
आपलं स्वतःच व्यक्तिमत्व पूर्णपणे झाकोळून टाकून दुसऱ्याची सावली बनून जगणे, म्हणजे आजच्या स्त्रीमुक्तीच्या भाषेत स्वतःचे अस्तित्व नाकारणे. असेच आयुष्य जगल्या यमुनाबाई सावरकर अर्थात माई.
नाशिक जवळील त्र्यंबकेश्वर येथे चिपळूणकर घरात यशोदाबाईंचा जन्म झाला ४ डिसेंम्बर १८८८ साली. घरची सधन परिस्थिती आणि घरातली थोरली कन्या यशोदाबाई सगळ्यांच्या जिजी झाल्या. जेमतेम ४ थी शिकलेल्या जिजी १९०१ साली सावरकर घरात विनायकराव तथा तात्या सावरकरांच्या पत्नी म्हणून आल्या आणि सावरकरांची सावली बनल्या.
घरात थोरल्या जाऊबाई म्हणजे येसू वहिनींना मदत करू लागल्या ती फक्त स्वयंपकात किव्हा घर कामातच नाही तर आत्मनिष्ठ युवीत संघाच्या कामात सुद्धा. एकअर्थी त्यांचीही सावलीच बनल्या. कवी गोविंदांच्या कविता, सावरकरांच्या कविता पाठांतर करून घेणे, केसरीतील लेखांचे सामूहिक वाचन करून घेणे, स्वदेशी चा प्रचार, प्रसार करणे इत्यादी सगळ्या गोष्टी अगदी सहज करू लागल्या. सावरकर लंडनला गेले त्यावेळी त्यांच्या स्त्रीसुलभ मनात नक्कीच आले असणार, आता ४ वर्षांनंतर घराची परिस्थिती बदलेल, पण सावरकरांना अटक झाली आणि दोन काळया पाण्याच्या शिक्षा म्हणजे ५० वर्ष सक्त मजुरी भोगाव्या लागल्या. काळ्या पाण्याच्या शिक्षेला जाण्या आधी, त्यांची भेट झाली तेव्हा सावरकर म्हणाले, 'माई, आपल्याला संसार चिमणी कावळ्या सारखा नाही करायचा, फक्त काटक्या गोळा करून घरटी बांधणे, वगरे, संसाराचे ध्येय मोठे असावे, आपल्या मुळे इतरांचे संसार उभे राहायला मदत झाली पाहिजे. ' अश्या विचारांची शिदोरी घेऊन माई घरी परतल्या आणि घरकामा बरोबरच समाज जागृतीचे व्रत अव्याहतपणे सुरू ठेवले.
पती वियोग, पुत्र शोक, घरावर जप्ती कुठलीच परिस्थिती त्यांना त्यांच्या ध्येयापासून दूर करू शकली नाही. सावरकर रत्नागिरीत नजरकैदेत होते, तेव्हा माई त्यांच्या सतत अवतीभवती राहत. त्यांना काय हवे नको ते बघत आणि ह्याशिवाय सामाजिक कामात पण सावरकरांच्या सल्ल्याने काम करत, मग ते सामूहिक हळदी-कुंकू किव्हा सामूहिक जेवण ज्यात त्या काळातल्या अस्पृश्य स्त्रियांनासुद्धा निमंत्रण असे. ह्या स्त्रियांची ओटी भरणे, त्यांच्याबरोबर जेवायला बसणे, हे सगळं त्या आनंदाने करत. घरात देवपूजा करणाऱ्या माई घराबाहेर देशपूजा, समाजातील बुरसटलेल्या रूढींना छेद देणे अशी कामेही अगदी त्याच श्रद्धेने, तन्मयतेने करत. गांधी वधा नंतर झालेल्या हिंदू महासभेला सावरकर आणि माई दोघांनाही आमंत्रण होते, पण तेव्हाची सामाजिक, राजकीय परिस्थिती बघता सावरकर जाऊ शकले नाही, त्याला माई गेल्या. त्यांचे त्यावेळचे भाषण अतिशय छान झाले, स्वतःला वाळलेल्या फुलांची उपमा देऊन त्यांनी समाजाचा गौरव केला की त्यांचे जीवन हे देशाच्या चरणी वाहिलेले एक वाळलेले फुल आहे. अश्या माई, १९६३ साली दीर्घ दुखण्यातून उठू शकल्या नाहीत.
