(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मराठी आडनावे ः परिवर्तनाची त्सुनामी

    नाव, आडनाव, धर्म, मातृभाषा आिण जात या पाच बाबी, प्रत्येक व्यक्तीला जन्मताच मिळतात. यातील पहिल्या तीन बाबी, म्हणजे,नाव, आडनाव आिण धमर्, ती व्यक्ती मोठी झाल्यावर आवडतातच असे नाही. त्यामुळे त्या आवडीनुसार बदलून घेण्याचा हक्क आपण त्यांना दिलाच पाहिजे.

  • फ्युचर व्हिजन

    चीफ इंजिनियरने वयाची पन्नाशी ओलांडली होती. पंचवीस वर्षांपेक्षा जास्त सर्व्हिस झाल्यामुळे, मुंबईत तीन कोटी पर्यंतचे दोन फ्लॅट्स, बी एम डब्लू, नोकर चाकर, मुच्यूअल फंडस्, मोक्याच्या ठिकाणी घेतलेले वाणिज्यिक गाळे त्यातून मिळणारे लाखो रुपयांचे भाडे अशी करोडो रुपयांच्या प्रॉपर्टीचे त्याच्याकडून नेहमी वर्णन ऐकायला मिळायचे.

  • मी, एक पुतळा

    नमस्कार. मी या शहरातील अत्यंत रहदारीच्या रस्त्यांनी घेरलेल्या प्रमुख चौकातील एक पुतळा. जिवंत असताना या देशातील जनतेच्या म्हणण्यानुसार मी खरंच महापुरुष होतो की नाही हे मला माहित नाही, पण आयुष्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत दीनदुबळ्यांना त्यांच्या अमानवीय अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी मी सतत प्रयत्नशील राहिलो. या कामाचा अवाका इतका मोठा होता की, मी जिवंत असेपर्यंत हे काम संपू शकण्यासारखं नव्हतं. माझ्या मृत्यूनंतर अनेकांना 'महापुरुष' होण्याची घाई झाल्यामुळे माझ्या जिवंत विचारांऐवजी माझे निश्चल पुतळे जागोजागी उभारणेच त्यांना जास्त सोईस्कर वाटले. माझ्या विचारांशी असलेल्या तथाकथित बांधिलकीची मोठ्या प्रमाणात जाहिरात करून अनेक नेत्यांनी वेगवेगळ्या नावांनी राजकारणाची दुकानं थाटली. अनेक दुकानं म्हणजे जीवघेणी स्पर्धा आलीच व जीवघेणी स्पर्धा म्हणजे एकमेकाचे गळे कापणं हेही ओघाने आलंच!

    माझ्या पुतळ्याचं अनावरण झाल्यानंतर अनेक वर्षांमध्ये इकडे एकदाही फिरकण्याची इच्छा न झालेले एक नेताजी अपरात्री माझ्या दिशेने येताना दिसले आणि त्यांची माझ्यावरील निष्ठा बघून मला अक्षरश: गहिवरून आले. पण ते माझ्याजवळ पोहोचताच ती 'निष्ठा' नसून 'विष्ठा' आहे हे बघून मी हादरून गेलो. माझ्या काही लक्षात येण्याच्या आतच नेताजींनी त्यांच्या हातातील विष्ठेने माझा चेहरा माखून टाकला व क्षणार्धात ते अंधारात दिसेनासे झाले. पहाटे तरतरीत चेहऱ्याने मॉर्निंग वॉकला निघालेले 'तेच' नेताजी माझ्या पुतळ्याची अवस्था बघून प्रचंड संतापले आणि बघता बघता त्यांच्या कार्यकर्त्यांचा जमाव माझ्याभोवती जमला. माझ्या विचारांशी बांधिलकी सांगणाऱ्या दुसऱ्या एका नेत्याचे हे दुष्कृत्य आहे अशी बातमी अगदी सुनियोजितपणे पूर्ण शहरात पसरविण्यात आली व अनेक निष्पाप नागरिकांचे जीव घेणारी दंगल पद्धतशीरपणे भडकवून मला विष्ठा फासणारे नेताजी अतीव समाधानाने त्यांच्या आलिशान बंगल्याच्या हिरवळीवर महागड्या व्हिस्कीचे घुटके घेत पुढील राजकीय डावपेचांची आखणी करण्यात गर्क झाले!

