु-मोती असेच घरंगळत राहतात.. पुढील गजलेत...

    कफन बांधुनी फिरतो आहे,

    तरी जगावे म्हणतो आहे...

    प्रेक्षकांचा कंठ गहिवरतो, आवंढा गिळताना कष्टी होतात. परंतु आप्पा नवचैतन्याचे मर्म मांडताना वाळूचे घर बांधण्याचा सल्ला देतात.

    दिवस उद्याचा घेत उशाला,

    स्वप्ने पुढची बघतो आहे...

    हळूहळू गजल आणि श्रोत्यांची गुंतलेल्या पाशांची वीण अधिकाधिक घट्ट होत जाते.

    आपल्या ओघवत्या निवेदन शैलीने श्रोता आणि गजलकार आप्पा यांच्यामधील सुरेख दुवा साधण्याचे आणि उत्तरोत्तर कार्यक्रम खुलवित नेण्याचे कसब आत्मसात केलेल्या निवेदिका शिल्पाने मग मोर्चा वळविला तो आप्पांच्या कवितेकडे...

    इतर काही जागतिक दिनांप्रमाणे

    जागतिक महिला दिनही साजरा करतील, हे तुझ्यासाठी

    आणि दुसऱ्याच दिवशी

    यांच्या नजर तुझ्या देहाच्या

    आकृतिबंधावर स्थिरावतील...

    अशा परखड भाष्याने प्रेक्षक दिग्मूढ होऊन गेले. निवेदिका शिल्पाने पुढील गज़लेच्या प्रास्ताविकेत म्हटले...

    माझ्याच माणसाशी मज बोलता न आले,

    त्यांच्या उरात माझे घर बांधता न आले...

    आप्पांनी या गज़लेच्या मतला पेश करताना म्हटले..

    तसा विश्वास कोणाचा कुठे होताच माझ्यावर,

    नको ते यायचे कानी जराशी पाठ फिरल्यावर...

    आप्पांच्या या एकापेक्षा एक सरस रचनांच्या आस्वादात सर्वांगाने डुंबत असलेल्या श्रोत्यांना आश्चर्याचा धक्का दिला तो शिल्पाने.

    आता आप्पा विठ्ठलालाच धारेवर धरणार आहेत आणि काही आदेशवजा सूचना करणार आहेत. प्रेक्षकही कान टवकारून बसले, तर आप्पा बोलते झाले...

    तूर्तास विठ्ठलाने आता असे करावे

    सोडून वीट मागे थोडे पुढे सरावे...

    बांधून ठेवलेले सोडून हात दोन्ही

    आता खुशाल देवा कामात गुंतवावे...

    पुढे, समाजातील दंभावर आसूड ओढताना आप्पा विठ्ठलाला साकडे घालतात.

    दारातल्या तुझ्या तू हटवून दांभिकांना

    संपूर्ण पंढरीचा वारस मला करावे.

    ही गजल सादर होतानाच प्रेक्षकांची कधी हसून मुरकुंडी वळली तर कधी आप्पांनी, भक्त पुंडलिकाने विठ्ठलाला जसे वीटेवर ताटकळत उभे राहण्याचे फर्मान सोडले होते तत्सम आता वेळ आली आहे विठ्ठलाने वीट मागे सोडून थोडे पुढे सरतानाच कटीवरील हात सोडून कार्यप्रणव होण्याचे निर्देश दिलेत ते केवळ त्यांच्या गजलेप्रती असलेल्या प्रतिभासंप्पन्न निस्सीम भक्तीमुळे आणि चोखंदळ रसिकवत्सल भावनेने.

    भक्तवत्सल विठ्ठलाच्या प्रेमापोटीच साक्षात ईश्वराला म्हणजेच पंढरीच्या विठूरायाला जनोद्धाराची कास धरण्याचे बाळकडू पाजतानाच आख्ख्या पंढरीचा वारस आपल्यालाच करावे अशी सूचना आप्पा करू शकले ते गजलप्रान्तातील त्यांच्या एकमेवाद्वितीय चारित्र्यसंप्पन्न संतशिरोमणी प्रतिमेमुळेच.

