(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • भाऊबीज

    कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज हा सण साजरा केला जातो. या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेला म्हणून या दिवसाला ‘यमद्वितीया’ असे नाव मिळाले असे मानले जाते. हा दिवस म्हणजे शरद ऋतूतील कार्तिक मासातील द्वितीया. द्वितीयेचा चंद्र आकर्षक व वर्धमानता दाखवणारा आहे.
    तेव्हा बिजेच्या कोरीप्रमाणे बंधुप्रेमाचे वर्धन होत राहो’, ही त्यामागची भूमिका आहे. आपल्या मनातील द्वेष व असूया निघाल्यामुळे सर्वत्र बंधुभावनेची कल्पना जागृत होते; म्हणून त्याकरिता हा भाऊबिजेच्या सण आहे. बंधू-भगिनींचा प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे.
    या दिवशी बहिणीच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाऊ मग ओवाळणीच्या ताटात ‘ओवाळणी’ देऊन बहिणीचा सत्कार करतो.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

    भाऊबीजे निमित्त
    स्त्रियांचा सण हा जिव्हाळयाचा विषय आहे. मग त्यात भाऊ-बहिणांच्या नात्यात या भाऊबीज या सणांचे महत्त्व किती आहे हे सांगावयास नको. दिवाळी हा सण इतर सणांपेक्षा मोठा मानला जातो, याचे कारण चार दिवस आणि प्रत्येक नात्यांशी जोडणारी रिती-परंपरा मग स्त्रीचा भाऊ, बहीण, पती यांसाठी भाऊबीज, पाडवा यासारखे दिवस राखूनच ठेवले आहेत. भाऊ-बहिणीच्या नात्यावर खूप लिखाण झाले आहे. मग स्त्री आपले दु:ख सांगताना भक्कम पाठीशी उभा राहणारा भाऊ डोळयासमोर ठेवून ओव्या रचते.

    बहिणीला भाऊ एक तरी तो असावा ।
    चोळीचा एक खण, एका रातीचा विसावा

    किंवा

    भाऊ तुझा घोडा आस्मानीचा तारा ।
    बहिणीच्या गावा जाता लागेना ऊन वारा ॥
    शंभर माझं गोतं एक नाही गं कामाचं ।
    भाऊ राजसाचं मला भूषाण रामाचं ॥
    भाऊची वाट पहाते मी कालच्या धरून ।
    शाळा दिवस गं बाई गेल्या सावल्या विरून ॥

    अशा प्रकारे भावाविषयीचे प्रेम स्त्री ओवीमधून व्यक्त करते. मग सख्खा भाऊ जरी नशिबात नसला तरी चुलत भावाला ती सख्ख्या भावापेक्षा वेगळं स्थान देत नाही.

    चुलत भावाला नका म्हणू वंगाळ
    इचार करा जरा एका राशीचं जोंधळ

    अशा प्रकारे प्रत्येक सणाला ती भावाची वाट पाहात असते. श्रावण महिना सुरू होतो आणि सणांची रेलचेल सुरू होते.

    पंचमीच्या सणाला बंधू आल्याती न्यायला ।
    जाऊ काय जी म्हायारी पंचमी खेळाया ॥

    पूर्वी एकत्र कुटुंबव्यवस्था असल्याने कुटुंबात सदस्यांची संख्या जास्त असे. दळणवळणाची सोय नसे, मग बैलगाडीचा वापर होई. मग बहिणीला सासरी आणण्यासाठी भाऊ निघे, त्यालाच मु-हाळी येणे किंवा मुराळी येणे असे म्हणत. मग त्यालाच मुराळी एखादी व्यक्ती यायची तिला सन्मानाने माहेरी घेऊन जात आणि पुन्हा सासरी पाठविताना तिच्यासोबत गोड पक्वान्न देऊन पाठवणी करीत असत.

    मु-हाळया माझा दादा घोडं बांधवा जाईल ।
    सोय-याला रामराम मग भेटावं बाईला ।
    दस-या दिवाळीचं मूळ येईल नेमाचं ।
    भाऊरायाचं घोडं दारी येईल टेमाचं ॥

    दसरा दिवाळीच्या सणाला हमखास भाऊ येणार याची खात्री बहिणीला असते. म्हणूनच तिला सणांची आस लागते. पूर्वी मुराळी या शब्दाबरोबर ‘मूळ’ हाही शब्द प्रचलित होता. दिवाळी हा सण साजरा करताना गरीब-श्रीमंत असा भेद केला जात नाही. दीप लावून प्रकाशमय होणारा काळ दिवाळीचा सर्वात मोठा सण मानला जातो. बहिणीला अगदी खात्री असते की काहीही झाले तरी दिवाळीला भाऊ आपल्याकडे येणार. मग तिची त्या भावालाही गोडधोड पदार्थ करण्यासाठी धावपळ सुरू होते. भावासाठी सजावट सुद्धा ती करते.

