(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • कोकण विंशेष

    रतनागिरी कोकणचा एक चानगला शहर आहे.

    तरी सुददा बरेचशे लोग बेरोजगार आहेत.

  • आधारची परवड……!!!

    आधार कार्ड मुळे येणार्‍या अडचणी, थोडक्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न येथे केलेला आहे.

  • धारावीचा काळा किल्ला

    धारावी मधे किल्ला आहे याचे अनेकांना आश्चर्य वाटते. कारण धारावीची प्रसिद्धी इतर कारणांनी अगदी जगप्रसिद्ध झालेली आहे. धारावीच्या या लहानशा किल्ल्याला काळा किल्ला म्हणतात. स्थानिक लोकांमधे तो काळा किल्ला अथवा ब्लॅक फोर्ट म्हणूनच प्रसिद्ध आहे.

  • बेवड्याची डायरी ! – भाग १

    समोरच्या खुर्चीत ऐक प्रसन्न चेहऱ्याचा माणूस बसला होता , म्हणजे हे महाशय मला समजावणार तर ? …मी मनातल्या मनात हसलो ..या पूर्वी मला समजवायला आलेल्या अनेक लोकांना मी माझ्या युक्तिवादाने उडवून लावले होते .

  • कोटी कोटी देती ……..

      

  • एक विदारक अनुभव

    आपल्याकडे एक समज आहे आणि त्याच बरोबर आकर्षण देखील आहे - गोऱ्या लोकांच्या समाजाबद्दल. समज असा आहे, "हे लोक किती श्रीमंत असतात आणि किती सुंदर आयुष्य व्यतीत करतात"!! यामधील, दुसरा भाग बरोबर आहे पण पहिला निश्चितच नाही. आयुष्य कसे उपभोगावे, याचा एक सुंदर वस्तुपाठ मला, माझ्या साउथ आफ्रिकेच्या १७ वर्षांच्या वास्तव्यात भरपूर मिळाला. अर्थात, मला भेटलेले सगळेच गोरे काही श्रीमंत म्हणावेत असे नव्हते परंतु वागण्या-बोलण्यात त्यांच्या अशी काही "ऐट" असायची की आपण त्यांच्याकडून काही शिकावे आणि मी भरपूर शिकलो देखील. अर्थात, मानवी स्वभाव हा कितीही वेगवेगळा भासला तरी अखेर भावनांचे पदर हे बरेचवेळा एकपदरी(च) असतात.

    २००६ मध्ये, मला रस्टनबर्ग इथे नोकरी मिळाली आणि मी पीटरमेरीत्झबर्ग सोडले. रस्टनबर्ग हे तसे छोटेसे गाव किंवा तालुका म्हणावा इतकाच भौगोलिक विस्तार. इथूनच पुढे ४० किलोमीटरवर जगप्रसिद्ध "सन सिटी" आहे. इथे मी, Accounts विभागाचा प्रमुख म्हणून नेमणूक झाली आणि माझ्या डिपार्टमेंट एकूण, ५ माणसे होती आणि त्यातील दोन गोऱ्या मुली होत्या. आत्तापर्यंत, माझा गोऱ्या मुलींशी थेट काम करायचा कधी फारसा दीर्घकालीन संबंध आला नव्हता पण आता मात्र रोजच्या रोज येणार, ही मनाशी खूणगाठ बांधली. एकीचे नाव, "लेनी" आणि दुसरीचे नाव "लिंडा". बाकीची मंडळी या कंपनीत काही वर्षे काम करत असल्याने, "वर्क कल्चर" बाबत मी थोडा अनभिज्ञ!! तरीही, पहिल्याच दिवशी लेनी माझ्या केबिनमध्ये आली आणि पुढील एका तासात, कंपनीची सगळी इत्थंभूत माहिती दिली. मला देखील फार बरे वाटले.

