..आज समोर रांग बघीतली आणि भयानक प्रकार वाटला.
सगळे रांगेत उभे होते , आपले अवॉर्ड घेत होते...
अनेकांना का आणि कसे मिळाले ह्याचे सगळे कोडे होते.
साहेबाने लिस्ट बघीतली आणि पटापट खुणा केल्या,
कोण कधी उपयोगी पडणार हे त्याला लगेच कळत होते
कारण तो मुरलेला साहेब होता ना.
हा प्रसंग प्रत्येक शहरात दिसतो.
त्यात एखादे आंब्याचे टाळं पण असते स्टेजवर.
त्याला काहीजण ' चमको ' म्हणतात.
एखाद्या राजकारण्याला ते आंब्याचे टाळं येताना दिसले की हबकतो.
कारण पाच पंचवीस हजाराची फोडणी निश्चित.कुणासाठी तरी मदत मागतो.
स्वतः क्रेडिट घेतो.
कारण ह्यांचा वावर सगळीकडेच असतो . प्रत्येक कार्यक्रम ते असतातच.
मग कधी तो कलाकार असतो , तर कधी तो शिक्षणतज्ञ म्ह्णून असतो , कधी तो डॉक्टर असतो .. तर एखादा कागदभरू लेखक.
मला एक कळत नाही ह्या कवी-लेखकांनी लिहावे मस्त पैकी रहायचे .
कशाला पुढे पुढे करतात.
कारण दुसऱ्या दिवशी वृत्तपत्राच्या पुरवणीमध्ये फोटो हा पायजेल कारण त्याची चटकच असते त्याला.
पेप्रात फोटो आला की हा खुश...मी त्याला एक दिवसांचाच गणपती म्हणतो आणि तो सुद्धा गल्लीतला .
दुसऱ्या गावात शहरात त्याचा मागमूसही नसतो.
कार्यक्रमात तो अगदी प्रमुख पाहुण्याच्या जवळ उभा रहातो.
कधीही दोन्ही कोपऱ्यात उभा रहात नाही कारण हे पेपरवाले निश्चित त्याचा फोटो कापणार, येदित करणार.
पेपरवाले हरामी असतात म्हणजे फोटो कापण्यात.
एक दोनदा कोपऱ्यात उभा राहिला टाकला फोटो मधून कापून.
म्ह्णून तो विशेष काळजी घेतो, अगदी सराईत सावधपणे.
मध्ये उभे राहिले की झक मारून तो फोटो लावता येतो.
कारण त्या फोटोमधून त्याला एडिट करता येत नाही.
असा तो हळूहळू मोठा होत जातो.
पेप्रात फोट म्हटल्यावर साधी माणसे मानतात त्याला कारण पेपरातफोटो आला म्हणून.
ह्याबाबतीत हे आंब्याचे टाळं फार जागरूक असत.
समजा आपल्या नावापुढे भाऊ किंवा राव नाही लावले गेले की चिडतो.
आज तो पण दिसला.
भाषण देण्यात एकदम तरबेज,
प्रमुख पावण्याच्या आधी बोलून घेतो,
इतका बोलतो की प्रमुख पाहुण्यांचा बोलण्याचा स्टॅमिना खलास होतो.
तिकडे मीडिया वाले बोबलत रहातात कारण त्यांना प्रमुख पावण्याची ' बाईट ' हवी असते.
परंतु हा आधीच ' चावत ' असतो..
उद्या पेप्रात हमखास फोटो आहे बघा तुम्ही.
आणि खरेच त्याचा फोटो आला आणि समोरच्या चहावाल्याने पहिला.
त्याने सांगितले त्याला चहा पण मिळाला . त्याने पैशाचे पाकीट काढले...म्हणा नाटक केले.
तितक्यात चहावाला म्हणाला काय साहेब.
आंब्याचे टाळं एकदम खुश.
चहावाल्याने त्याला वाकून नमस्कार केला.
आंब्याचे टाळं भलताच गहिवरल . नाक्यावरचे लोक हे रस्त्यात बघत होते.
आणि असेच गावागावात आंब्याचे टाळं खुश होत असणार हे निश्चित.
पण त्याचा उपयोग कुणाला...त्या बिनशेडीच्या नारळाचा उपयोग कुणाला..
त्याच्या बायकोला चटणी करायला..
ती नेहमीच होत असते...
..आणि ती म्हणत पण असते जा उनाडायला .
सतीश चाफेकर
ही कवीता आवडल्यास जरुर कळवा
मराठी अर्वाचीन कादंबरीचे जनक' अशा शब्दांत ज्यांचे वर्णन होते अशा हरी नारायण उर्फ ह. ना. आपटे यांचा जन्म ८ मार्च १८६४ रोजी झाला.
