(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • ये है बम्बई मेरी जान !!!

    मुंबई या नावाचा दबदबा भारतात फार मोठा आहे. महाराष्ट्र बाहेर परराज्यात गेलो की कोठे राहतात विचारले की माझे गाव ते कोठे आहे कस आहे हे सांगत बसण्या पेक्षा सरळ मुंबईत राहतो म्हणुन सांगतो. समोरचा माणूस आदराने तुमच्या कडे पाहत अर्धा खल्लास होतो. एव्हढी जादू या नावाची आहे.

      April 22, 2011


  • संस्कृत सारी या शब्दाचा अर्थ कापडाची पट्टी.

    इसवीसनाच्या पूर्वी तीन हजार मध्ये लिहिलेल्या ऋग्वेदामध्ये सारी या वस्त्राचा उल्लेख सर्वप्रथम आढळतो. याचा अर्थ सारी ही त्याही पूर्वी अनेक वर्षे वापरली जात असावी.

      March 11, 2022


  • टॉमॅटो सुप (खाद्ययात्रा)

      May 25, 2010


  • माहेर

    कौसल्या’ स्वतःचा खर्च स्वतः चालवण्याला समर्थ होती. कारण ‘कौसल’ देशाचं उत्पन्न तिच्या मालकीचं होतं असं म्हणतात. रामाला ‘कोसलपती’ हे नाव कौसल्येकडून मिळालेल्या राज्यामुळे पडलं असावं. स्त्रियांचा माहेरावरचा अधिका विवाहानंतरसुद्धा शाबूत राहात असावा.

      November 13, 2023


  • लोकशाहीच्या वल्गना

    बाप केंद्रात,मुलगा राज्यात,

    जिल्हा परिषदेत नातू असतो.

    कुणी म्हणायला गेले तर

    जनकल्याण हाच हेतू असतो.

      November 19, 2010


  • बातम्यांचे आकर्षक आणि खेचक मथळे

    आज पन्नाशीच्या पुढे असलेल्या मंडळींना “अमृत” वगैरे मासिके आठवत असतीलच. या मासिकांमध्ये “मुद्राराक्षसाचा विनोद” वगैरेसारखी मनोरंजक सदरे असत. वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांच्या मुद्णावर अचूक बोट ठेवून त्यातल्या चुका दाखवून त्यातून मनोरंजन करणे हाच या सदरांचा उद्देश.

    सध्या “ब्रेकिंग न्यूज” आणि खळबळजनक मथळ्यांचा जमाना आहे. इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या हल्ल्यामुळे वर्तमानपत्रे जरा मागेच पडलेली आहेत. “ब्रेकिंग न्यूज” आधल्या दिवशी बघितल्यावर पुन्हा बातमी कोण कशाला वाचेल ? मात्र वृत्तपत्रातल्या बातमीचा मथळा दिलखेचक असेल तर ती बातमी किंवा लेख हमखास वाचला जाणार असेच हे गणित.

    काही बातम्यांचे मथळे असेच आकर्षक आणि खेचक असतात. त्यातलेच काही नमूने....


    - खूप वर्षांपूर्वी, एक महिला विमानप्रवासात प्रसूत झाली. त्या बातमीचे हेडिंग होते,
    'भाळी तिच्या, जन्म आभाळी.'


    - वजनात मारणे हा रद्दीवाल्यांचा आणि भाजीवाल्यांचा जणू हक्क असतो. त्यावर वैधमापन विभागाने कारवाई सुरू केली. त्या बातमीचं हेडिंग होतं,
    'मापात पाप' करणार्‍यांना चाप!


    - काही वर्षापूर्वी मुंबई पावसात तुंबली. एका बातमीचं हेडिंग होतं..
    'तुंबई'!


    - आणखी एका बातमीचं हेडिंग ...
    “अटक न करण्यासाठी लाच घेताना अटक!”


    बाय द वे, एक आठवणीतलं हेडिंग आठवलं.
    'जीव वाचवण्यासाठी पळताना खड्ड्यात पडून मृत्यू! '


    सौरभ गांगुली आणि युवराज सिंग यांनी त्रिशतकी भागीदारी पाकिस्तानविरुद्ध केली आणि त्याच दिवशी कम्युनिस्टांनी मनमोहनसिंग सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची धमकी दिली.

    लोकसत्ता फ्रंट पेज हेडिंग.

    डाव्यांचा तडाखा


    मागे कोल्हापुरात एक खून खटला गाजला होता. त्याच्या बातम्या खूप वाचल्या जायच्या. सहाजिकच, साक्षी, पुरावे, उलट तपासणी यांत हेडिंगचा मसाला मिळायचा.
    त्याच काळात, एका स्थानिक पेपरची हेडलाईन होती, 'नाम्या, बगतूस काय? घाल गोळी!'
    ... नंतर रिक्षांच्या मागेही दिसू लागले... 'नाम्या, बगतूस काय, घाल गोळी!'


