समाजात एक-एकटे राहणार्यांजच प्रमाण वाढतय भविष्यात ते आणखी वाढतच जाणार आहे. पण या एकट्या लोकांकडे बरंच काही असणारही आहे त्यामुळे तू एकटा अथवा एकटी आहेस तुला हे काय करायच तुला हे काय करायचय ? वगैरे सांगून त्यांच्या मालकीच्या वस्तू अथवा संपत्ती लुबाडण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात होणारच त्यामुळे या एकट्या लोकांनी तर अधिक सावध राहायला हंव आपल्या हयातीत आपल्या मालकीच्या सुईवरचा हक्क ही सोडायचा नाही.
हिरोशिमाच्या आकाशात दोन विमाने घिरट्या घालत होती. एका क्षणात त्यातल्या एका विमानातून अणुबॉम्ब हिरोशिमा शहरावर पडला. प्रचंड मोठा स्फोट झाला आणि मशरूमच्या आकाराचा आगीचा लोळ आकाशाकडे झेपावला. त्या आधीच ती दोन्ही विमाने हिरोशिमाच्या बाहेर पडली. त्या दोन विमानापैकी एक वैमानिक होता पौल तीबेट्स व दुसरा वैमानिक होता क्लौड इथेर्ली (Claude Eatherly).
उधारी संदर्भातल्या पाट्या तुम्ही आम्ही बाजारात, दुकानाबाहेर नक्कीच वाचलेल्या असतील. व्यापार हा कोणताही असो… म्हणजे खरमुरे विकणाऱ्या पासून तर टाटा, बिर्ला, मुकेश अंबानी असो… या ‘उधारी’ नावाच्या रोगापासून प्रत्येक व्यापारी, दुकानदार दूर राहण्याचा प्रयत्न करीत असतो परंतु कितीही खबरदारी बाळगली तरी ‘उधारी शिवाय धंदा नाही”, हेच त्रिकालाबाधित सत्य आहे.. यात शंकाच नाही.
आदिवासींच्या बोहाडा या उत्सवासाठी विविध मुखवटे बनविण्याची वडिलोपार्जित कला जोपासत स्वत:च्या कर्तृत्वाने कागदाच्या लगद्यापासून सुंदर मूर्ती बनविण्याचे काम जव्हार तालुक्यातील रामखिंड येथील पेपरमेशी स्वयंसहाय्यता पुरुष बचतगट करीत आहे.ही कलाकृती त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरही नेण्याचा मान मिळविला आहे.
आश्रमात स्वामी त्रिकालदर्शी ध्यानावस्थेत बसले होते, मला पाहताच त्यांनी डोळे उघडले, क्षण न गमविता मी प्रश्न विचारला, स्वामीजी, वातावरण लय तापलंय, काय निकाल लागेल काहीच कळत नाही.
स्वामी त्रिकालदर्शी: वत्सा तुझ्या समाधाना साठी एक कथा सांगतो, एका पुष्प वाटिकेत गुलाबाचे सुंदर फुल उमललेले होते. एक द्वाड मुलगा सायकल चालवीत तिथे आला. सुंदर गुलाबाच्या फुलाला पाहून त्याने आपल्या हाताने देठा सकट गुलाबाचे फुल उपटले. सायकलवर स्वार होऊन तो घरी पोहचला. पूजा घरात पूजा करीत असलेल्या आईच्या हाती त्याने फुल दिले. गुणाचा माझा पोर म्हणत आईने प्रेमाने हात त्याचा पाठीवर फिरविला आणि नमो-नमो म्हणत ते गुलाबाचे फुल देवाच्या चरणी अर्पित केले. दुसऱ्या दिवशी पहाटे निर्माल्य झालेले फुल तिने रस्त्यावर फेकून दिले. अनेक वर्ष रस्त्यावर झाडू लावल्या मुळे अस्थमासम आजाराने ग्रस्त झाडूवाला खोकलत-खोकलत झाडू लावत होता. त्याने कचऱ्या सोबत गुलाबाच्या फुलाला ही उचलून कचरा गाडीत टाकले. स्वामीजी थांबले आणि प्रश्नार्थक नजरेने मजकडे बघितले. मी म्हणालो, स्वामीजी माझ्या सारख्या अल्प ज्ञानी जीवाला, काहीच उमगले नाही.
स्वामीजी ने स्मित केले आणि म्हणाले ‘नादान है, बच्चा’ आणि डोळे मिटून पुन: समाधिस्थ झाले.
-- विवेक पटाईत
विनाकारण असा स्वतःल त्रास करून घेण्यापेक्षा स्पष्ट नाही म्ह्णायला शिकण योग्य होणार नाही का ? बर्यारचदा आपल्या जवळ्च्या माणंसाच्या दबावाला बळी पडून एखादी गोष्ट नाईलाजाने करायला आपण होकार देतो आणि तो होकार देऊन केलेल्या चुकीची शिक्षा नंतर आयुष्यभर भोगत राहतो.
प्रवासाची विशेष आवड असलेल्या सुरेश नाईक यांनी शब्दांतून केलेले वर्णन वाचण्या आणि ऐकण्यासारखेच आहे. म्हणुनच त्यांच्या काव्य मैफिलांच्या कार्यक्रमांना देखील रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो.
हे कोठून येतात, त्यांच्यार ही वेळ कोणामुळे आली, त्यांची तस्करी कोण करते, असे सारे प्रश्न यानिमित्ताने निर्माण होत असून समाज शिक्षणाअभावी केवळ स्वार्थापायी लहान मुलांची तस्करी करणार्या या लोकांमुळे सामाजिक स्वास्थ्य खराब होत आहे.
मराठी ही केवळ व्यावहारिक भाषा असून चालणार नाही तर ती ज्ञानभाषाही झाली पाहिजे. त्यासाठी निरनिराळ्या विषयातील ज्ञान मराठीत उपलब्ध झाले पाहिजे. मराठीतून उच्च शिक्षण उपलब्ध झाल्यास समाजातील एका मोठ्या वर्गाला त्याचा खूप फायदा होऊ शकतो. किंबहुना समाजाच्या दृष्टीनेदेखील हे आवश्यक आहे कारण सध्याच वर सांगितल्याप्रमाणे शिक्षण आणि आरोग्यसेवा या चैनीच्या गोष्टी झालेल्या आहेत. याचा दुसरा फायदा म्हणजे मराठी शाळा बंद होण्याचे प्रमाणही कमी होऊ शकेल कारण प्रगतीच्या संधी मराठीतूनही उपलब्ध होतील.
Copyright © 2025 | Marathisrushti