    माझ्या पुतळ्यावरून झालेली पहिलीच दंगल ही परकीयांसाठी एक सुवर्णसंधी ठरली. अनेकांचे नाहक जीव घेणारी व असंख्यांचे संसार एका दिवसात उद्ध्वस्त करणारी ती दंगल शांत झाल्यानंतर एक दिवस माझी नजर माझ्या चौथऱ्याकडे गेली तर मध्यरात्री तिथे दोन परदेशी नागरिक गंभीर चर्चा करीत बसले होते. त्यांच्या हातात आपल्या देशातील पुतळ्यांच्या लांबलचक याद्या होत्या. पुतळ्यांच्या नावांसमोर त्यांच्या जयंत्या व पुण्यतिथ्यांचा तपशील लिहिला होता. कोणत्या पुतळ्याला केव्हा मानवीय विष्ठा, शेण किवा डांबर फासायचे, कोणत्या पुतळ्यांच्या गळ्यात चपला व जोड्यांचे हार घालायचे याची योजना तयार करण्यात ते गर्क झाले होते. चर्चेच्या शेवटी एक दुसऱ्याला अत्यानंदाने म्हणाला, ''या पुतळ्यांमुळे आपलं काम किती सोपं झालं. स्वार्थाच्या पोळ्या शेकण्यासाठी महापुरुषांच्या पुतळ्यांचा वापर अत्यंत निर्लज्जपणे जोपर्यंत होत राहील तोपर्यंत या देशात मनसोत्त* धुमाकूळ घालण्यास आपल्याला भरपूर संधी उपलब्ध आहे!''

    परकीयांनी आमच्या वागण्याचा अत्यंत बारकाईने अभ्यास केला आहे म्हणूनच अगदी क्षुल्लक कारणावरून ते आमच्या देशात मोठ्या दंगली भडकवू शकतात. सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊ न निष्पाप नागरिकांना भडकवणारे स्थानिक नेते हे तर त्यांचे बिनीचे सरदारच! मी अंतर्मुख झालो असतानाच जीव वाचविण्यासाठी रस्त्यावर सैरावैरा पळणाऱ्यांना बघून आश्चर्यचकित झालो. एका नेत्याचे पोस्टर दुसऱ्या नेत्याने फ ाडल्यामुळे शहरात प्रचंड दंगल उसळली होती. त्या गदारोळात ते दोन परकीय नागरिक अचानक माझ्या दृष्टीस पडले. विलक्षण आनंदाने एक दुसऱ्याला टाळी देत म्हणाला, ''काल पुतळा, तर आज पोस्टर, तर उद्या आणखी काही. या देशात वर्षानुवर्षे हे असंच चालत राहणार!''

    -- श्रीकांत पोहनकर, पुणे

    98226 98100

  • साधनेतील ईश्वरी अनुभव

    बालपणापासून घराण्याचे उत्तम संस्कार. शरीर मनावर पडत गेले. त्याच प्रमाणे आयुष्याची वाढ होऊ लागली. सर्व कांहीं आदर्शवत, सुसंस्कारीत, तत्वज्ञानाने भरलेले होते. …..

  • नटसम्राट नक्की कुणाचा?

    ‘नटसम्राट’ हा चित्रपट नक्की कुणाचा? तो फक्त विश्वनाथ दिनकर पाटेकर (वि.दि.पाटेकर) म्हणजेच नाना पाटेकर यांचाच? कारण जाहीरातीमध्ये तर त्यांचाच चेहेरा दिसतो? पण चित्रपट पाहिल्यावर लक्षात येते की हा चित्रपट फक्त वि.दि.पा. म्हणजेच नाना पाटेकरांचाच नाही तर अनेकांचा आहे.