    या प्रसंगी, सूर निरागस हो... या गाण्यावर सहजहस्ते श्रीगणरायाचे सुंदर चित्र रेखाटणारे चित्रकार श्री. प्रकाश पाटील यांचा सत्कार ‘बांधण प्रतिष्ठान’तर्फे गज़लप्रेमी विश्वस्त श्री. नाना लोडम यांच्या शुभ हस्ते करण्यात आला तसेच आप्पांच्या आग्रहास्तव नुकत्याच नवी मुंबई अभिमान पुरस्काराने सन्मानित झालेल्या श्रीयुत ललित पाठक आणि सुभाष कुलकर्णी यांचा सत्कार माया ठाकूर यांचे मानसपुत्र आणि ठाणे महानगरपालिका उपायुक्त, श्री. संदीप माळवी, यांचे शुभ हस्ते करण्यात आला. आभारप्रदर्शन श्री. दिलीप जांभळे यांनी केले. या प्रसंगी सर्वश्री सर्जेराव कुईगडे, महादेव देवळे, पल्लवी देशपांडे, विजय दाते, भूषण मालवणकर, वसंत साळी, डॉ. राम पंडित, प्रमोद कर्नाड, संदीप माळवी, डॉ. अशोक पाटील, नाना लोडम, सुभाष कुळकर्णी, ललित पाठक, अशोक भगत, प्रा. वर्षा भोसले आणि विद्या तांबवे यांच्यासह परिसरातील मान्यवर आणि मोठ्या संख्येने गुणग्राहक रसिक श्रोते उपस्थित होते.

    लेखक - श्री घनश्याम परकाळे

    श्री घनश्याम परकाळे यांच्या कॉमन मॅन या ललित लेखन संग्रह इ-पुस्तकातील हा लेख.
    हे इ-पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...
    https://marathibooks.com/books/common-man-by-ghanashyam-parkale/

    किंमत : रु.१५०/
    सवलत किंमत : रु.७५/-

  • माह्या गुरजीची गाडी

    फेसबुकवरुन आलेली ही अस्सल कथा भावनाविवश करणारी...... फारच सुंदर वाटली म्हणून शेअर केलेय. अवश्य वाचा....


    तो एक नवयुवक.... डीएड झालेला... गुरुजीची नोकरी लागली... पण दूरच्या जिल्ह्यात.... एका पारधी समाजाच्या तांड्यावर.... जिथं शिक्षण आणि शाळा पिढ्यानपिढ्यापासून कशाशी खातात हेच माहित नाही अश्या ठिकाणी... पण तोही अस्सल गुरुजी.... नव्या पिढीचा.... नव्या विचारांचा... अर्थात तुमच्या-माझ्या सारखा.... ज्या दिवशी रुजू झाला तो दिवस शाळा नावाच्या वास्तूला समजून घेण्यातच गेला. दिवसभर एकही पोरगं शाळेकडं फिरकलं नाही.... पण त्याने हार मानली नाही. तो रोज पालावर जायचा. पोरांच्या आई-बापांना पोरांना शाळेत पाठवायला सांगायचा. हळूहळू त्या अडाणी लोकांना पटायला लागलं आणि वेगवेगळ्या वयाची कधीही शाळेत न गेलेली ती रानफुलं शाळा नावाच्या तुरुंगात येवून बसू लागली.... रानावनात लीलया फिरणारी ती मुलं शाळेत मात्र अवघडल्यासारखी बसत... पण आपला मित्रही काही कमी नव्हता. त्याने अशी काही जादू केली कि त्या पोरांना गुरुजी आवडू लागला.... अन् रानात, काट्याकुट्यात ससा, तितर सहज पकडणारे हात ग म भ न गिरवायला लागले.