भारतातील कंपनी सरकारचे राज्य खालसा होऊन ब्रिटिश सरकारची सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर प्रतिभावंतांची जी पहिली पिढी जन्माला आली, त्यात ह. ना. आपटे यांचा समावेश होता.
हरी नारायण आपटेंनी कथा, स्फूट लेखन, कविता, कादंबरी, नाटक व पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांत मर्दमुकी गाजवत आपले नाव प्रतिभेच्या सर्व दालनांवर सुवर्णाक्षरांनी कोरले. 'करमणूक' या त्या काळात वाचकप्रिय झालेल्या मासिकाची स्थापना त्यांनी केली व त्याचे ते काही काळ संपादकही होते. ज्ञान प्रकाश या मासिकाचेही त्यांनी काही काळ संपादन केले व आनंदाश्रम ही प्रकाशनसंस्था चालवली. प्रख्यात महिलांची माहिती देणारे 'स्त्रीरत्ने' हे सदर त्यांनी बराच काळ लिहिले. त्यात त्यांनी लीलावती, राणी दुर्गावती अशा कर्तृत्ववान महिलांची ओळख वाचकांना करून दिली.
कै. गोविंद बल्लाळ देवल यांचे सुप्रसिद्ध `संगीत शारदा' हे नाटक मा.ह. ना. आपटेंनीच प्रकाशात आणले व केशवसुतांची कविताही त्यांनीच प्रयत्नपूर्वक लोकप्रिय केली.
अकोल्यात झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना लाभले. त्यावेळी अध्यक्षपदावरुन त्यांनी केलेले भाषण बरेच गाजले. या भाषणात त्यांनी नवमराठी साहित्याचा पुरस्कार करून मराठी वाङमय जीवनस्पर्शी असलेच पाहिजे या भूमिकेचा पुरसकार केला. ह. ना. आपटेंनी अनेक पुस्तकांना प्रस्तावनाही लिहिल्या. मा.ह. ना. आपटेंनी साहित्याच्या अनेक प्रांतांत मुशाफिरी केली असली, तरी ते गाजले त्यांच्या कादंबरी लेखनामुळेच. बारा सामाजिक व अकरा ऐतिहासिक कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. त्या सर्वच लोकप्रियही झाल्या. पण त्यांचे नाव आजतागायत गाजत राहिले, ते त्यांच्या 'पण लक्षात कोण घेते?' या कादंबरीमुळे. ही कादंबरी मराठी साहित्याच्या वाटचालीतील मैलाचा दगड बनून राहिली. त्यांच्या लिखाणावर महादेव गोविंद रानडे व गोपाळ कृष्ण गोखले या सुधारणावादी नेत्यांचा प्रभाव होता. त्यामुळे त्यांच्या लिखाणाचा गाभाही समाजाला शहाणे करून सोडण्याचाच होता.
ह. ना. आपटेंचा इंग्रजी भाषेचा अभ्यास दांडगा होता. त्यामुळेच त्यांनी शेक्सपियर व्हिक्टर ह्युगो, कॉग्रेव्ह, फ्रेंच नाटककार मोलियर यांच्या नाटकांची रुपांतरे मराठीत आणली. मेडोज टेलर याच्या दोन गाजलेल्या कादंबऱ्यांची 'तारा' व 'पांडुरंग हरी' ही रुपांतरे त्यांनी प्रकाशित केली. निबंधकार विष्णूशास्त्री चिपळूणकर हे ह. ना. आपटेंचे लेखनातील आदर्श. शास्त्रीजींच्या मृत्यूनंतर त्यांनी 'शिष्यजनविलाप' ही ऐंशी श्लोकांची विलापिका लिहिली. त्यांनी वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी 'केसरी'मध्ये त्यांनी भवभूती व कालिदास यांच्यासंदभांत टीकात्मक लेखन केले. हे लेखन त्यांनी 'बिचारा' या टोपण नावाने केले होते.