    लेनीने मला पहिल्याच दिवशी स्पष्ट केले, तिला स्मोकिंग फार आवडते - अगदी दिवसाला कमीतकमी ६ सिगारेट्स ओढते आणि तशी मला अधून मधून "विश्रांती" घ्यावी लागेल. आता अशी सुरवात झाल्यावर, मला देखील खवचटपणा करायचा "मूड" आला मी लगेच बोललो, "As long as, there's no drugs smoking, I don't mind"!! ती देखील थोडी चमकली पण माझ्या चेहऱ्यावरील स्मिताने तिला अधिक मोकळेपणा वाटला. वय, वर्ष २० - उंच, सडपातळ बांधा, वाचायला चष्मा, केस पिंगट सोनेरी आणि मनाने थोडी फटकळ पण मोकळी!! कामाला वाघ म्हणजे, ऑफिसमध्ये क्वचित कधी तिच्या मित्राचा फोन तिने घेतल्याचे, मला आठवत आहे. अन्यथा ऑफिसवेळेत, शक्यतो फक्त काम!! अर्थात, कधी कधी ऑफिसवेळेनंतर काम करणे जरुरीचे असायचे आणि त्यावेळेस मात्र, आमचे बोलणे अधिक मोकळेपणी व्हायचे.

    त्यातून समजलेली माहिती - सध्या तिचे तिसऱ्या बॉयफ्रेंड बरोबर "सूत" जुळलेले आहे आणि त्यानिमित्ताने, पहिल्या, दोन मित्रांशी संबंध का तुटले, याची माहिती देखील समजली. गावात आई, वडील असून देखील, जिद्दीने एकट्याने राहण्याचा निर्णय घेतलेला आणि त्यामुळे,जगताना होणारी धावपळ, हे सगळे आता मला रोजच्या रोज दिसत होते. मी जिथे रहात होतो, तिथून तिचे घर, फक्त २ मिनिटांवर (चालत) होते, त्यामुळे कधीकधी शनिवार संध्याकाळ किंवा रविवार संध्याकाळ, आम्ही एकत्र गप्पा मारीत घालवीत होतो. मी एकटाच रहात असल्याने, तिनेच मला, माझे (तात्पुरते) घर वसवायला बरीच मदत केली. मी जरी स्मोकिंग करीत नसलो तरी ड्रिंक्स मात्र बरेचवेळा एकत्रितपणे घेत होतो. तिचा "जेम्स" या बॉयफ्रेंडबरोबर देखील मी बरेचवेळा एकत्र गप्पा मारीत असायचो. मला तर त्यावेळी, जेम्स तिच्या लायकीचा वाटला होता आणि पुढे जशी ओळख अधिक पक्की झाली तशी, (माझ्या टिपिकल मध्यमवर्गीय) स्वभावानुसार लेनीकडे, तिच्या लग्नाविषयी एकदा विषय काढला होता. पहिल्यांदा ती हसली आणि मला म्हणाली, "Anil, I don't want to get engaged with marriage so early. I want to enjoy life in full". कितीही झाले तरी मी परदेशी, केवळ एकाच कंपनीत काम करण्याच्या निमित्ताने संबंध जुळलेले. तेंव्हा मेच माझ्या मनावर बांध ठेवला.

    अर्थात, तिची मैत्रीण. लिंडाकडून, लेनीच्या काहीशा स्वच्छंदी विचाराबद्दल बरीच माहिती समजली. एकदा, एके शनिवारी, तिच्याकडे मी याबद्दल बोलायला सुरवात केली. वास्तविक, गोऱ्या मुली आणि मुले देखील वागायला अगदी मोकळे पण, शक्यतो वैय्यक्तिक स्तरावर परकेपण दाखवणारे!! जसा मी थोड्या मोकळेपणी बोलायला लागलो तशी लेनीच्या स्वभावाचे "अस्तर" उलगडायला लागले. सध्या अस्तित्वात असलेली ही तिची तिसरी आई, मूळ आईने नुकतेच तिसरे लग्न करून वयाच्या साठाव्या वर्षी नव्याने संसार थाटलेला. अर्थात, इथे सगळे संपत नाही. लेनीला वयाच्या १४व्या वर्षी ड्रग्जचे व्यसन लागलेले, त्यावरून घरात रोजची भांडणे आणि त्यातूनच स्वत:ने वेगळे व्हायचा निर्णय आणि त्याच एकटेपणाचे सुख आणि वैषम्य,दोन्ही भावनांचा सततचा आढळ, यामुळे आयुष्यात कमालीची अस्थिरता. साउथ आफ्रिकेत राहायचे म्हणजे, तसे सोपे अजिबात नाही, अत्यंत अवघड कसरत असते आणि याचे कारण, तिथल्या समाजाची ठेवण आणि त्या ठेवणीला बळी पडलेली अशी नवीन पिढी!!