    हा चित्रपट विक्रम गोखले यांचा पण आहे. तसे पाहीले तर विक्रम गोखले यांची भूमीका तशी दुय्यम आहे. नानाच्या तुलनेने त्यांना मिळालेले ‘फुटेज’ बरेच कमी आहे. पण एका दुय्यम भूमिकेचे सुद्धा कसे ‘सोने’ करता येते हे विक्रम गोखले यांनी दाखवून दिले आहे. ‘नटसम्राट’ हा खरे म्हणजे नाना पाटेकर व विक्रम गोखले या दोन ‘नटसम्राटां’च्या अभीनयाची जुगलबंदी आहे. यात कमी फूटेज मिळालेले विक्रम गोखले नाना एव्हडाच ‘भाव’ खाऊन जातात. एखाद्या भूमिकेचे सोने करणे हे त्या भूमिकेला मिळालेल्या ‘फूटेज’ वर अवलंबून नसते तर अभिनेत्याच्या अभिनय कौशल्यावर अवलंबून असते हे विक्रम गोखले यांनी दाखवून दिले आहे.

    नटसम्राट हा चित्रपट मेधा मांजरेकर यांचा आहे. यापूर्वी त्यांनी कोणत्या चित्रपटात काम केले आहे किंवा नाही हे माहीत नाही. तसेच नानांच्यापेक्षा त्या तरुण आहेत. नानासारख्या कसलेल्या अभिनेत्यापूढे ठामपणे उभे रहाणे हेच एक आव्हान असते. असे असुनही त्यांनी उभी केलेली ‘नटसम्राटांची पत्नि’ ‘सरकार’ लाजबाब. वरून शांत दिसणारी पण आतून अत्यंत कणखर असणारी ‘सरकार’ त्यांनी अत्यंत ताकतीने उभी केली आहे.

    नटसम्राट हा ‘नटसम्राटांच्या’ सुनेची भूमिका करणार्या नेहा पेंडसे व त्यांच्या मुलीची भूमिका करणार्याा मृण्मयी देशपांडे यांचा पण आहे. सासर्यां च्या उद्योगांना कंटाळून त्यांना बाहेरचा रस्ता दाखवणार्याृ सुनबाई तर वडिलांवर चोरीचा आळ घेऊन त्यांना बदनाम करु पहाणारी मुलगी या भूमिका या दोन अभिनेत्रींनी ज्या दाकदीने उभ्या केल्या आहेत त्याला तोड नाही.

    हा सिनेमा यामध्ये छोट्या छोट्या भूमिका करणार्याा अनेक आर्टिस्टचा आहे. नटसम्राटांना वडापाव खायला घालणारी म्हातारी मुसलमान बाई, त्यांना सावलीसारखी साथ देणारा दाढीवाला एनआरआय, शेवटी शेवटी त्यांना साथ देणारा दारुड्या तरूण, तर लंडन रिटर्न्ड तरुणाच्या छोट्या भूमिकेत वावणारे जेतेन्द्र जोशी, तर नटसम्राटांची नात झालेली छोटी चिमुरडी, या सगळ्यांचीच कामे अप्रतीम. हा त्यांचा पण सिनेमा आहे.

    या सिनेमाचे संवाद हा प्राण आहे. याचे संवाद लेखन किरण यज्ञोपवीत व अभिजीत देशपांडे यांचे आहे. हा सिनेमा खरे म्हणजे त्यांचा तर आहेच पण या चित्रपटाची उत्कृष्ट फोटोग्राफी करणार्याा अजिथ रेड्डी यांचा पण आहे. ‘लास्ट पण नॉट द लिस्ट’ हा चित्रपट या सर्वांची सुरेख गुंफण करणारे याचे दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर (म.वा.मां.) यांचा तर आहेच आहे.