ह.ना.आपटे यांचे ३ मार्च १९१९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ : इंटरनेट
१९६६ मध्ये “आखरी खत” हा चेतन आनंद यांचा कृष्णधवल चित्रपट प्रदर्शीत् झाला. यात बंटी नावाच्या एका दिड वर्षाच्या मुला सभोवती या चित्रपटाची कथा गुंफण्यात आली होती. जाल मिस्त्री या प्रतिभावान छायाचित्रकाराने या मुलाचे विविध अंगाने इतके अप्रतिम छायाकंन केले होते की तेवढ्यासाठी प्रेक्षकवर्ग थिएटरकडे खेचला गेला. या चित्रपटात चेतन आनंद यांनी २३ वर्षाच्या एका तरूणाला सर्वप्रथम नायकाची भूमिका दिली जो यात त्या मुलाचा पिता असतो. नायिका होती इंद्राणी मुखर्जी. तरूणाची चित्रपटात फारशी छाप पडली नाही. मात्र या तरूणाचे डोळे अत्यंत स्वप्नाळू होते आणि ते फ्रेममध्ये अनेकदा स्पष्ट दिसत. चित्रपट मात्र चांगला चालला. यातील “बहारो मेरा जीवन भी सँवारो……” हे खय्यामने संगीत दिलेले गाणेही लोकप्रिय झाले. यातील नायकाची भूमिका करणाऱ्या तरूणाचे नाव होते जतीन खन्ना. नंतर हे दापंत्य पाकिस्तानातुन अमृतसर येथे येऊन राहू लागले. मुंबईचे श्रीमंत दापंत्य चुन्नीलाल आणि लिलावती हे यांचे जवळचे नातेवाईक होते. त्यांनी जतीनला दत्तक घेतले. गिरगावच्या सेंट सॅबेस्टियन इंग्रजी शाळेत त्याने प्रवेश घेतला. येथे त्यांची दोस्ती रवी कपूर याच्याशी झाली व दोघे चांगले मित्र झाले. दोघांनाही नाटकांत रूची विशेषत: जतीन ती अधिक होती. हळूहळू मग तो थिएटरकडे खेचला गेला. नाटकातल्या अभिनयासाठी अनेक पुरस्कारही मिळवले. स्ट्रगलच्या काळात जतीन आपली स्पोर्ट कार घेऊन बाहेर पडत असे. यातुनच त्याला हा चित्रपट मिळाला होता. जतिन आणि रवी दोघांनी काही वर्षात चित्रपटसृष्टीत आपला जम बसवला. पूढे यातलाच एक मग चित्रपटसृष्टीतला सुपरस्टार झाला तर दुसरा जंपिग स्टार झाला.
जतिनला १९६७ मध्ये दोन चित्रपट मिळाले. पहिला “राज” ज्यात बबीता त्याची नायिका होती आणि दुसरा नासिर हुसेनचा “बहारों के सपने” यात आशा पारेख नायिका होती. यातील आरडीची ‘चुनरी संभाल गोरी’ व ‘आजा पिया तोसे प्यार दू’ ही दोन गाणी तुफान गाजली. जतिनची कामगिरी ठिक म्हणण्या इतपत झाली होती. आणखी दोन वर्षाने जतिनच्या आयुष्यात एक जबरदस्त बदल घडणार होता जो त्याच्या ध्यानी मनीही नव्हता. ६० च्या दशकातील सचिन भौमिक हे प्रसिद्ध चित्रपट कथा-पटकथाकार होते. त्यांच्याच एका कथेवर शक्ती सामंतानी एक चित्रपट काढायचे नक्की केले. संगीतकार एस:डी. बर्मन,गीतकार आनंद बक्षी, संवाद रमेश पंत अशी त्रयी एकत्र आली आणि १९६९ मध्ये “आराधना” प्रदर्शीत झाला. या चित्रपटाने अक्षरश: धूम केली आणि जतिन हा खऱ्या अर्थाने राजेश खन्ना झाला. पूर्वीच्या तिनही चित्रपट नामावलीत त्याचे नाव राजेश खन्ना होते ते नंतर सुपर स्टार राजेश खन्ना झाले. त्याचा शाळेतला मित्र रवी कपूर ही पूढे जितेंद्र नावाने सुप्रसिद्ध अभिनेता झाला. गंमत म्हणजे एकदा एका ऑडिशनच्या वेळी कॅमेऱ्या समोर कसा अभिनय करायचा हे राजेश खन्नाने जितेंद्रला सांगितले त्यात जितेंद्र पास झाला आणि राजेश फेल झाला. जितेंद्र आणि त्याची पत्नी राजेश खन्नाला “काका” म्हणून हाक मारत असत.