    याचा परिणाम असा झाला, आत्तापर्यंत तिने २ वेळा (अर्थात, पहिल्या दोन बॉयफ्रेंडपासून) गर्भपात पण याचा परिणाम असा झाला, सेक्स विषयात बद्दल फारशी "आसक्ती"च उरली नाही आणि त्याचा उफराटा परिणाम नक्कीच होणार आणि त्यामुळे मनाची होणारी तगमग!!

    आज, मी रस्टनबर्ग सोडून जवळपास ७ वर्षे झाली पण आजही माझी तिच्याशी ओळख आहे, फेसबुकवरून संपर्क चालू आहे. तिनेच दोन वर्षांपूर्वी सांगितले, तिने तिसरा बॉयफ्रेंडशी असलले संबंध तोडून टाकले!! त्याची कारणे अनेक लिहिली आणि ती, तिच्या मते योग्य(च) होती आणि आजही ती त्याच गावात एकटीच रहात आहे - घर तरी केव्हढे मोठे? एक बेडरूम, एक लाउंज आणि न्हाणीघर इतकेच!! आता, तिने नवीन नोकरी शोधली आणि अर्थात आर्थिक पूर्वीपेक्षा चांगली आहे. या सगळ्याचा परिणाम असा झाला, तिने लग्न न करण्याचा निर्णय. एकदा तिनेच मला सांगितले होते, "Anil, I spoiled my life and my body too"!! हे वाचताना, मीच थक्क!! पण, इथे अशा अनेक मुली साउथ आफ्रिकेत आजही आहेत आणि त्यांच्या आयुष्याशी वंचना अशीच चालू आहे आणि त्याबरोबर आयुष्याची फरफट!!

    - अनिल गोविलकर

  • रिटायरमेंट – हिसाब अपना अपना

    मागच्या म्हणजे २०२३च्या ऑक्टोबर महिन्यात हेमामालिनी ७५ वर्षांची झाली… फिल्म इंडस्ट्रीत अतिशय यशस्वी कारकीर्द – नुसतीच यशस्वी नव्हे तर हिंदी सिनेसृष्टीचा इतिहास लिहिताना ह्या ” ड्रीमगर्ल ” चा उल्लेख सिनेमा जगताला पडलेलं एक सुंदर स्वप्न असा करावाच लागेल… दोनेक पिढ्यांना आपल्या सौंदर्याने भुरळ घालणारी अफाट लोकप्रियता मिळवलेली ही अभिनेत्री… गेली दोन दशकं देशाच्या लोकसभेत, राज्यसभेत ही खासदार म्हणून उपस्थिती…

  • टर्की.. संताप ! (नशायात्रा – भाग ३०)

    तर आम्ही एकूण चार पाच जणांनी पहाटे बसने जाण्याऐवजी आदल्या दिवशी रात्रीच सटाण्याला जायचे ठरवले होते व त्यानुसार आम्ही तयारी करून गांजा , ब्राऊन शुगर असा पैसे असतील तेव्हढा साठा सोबत घेऊन नाशिक ला सी .बी .एस च्या स्थानकावर जमलो होतो..

  • मुंबई ते कल्याण रेल्वेप्रवासाची नांदी

    १८५४ मध्ये मुंबईजवळचा पारसिकचा डोंगर फोडून त्यातून बोगदा खोदून रेल्वे चालवण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. नवीन लोहमार्ग टाकून झाल्यानंतर या लोहमार्गाची चाचणी करुन घेण्यासाठी १ मे १८५४ रोजी मुंबईचा गर्व्हनर लॉर्ड एलफिन्सटन याने २५० प्रतिष्ठित नागरिकांसमवेत आगगाडीतून कल्याणचा दौरा केला.