    या चित्रपटाची ‘थिम’ तशी काही नवीन नाही. एक बाप निवृत्तीनंतर आपली सर्व संपत्ती मुलाबाळांना वाटून टाकतो व पुढे मुले त्याला कशी बेघर कराता व त्याला ‘कोणी घर देता का घर’ अशी भीक मागत रस्त्यावरून फिरावे लागते अशी एका ओळीत या सिनेमाची स्टोरी सांगात येईल. याच थिमवर पुर्वी अमिताभ बच्चन व हेमा मालिनी यांचा ‘बागबान’ हा चित्रपट आला होता व तुफान गाजला होता. अशा प्रकारच्या चित्रपटांमध्ये हमखास डोळ्यातून आश्रु हे येतातच येतात. मग ‘नटसम्राट’ मध्ये वेगळे काय आहे? हा चित्रपट ‘डोळ्यात आंसु आणि ओठांवर हसू’ या कॅटेगरीतला आहे. असे चित्रपट काढणे फार कठीण असते. पूर्वी चार्ली चॅपलिन व राज कपूर यांना ही कला जमली होती. हाच करिष्मा राजा परांजपे यांनी त्यांच्या ‘जगाच्या पाठीवर’ या चित्रपटात दाखवला होता. राजा परांजपे, ग.दि.माडगूळकर व सुधीर फडके यांच्या मुशितून निर्माण झालेली ही अजरामर कलाकृती आहे. त्यानंतर कुठलाच मराठी चित्रपट याच्या तोडीस पोचु शकला नाही. पण ‘नटसम्राट’ ने मात्र ही पातळी आवश्य गाठली आहे. पण तो ‘जगाच्या पाठीवर’ च्या पूढे मात्र गेलेला नसला तरी ही पातळी गाठणे हे ही नसे थोडके.

    ‘नटसम्राटांच्या’ भाषेत बोलायचे तर हा चित्रपट म्हणजे उत्तम भट्टी जमलेली, डोळ्यात आसू व ओठांवर हसू आणणारी, विलक्षण झींग आणणारी जांभळाची दारू आहे.

    आता ही दारू प्यायची की नाही, म्हणजेच हा चित्रपट बघायचा की नाही जे ज्याचे त्याने ठरवावे.

    (मी नाना पाटेकरांचा उल्लेख वि.दि.पाटेकर असा केला आहे या बद्दल क्षमस्व. जर चित्रपटाचा देग्दर्शक आपले नाव महेश वामन मांजरेकर असे जाहीर करतो मग नाना पाटेकरांचा उल्लेख विश्वनाथ दिनकर पाटेकर किंवा वि.दि.पा. असा करावयास काय हरकत आहे? असो)

    -- उल्हास हरी जोशी, मोः-9226846631

  • आज सचिन ४४ चा झाला…

    सचिन नावाच्या गारुड्याची  मोहिनी आम्हा भारतीयांच्या मनावर निरंतर राहणार आहे. आणखी शंभर वर्षांनी कोणाला सांगितले तर विश्वास बसणार नाही की २१ व्या शतकात सचिन रमेश तेंडूलकर नावाचे वादळ भारतीय क्रिकेट विश्वात घोंगावले होते…………कारण शतकातून एखादाच  असा शतकवीर सचिन जन्माला येतो.

  • इस्लामी जगाची चित्रे

    जगाच्या संदर्भात इस्लाम ची प्रतिमा, स्वरूप आणि आक्रमक राजकारण हे नेहमीच चर्चेचे, कुतुहलाचे आणि संदेहाचे विषय राहिले आहेत. इराण, स्पेन, इराक, इजिप्त आदी देशांचे इस्लाममुळे सांस्कृतिक, धार्मिक आणि कट्टरवादी राष्ट्रात रूपांतर झाले हा इतिहास आहे.