खरे तर हिंदी चित्रपटसृष्टीतला पहिला सुपरस्टार अशोक कुमारला म्हटले जाते. पण त्याकाळात चित्रपट निर्माण होण्यास बराच कालावधी लागत असे शिवाय एका चित्रपटात काम करतानां अभिनेता दुसरीकडे काम करत नसे कारण निर्माता तसा करार करीत असे. त्यामुळे एका अभिनेत्याचे भारंभार चित्रपट येत नसत. पण नंतर परिस्थिती बदलली. अभिनेते शिफ्ट बेसीसवर काम करू लागले. १९७० पर्यंत खूप काही बदलले. राजेश खन्नाने १९६९ ते ७२ या तिन वर्षाच्या कालावधित सलग १५ चित्रपट सुपरहिट दिले. आराधना, इत्त्फ़ाक़, दो रास्ते, बंधन, डोली, सफ़र, खामोशी, कटी पतंग, आन मिलो सजना, ट्रैन, आनन्द, सच्चा झूठा, दुश्मन, महबूब की मेंहदी, हाथी मेरे साथी हे तुफान चालले. तर १९७२ ते ७५ च्या दरम्यान अमर प्रेम, दिल दौलत दुनिया, जोरू का गुलाम, शहज़ादा, बावर्ची, मेरे जीवन साथी, अपना देश, अनुराग, दाग, नमक हराम, अविष्कार, अज़नबी, प्रेम नगर, रोटी, आप की कसम, प्रेम कहानी हे चित्रपट यशस्वी झाले. राजेश खन्ना इतका यशस्वी का झाला असेल बरे? खरं तर त्याच्याकडे धमेंद्र सारखे तगडे शरीर नव्हते, जितेंद्र सारखे नाचू शकत नव्हता, संजीव कुमार इतकी खोली नव्हती, नवख्या ऋषी कपूर सारखा खानदानी रंग ही नव्हता, विनोद खन्ना सारखी वा अमिताभ सारखी उंचीही नव्हती किंवा मनोजकुमारसारख वेगळा दिसणारा चेहरा नव्हता. ७० च्या दशकातील विचार केला तर एक गोष्ट नक्की होती ती म्हणजी त्यावेळी तारूण्याच्या उंबरठ्यावर असणारी ती पिढी खूपशी स्वप्नाळू होती. राजेश खन्ना हा त्यांनां आपल्यातला एक वाटायचा. राजेश खन्नाला सुपरस्टार करण्यात सर्वात मोठा वाटा मला तरी वाटते त्यावेळच्या तरूणींचा होता. त्याचे डोळयात त्यांना आपला स्वप्नाळू प्रियकर दिसायचा. त्याचे ते किंचीत मान तिरकी करून हलकासा झटका देणे, चालताना किंचीत एका बाजूला झुकत चालणे, ओठांच्या नैसर्गिक हालचाली आणि सर्वात आकर्षक म्हणजे त्याचे अत्यंत प्रसन्न असे हसणे. त्याने कधी आपल्या चेहऱ्या वरील तारूण्यपिटीका लपविल्या नाहीत कदाचित त्यामुळे अधिक जवळचा वाटत असावा. अनेक तरूणींनी त्या काळात स्वत:च्या रक्ताने राजेश खन्नाला प्रेमपत्रं लिहीली आहेत. ज्या कार मधून तो जात असे त्याचे चुंबनही घेत तरूणी.
राजेश खन्नाचा अभिनय अगदी सहज वाटत असे. संवादाचे खूप मोठे चढउतार त्याने कधीच केले नाही. खलनायकाचा कितीही राग आला तरी त्याचे डोळे कधीच अंगार ओकत नसत जणू काही तो त्यानां पश्चातापाची संधी देतोय. हाणामारीच्या दृष्यापेक्षा कौटंबिक प्रसंगात तो छानच फुलत असे.अभिनय करताना त्याच्या चेहऱ्या वरील भाव सहज बदलत असत. कदाचित म्हणूनच त्याचा “आनंद” आपल्याला आजही वेगळी अनुभूती देतो. गुलजारच्या प्रत्येक संवादाचं राजेश खन्नाने सोनं केलंय. “बाबू मोशाय” या त्याच्या एका हाकेने अख्खा प्रेक्षक शहारून जात असे. “जिंदगी लंबी नही बडी होनी चाहिए” या त्यांच्या एका वाक्याने अनेक कॅन्सरग्रस्त रोग्यांचा मृत्यू राजेशच्या अभिनयाने सुसह्य केला होता. मला तरी असे वाटते की राजेश खन्ना थेटपणे समाजमनाला भिडत असावा. जेव्हा एकादा अभिनेता आपल्यातलाच कुणी तरी एक आहे असे वाटू लागते तेव्हा साहजिकच त्याला तिकाच जोरकस प्रतिसादही मिळू लागतो.