    त्यापूर्वी जेमतेम एक वर्षाआधी भारतातीलच नाही तर आशिया खंडातील पहिली रेल्वे १६ एप्रिल १८५३ ला मुंबई - ठाणे दरम्यान सुरु झाली. या दिवसाला भारताच्या इतिहासात मोठे महत्त्व आले. मात्र त्यानंतर केवळ एकाच वर्षात ब्रिटिशांनी आणखी एक आविष्कार दाखवून ही रेल्वे थेट कल्याणपर्यंत नेली आणि तीसुद्धा पारसिकचा डोंगर खोदून.. आणि भव्य बोगद्यातून रेल्वेमार्ग टाकून. १ मे १८५४ हा दिवस कल्याण-डोंबिवलीकरांसाठी खरा सोन्याचा ठरला आणि त्यासाठी त्यांनी ब्रिटिशांचे मनोमन आभार मानायला हवेत. का, ते समजण्यासाठी पुढे आणि शेवटपर्यंत वाचा.....

    १८३० मध्ये जगातील पहिली रेल्वे सुरु झाली. त्यानंतर केवळ चौदा वर्षात भारतात रेल्वे आली. इंग्लडमध्ये बनवलेल्या लॉर्ड फॉकलंड इंजिनने भारतातील पहिली रेल्वे खेचली. त्याच्या दिमतीला सिंध, सुलतान आणि साहिब या नावांची तीन इंजिने होती.

    दुपारी साडेतीन वाजता ही गाडी मुंबईतील ५०० प्रतिष्ठीत नागरिकांसह पहिल्या प्रवासाला निघाली. तोफांची सलामी, बॅंडपथक हे तर तयार होतेच. बोरीबंदर ते ठाणे असा प्रवास ५७ मिनीटात झाला. ठाण्याला उपस्थितांना मेजवानी दिल्यानंतर ठाणे बोरिबंदर प्रवास ४० मिनीटे करण्यात आला आणि १८ मे १८५३ (सोमवार) पासून आगगाडी आम जनतेच्या प्रवासासाठी सुरु झाली.

    यानंतरच्या काळातही लोहमार्ग ठाण्याच्या पुढे टाकण्याचे काम सुरु होते. मुंबईजवळच्या पारसिकच्या डोंगरातून बोगदा खोदून त्यातून रेल्वे चालवण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. नवीन लोहमार्ग टाकून झाल्यानंतर या लोहमार्गाची चाचणी करुन घेण्यासाठी १ मे १८५४ रोजी मुंबईचा गर्व्हनर लॉर्ड एलफिन्सटन याने २५० प्रतिष्ठित नागरिकांसमवेत आगगाडीतून कल्याणचा दौरा केला. या मंडळीत स्त्रियादेखील होत्या. या वाफेच्या इंजिनाला प्रथम वर्गाचे सात व दुसर्‍या वर्गाचा एक डबा जोडण्यात आलेला होता. गाडीला खानपानाचाही एक डबा जोडण्यात आला होता. सायंकाळी ४ वाजून ५० मिनीटांनी बोरीबंदर स्थानकावरुन सुटलेली ही गाडी १ तास १० मिनीटांचा प्रवास करुन सायंकाळी ६ वाजता कल्याणला पोहोचली. कल्याण स्टेशनपर्यंत ही गाडी नेण्यात आली नाही तर स्टेशनच्या आधी खाडीकिनार्‍यालगत गाडी थांबवण्यात आली. येथेच सैनिकी बॅन्डपथकाने बॅन्डची सलामी दिली. मेजवानी देखील येथेच देण्यात आली. कल्याणपर्यंत रेल्वे धावली या आनंदाप्रित्यर्थ फटाक्यांची आतषबाजी देखील करण्यात आली. तीन तासाच्या मनोरंजनानंतर जेवण झाल्यानंतर रात्री नऊ वाजता परतीच्या प्रवासाला निघालेली गाडी रात्री अकरा वाजता बोरीबंदरला परत पोहोचली.

