(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • लहानपणी बर होत….

    लहानपणी बर होत....
    वरच्या इयत्तेतल्या मुलांची पुस्तक अर्ध्या किमतीत आपल्याला चालायची.
    आता नवीनचं पुस्तक.... ती हि शाळेतूनच घ्यावी लागतात.
    मोठ्या भावाचा शाळेचा गणवेश आपल्याला कामी यायचा ...
    आता किमान दोन प्रकारचे गणवेश शाळेत लागतात..
    ईतर दिवशी वेगळा आणि पी.टी. च्या दिवशी वेगळा.
    आम्हाला एकदा घेतलेला रिलाईबल (Reliable) कंपनीचा रेनकोट दोन तीन वर्ष चालायचा...
    आता प्रत्येक वर्षी नवीन कार्टुनच चित्र असलेला रेनकोट आणि सोबत छत्री ही लागते.
    आम्ही अर्धा तास चालत मित्रांसोबत गप्पा मस्करी करत शाळा आणि शाळा ते घर गाठायचो...
    आता १५/२० मिनिटावरची शाळा गाठायला सुद्धा बस किंवा रिक्षा लागते.
    तेव्हा शाळेत फुल दंगा करून एकमेकांना लोळवून घरी गेलो तरी चालायचं...
    आता आपल्या मुलाला धक्का लागला तरी पालक तक्रार घेऊन शाळेत पोहोचतात.
    तेव्हा बाबा लाईफबॉय साबणाच्या लाल वडीचे दोन तुकडे करायचे आणि आम्ही डोक्यापासून पायापर्यंत तोच साबण वापरायचो...
    आता केसांना वेगळा शॅम्पू, चेहेऱ्याला वेगळा साबण, शरीराला वेगळा साबण, ताईला वेगळा साबण, दादाला वेगळा साबण, आईला वेगळा साबण, बाबांना वेगळा साबण लागतो.
    तेव्हा आई ५०१ साबणाच्या बार चे चार तुकडे करायची आणि तेच सर्व कपड्यांना वापरायची....
    आता वेगळ्या कपड्यांना वेगळा साबण आणि पावडर लागते, वेगळी निळ लागते, स्टार्च ला वेगळं आणि सुगंध यायला वेगळं लिक्विड साबण लागत.
    तेव्हा आम्ही सणा सुदीला अत्तर वापरायचो.
    आता रात्रंदिवस फॉग चालतोय....
    तेव्हा पावसाळ्यात चिखल उडू नये म्हणून पायल स्लिपर्स ला मागे रब्बर लावायचो.
    आता घरी वापरायला वेगळी, बाहेर वापरायला वेगळी, पावसाळ्यात वापरायला वेग वेगळी चप्पल लागते.
    तेव्हा पावसाळ्यात खाली खराब होऊ नये म्हणून फुल पॅन्ट वर दुमडून विशिष्ट पिन असलेल्या रबर ने फिट्ट करत असायचो.
    आता खास पावसाळी कपडे, हाफ पॅन्ट वापरतो.
    तेव्हा शाळा सुटली कि... आवळा, बोर, चिंच, पेरू, काळ मीठ, कलर वाला बर्फाचा गोळा खात घर गाठायचो....
    आता... कुरकुरे, कॅडबरी, किंडर जॉय, पेप्सी कोला, वेफर्स खातात मुलं....
    तेव्हा पेरुवाल्याकडे सहा मित्र जायचे, दोन मित्र दोन पेरू विकत घायचे बाकीचे चार मित्र गलका करत किमान दोन पेरू तरी ढापायचे..
    तेव्हाचे पालक अश्या गोष्टींना मुलांचा खोडकरपणा समजायचे.. आताचे पालक चोरी समजतात .
    तेव्हा वाढत्या अंगाचे कपडे मिळायचे
    आता तोकड्या अंगाचे कपडे मिळतात..
    तेव्हा हे अनुभवायला मिळायचं
    आता हे वाचायला लागतयं...

      August 16, 2017


  • दिस उजळला

    दिस उजळला
    रात सरली
    बात उरली
    अंधाराची

    काजवे सावल्या
    गोड चांदण्या
    चंद्र कहाण्या
    ओठांवरी

    सुर किड्याचे
    बोल घुबडाचे
    तोल मनाचे
    ढललेले

    -- शरद अर्जुन शहारे

      November 12, 2019


  • अंजनेरीचा किल्ला

    त्र्यंबकेश्वर जवळ हनुमानाचं जन्मस्थळ म्हणून ओळखला जाणारा अंजनेरी पर्वत देव दर्शनाच्या दृष्टीनं जितका महत्त्वाचा तितकाच ट्रेकींगचा थ्रिलिंग अनुभव देणारा. तुम्ही जर वेगळा विकेण्ड साजरा करण्याच्या मुड़मध्ये असाल तर अंजनेरीचा किल्ला एक उत्तम पर्याय आहे..

      July 22, 2013


  • मानसिक तणाव- (क्रमशः पुढे ३ वर चालू-)

    एखादा पाच किलो वजन घेवून काही अंतर …..

      November 9, 2012


  • मिसळमॅच

    संगीतामधे शब्दामधून अर्थ समजतात तर सुरांमधुन भावना प्रकट होतात. सुरांच्या अंगाने शब्द गुंफले तर शब्दाच्या अर्थछटा सुस्पष्ट सुरांच्या साथीने संगीत प्रगल्भ होते. तस्सच, फरसाणाच्या अर्थपूर्ण शब्दांमधे तर्रीच्या झणझणीत भावना जुळून आल्या की मग काय विच्चारता!