राजेश खन्नाच्या चित्रपटांची आणि पुरस्कारांची यादी खूपच लांबलचक आहे. “आराधना” या चित्रपटाने जसा राजेश सुपर स्टार झाला तसाच किशोरदाचा ही दुसरा जन्म झाला. किशोर आणि राजेश हे समिकरण इतके छान जुळले की जणूकाही राजेश खन्ना स्वत:च गात आहे. राजेशने गायलेली गाणी त्यांच्या ओठातुन नव्हे तर पोटातून यायची. पूर्वी असे देव आनंद बाबत होत असे. म्हणून त्याच्या सुपरस्टारच्या यशात किशोरदाचा आवाज आणि संगीतकारांचे योगदानही तितकेच महत्वाचे आहे. शक्ती सामंतानी जेव्हा “अमर प्रेम” करायचा ठरविला तेव्हा राजेश खन्ना यात काम करेल याची त्यानां शाश्वती वाटत नव्हती. ते बिचकतच राजेशकडे गेले व कथा ऐकवली. राजेश खन्नाला ती प्रचंड आवडली. त्यांनी फक्त एकच सूचना केली की त्यात त्यांचे नाव “आनंद” असावे. धोतर आणि कुर्ता या वेषातला आनंद बाबू शर्मिला टागोरला “पुsष्पाss” अशी हाक मारतो तेव्हा ती हाक हृदयाच्या खोल गाभाऱ्यातुन आल्या सारखी वाटते. “पुष्पा ….आय हेट टिअर्स” हा या चित्रपटातला गाजलेला संवाद. राजेशचा आवाज असा अनेकदा आरपार जात असे. खरं तर “हाथी मेरे साथी”तले खरे नायक प्राणीच होते. कारण निर्माता चिन्नप्पा देवर यासाठीच प्रसिद्ध होते. या चित्रपटातही राजेश अगदी सहज वावरला त्याच्या आवडत्या हत्तीच्या मृत्यू नंतर त्याचा गाण्यातील अभिनय सुंदरच होता. दुलाल गुहाच्या “दुश्मन” मधला त्याचा आगोदरचा बेफिकीर ट्रक ड्रायव्हर आणि नंतरचा पश्चाताप झालेला दुश्मनचाचा मस्तच …त्याकाळात पँट आणि त्यावर झब्बा किंवा गुरू शर्ट हा वेष तरूणांमध्ये अफाट लोकप्रिय झाला होता. ‘सच्चा झुठा’, ‘आनंद’ आणि ‘अविष्कार’ साठी तीन वेळा त्याला उत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्म फेअर पुरस्कार मिळाला. फिल्म फेअरसाठी त्याला १४ वेळा नामाकंने मिळाली. मुमताज या अभिनेत्री बरोबर त्याची छान केमेस्ट्री जुळली. दोघांचे आठही चित्रपट सुपरहिट झाले. मग अचानक राजेश खन्नाने आपल्यापेक्षा १६ वर्षे लहान असलेल्या डिम्पलशी लग्न केले तर मुमताजने आपल्यापेक्षा एक वर्ष मोठ्या असलेल्या मयूर मध्वानीशी लग्न करून चित्रपट संन्यास घेतला. १६३ फिचर फिल्मपैकी १२८ चित्रपटात ते मूख्य नायक होते.
राजेश खन्नाचा संघर्षाचा काळ तसा खूप कमी होता. त्यात श्रीमंत घरात दत्तक गेल्यामुळे पैशांची चणचण कधी भासली नाही त्यानां. प्रसिद्धीचे सर्वोच्च शिखर काबीज केल्या नंतर खाली बघतानां ते एक गोष्ट मात्र विसरले की हे यश कायम स्वरूपी कधीही असत नाही. अमिताभच्या उदया नंतर त्यांच हे पद हिसकावले जाणार होते हे त्यांच्या लक्षातच आलं नाही. खरं तर त्या काळात अमिताभ स्ट्रगलर होते. ते मेहमूदकडे अनेकदा म्हणत की- मला एकदा तरी राजेश खन्नाची भेट घालून दे. आणि मेहमूदने ती भेट घडवूनही आणली होती. आनंद नंतर १९७३ मध्ये आलेल्या हृषिकेश मुखर्जी यांच्या “नमक हराम” मध्ये दोघांचा अतिशय सुंदर अभिनय बघता आला. यात राजेशपेक्षा थोडीशी अधिक सशक्त भूमिका अमिताभची होती आणि ती त्यांनी उत्कृष्ट साकार केली. पण याच चित्रपटाने दोघांच्या व्यक्तीक आयुष्यात एक आडवी रेषा मारली. ते परत कधीच एकत्र आले नाही. नंतर ही दरी वाढतच गेली. डिम्पल सोबतचे वैवाहिक जीवनही अडचणीत येत गेले. राजेश खन्ना एकलकोंडे होऊ लागले. यश पचवतानां अपयशाचा विचार कधी केलाच नाही राजेश खन्नाने आणि ही त्यांची मोठी चूक ठरली. जसजसे त्यांचे चित्रपट कोसळू लागले तसतसे ते प्रेक्षकां पासून दूर होत गेले. १९९२ ते ९६ या काळात ते काँग्रेसचे खासदार होते. सन २००९ मध्ये मुंबईतील घाटकोपर येथे भारतीय जनता पार्टो राम कदम यांनी आयोजित केलेल्या दहीहंडीच्या कार्यक्रमात केलेले भाषण हे राजेश खन्नाचे अखेरचे जाहिर भाषण होते. अमिताभच्या यशाचा विषाद अनेकदा त्यांच्या बोलण्यातुन स्पष्ट दिसत असे. सन २०१४ मध्ये अमिताभच्या हस्ते त्यानां लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार देण्यात आला…त्यावेळी ते म्हणाले होते- “इज्जते शोहरते उल्फते चाहते सब कुछ इस दुनियामे रहता नही, आज मै हूँ वहाँ कल और कोई था, ये भी एक दौर है वह भी एक दौर था”…. कायम यशाची चव चाखलेला हा सूपर स्टार अपयशानं मात्र खंगून गेला. २०१२ च्या जुलै मध्ये त्यांना मुंबईच्या लिलावती हॉस्पीटल मध्ये दाखल करण्यात आले होते. १८ जुलैला त्यांनी शेवटचा श्वास घेतला. मला सर्वाधिक वेदना त्यांच्या मृत्यूमुळे नव्हे तर अखेरच्या काळातील त्यांचे छायाचित्र बघून झाल्या. त्यांच्या ज्या हास्याने मनाला टवटवीतपणा येई ते नैसर्गिक हास्य पार लोपलं होतं. डोळे हे विश्वास ठेवायला तयारच नव्हते की हे राजेश खन्नाचे छायाचित्र आहे………..माझ्या डोळ्या समोर आजही आनंद मधला समुद्र किनाऱ्यावरील वाळूतुन अनवाणी पायाने हातात मनस्वी स्वप्नाचें रंगीबेरंगी फुगे घेऊन गाणे म्हणणारा आनंद आठवतो…”जिंदगी कैसी है पहेली हाय”……………गुलजारनी यातला एक संवाद जणू फक्त राजेश खन्नासाठीच लिहला असावा- ‘आनंद मरा नही, आनंद कभी मरते नही’……….