    इस्लामी जगाची चित्रे

    श्री. ज. द. जोगळेकर

    नचिकेत प्रकाशन, नागपूर

    ISBN : 978-93-80232-53-9, 

    मूल्य : रू.२२०/- फक्त

    ऑनलाईन खरेदी करा

  • विकल जोगिया

    "तो हाच दिवस हो, तीच तिथी, ही रात; ही अशीच होत्ये बसले परी रतिक्लांत;
    वळूनी न पाहतां, कापीत अंधाराला, तो तारा तुटतो - तसा खालती गेला.
    हा विडा घडवुनी करिते त्याचे ध्यान, त्या खुल्या प्रीतीचा खुलाच हा सन्मान;
    ही तिथी पाळिते व्रतस्थ राहुनी अंगे, वर्षांत एकदां असा "जोगिया रंगे."
    माडगूळकरांच्या या अजरामर ओळी खरेतर, 'जोगिया" रागाची एकही छटा दर्शवत नाहीत. त्यादुष्टीने, या कलाकृतींचा एकच एक ठाम अन्वयार्थ लावणे, हे त्या कलाकृतीवर काहीसे अन्याय करणारे असते आणि बहुदा हा एक (एकमेव नव्हे) निकष, उत्तम कलाकृतीबाबत मांडता येईल. आस्वादाच्या दृष्टीने हे गुंतागुंतीचे होऊ शकते परंतु सतत वेगवेगळ्या अर्थछटा दृग्गोचर होणे, हे आव्हानात्मक देखील असू शकते. एका बाजूने मांडायचे झाल्यास, कविता काय किंवा संगीत निर्मिती काय, याची निर्मिती ही नेहमीच "अबोध" मनातून होत असते आणि त्याचे चलनवलन नेमके शब्दबद्ध करणे, निरातिशय जिकीरीचे होऊ शकते आणि परत त्यात व्यक्तिपरत्वे अनुभूती येउन, मग अन्वयार्थ अधिक अवघड होऊ शकतो. पण, हीच कलेची खरी "मजा" आहे, हे लक्षात घेतल्यास, बऱ्याच शंकांचा निचरा होऊ शकतो.
    जोगिया रागाबाबतची माझी भूमिका यावरून लक्षात येणे शक्य आहे. "गंधार" आणि "निषाद" स्वर वर्ज्य असलेल्या या रागात, "कोमल रिषभ" आणि "कोमल धैवत", या स्वरांचे प्राबल्य आहे, इतके की, जरी "षडज","मध्यम" हे स्वर या रागांचे "वादी - संवादी" असले तरी मनात तरळत राहतात, ते हेच कोमल स्वर आणि या स्वरांवर घेतलेला "ठेहराव". संस्कृत ग्रंथानुसार रागाचे वर्गीकरण "भैरव" थाटात केलेले आहे आणि बहुदा याचा परिणाम असावा, पण रागाची वेळ ही, पहाटेचा पहिला प्रहर सांगितलेला आहे. आता, याच अनुषंगाने बघायचे झाल्यास, वर दिलेल्या माडगूळकरांच्या ओळी किती अन्वर्थक ठरतात, हे सहज ध्यानात येऊ शकेल. या रागाची खरी ओळख दाखवायची झाल्यास, "प ध नि ध प" किंवा "प ध म रे सा" या स्वरसंहतीचा मागोवा घेत राहिले तर समजून घेता येईल.
    एखाद्या कलाकाराची एखाद्या रचनेशी कायमची नाळ जुळते आणि ती रचना म्हणजे त्या कलाकाराच्या व्यक्तिमत्वाची नाममुद्रा म्हणून प्रस्थापित होते. पंडित भीमसेन जोशींची "पिया के मिलन की आस" ही रचना इतकी लोकप्रिय झाली की इतर कुणा गायकाने, ती रचना गायला दहादा विचार करावा. जोगिया रागाचा "अर्क" म्हणजे ही रचना, असे म्हणता येईल. विशेषत: तार सप्तकातील ठेहराव आणि आस, फारच अप्रतिम आहे.
