मला कोणीतरी ऑफिस मधून उठवून पलंगावर आणून झोपवले इतके लक्षात आहे फक्त नंतर मला एकदम जाग आली तेव्हा .आजूबाजूला खूप जण इकडे तिकडे फिरताना दिसत होते .मी डोळे चोळले ..आणि जरा डोक्याला ताण दिला तेव्हा लक्षात आले की आपण घरी नसून ‘ मैत्री ‘ व्यसनमुक्ती केंद्रात आहोत ते
विमनस्क असा बसून राहिलो प्राणायाम संपायची वाट पहात…माझे लक्ष वेधून घेणारे एक दृश्य दिसले … वार्डात भिंतीला टेकून तीन जण अगदी शांतपणे बसलेले होते ..हे तीन जण येथे आल्यापासून माझ्या कुतूहलाचा विषय बनेलेल होते ..
माझे वडील रेल्वेत नोकरीस होते व आम्ही सुमारे २० वर्षे नाशिकरोड येथे रेल्वे क्वार्टर मध्ये राहत होतो . तेथे फक्त एकदोन कुटुंबे ब्राह्मणांची होती इयत्ता पहिली पासून मला आसपास खेळण्यासाठी सर्वच जातीधर्मातील मित्र मिळाले, समाजात खोल वर पसरलेला जातीभेद मी तेव्हापासून अनुभवतो आहे तेथे एखाद्या मुलाचा त्याच्या माघारी त्याचा उल्लेख तो गवळ्याचा , तो न्हाव्याचा , धनगराचा , बामनाचा , वाण्याचा असाच होत असे अर्थात प्रत्यक्ष त्या व्यक्तीसमोर असा उल्लेख क्वचितच होई …
शेवान - एक प्रचंड ताकद असलेला मालवणी शब्द.....
आज बागेत जात असतांना सहज कापणी झालेल्या भाताच्या शेतात लक्ष गेलं, गाडी तिथेच थांबऊन गेलो तिथे, भाताचे 4. 5 आवे वाफ्याच्या मधोमध ऊभे करून एकत्र बांधलेले.....म्हणजेच शेवान..... कापणी संपल्याची निशाणी.... कापणी संपताना किड मुंग्यांची, पाखरांची काळजी करणारा माझा गरीब शेतकरी...
मला अजूनही आठवतय, आजोबा भात शेती करायचे... 7. 8 गडी माणसे असायची कापणीला....
पण गावातील काही बलुतेदार लोकं ...... नाव नाही घेत..... यायची अगदी कापणीचा शेवटचा दिवस कधी आहे त्याची चौकशी करून.... आणि हक्काने एक एक कवळी कापलेले भात ... आजोबा त्यांना द्यायचे... त्यांचा हक्क म्हणून.... आता देणारे पण नाहीत.... अन् घेणारे पण नाहीत....
मी तेव्हा विचारलेले... आजोबा का देताय यांना हे धान्य ते पण न मळता?
आजही आठवतय त्यांच उत्तर..
बाऴा आपण जरी पिकवलं तरी सगळ्यांचा वाटा काढायचा... भात त्याला दिलं तरी त्याची गाय उपाशी राहील म्हणून गवतासकट.... कवळी..... देतो...
तेव्हा प्रत्तेकाची काळजी होती ... पिकवणार्याला.... अगदी किडमुंगी
पशुपक्षी सगळ्यांची काळजी होती त्यांना...
आणि त्यांच्यासाठी चार आवे शिल्लक ठेवतो... तेकाच शेवान म्हणतात
बापूर्झा
डॉ बापू भोगटे
9422632456
पत्र लिहून झाल्यावर आपण खाली लिहितो
'कळावे'
पण याचा पत्रातील आधीच्या मजकुराशी काही संबंध असतोच असे नाही. खरंतर पत्राचा समारोप मजकुराशी सुसंगत शब्दांनी व्हायला हवा असं माझं म्हणणं. उदा...
१) प्रिय, तू ज्या रस्त्याने जात आहेस
तो खूप डेंजर आहे.
वळावे...
२) मित्रा, तुझ्या प्रेयसीचा भाऊ
तुला फटकवायला येत आहे.
पळावे...
३) प्रिय, तुझ्या आवडीच्या भजीसाठी
अडीच किलो कांदे पाठवित आहे.
तळावे....
४) प्रिय मित्रा, तू जिच्यावर लाईन
मारत होतास तिला मी पटवून
पिक्चरला घेवून जात आहे.
जळावे...
५) प्रिय, तुझ्या आवडीचा स्पेशल
गायछाप तंबाखू पाठवित आहे.
मळावे...
६) प्रिय आई, तुला नको असलेली
पोरगी घरात सून म्हणून आणणार आहे.
छळावे...
७) मित्रांनो, इतक्या उदाहरणानंतर तरी माझा मुद्दा बरोबर आहे हे तुम्हाला
कळावे...
आणि तुम्ही हसुन हसून
लोळावे...
बाबा बिचारा स्वत:ची सुखदु:ख विसरुन, प्रसंगी स्वत:च्या आवडी-निवडींना मुरड घालून मुलांसाठी सगळं करतो. पण या बाबाचीही एक वेगळीच व्यथा आहे. कोणी समजून घेईल का?
दादा कोंडके यांनी दिग्दर्शित केलेला पांडू हवालदार हा चित्रपट १९७५ साली पडद्यावर झळकला. दादा कोंडके यांनी स्वत: या चित्रपटात दिग्दर्शनाबरोबरच अभिनयही केला होता. अशोक सराफ, उषा चव्हाण या कलाकारांनीही या चित्रपटात भूमिका वठवल्या. चला तर मग पाहूया हा चित्रपट..
घटनेने प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्याचा मुलभूत अधिकार दिला आहे. कोणताही गुन्हा सिद्ध होईपर्यंत आरोपीचे स्वातंत्र्य हिरावून घेता येणार नाही अशी तरतूद कायद्यामध्ये करण्यात आली आहे. त्यासाठी अंतिम निवाडा होईपर्यंत आरोपीला जामिन दिला जात. त्यासाठी गुन्ह्यांचे जामिनपात्र आणि अजामीनपात्र या दोन प्रकारांमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. जामीनाचा निर्णय देताना उच्च आणि सत्र न्यायालयांमध्ये विसंगती आढळते. ही विसंगती वेळीच टाळायला हवी.
बागेतील तारका-
Copyright © 2025 | Marathisrushti