-दासू भगत (१८ जुलै २०१७)
शम्मी कपूर व अमिताचा ‘तुमसा नहीं देखा’ हा चित्रपट एकदा पाहून कधीच समाधान होत नाही.. त्यातील ‘आए है दूर से..’, ‘छुपने वाले सामने आ..’, ‘सिरपर टोपी लाल..’, ‘देखो कसम से..’ व टायटल साॅंग गाण्यांसाठी तो पुन्हा पुन्हा पहावासा वाटतो.. नासिर हुसेन यांचं दिग्दर्शनही अप्रतिम होतं. या चित्रपटाच्या अफाट यशामुळे शम्मी कपूर व अमिताचंही सिनेसृष्टीत चौफेर नाव झालं..
आता नाही कुठे अंतराला ओल
कसा तरी व्हावा एकमेळ
वाढतो मी पान जेवतो न कोणी
माझीच कहाणी मी वाचतो
निरंजनदास बल्लाळ हे गणेशभक्त व गीतेचे टीकाकार म्हणून प्रसिद्ध आहेत. ते निरंजनस्वामी कऱ्हाडकर यांचे शिष्य. हे मूळचे बीडचे असा उल्लेख निरंजनस्वामींचा चरित्रकार नातू भगवंत देव यांनी केला आहे.
जळगावमधील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात नुकतेच महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनादरम्यान झालेल्या विविध व्याख्यानांतून तसेच पक्षी निरीक्षणातून जात संरक्षण, संवर्धन व पर्यावरण जागृतीच्या मोहिमेला पुढील दिशा देण्यात आली.
असे म्हणतात की बाळाचे पाय हे पाळण्यात दिसतात कारण एखाद्या व्यक्तीला एखाद्या क्षेत्रात कारकीर्द घडवायची असेल तर त्याची सुरुवात आणि मुळातच आवड ही बालपणापासून असावी लागते. तरच आपली पॅशन हे आपलं करीयर बनू शकतं. याच युक्तीप्रमाणे ५५ आवाजांची किमया लाभलेल्या अमोल तेली या तरुणाने हे खरे करुन दाखवले आहे..
आम्ही भाजी निवडत असताना माॅनीटर भाजी निवडण्यास टाळाटाळ करणाऱ्या मंडळींकडे लक्ष ठेवत होता ..काही जण नुसतेच समूहात बसून हातात एखादी गवार शेंग घेवून अथवा मेथीची काडी घेवून गप्पा मारत बसले होते ...माॅनीटरचे लक्ष जाताच ते भाजी निवडतोय असे भासवत ..भाजी निवडता निवडता तोंडे सुरूच होती सगळ्यांची ..हास्यविनोद सुरु होते ..एकदोन टवाळ लोक गुपचूप वार्डातील जरा ' मंद ' असलेल्या लोकांना लसणाची पाकळी फेकून मारत होते .. कामचुकार लोक सारखे उठून बाथरूम ..संडासकडे जावून टाईमपास करत होते ..त्या सगळ्यांना वारंवार माॅनीटर हाकलत होता ..मी बराच वेळ मांडी घालून बसल्याने जरा पायाला मुंग्या आल्यासारखे वाटले म्हणून उठून उभा राहिलो ..मग बाथरूम कडे गेलो ..