    त्यावेळी डोंबिवली, कळवा, मुंब्रा ही स्टेशने नव्हती. हाच लोहमार्ग मग पुढे पुण्यापर्यंत वाढवण्यात आला. पुढे कल्याण हे या मार्गावरील जंक्शन स्थानक बनले. रेल्वेस्थानक, कार्यालय आणि कर्मचारी निवासस्थाने उभारण्यासाठी लागणारा दगड या परिसरात मुबलक प्रमाणात उपलब्ध होता. त्यामुळे या उभारणीचा खर्च आणि वेळ वाचणार होता. मात्र, त्याच वेळी तत्कालीन कल्याण पालिकेने रेल्वेला पाणीपुरवठा करण्यास नकार दिला. त्या वेळी कल्याणला काळा तलावातून पाणीपुरवठा होत होता. पाणी मिळणार नाही म्हटल्यावर रेल्वेची पंचाईत झाली. त्यामुळे ग्रेट इंडियन पेनन्सुला कंपनीने अंबरनाथला जंक्शन करण्याचा विचार सुरू केला. परंतु अंबरनाथ परिसरात बांधकामासाठीचा दगड उपलब्ध नव्हता. अखेर अंबरनाथजवळील काकोळे तलावावर धरण बांधून तेथून पाणी कल्याण स्थानकापर्यंत आणण्यात आले. पुढे कल्याण हे जंक्शन बनले. भारताच्या कानाकोपऱ्यातून मुंबईकडे ये-जा करणाऱ्या बहुतांश गाडय़ा कल्याण स्थानकातून जातात. रात्रंदिवस प्रवाशांची प्रचंड गर्दी कल्याण स्थानकावर असते.

    आता दुर्दैवाचा भाग बघा. १६० वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी भविष्याचा विचार करुन ज्या काही सुविधा आणि सुखसोयी आपल्यासाठी निर्माण केल्या त्यांचा लाभ आपण अजूनही घेत आहोत. पारसिकच्या त्याच बोगद्यातून लाखो प्रवासी दररोज प्रवास करत आहेत. ठाण्याच्या खाडीवरचा तोच जुना पुल अजूनही रेल्वेसाठी वापरला जातोय.

    मात्र आपल्याच लोकांनी बांधलेले एक्स्पेस-वे, मुंब्रा बायपास, कल्याण-शीळ रस्ता यासारखे रस्ते खड्डेमुक्त होण्याऐवजी दर पावसाळ्यात खड्डेयुक्त होत आहेत. ठाणे कल्याण दरम्यान अजूनही थेट रेल्वेमार्गाला समांतर रस्ता होत नाही. १६० वर्षांपूर्वी ब्रिटिशांना पारसिकचा बोगदा खणण्यासाठी जे तंत्रज्ञान उपलब्ध होतं त्यापेक्षा कितीतरी पटींनी श्रेष्ठ तंत्रज्ञान आज उपलब्ध आहे. मग १०-१५ किलोमिटरचा एक रस्ता आम्हाला बनवता येत नाही की त्यात हितसंबंध गुंतलेले आहेत? वरळी सी-लिंक सारखा मोठा पूल जर ४-५ वर्षात बनू शकतो तर मग ठाणे कल्याण रेल्वेला समांतर रस्ता का होत नाही?

    निदान या रेल्वेसाठीतरी खरोखरच कल्याण-डोंबिवलीकरांनी ब्रिटिशांचे आभार मानले पाहिजेत. पारसिकचा डोंगर फोडून त्यातून बोगदा बांधून रेल्वे सुरु झाली नसती तर कदाचित स्वतंत्र भारतात अजूनही हे काम कोणत्या कॉन्ट्रक्टरला द्यायचं, कोणाचे किती टक्के, टोल किती घ्यायचा यातच गुरफटून राहिलं असतं !

    -- निनाद प्रधान

  • श्री घृष्णेश्वर

    हे १२ वे लिंग असून याच्या दर्शनाशिवाय १२ ज्योतिर्लिंगाची यात्रा पूर्णच होत नाही. औरंगाबाद जिल्ह्यात वेरुळ या ठिकाणी हे पवित्र लिंग आहे.