    दिवाळीच्या दिशी झुंबराची गं आरास ।
    न्हाई कुणाची आगत मला बंधुजी परास॥
    दिवाळीच्या दिशी पाट रांगोळ्याची शोभा ।
    बंधुजी पावना माझ्या देव्हा-याम्होरं उभा ॥
    चांदिच्या कंदिलाला सये सोन्याचे गं वात ।
    बंधूला झाली रात कुण्या गावच्या मळयात ॥
    दिवाळीच्या दिशी उटणं गुलालाचं ।
    भाऊ भाऊ राजसांचं गोर अंग मुलायम ॥
    दिवाळीच्या दिशी दारी सजवीन मोर ।
    लाडके माझे बंधू ववाळीन
    गं भास्कर ॥

    अशा रीतीने आतुरतेने वाट पाहणा-या बहिणीकडे भाऊ येतो तेव्हा तिला त्याच्यासाठी काय काय करू असे होते. मग ती भावाला आवडणा-या पक्वान्नासाठी लगबग सुरू करते.

    भाऊबीज केली मी बुंदीच्या गोळ्याची ।
    बांधवाच्या हाती माझ्या धुलंड तोढायची ॥
    भाऊबीजे दिशी ठिवलं दुधाचं आदायान ।
    भाऊरायासाठी केलं पोळीचं जेवायन ॥
    पाची पक्वान्नं ताट वर बासुंदी आणि पुरी ।
    भाऊबीजेच्या फराळाला बोलाविले नरहरी ॥
    गहू पोळीयाला डाळ दळिते भज्याला ।
    जेवण करीते मी माझ्या बंधू राजाला ॥
    भावाला भाऊबीज करीते करंज्याची ।
    बंधुजीच्या हाती नथनी सरजाची ॥

    ज्या बहिणीला भाऊ नाही, पण तिने गुरुभाऊ मानला असेल तर त्यासंबधी सुद्धा ती आपले मन मोकळे करते ती म्हणते,

    सख्ख्या भावा परीस गुरुभावाला माया मोठी ।
    लाडक्या भैनीसाठी चोळी घेऊन येतो भेटी ॥
    सख्ख्या भावापरिस गुरुभाऊ गं आगळा ।
    पाची प्रकाराचं ताट नको जेऊस वेगळा ॥

    वाट पाहूनही भाऊ आला नाही तर ती नाराज होते आणि म्हणते

    दिवाळी सणादेशी बंधू माझा गं आला न्हाई ।
    सांगावा आला बाई जोड ठुशीचा झाला न्हाई ॥

    अशा रितीने बहीण भावाचं आदरातिथ्य करते आणि त्याला औक्षण करताना भाऊ आपल्याला काही नाही तरी साडी-चोळी देऊन आदर करेल अशी इच्छा व्यक्त करते. लग्न करून सासरी गेलेल्या स्त्रीला आपल्या माहेरचा मोठेपणा नेहमीच असतो.

    भाऊबीजे दिवशी भाऊ आले पुण्याहून ।
    आज भाऊबीज ओवाळीते दुणाऊन॥
    राम-लक्ष्मण तुम्ही बसा एका ओळी ।
    दिवाळीची मला द्यावी साडी-चोळी ॥
    भावाची भाऊबीज बाई जरीची पगडी ।
    माझ्यासाठी ओवाळणी चंदेरी आणी साडी ॥
    दिवाळी दस-याची चोळी फाटून झाली चिंधी ।
    नटव्या बंधुजींनी मला ओताला दिली जोडी ॥

    भावाविषयीची आत्मीयता तिच्या ठायी सतत जाणवते. चोळी पातळ हे तर क्षणभंगूर आहे. परंतु संसारात सुद्धा भाऊ पदोपदी बहिणीला मदत करतो. पण तोच भाऊ बहिणीकडे आला नाही तर नाराज होऊन मनातील खंतपण बोलून दाखविते,

    भाऊबीज केली नाही कुणाला कळू दिली ।
    बंधूरायानं मला पोकळी नेसविली ॥
    संपाक रांधते मी पुरणपोळीला तवा ।
    माझा गं बंधूराज नड सांगते जवा तवा ॥

    अशा प्रकारे भाऊ, बहीण, भावजय अशा नात्याविषयीच्या ओव्या खूपच अस्तित्वात आहेत. याशिवाय स्त्रीला आपले अंतर्मन मोकळे करण्यासाठी पांडुरंग, रुक्मिणी, पंढरपूर म्हणजेच पंढरपूर हे माहेर आणि पांडुरंग आणि रुक्मिणी माता-पिता अर्थी अनेक ओव्या रचल्या आहेत. स्त्रीचे सर्व आयुष्यच बहुधा माहेराशी बांधलेले असते. स्वाभाविकच सासर-माहेरच्या माणसांभोवती भिरभिरणारे मनच गीतरूप घेते.