एकदम शेवटच्या बाथरूम मध्ये गेलो ..मला आश्चर्याचा धक्काच बसला ..इथे एक जण कोपऱ्यात दडून बसला होता ..बहुधा माॅनीटरच्या नजरेतून तो सुटला होता ..मला पाहून तो उठून उभा राहिला ..त्याचा चेहरा भेदरल्या सारखा झाला होता ..डोळे स्थिर नव्हते ..' अरे इथे काय बसलास ? चल कि तिकडे भाजी निवडायला ' असे म्हणालो त्याला तर त्याने कानावर हात ठेवले आणि पुन्हा खाली बसला ..काय प्रकार आहे ते समजेना ..मी बाहेर जावून माॅनीटरला तो प्रकार सांगितला ..माॅनीटरने त्याला हाताला धरून बाहेर आणले ..हा सुमारे पंचविशीचा युवक होता ..तो येथे दाखल होऊन जेमतेम चार पाच दिवस झालेले ..खूपच अशक्त वाटत होता ..तसेच चालताना जरा लंगडल्या सारखा चाले ..तो आल्यापासून सारखी तळपायाची आगआग होते म्हणून तक्रार करत असे ..त्याला डॉक्टरनी तपासून औषध गोळ्या लिहून दिल्या होत्या ..दारूचा दुष्परिणाम म्हणून त्याच्या पायाच्या रक्तवाहिन्यांमध्ये मध्ये समस्या निर्माण होऊन तेथे आगआग होते असे डॉक्टरांचे म्हणणे पडले होते ....
त्याला चालताना खूप त्रास होई म्हणून तो जास्तीत जास्त वेळ बसून राही किवा पलंगावर झोपून राही ..आजचा त्याचा हा बाथरूम मध्ये लपून बसण्याचा प्रकार अजबच वाटला मला ..माॅनीटरने जेव्हा त्याची थोडी प्रेमाने विचारपूस केली तेव्हा म्हणाला ..कानात खूप आवाज येत आहेत माझ्या ..शिव्या देण्याचे ..रागावल्याचे ..खूप आरडा ओरडा ..गोंधळ ..गाड्यांचे ..होर्नचे आवाज ...या आवाजानं घाबरून तो लपून बसला होता बाथरूममध्ये .. माॅनीटरने त्याला धीर दिला ..मग एक गोळी आणून दिली ..ती गोळी घेवून त्याला झोपण्यास सांगितले ...हा देखील एक दारूचा दुष्परिणाम आहे हे मला समजले ..हा तरुण मानसिक रुग्ण बनला होता ..दारूचा दुष्परिणाम त्याच्या मेंदूवर होऊन त्याला असे आवाज कानात ऐकू येत होते ..त्याने दारू सेवन न करता आता व्यवस्थित दीर्घकाळ उपचार घेतले पाहिजेत असे माॅनीटरचे म्हणणे पडले ..
इथे आल्यापासून दारू आणि मादक पदार्थांच्या दुष्परिणामांचे एक एक भयानक प्रकार माझ्या समोर यते होते ..दारूमुळे केवळ लिव्हर खराब होते असे मी ऐकून होतो .परंतु मेंदू ...त्वचा ..डोळे ...शरीरांतर्गत असणाऱ्या रक्तवाहिन्या ..किडनी ..हृदय ..अश्या शरीराच्या प्रत्येक महत्वाच्या भागावर वेगवेगळे दुष्परिणाम होतात हे समजल्यावर ..बरे झाले आपण इथे उपचार घेण्यास आलो ही भावना अधिक दृढ होत गेली माझी ...एकाच्या लघवी आणि संडास या बद्दलच्या संवेदना क्षीण झालेल्या होत्या ..तो एकदम उठून पळत पळत बाथरुमला जात असे ..किवा कधी कधी त्याला लघवी अथवा संडास येतेय हे कळत नसे..तो अशा वेळी कपडे खराब करी ..मग सगळे झाल्यावर ते त्याच्या आणि आमच्याही ध्यानात येई ..तो ओशाळून जाई खूप ..त्याला औषध सुरु होते ..त्याच्या तपासण्याही झाल्या होत्या ..त्याला मेंदूच्या क्रिया सुरळीत करण्यासाठी इंजेक्शन्स सुरु होती ..