    नोकरी मिळाल्यावर आपल्या मित्राने त्याची ड्रीम बाईक घेतली. रोज सकाळी तो स्वतः आंघोळ करण्यापूर्वी गाडीला साफ-सुफ करायचा... मगच शाळेची तयारी. नव्या कोऱ्या बाईक वरून शाळेच्या ठिकाणी जावून-येवून करण्य्यात तो रोज थ्रिल अनुभवायचा. ती गाडी त्याची जिवाभावाची मैत्रीणच बनून गेली होती जणू... एक साधा ओरखडा किंवा थोडीशी धूळही गाडीवर पाहून अस्वस्थ व्हायचा तो.... रोज शाळेच्या समोर एका झाडाखाली गाडी लावून शाळा सुरु व्हायची....

    आनंददायी शिक्षण पद्धती वापरल्यामुळं गुरुजीवर मुलांना रागवायची पाळीच कधी येत नव्हती. पोरं रोज गुरुजीची गाडी यायची वाट बघत शाळेजवळ येवून थांबत आणि गाडी गेल्यावरच घरी जात....

    पण............भर झोपेत मोठा आवाज झाल्यावर दचकून झोप मोडावी अन् सुंदर स्वप्न सहज भंग पावावं तसं झालं त्या दिवशी.... रोजच्याप्रमाणे तो गाडीजवळ गेला आणि त्याचा डोळ्यांवर विश्वासच बसेना... गाडीच्या टाकीवर कुणीतरी टोकदार दगडांनी काहीतरी कोरलं होतं. त्याच्या आवडत्या गाडीच्या टाकीवर ओढलेले ओरखडे पाहून तो प्रचंड संतापला. पोरं समोरचं उभी होती. कधीही न सुटलेला त्याचा तोल गेला. तो त्या पोरांना अद्वा-तद्वा बोलू लागला. त्याच्यातील सदसद्विवेकबुद्धी पार हरवून गेली. फक्त राग आणि राग.... पोरं घाबरून गेली. त्यांनी आपल्या गुरुजींना कधीही एवढं रागवलेलं पाहिलं नव्हतं. नेहमी प्रेम करणारा त्यांचा गुरुजी.... पण आज मात्र प्रचंड संतापून त्यांना शिव्या-शाप देत होता आणि एकच विचारात होता.... सांगा कुणी गाडी खराब केली? माझ्या गाडीवर ओरखडे कुणी ओढले?

    पण या रागाच्या प्रसंगी कोण पुढं येणार... . सगळी पोरं भयचकित होऊन एकमेकाच्या तोंडाकडं बघत होती....

    इतक्यात एक चिमुरडी पुढं आली आणि होणाऱ्या परिणामांची काळजी न करता म्हणाली, ‘ गुरजी, मी लिव्हलं तुझ्या गाडीवर..."

    तो खूप चिडला आणि विचारू लागला का पण....? शेवटी ती बोलू लागली "काल गावातून अशीच एक गाडी चोरीला गेली. मला वाटलं, गुरजीची गाडी कुणी चोरून नेली तर...? . म्हणून मी गाडीवर लिव्हलं..... इतका वेळ फक्त स्वार्थी अविचारी रागाने त्याच्या मनाचा ताबा घेतला होता.... पण त्या पोरीचे शब्द ऐकले अन् एकदम भानावर आला तो.... तेव्हा कुठं बारकाईनं पाहिलं गाडीकडं त्यानं... गुरुजींनी शिकवलेल्या बाळबोध अक्षरात त्या चिमुरडीनं गाडीच्या टाकीवर कोरलं होतं....

    "माह्या गुरजीची गाडी "

    टचकन पाणीच आलं त्याच्या डोळ्यात.... इतका वेळ आरोपी सापडला कि त्याला शिक्षा करायला शिव-शिवणाऱ्या हातात त्याने ते चिमुकले हात घेतले आणि त्यांच्यावर ओठ टेकवले............

