(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • धोबी घाट`- बाहेरच्यांची मुंबई

    `धोबी घाट`बद्दल त्याच्या प्रदर्शनापासून एक संभ्रमाचं वातावरण पसरलेलं पाहायला मिळतं. खरं तर तसं असण्याला कारण नाही. हा चित्रपट वेगळा आहे, असणार, हे आपल्याला अपेक्षित तर होतंच. त्याच्या पूर्वप्रसिद्धीपासून ते `धोबी घाट` या वरकरणी चमत्कारिक नावापर्यंत सर्वच बाबतीत त्याचा हा वेगळेपणा अधोरेखित कऱण्यात येत होता.

  • छतावर साहित्यिकांच्या नावांचे कोंदण

    लहानपणापासून कवितांची प्रचंड आवड. वाचलेल्या कवींवर निस्सीम प्रेम. या कवींची नावे सतत आपल्या डोळ्यासमोर आसावीत ही भावना. मात्र, घर पत्र्याचे. त्याला छत नसल्यामुळे नावे टाकण्याची अडचण. ही अडचण पत्र्याच्या घराला पीओपी करून सोडवली.

  • अनधिकृत बांधकाम…. काही प्रश्न

    सध्या चालू असलेल्या अनधिकृत बांधकामावरील कारवाई बाबत काही अनुत्तरीत प्रश्नांचा मागोवा

  • राशिभविष्य

    मागे एकदा संपादकांनी आम्हाला राशिभविष्य लिहायला सांगितले. आता हा आमचा पहिलाच प्रयत्न असल्याने आम्ही कन्या राशीला लिहिले होते की ‘सुखद घटना घडेल व दिवस आंनदात जाईल.’

    तुम्हाला सांगतो त्याच दिवशी संध्याकाळी आम्ही प्रेसच्या ऑफिसमधून घरी जात असताना, वाटेत आमचा एक कन्या राशीवाला परममित्र दिन्या भेटला.

  • आमची आजी

    काही दिवसापूर्वी दिर्घ आजारपणामुळे आमच्या आजीचे वयाच्या जवळ-पासपंच्याहत्तराव्या वर्षी निधन झाले. आमच्या आजीच्या मृत्यूमुळे आमची आई तिचे मायेचेछ्त्र कायमचेच गमावून बसली. आमच्यासाठी तर ती मायेच मोकळ आभाळ्च होती.

  • हरभजनचा ‘मास्टर स्ट्रोक’

    न्यूझिलंडविरुद्धच्या अहमदाबाद येथील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ पराभवाच्या उंबरठ्यावर असताना मोक्याच्या क्षणी हरभजनसिंगने चमकदार शतक झळकावून हा पराभव टाळला. आजवर आपल्या गोलंदाजीने देशाला विजय मिळवून देणार्‍या या सिंगने पहिले-वहिले कसोटी शतक झळकावून फलंदाजीतही आपण कमी नसल्याचे सिद्ध केले.

  • उत्सव आणि इव्हेंट

    गणेशोत्सव जल्लोषात सुरू असताना त्यातून उभे राहणारे मोठे अर्थकारण स्पष्टपणे जाणवत आहे. लोकांच्या श्रद्धेचा विषय असलेला हा उत्सव राजकारणात जाणार्‍यांसाठी महामार्ग ठरतो आहे. त्यात अर्थकारण आल्याबद्दल आक्षेप नाही. परंतु, गणेशोत्सवाचे ‘मार्केटिंग’ होत असताना ‘सेल्स’लाच प्राधान्य दिले जात आहे. गणेशोत्सवावर जाणवत असलेला अर्थकारणाचा हा प्रभाव नेमके काय सांगतो ?

  • स्वयंपाकामागचे विज्ञान

     पाक-कला पुस्तकांचे लेखक (आणि पुस्तकी-किडा) नेथन म्यह्र्वोल्द यांनी टेड टॉक्समध्ये दिलेले “नव-खाद्य संस्कृती” या विषयावर भाषण.