      February 2, 2025


  • २०१३ चा रुपेरी वेध

    “२०१३ या वर्षाची सुरुवात झाली मराठी चित्रपटांसाठी एका सुखावणार्‍या बातमीने. ‘बी.पी.’ हा बहुचर्चित सिनेमा रिलीज झाला अन् बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई झाली. अर्थात कोटीची उड्डाणे या वर्षी अनेक चित्रपटांनी घेतली. विषयांमध्ये विविधता, प्रगल्भता आणि मुख्य म्हणजे प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादासोबत सतत ‘आपला सिनेमा’ प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय देखील ठरला.

      January 10, 2014


  • अवंतिका शीर्षक गीत

    अवंतिका या मालिकेचे शीर्षक गीत

      September 20, 2013


  • श्री केदारनाथ

    हिमालयाच्या शिखरावर हे ज्योतिर्लिंग वसलेलं आहे. इथे जाण्याचा रस्ता फारच कठीण आहे. या ठिकाणी कायम हिमवर्षाव होत असतो. आणि म्हणूनच या लिंगाचं दर्शन एका विशिष्ट वेळेलाच होतं. 

      August 13, 2013


  • कविता राऊतची सावरपाडा एक्स्प्रेस

    कविता राऊत ज्या स्पर्धेत उतरते त्यात पदक कमावल्याशिवाय थांबत नाही, असा तिचा लौकिक आहे.
    यश म्हणजे जीवतोड मेहनत करावी लागणार, हे इतर सगळ्याच स्पर्धकांना न सांगताही माहीत असतं; पण तिचं आजचं यश हे असं सहजासहजी तिच्या पदरी पडलेलं नाही; तर तिनं शब्दशः घाम, रक्त आणि अश्रू गाळून ते कमावलेलं आहे.

    नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्‍वर तालुक्‍यातील एक आदिवासी पाडा... पाचशे वस्तीचं लहानसं गाव. रस्ते, वीज आणि पाणी या कशाशीही संबंध नाही. शाळा जेमतेम चौथीपर्यंत. असं जंगलातल्या कुशीतलं सावरपाडा. याच गावावरून कवितालाही नाव पडलं "सावरपाडा एक्‍स्प्रेस'.

    कविताचं सगळं बालपण याच सावरपाडामध्ये गेलं. वडील फॉरेस्टमध्ये नोकरीला होते; पण सावरपाड्यातल्या इतर मुलींप्रमाणेच तिचंही आयुष्य चालू होतं. रोजच 15-20 मैलांची पायपीट. सावरपाडामध्ये चौथीनंतरच्या शिक्षणाची सोय नव्हती; म्हणून मग तिच्या वडिलांनी तिला ठाणापाडा इथल्या आश्रमशाळेत घातलं. सावरपाडापेक्षाही आश्रमशाळेतले दिवस कठीण होते. ठाणापाडातही पाण्याची वानवाच होती. प्रत्येक मुलीला स्वतःच्या पाण्याची सोय स्वतःच करावी लागत असे. त्यामुळे सावरपाडातली पायपीट ठाणापाडामध्यही तशीच सुरू होती. ठाणापाड्याहून मग कविता हरसूलच्या केबीएच शाळेत शिकायला गेली. चौथीत असताना तिने पहिल्यांदा धावण्याच्या स्पर्धेत भाग घेतला आणि त्यानंतर आजतागायत तिने कधीच मागे वळून बघितलेले नाही.
    हरसूलच्या शाळेत असताना कविता विविध स्पर्धांमध्ये भाग घेत होती, बक्षीसंही मिळवत होती; पण शास्त्रोक्त पद्धतीने धावणं तिला माहीत नव्हतं. लहानपणापासून केलेल्या कष्टामुळे तिचं शरीर काटक बनलेलं होतं. मैलोन्‌ मैल पाण्यासाठी ये-जा करण्यामुळे तिचा स्टॅमिना तुफान होता आणि त्याच बळावर ती धावत होती. याचदरम्यान, विश्‍व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते डॉ. पिसोळकर यांनी शालेय राज्य स्पर्धेच्या तीन दिवस आधी "साई'चे (स्पोर्टस ऍथॉरिटी ऑफ इंडिया) प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांच्याकडे तिला आणलं. विजेंद्र सिंग यांच्याकडे कविता आली आणि तिचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं. धावणं ही फक्त आवड न राहता त्यातच करिअर करता येऊ शकतं, हा विचार कवितामध्ये रुजला.

    कविता सांगते, ""आदिवासी मुलांमध्ये टॅलेंट ठासून भरलेलं आहे. फक्त त्यांना योग्य ती संधी मिळायला हवी. या मुलांमध्ये नैसर्गिकपणे असणाऱ्या अफाट ऊर्जेचा वापर योग्य पद्धतीने व्हायला हवा. तसं झालं तर सगळ्याच क्षेत्रांत ही मुलं नक्कीच उत्तम कामगिरी करून दाखवू शकतील.''
    कविता राऊत हे एक उदाहरण आहे, माणसातल्या जिद्दीचं... चिकाटीचं!

      January 8, 2017


  • अनुभवांचे शब्द जाहले

    मला आजही लख्खं आठवतंय, आजीचं एक पालूपद …. तुला “अनुभव” येईल नं तेव्हां कळेल. मी म्हणायची, ‘आजी कुठून ग येईल तो अनुभव ?’
    ‘अगं, तो काही असा सांगून येत नाही वेडाबाई. तुझं तुलाच जाणवेल हो.’

      November 27, 2024