    ज्या रागांत भावनिक आवाहन आहे, असेच राग बहुतांशी वेळा या गायकाने निवडल्याचे सहज ध्यानात येऊ शकते. आता, रागामध्ये भाव किंवा मूड का निर्माण होतो, हा संगीत सौंदर्यशास्त्रातील जटील प्रश्न आहे. परंतु, अनवट रागांपेक्षा प्रचलित राग, हे रसिकांच्या मनावर दीर्घकाळ राज्य करू शकतात आणि त्यानुसार रागांची निवड करणे, हे धोरण या गायाकाच्याच बाबतीत नेमकेपणी दिसून येते. अर्थात, अशा प्रकारच्या निवडीने, गायनात साचेबद्धता येण्याचा धोका निर्माण होतो पण पंडितजींनी त्याबाबत सावधगिरी बाळगून, त्यात नाविन्य आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला, हे देखील समजून घेता येते. एकूणच संपूर्ण गायनाचा विचार केला तर, तानांची गुंतागुंत, आग्रा घराण्याच्या आघातयुक्त आणि पुनरावृत्त स्वरांच्या परिणामांवर अवलंबून असलेल्या तानांच्या अंगाने जाते, असे म्हणता येईल. शिवाय त्यात भर आहे, ती आवाजाच्या लगावातील विरोधसंबंधामुळे अवतरणाऱ्या नाट्यात्मतेची. बोल-लय, बोलतान वा तिहाई वगैरेंवर फारसा भर नाही परंतु अंतिम परिणाम रंगदार होतो की नाही, हीच कसोटी अखेरची असते आणि तिथे मात्र पंडितजी बाजी मारून जातात. ठुमरी अंगाने जाणारी रचना पण तरीही शब्दाचा आशय बघता, त्यानुसार केलेले असामान्य सादरीकरण, असेच इथे म्हणता येईल.
    भारतीय संगीतरचनाकारांना त्यांच्या शास्त्रोक्त संगीताकडील झुकावानुसार जोखणे योग्य आणि गरजेचे आहे, हा अत्यंत चुकीचा समज आहे. परंतु दुर्दैवाने, भारतीय रागसंगीताचे ज्ञान वा तत्संबंधीची सर्वसाधारण माहिती असणे, याला एक योग्यता-निकष म्हणून बरीच प्रतिष्ठा लाभली आहे. मग, संगीतरचनाकार कुठल्याही संगीतकोटीत काम करीत असू दे. या दृष्टीने विचार करता, संगीतकार ओ.पी. नैय्यर यांचा विचार, रचनाकार म्हणून करताना, विश्लेषण करणे आवश्यक ठरते. वास्तविक त्यांची सगळी कारकीर्द बघितली तर आणि प्रसिद्धीचा अदमास घेतला तर, त्यांची गणना, तालाचे बादशहा म्हणून करण्यात येते आणि अर्थात ती फार एकांगी आहे. प्रस्तुत गाणे, "रात भर का है मेहमां अंधेरा" - चित्रपट "सोने कि चिडिया", मुद्दामून ऐकायला हवे.
    "रात भर का मेहमां अंधेरा,
    किस के रोके रुका है सवेरा".
    वास्तविक त्यांच्या संगीताचा ढंग बघता, त्यांना भारतीय रागसंगीत वा संबंधित बाबींचे फार तीव्र आकर्षण आहे,असे दिसत नाही. त्यामुळे, त्याच्या रचनांचे प्रामुख्याने दोन भाग पडतात. एक तर, ते राग वापरतात, कारण विशिष्ट गीतप्रकार हाच मुळी एखाद्या रागात वा त्याच्या सावलीत मुरलेला असतो दुसरा भाग म्हणजे चाल अवतरते आणि नंतर त्यात रागाची बीजे सापडतात. प्रस्तुत गाणे दीपचंदी तालात बांधलेले आहे पण या गाण्याच्या बाबतीत, असे ठामपणे म्हणता येईल, गाण्याची लयच मुळी अशा प्रकारे बांधली आहे की तालवाद्य नसले तरी चालले असते!!