  • काटेपुराण…

    जुन्या काळातील चित्रपटात एक सीन हमखास रहायचा, तो म्हणजे नायिका बागेत चालत असते… चालता चालता तिच्या पायात अचानक काटा रुततो… शेजारी असलेला नायक अलगद तिच्या पायातला काटा काढतो… चित्रपट पुढे सरकत जातो. थोडक्यात काय तर चित्रपटात नायक-नायिकेचे प्रेम फुलवायला आणि चित्रपट पुढे सरकवायला काटा कारणीभूत ठरतो, असो…

    काटा पाहिला नाही, असा माणुस या पृथ्वीवर सापडणे अवघडच. अगदी राजघराण्यात जन्मलेला असला तरी त्याच्याही पायात काटा कधीना कधी रुतलेला असतोच. कसा ते माहित नाही. पण हे होतं. गवतावर चालताना, शेतात काम करताना काट्यांशी सामना होत असतो. शेतकऱ्याच्या पायात किती काटे टोचले असतील त्याची मोजदाद कुठेच नसते. कदाचित त्याच्या नशीबाचा ते भाग असावेत. काटेही विविध प्रकारचे असतात. काही बोचणारे असतात, काही टोचणारे असतात, काही रुतणारे असतात, काही रक्त काढणारे असतात, काही आग करणारे असतात. काट्यांचे जितके प्रकार आपल्याला डोळ्यांनी दिसतात त्याही पेक्षा अनेक प्रकारचे काटे या पृथ्वीतलावर आहेत. अगदीच गुगलवर काटा हा शब्द जरी टाकला तरी २ कोटी ८ लक्ष इतकी पानं सेकंदभरात उघडतात. त्यात काट्यांचे शास्त्रीय नाव, औषधी उपयोग, प्राचीन काळातील संदर्भ आदी सविस्तरपणे असलेली माहिती आपल्यासमोर येते.

    आपल्या जीवनातही काट्याला महत्व आहेच. कसे ? खडतर ज़ीवनाचे विश्लेषण करतांना अनेकदा गुलाबाचे उदाहरण दिले जाते. काट्यांवर राहुनही गुलाबाची मोहकता सर्वांना आपलीशी करते, त्यामुळे फुलांचे राजेपण गुलाबाकडे आलेय. गुलाबाला असलेले काटे पसरट पण टोकदार असतात, टोचले की आग करतात. बाभळीचे काटे लांब असतात. टोचले की लगेच तुटतात. कॅक्टसचे काटे बारीक पण टोचणारे असतात. गव्हाच्या ओंबीला येणारे काटे केसांप्रमाणे बारीक पण तितकेच टोकदार असतात, टोचले की शरीराची आग व्हायला लागते. या सारख्या अनेक वनस्पतींचे रक्षण काटे करत आलेले आहेत. भाज्यांचा विचार केला तर भेंडीला बारीक काटे असतात, डोळ्यांनी दिसत नाहीत पण हाताला टोचतात. वांग्यांना असलेले काटे वांगे तोडतांनाच टोचतात. फणसाचे कवच काटेरीच असते पण त्याखाली आतमध्ये असतो फणासाचा गोडवा असलेला गर.

    सजीव प्राण्यांचा विचार केला तर विंचवाचा काटा विषारी असतो, त्याच्या इंगळीत तो असतो. मधमाशीचा काटा शरीराची आग करायला लावतो. माशांचा काटा घशात रुतणारा असतो. साळशिंगी हा प्राणी त्याच्या शरीरावर असलेल्या काट्यांपासुनच स्वत:चे रक्षण करतो. हे झाले प्राण्यांचे. मानवी काट्यांचे काय? मानवी काटेही असतातच की. विशिष्ट प्रसंगात, भीतीदायक प्रसंगात शरीरभर उठणारा काटा वेगळा असतो. आनंदाच्या प्रसंगात हर्षभराने शरीरावर उठणारी संवेदना काटेरीच असते. हृदयात बोचणाऱ्या सलीचा काटा निराळा असतो. काव्यपंक्तीत येणाऱ्या काट्यांची दुनिया निराळीच असते. प्रेयसीच्या वाटेतील काटे वेचण्यासाठी प्रियकराची आतुरता अनेक कवींनी वर्णन केलेलीच आहे.

    काटेरी गुलाब असतो, काटेरी हलवा असतो. वजनकाटाही असतोच ना. थोडक्यात काय तर आपले आयुष्य ‘काटे भरा’ प्रवास आहे. रस्त्यात पडलेले दु:खाचे काटे बाजुला सारत आपल्याला चालायचे आहे. कधी काटे बोचतीलही, मनाच्या अंतरंगात ही बोच घर करेलही… पण त्यावर मात करून पुढे चालायचे आहे. काटे आहेत म्हणुन चालणे सोडणे माणुसपणाचे लक्षण नाही. चालणे, लढणे आणि यशस्वी होणे हेच माणुसपणाचे लक्षण… वाट कितीही काटेरी असली तरीही…!

    दिनेश दीक्षित, जळगाव.

  • नवरात्री उत्सव -घटस्थापना.

    अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो. हा उत्सव नऊ दिवस असल्यामुळे यासं ” नवरात्रौत्सव ” असे म्हणतात .