श्रीमंतीसाठी अंधश्रद्धेचा वापर गरीबीवर मात करण्यासाठी प्रत्येकालाच पैसा कमविणे गरजेचे असून तो सरळ मार्गाने मिळत नाही. यासाठी कोण कशा-कशाचा आधार घेईल, याचा काहीच भरवसा राहिलेला नाही.
माझ्या संग्रहातील विविध " कातणी " !
नवरात्र आणि दसऱ्याची धावपळ संपली की साहजिकच दिवाळीचे वेध लागतात. सगळ्या आघाड्यांवर जोरदार तयारी सुरु होते. दिवाळीचा सण साजरा करण्याचा एक महत्वाचा पैलू म्हणजे फराळ आणि मराठी फराळातील करंज्या हा अगदी महत्वाचा आणि शुभ पदार्थ आहे. फराळाचे पदार्थ बनवायला करंज्या बनवून शुभ मुहूर्त केला जातो. लग्न-मुंजीत केळवणांसाठी, मुंजीत भिक्षावळीसाठी, रुखवत, मातृभोजन इत्यादींमध्ये करंजीचा मान मोठा ! गंमत म्हणजे करंज्या करतांना एक तरी मोदक करण्याची आणि मोदक करतांना एक तरी करंजी करण्याची प्रथा अनेक ठिकाणी पाळली जाते. सुमारे ५५ -५६ वर्षांपूर्वी मी माझ्या आजीला याबद्दल विचारले तेव्हा ती म्हणाली " अरे, भावाला बहीण नको का ?"... किती सहज आणि अर्थपूर्ण कारण आहे हे ! लाटलेल्या पुरीत पुरण / सारण भरून ती दुमडली की अर्धचक्राकार कडा दाबून बंद करायची. ती कडा नाजूकपणे कातरून काढल्याशिवाय ती करंजी सुंदर दिसतच नाही. कडा जर नुसतीच मुडपून जरी छान आकार दिला तरीही कातरलेल्या करंजीचे रूपच अधिक
भावते. याच पद्धतीने शंकरपाळे आणि पोह्याच्या पापडाची मिरगुंडेही कातरली जातात. करंजीलाहे सुंदर रूप बहाल करणारा करंजीचा ब्युटिशियन म्हणजेच " कातणे" !!
माझ्या संग्रहात अशी अनेक, खूप जुनी आणि नवीही कातणी आहेत. पितळ, लोखंड, तांबे, स्टेनलेस स्टील अशा धातूंपासून ती बनविलेली असली तरी एक कातणे चक्क लाकडाचे आहे तर एक पितळी डबीसारखे आहे. या कातण्यांवर पोपट मोर असे पक्षीही आहेत. माशाच्या आकाराचे कातणे जड आहे. कांहींच्या मागे असलेला चमचा हा सारण भरण्यासाठी आहे. काहींवर वाघसिंहांहून श्रेष्ठ अशा याली या पौराणिक प्राण्याचे मुख आढळते. त्रिकोनी नक्षी पाडणारे, बारीक भोकं पडणारे, छान नागमोडी वळण देणाऱ्या अशा दात्यांची चक्रे कातण्यांना बसवलेली आहेत. एका कातण्यावर बोट ठेवायला छोटासा आधार आहे, मोठ्या प्रमाणावर शंकरपाळे आणि मिरगुंडे कातरायची असतील तर त्यासाठी खास लाटणेही आहे. विदेशी पर्यटक, जुन्या बाजारात ही कातणी Indian Pizza Cuter म्हणून मोठ्या औत्सुक्याने खरेदी करतात. अशा या करंज्यांना सौन्दर्य बहाल करणाऱ्या कातण्यांची ही एक झलक !
-मकरंद करंदीकर.
जेव्हा वैद्यकीय व्यवसायाचे व्यापारीकरण असा शब्दप्रयोग केला जातो तेव्हा हसावे की रडावे हे कळत नाही. कोणत्या व्यवसायाचे व्यापारीकरण झाले नाही. कोणत्या क्षेत्रास ह्या व्यापारीकरणाने सोडले आहे. सन्माननिय समजली जाणारी क्षेत्रे उदा. न्याय, शिक्षण, सामाजिक इ. क्षेत्रे यापासून मुक्त आहेत असे म्हणता येईल का.
जर कुटूंबातील प्रत्येकाने थोडी संयमित वागणूक दाखवली तर एकत्र कुटूंब पद्धती समान सुख-सम्रुद्धीचा सागर दुसरा होणे नाही.
काही दिवसापूर्वी दिर्घ आजारपणामुळे आमच्या आजीचे वयाच्या जवळ-पासपंच्याहत्तराव्या वर्षी निधन झाले. आमच्या आजीच्या मृत्यूमुळे आमची आई तिचे मायेचेछ्त्र कायमचेच गमावून बसली. आमच्यासाठी तर ती मायेच मोकळ आभाळ्च होती.
हिंदी सिनेमाचा इतिहास लिहिताना ,गुरु दत्तचा ‘साहब ,बीबी और गुलाम ‘हा सिनेमा वगळून लिहता येणार नाही. त्या वेळीस ,म्हणजे मी तसा पक्का सिनेमबाज नव्हतो म्हणा, आणि वय हि बालिशच होत ,संधी असून हि मी तो पाहायचा टाळला होता. कारण काय?तर त्यात मीनाकुमारी होती ! ‘एक रडकी हिरॉईन ‘ हा त्या वेळेसचा ग्रह बरेच दिवस तसाच होता.
जायचंय अमेरिकेला.. पण विमानतळ सोडून भलतीकडेच पोचलेय स्वारी......

आनंदघन यांचे सुरेल संगीत आणि “ऐरणीच्या देवा” सारखे सदाबहार अजरामर गाणे हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य. या चित्रपटाला राज्य शासनाच्या उत्कृष्ट चित्रपटाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले होते..
अंबाणी दादांच्या महालाची फार चर्चा होत असते. त्या चर्चेमुळे आग्य्रातील ताजमहल आणि वाशिंग्टन येथील व्हाईट हाऊस हे राजवाडे कम महाल फिके पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवाय या दोन्ही महालांची नव्हाळी कमी झालेलीच आहे. ताजमहलाचं दर्शन बिल क्लिंटन पासून ते बाबूराव कोटलवार आणि मिशेलवहिनी ओबामा पासून मंगलाताई ओतारे यांच्यापर्यंत कुणीही,कधीही घेऊ शकतात.
Copyright © 2025 | Marathisrushti