    गाण्याचा मुखडा, जर बारकाईने ऐकला तर ध्यानात येईल, इथे राग जोगिया आणि त्याचे स्वर केवळ आधार म्हणून घेतलेले आहेत. गाण्याची सुरवात अति तार स्वरांत सुरु झाली तरी गाण्याचा "मुखडा" घेताना, मात्र एकदम खालच्या सुरांत आणि शांतपणे सुरु होते.राग जोगिया इथे स्पष्टपणे दिसतो. पण पहिला अंतरा सुरु होण्याआधीचे, जे वाद्यमेळातून संगीत आपल्या समोर येते, ज्यात "कोरस" संगीताचा वापर केला आहे, तिथे तर स्पष्टपणे, ऑपेरा संगीताचा प्रभाव जाणवतो. याचा वेगळा अर्थ असा घेता येईल, रचनाकार, इथे गाण्याच्या अंतिम सादरीकरणाला महत्व देत आहे आणि त्यासाठी मग कुठूनही सांगीतद्रव्य उचलण्याची तयारी आहे, मग त्यात सुरवातीला ज्या रागाचा आधार घेतला आहे, त्याला सहज बिनदिक्कतपणे बाजूला सारण्याची हिम्मत आहे. याचाच दुसरा दृश्य परिणाम असा दिसतो, नैय्यर यांनी आकर्षक सांगीत विलासासाठी प्रचलित रागांत का होईना, पण नवे मुखडे समोर आणले असेही दिसत नाही. नवीन मुखडे बंधने, हे अनेकदा, सर्जनशिलतेचे उदाहरण म्हणून दाखवता येते. या संगीतकाराचे प्रयत्न याबाबतीत तरी कमी पडले, असे म्हणायला जागा आहे.
    सुप्रसिद्ध गायकनट बालगंधर्वांनी गायलेले आणि अतिशय लोकप्रिय झालेले "वद जाऊ कुणाला शरण" हे पद या रागावर आधारलेले आहे. खरतर, गाण्याचे ध्वनिमुद्रण काहीसे सदोष आहे पण तरीही खास वैशिष्ट्ये नक्कीच समजून घेता येतात. या गाण्याची चाल बघितली तर "जोगिया/कलिंगडा" या दोन्ही रागांचा आढळ या रचनेत ऐकायला मिळतो. अर्थात, रचनेचा मुखडा मात्र नि:संशय जोगिया रागावर आहे आणि याच रागाची दाट सावली आहे.
    "वद जाऊ कुणाला शरणागत, करी जो हरण संकटाते;
    मी धरीन चरण त्याचे, अग सखये".
    बालगंधर्वांनी लयसिद्धी प्राप्त होती. विशिष्ट मात्रांचे तालावर्तन सुरु झाले की त्याचे स्पंदन अंगी भिनल्यासारखे कायम राखणे, तबलजीने कसेही आड वाजवले तरी सुखाने गात राहायचे त्याना जमते, हे इथे लक्षात येते. मात्रांच्या सूक्ष्म कणांशी क्रीडा करणे, ही खास लयकारी पण शब्दांची किंवा अक्षरांची फेक जरा इकडे, तिकडे केल्याने सबंध तालावर्तन कसे उठून येते, हे देखील ऐकण्यासारखे आहे. सुरावटींचा पुनरावतार असावा, पण त्यांची पुनरावृत्ती टाळावी, हे एक कालासुत्र, त्यांच्या गाण्यात प्रत्ययाला येई.लयकारीची सूक्ष्म क्रीडा, हा विशेष इथे प्रत्ययाला येतो. आवाज फार बारीक नाही पण लगाव नाजूक आहे. विशेष म्हणजे त्यात अस्थिरता नाही. पट्टी उंच आहे पण तरीही मध्यममार्ग आहे. आवाज सहजपणे हलका होतो. आवाजात काही वेळा असे आढळते, त्याला स्वरावर स्थिर करून बघितले की तो जडावतो. तसे इथे काहीच घडत नाही. सहजपणे, दुसऱ्या स्वरावर जाणे, तिथे हलकीशी हरकत घेणे आणि त्यातून लय लांबविणे, इत्यादी अनेक सांगीत सौंदर्यवाचक क्रिया, या गाण्यात सहज ऐकायला मिळतात.