    आईविषयीची कृतज्ञता आणि भावांचे प्रेम अनेक वाटांनी व्यक्त होते. स्त्रीचे पुरुषसापेक्ष अस्तित्व आणि तज्जन्य वेदनेच्या अनंत परी लोकजीवनात आजही विद्यमान आहेत. तथाकथित शिक्षित उच्चस्तरीय समाजाचे मनही वेगळे नाही, यातूनच कवितेचा जन्म झाला असे म्हणता येईल. मनात दाटलेले सुख, दु:ख, खंत एखाद्या कवितेद्वारे ओठावर येणं हे नसर्गिक आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • हि कसली समानता ?

    आज लोकशाही असलेल्या या भारत देशात अण्णा हजारे सारख्या ७४ वर्षांच्या वयोवृद्ध व्यक्तीला १३ दिवस उपोषण केल्यावर कुठे शासनाला जाग आली आणि हा घोर संघर्ष यशस्वी झाला.दुक:ख असे आहें कि अशा अनिष्ट प्रथा जोपासण्यासाठी शासकीय बळ वापरले जाते तेथे समानतेची अपेक्षा बिचार्या शेतकऱ्यांनी काय म्हणून करावी ?

  • बहिण

    बाजारातुन परत घरी येताना काही खाण्याच मन झाल.. म्हणुन ती मुलगी पाणीपुरीच्या ठेल्यावर थांबली..

    एकटी मुलगी पाहुन शेजारीच असलेल्या पान टपरीवरची काही मुले ही त्या ठेल्यापाशी आली...

    त्यांनी त्या मुलीला छेडायला चालु केल.. अश्लिल गाणी आणी संवाद चालु केला.. घाणेरडी नजर त्या मुलीच्या देहावरुन फिरत होती..

    बिचारी आगोदर पैसे दिल्याने तिला तेथुन जाता ही येत नव्हते.. आपली ओढणी संभाळत.. "भैया जल्दी दो".. या पलिकडे ती काहीच बोलत नव्हती.. घाबरलेली तिची नजर फक्त खाली पाहत होती..

    तेवढ्यात तिथे एक तरुण युवक आपल्या बाईक वरुन येऊन तेथे थांबला...

    आधिच मनात कल्लोळ चालु असताना त्यात आजुन एक ती पुर्ण भेदरुन गेली...

    तेवढ्यात तो युवक बोलला.. " आरे अंजली तु इथे कुठे" भावाला एकट्याला सोडुन पाणी पुरी खातीयेस काय?".

    संकटाची संभावणा पाहुन तिथली बाकीचे मुले चालते झाले.. आपल्यावरच संकट टळलेल पाहुन मुलीन मोकळा श्वास घेतला..
    .
    न राहुन तिने त्या युवकाला विचारल.. "माफ करा माझ नाव अंजली नाही पुर्वा आहे".

    तो युवक हसत बोलला "काय फरक पडतो.. तु आहेस तर कुणाची तरी बहिणच ना"?.

    आणी तो युवक आपल्या डोक्यावर हेल्मेट चढवुन तेथुन निघुन गेला...

    त्या पाठमोर्या जाणार्या युवकाकडे पाहुन त्या मुलिची मान आभिमानाने उंचावली....

    कारण त्याच्या टी शर्टावर लिहिले होते..........

    Indian army

    -- अनुजा

  • शुभारंभ

    नमस्कार

    मी आयडीबीआय बॅंकेच्या सेवेतून जुन २०१७ मधे निवृत्त झालो आहे. मी मुख्यतः काव्यलेखन करतो. काही वैचारिक लेखन केले आहे.ते मी आपणाबरोबर शेअर करीन. या साईटवर लेखनाची सुरुवात आमची कुलदेवता श्री. मोहीनीराज याचे मी रचलेल्या आरतीने कैलेली आहे.

    कृपया वाचकांनी अभिप्राय व पाठींबा देऊन माझे सारख्या नवोदित साहित्यिकांना ऊर्जा द्यावी ही विनंती.