    अश्रूंना वाट मोकळी करून देण्याशिवाय पर्याय नव्हता त्याच्यापुढे..... मुलं बिचारी गोंधळून गेली... गुरुजी अचानक का रडतायेत... हेच कळंत नव्हतं त्यांना..... पण गुरुजींना मात्र सर्वकाही कळलं होतं.... शब्दांच्या पलिकडलं....

    त्यानंतर गुरुजींनी गाडीवरचे ओरखडे तसेच ठेवले... आजही आपला तो मित्र मोठ्या दिमाखात तीच गाडी वापरतोय... अन् तशीच वापरतोय.. तो जेव्हा गाडीवर बसतो.... त्याची छाती गर्वाने फुगलेली असते....

    कुणी विचारलंच तर तो अभिमानाने सांगतो कि, हा मला मिळालेला राष्ट्रपती पुरस्कारापेक्षाही मोठा पुरस्कार आहे.....!!!

    कथा आवडली तर नक्की सांगा

  • देवा आण्णांना तेजोमय राष्ट्रीय प्रेरणा ज्योत बनव ….

    भारत देश हा पुरातन सनातन राष्ट्र आहे या देशांनी आजवर अनेक धोके खाले आहेत ह्याची साक्ष आपला इतिहास देतो. आज पर्यंत या देशाला काणत्याही विदेशी ताकतीने पराजित केले नाही.

  • संगमेश्वरी नौका

    सागरी सुरक्षेचे महत्व लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराची उभारणी केली. याच आरमाराची शान असलेली ‘संगमेश्वरी’ नौका रत्नागिरी जिल्ह्याच्या निढळेवाडी येथील सुतारांनी तयार केल्याचे सांगितले जाते. सुतारकलेची ही परंपरा जोपासत आजही या गावात नौका तयार करण्याचा व्यवसाय करण्यात येतो.

  • सौर सुनामी खरंच येणार ?

    सूर्यावर घडलेल्या अत्यंत गुंतागुंतीच्या चुंबकीय घडामोडींमुळे विद्युत्भारित कणांचा एक महाकाय ढग पृथ्वीच्या दिशेने भिरकावला गेला. हा ढग कोणत्याही क्षणी पृथ्वीला तडाखा देऊ शकेल असा अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे. याला सौरसुनामीचे नाव देण्यात आले आहे. प्रत्यक्षात भूकंप झाल्याशिवाय सुनामी येत नाही. त्यामुळे या घटनेला ऊर्जेचा स्फोट म्हणता येईल. त्याचा पृथ्वीवर कितपत परिणाम होतो याबाबत मतमतांतरे आहेत.

  • टेबल मॅनर्स

    फोर्क आणि स्पून ने जेवायचे, जेवताना अन्न खाली पडून द्यायचे नाही. प्लेट मध्ये काट्या चमच्यांचा आवाज नाही झाला पाहिजे. फोर्क किंवा क्नाइफ कोणत्या हातात पकडायची वगैरे वगैरे सांगितले गेले. अर्ध्यापेक्षा जास्त जणांना हे माहिती होते आणि त्यांना तसं जेवता पण येत होते. पण माझ्यासारख्या काहीजणांना जेवताना कसले मॅनर्स पाळायचे, जहाजावर जाऊ तेव्हा बघू असं वाटायचं. घरात मांडी घालून हाताने जेवायची सवय, शेतावर लावणी नाहीतर कापणीला डाव्या हातावर भाकरी आणि त्याच भाकरीवर वाळलेले बोंबील, सुकट नाहीतर जवळ्याचे कालवण खाताना जी चव लागते ती पंचपक्वान्ने खाताना कशी काय मिळायची आणि तीसुद्धा काटे चमच्यांनी