आशयनिश्चिती करणारा एक काहीसा अमूर्त घटक म्हणजे त्यांच्या गायकीतील उत्कटता. तसे बघितले तर, उत्कटता ही मनोवृत्ती सर्जनशिलतेची पूर्वअट असते. बालगंधर्व जे काही गात असत, त्यात एक उत्कटता, एक भारलेपण होते आणि ते ऐकणाऱ्यापर्यंत संक्रांत होणे, ही अपरिहार्यता होती. तसे बघितले तर संगीताचा आशय, गवयी-गाण्याचा नाही. पण तरीही त्या गायनाची सावली सादरीकरणावर पडलेली आढळते.
    "गुंज उठी शहनाई" चित्रपटातील "कह दो कोई ना करे यहां प्यार" या गाण्यातून आपल्याला जोगिया रागाची ओळख करून घेता येते. संगीतकार वसंत देसायांनी या गाण्याची तर्ज बांधली आहे आणि मोहम्मद रफीनी गायले आहे. मुळात रफीचा पहाडी, दमदार आवाज, आणि गाण्याची रचना देखील त्या गळ्याला सुयोग्य अशी असल्याने, हे गाणे खूपच लोकप्रिय झाले.
    "बिखर गये बचपन के सपने, अरमानो की शाम ढले;
    कही सजे बारात किसीकी, कही किसीका प्यार जले;
    कह दो कोई ना करे यहां प्यार
    इस में खुशिया है कम, बेशुमार है गम;
    एक हंसी और आंसू हजार".
    गाणे पहिल्या सुरापासून वरच्या सप्तकात गायले गेले आहे आणि तिथे आपल्याला जोगिया रागातील, ज्याला "आस" म्हणतात अशा सुरांची भेट होते.
    असेच एक गाणे "दिल एक मंदिर" या चित्रपटात आहे - "दिल एक मंदिर है" याच ओळीने गाणे सुरु होते. इथे एक गंमत बघता येते. वरील गाण्याच्या चालीतील सूर आणि या गाण्याच्या चालीतील सूर, एकमेकांशी ताडून बघितले तर खूप फरक आढळतो पण तरीही गाण्याच्या एका वळणावर, आपल्याला या रागाचे सूर आढळतात.
    "जानेवाले कभी नहीं आते,
    जानेवालो की याद आती है;
    दिल एक मंदिर है, दिल एक मंदिर है
    प्यार की जिसमें होती है पूजा, ये प्रीतम का घर है
    संगीतकार शंकर/जयकिशन यांनी या गाण्याची चाल बांधली आहे आणि तशी चाल काही फार अवघड नाही पण गाणे आपल्या मनावर विलक्षण परिणाम करते. ही किमया संगीतकाराची. या संगीतकार जोडीबद्दल एक गोष्ट अवश्यमेव सांगायलाच हवी. चित्रपट गीत हे प्रामुख्याने चित्रपटातील कथेला पूरक असे माध्यम आहे आणि ही जाणीव यांच्या प्रत्येक रचनेत आढळून येते.
    -- अनिल गोविलकर

  • चुशुल – REzangla pass ची लढाई

    संकटे एकामागून एक पाठोपाठ देशावर चालून येत आहेत. करोनापासून ते लडाखचा चिघळलेला प्रश्न, व आर्थिक मंदी या सर्वांवर मात करण्याची वेळ आज भारताकडे चालून आलेली आहे. देशापुढे आव्हानं तर आहेतच पण आपला इतिहासही तितकाच उज्वल आहे. त्यातीलच घडलेली ही एक सत्य घटना.

  • महाराष्ट्र दिन १ में २०११

    हे राष्ट्र असेच अभिमानाने जर सदा सर्वकाळ उभे ठेवायचे असेल तर आजच्या पिढीला त्याची काळजी घ्यावी लागेल.