दाखल झाल्यावर एकाच्या त्वचेची सालपटे निघू लागली होती.. साप जसा कात टाकतो तशीच ..दारूच्या सेवनामुळे त्याच्या अंगावरची त्वचा पूर्ण निकामी होऊन आता आतून नवीन त्वचा निर्माण होऊन जुनी त्वचा हळू हळू निघून जात होती म्हणे ..याला गमतीने वार्डातील लोक ' अजगर ' म्हणत असत ..एकाच्या पित्ताशयात समस्या निर्माण झाल्याने .. अचानक त्याचे पोट दुखू लागे ..अगदी गडबडा लोळे तो पोटदुखीने मग त्याला गोळी दिल्यावर बरे वाटे ..एकाचे पोट खूप वाढलेले ..अगदी दिवस भरत आलेल्या बाईसारखे ..हातापायाच्या काड्या झालेल्या ..त्याला म्हणे जलोदर झालेला होता ..लिव्हरचे कार्य खूपच बिघडलेले होते त्याच्या ..त्यालाही नियमित औषधे सुरु होती ..त्याच्या खाण्यात जरा वातूळ पदार्थ आला की त्याचेही पोट दुखे खूप ..एकदोन जण क्षयरोगाची लागण होता होता थोडक्यात वाचलेले ..तर सुमारे पाच सहा लोक दारूमुळे अपघात होऊन पायाचे अथवा हाताचे हाड जायबंदी होऊन शस्त्रक्रिया झालेले..कंबरदुखी ..पाठदुखी अशी दुखणी सुरु झालेलेही बरेच लोक होते ..
मी असा विमनस्क विचार करत असताना ..मला सरांनी बोलावले आहे असा निरोप आला म्हणून बाहेर ऑफिसात गेलो ..सरांनी नेहमीप्रमाणे हसतमुखाने स्वागत केले ..मला वाटले बहुतेक परवा घरी जाण्यासाठी अलकाकडे हट्ट केला ..अन्नत्याग केला म्हणून बोलावले असावे..सरांनी माझी डायरी मागितली ज्यात मी रोज दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहित होतो ..सर काळजीपूर्वक सगळी उतारे वाचत होते ..वाचून झाल्यावर मग म्हणाले ..' विजयभाऊ तुम्ही छान लिहिता उत्तरे ..अगदी मनापासून ..एकंदरीत आपण येथे उपचारांना आलो ते फार बरे झाले असाच सूर आहे तुमच्या लिखाणाचा ..' सरांनी केलेली तारीफ ऐकून बरे वाटले मला ..पुढे ते म्हणाले ..इथे राहत असताना अनेकदा तुम्हाला लवकर बाहेर पडावे असे वाटेल ..कंटाळा येईल इथल्या दिनक्रमाचा ..मात्र तरीही मनाला समजवावे लागते की माझ्या सुरक्षित भविष्यकाळासाठी ही काही दिवस येथे राहणे ही एक गुंतवणूक आहे ..त्याचे फायदे नक्कीच मिळतील तुम्हाला ..मी होकारार्थी मान हलवून हसलो ..मग त्यांनी विषय काढलाच परवाचा ' परवा वाहिनी भेटीला आल्या होत्या ना ..काय म्हणत होत्या ..आनंद झाला असेल न त्यांना तुमची तब्येत सुधारत आहे हे पाहून ? " खरे तर मी हट्ट केला होता अलकाकडे हे सरांना ठाऊक होते .. त्यांनीच कितीही हट्ट केला ..धमक्या दिल्या ..तक्रारी केल्या तरी दुर्लक्ष करावे हे अलकाला सांगून तिला धीर देवून मन घट्ट करण्यास सुचवले होते तिला ..मी ओशाळून खाली मान घातली ..नुसताच बसून राहिलो ..
सर म्हणाले " एकंदरीत तुमची चूक तुम्हाला उमजलेली दिसतेय तर ..छान झाले तुम्ही पत्नीच्या भावना समजून घेतल्या ते ..तुम्हाला येथे शिक्षा म्हणून ..अद्दल घडावी म्हणून ..अथवा त्रास व्हावा म्हणून येथे दाखल केले गेले नसून ..तुमचे शारिरीक आरोग्य ..मानसिक आरोग्य सुधारावे ..तुमच्या व्यक्तिमत्वाला लागलेले हे व्यसनाधीनतेचे ग्रहण कायमचे सुटावे म्हणून उपचारांसाठी येथे ठेवले आहे हा विचार सतत मनात असू द्या ..म्हणजे वेळोवेळी मनात येणारे नकारात्मक विचार तुम्हाला हाकलता येतील " मी नुसताच मान डोलवत होतो ..सरांनी मला शुभेच्छा दिल्या आणि जाण्याची जाण्याची खुण केली .वार्डात परत येताच नेहमीप्रमाणे शेरकर काका आलेच जवळ ...त्यांना कुतूहल होते सर मला काय म्हणाले याबद्दल ..मी सांगितले सरांनी वहीची तारीफ केली..मला अजिबात रागावले नाहीत परवाच्या प्रकाराबद्दल ..यावर ते म्हणाले .. " आपले सर ' मीठी छुरी ' आहेत ..अजिबात त्रास न होऊ देता ऑपरेशन करतात " ..मग मिस्कील हसून मला टाळी दिली .
( बाकी पुढील भागात )
-- तुषार पांडुरंग नातू
" मैत्री ' व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र , नागपूर
संपर्क..रवी पाध्ये - ९३७३१०६५२१ ..तुषार नातू - ९८५०३४५७८५
Copyright © 2025 | Marathisrushti