    सुरेश काळे

    सातारा

  • उब आणि होरपळ

    आपण एका जागी स्थिर उभे असतो. आपला श्वासोच्छ्वास सोडला तर आपली कोणतीही हालचाल होत नसते. अशा वेळी एखादा फुटबॉल आपल्यावर येऊन आदळला, तर काय होईल?

  • ५ नोव्हेंबर : मराठी रंगभूमी दिन

    मराठी रंगभूमी खर्‍या अर्थाने इ.स.१८४३ मध्ये सांगली येथे उदयास आली. सांगली येथील संस्थानिक चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांच्या आश्रयामुळे कै. विष्णुदास भावे ह्यांनी दि ५ नोव्हे.१८४३ साली सांगली येथे " सीता स्वयंवर " ह्या नाटकाचा प्रयोग केला आणि मराठी रंगभूमीचा पाया रचिला.. मराठीतील हे पहिले गद्य पद्यमिश्रित नाटक जन्मास आले.

    नृत्य, गायन, अभिनय, देव, गंधर्व, अप्सरा, ऋषी, विदूषक इ.नी युक्त अशी ही पौराणिक नाटके सर्वसामान्यांची करमणूक करू लागली. मराठी संगीत नाटकांनी तर मराठी माणसाच्या हृदयात कायमचे स्थान निर्माण केले..

    साधारणपणे एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावधीस सुरु झालेली मराठी नाट्यपरंपरा तेव्हापेक्षा कितीतरी पटीने अधिक जोशात जोपासली जात आहे. दररोज नवनवीन नाटके रंगभूमीवर येत आहेत, यापुढेही येत राहतील. आजपर्यंत अनेक नाटके मराठी रंगभूमीवर आली. पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, निव्वळ करमणूकप्रधान, रहस्यमय असे वेगवेगळे विषय आणि प्रकार मराठी रंगभूमीने हाताळले.

    १७० वर्षाची ही रंगभूमीची परंपरा..आजही २१ व्या शतकातल्या गतिमान युगात, जोपासली जात आहे. ह्या १७० वर्षातील सर्व ज्ञात, अज्ञात कलावंत, तंत्रज्ञ आणि सहायक ज्यांनी ही परंपरा अखंड चालू ठेवली आणि मराठी रसिकांच्या मनात रुजवली त्या सर्वांचं अभिनंदन !

    मराठी रंगभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

    WhatsApp वरील संजीव वेलणकर यांच्या संगीत संगीत आणि फक्त संगीत या ग्रुप वर आलेला लेख साभार प्रकाशित.

  • पारंपारिक उद्योगाची कल्पक भरारी

    माणसाकडे कोणतेही कार्य करण्यासाठी दुर्दम्य इच्छाशक्ती, चिकाटी, कोणत्याही परिस्थितीमध्ये मेहनत करण्याची तयारी असेल तर असाधारण आणि कठीण काम सुध्दा सोप्पी वाटू लागतात.खादी उद्योगाला नव्या शिखरावर नेऊन त्या उद्योगात सुरुवातीलाच भव्य यश मिळून देण्याची किमया वर्धा जिल्ह्यातील बळवंत ढगे या तरुणाने साधली आहे.

  • एक तरी ओवी अनुभवावी: ज्ञानेश्वरी वाचन

    ज्ञानेशांचा मागोवा तसा अनेक वर्षे घेत होतो. आसपासच्या माणसांच्या वागण्याचा अर्थ लावता लावता बासनात गुंडाळलेले ज्ञानेश कधी जीविचा जीव झाले कळलेच नाही. पण हे सहज घडले नाही. अनेक मोठे मोठे धोंडे या गुरुवतीच्या ग्रंथात व माझ्यामध्ये अनेक वर्षे थटून राहिले होते. 

  • खोट्या जामिनाला बसेल आळा ?

    आपल्याकडे कायद्यानेही आरोपींना जामिनाचा अधिकार मान्य केला. परंतु, आरोपींकडून जामिनासाठी गैरमार्गांचा अवलंब केला जातो. पैसे घेऊन कोणालाही जामीन राहणार्‍या टोळ्या कार्यरत आहेत. अशा प्रकारांना पायबंद घालण्यासाठी जामीनाबाबतच्या विशेष अटी शिथिल करता येणार आहेत. मात्र, असा उपाय योजूनही खोट्या जामिनाची प्रकरणे होणारच नाहीत याची खात्री देणे अवघड आहे.

  • ऋण मातीचे (अनिल शिंदे)