    राहुल द्रविड च्या निवृत्ती वेळी एका इंग्रजी पेपर चा अप्रतिम मथळा होता.
    'indian team is now bread n butter but without jammy'


    भारताने वानखेडेत होणाऱ्या विश्वचषक अंतिम फेरी धडक मारली, तेव्हाचा एक अप्रतिम मथळा....
    'चारले खडे आता वानखेडे'


    पतंजली कोलगेटचे दात पाडणार! - मटा ऑनलाइन


    हे थोडं आक्षेपार्ह आणि तितकंच गमतीदार हेडिंग…

    गोव्यात पाळी नावाचं गाव आहे.विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेपूर्वी पाळी हा एक मतदारसंघ होता. निवडणुकीस एक नामांकित डॉक्टर उभे राहिले. मोठा मेळावा घेतला. धडाकेबाज भाषणे झाली. गोव्यातल्या एका नामांकित मराठी दैनिकाने दुस-या दिवशी हेडिंग दिले,
    "डॉ. ××××× पाळीच्या समस्या सोडविणार"!


    वादग्रस्ततेमुळे खैरनार यांची देवनार कत्तलखान्यात बदली झाली आणि त्यांनी तिथला कत्तलखानाच बंद करण्याच्या हालचाली आरंभल्या होत्या. त्याचे पंढरीनाथ सावंत याने दिलेले हेडींग अजून लक्षात राहिले आहे.

    खैरनार देवनारचे पवनार करणार


    या सर्वावर कडी करणारी हेडलाईन लोकसत्ताच्या अशोक पडबिद्री यांनी बर्‍याच वर्षांपूर्वी दिली होती. मुंबईत एका वर्षी प्रचंड म्हणजे प्रचंडच पाऊस झाला. अलीकडच्या 26 जुलैसारखाच. सारी मुंबई ठप्प झाली. लोकसत्ताची हेडलाईन होती - मुंबापुरीवर जलात्कार !!!


    मस्त... दिलखेचक शीर्षकांच्या आठवणींचा पाऊस पडतोय इथे. याच सम्दर्भात २००४ साली अटल सरकारचा पराभव करुन कॉंग्र्स बहुमताने जिंकली त्यावेळचं टाईम्स ऑफ इंडियाचं हेडींग होतं, King Cong... Queen Sonia. अर्थात परदेशी जन्माच्या प्रश्नावरुन सोनिया गांधींनी नंतर पंतप्रधानपद नाकारलं हा भाग वेगळा.


    बुटासिंघ २००५मध्ये बिहारचे राज्यपाल असताना तेथील त्रिशंकू विधानसभा बरखास्त करण्याची शिफारस त्यांनी केली होती. त्यामुळे तत्कालीन केंद्र सरकारने तशी शिफारस राष्ट्रपतींकडे करून तेव्हा जदयू-भाजपच्या संभाव्य युतीला सरकार बनविण्यापासून रोखले होते. सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय रद्द ठरवीत केंद्र सरकारवर कठोर प्रहार केले होते. तेव्हा एक शीर्षक होते(बहुधा "सामना"चे) - सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला "बुटा"ने हाणले.


    मध्यंतरी बालाजी तांबे यांना त्यांच्या गर्भसंस्कार या पुस्तकातील आक्षेपार्ह गोष्टींबद्दल खुलासा करण्याचे आदेश दिले होते तेव्हा लोकमत कि कुठल्याशा वर्तमानपत्राने ' तांबेचं पितळ उघडं' अशी बातमी दिली होती.


    'वडील लग्न करत नसल्याने मुलाची आत्महत्या'


    डिसेंबर २०१३ मध्ये, निवडणूक निकालानंतर, लोकसत्ता च्या मुख्य बातमीचे हेडिंग होते,
    'हाताची घडी, कमळावर बोट! '


    नवाकाळचे एक हेडिंग : श्रीकांतने जयसूर्याला गिळले. भारताच्या क्रिकेटसंघाने साजरी केली श्रीलंकेत हनुमान जयंती !


      August 16, 2017


  • नव्या कायद्याचा महिलांना दिलासा

    कामाच्या ठिकाणी महिलांना अनेकदा केवळ स्त्री असल्यामुळे वाईट वागणुकीला तोंड द्यावे लागते. सरकारने अशा घटनांबद्दल कडक शिक्षेची तरतूद करणारा कायदा केला आहे. मंत्रिमंडळाने या कायद्याचे विधेयक मंजूर केले असून ते संसदेत लवकरच मंजूर केले जाईल. या कायद्यामुळे महिलांसंदर्भातील गुन्ह्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकेल. अर्थात, त्यातील काही त्रुटीही लक्षात घ्यायला हव्यात.

      November 15, 2010


  • भ्रष्टाचाराचा डेटाबेस

    भ्रष्टाचार आणि लाचखोरी ही फक्त भारतातच नाही. हा रोग संपूर्ण जगात पसरलेला आहे. आपलं काम साधं असो किंवा मोठं, गुंतागुंतीचं. टेबलाखालनच काय, अगदी राजरोसपणे टेबलाच्या वरुनही लाच घेउन खिशात टाकणारे महाभाग आपल्या देशात आहेत.

      October 26, 2015


  • एक राजेशाही मिरवणूक . . .

    अत्यंत अवघड आणि प्रतिष्ठेच्या परिक्षेचा म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या नागरी सेवा परिक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. . . या परिक्षेत देशभरातील ९२० विद्यार्थी यशस्वी ठरले. त्यापैकी सुवर्ण महोत्सवी वर्षात, राज्यातील ९० उमेदवारांनी मराठीचा झेंडा फडकावीत व अभिमानाने सांगितले ! . . . मराठी पाऊल पडते पुढे . . .

      June 3, 2011


  • एक वर्षाची चिमुरडी बघते वाट

    बागेतील तारका –

      January 25, 2013