अहेव मरण हे प्रत्येक भारतीय स्त्रीने देवाकडे मागितलेला वर असतो. माईंचे आयुष्याकडे मागणं फक्त एकच होतं, देशसेवेचे अव्याहत व्रत घेतलेल्या आपल्या परिवाराची काळजी. स्वतः परिश्रमी, धाडसी, कणखर असलेल्या माई सावरकरांची सावली म्हणूनच जगल्या पण आपल्या कामाचा ठसा सगळ्या जगासमोर उमटवून गेल्या. त्यांना ही माझी शब्दसुमनांजली.
|| वंदे मातरम् ||
-- सोनाली तेलंग.
संदर्भ :
http://xn--e4b.historyunderyourfeet.wordpress.com/
२. savarkar.org
३. त्या तिघी : शुभा साठे
४. स्त्रीशक्ती आणि स्वातंत्र्यलढा : डॉ अर्चना चव्हाण, स्मिता कुलकर्णी, भारतीय विचार साधना पुणे
July 2, 2022
December 16, 2022
थोरो म्हणतो त्याप्रमाणे तत्त्वज्ञानी होणे म्हणजे सूक्ष्म विचार जवळ असणे नव्हे किंवा एखादा पंथ किंवा संप्रदाय स्थापणे नव्हे! तर ज्ञानावर अपार प्रेम करणे व तद्नुरूप वागणे. साधे, स्वतंत्र उदार श्रद्धेचे जीवन जगणे होय. बेकन म्हणतो, प्रथम मनाच्या मंगल गोष्टी शोधा. त्या मिळवल्या म्हणजे उरलेसुरले आपोआपच मिळेल किंवा ते मिळाले नाही तरी त्याची खंत राहणार नाही. सत्य आपणास श्रीमंत करणार नाही; परंतु मुक्त मात्र करील. परंतु, कवी किट्सचे म्हणणे मात्र वेगळे आहे. सौंदर्यच सत्य आणि सत्यच सुंदर आहे. जीवनाचे रहस्यमय सौंदर्य नष्ट करण्याचे काम तत्त्वज्ञान करते. जीवनात सौंदर्य कशात आहे, तर त्याच्या रहस्यमयतेत आहे. म्हणून तर रामायण, महाभारत, होमरचे इलियड यांतील सौंदर्य कमी झाले नाही. शेक्सपियरने तर सर्व जगाला कवेत घेतले. पलीकडल्या झाडीत जो पक्ष्यांचा जीवनोत्सव चालला आहे, त्यात मला भाग घेता येत नाही, म्हणून मी कितीतरी वेळा अस्वस्थ झालो आहे. याला सुखवाद म्हणावे, कष्टवाद
July 9, 2011
चित्रकार असो , लेखक असो . कवी असो ज्याचे त्याचे स्वतःचे असे विश्व् असते. तो त्यात रमतो तर काहीजण अत्यंत चातुर्याने आपला कार्यभागही साधू शकतात. अशी अनेक प्रकारची व्यक्तिमत्वे आजूबाजूला बघावयास मिळतात. चित्रकार किंवा चित्र काढणे आणि त्याचा अभ्यास करणे या गोष्टीना आपल्या मध्यमवर्गात कधीच सहजपणे थारा मिळत नाही.
October 9, 2023
आडवी तिडवी वाट -- वाकडेवाडी
धनवान रस्ता -- लक्ष्मी रस्ता
आजोबांची पेठ -- नाना पेठ
थंड हवेचे ठिकाण -- सिमला आॅफीस
आदर्श वसाहत -- माॅडेल काॅलनी
एकमेकांना मदत करणारा गाव -- सहकार नगर
उग्र देवतेचा कट्टा -- शनिपार
देवांचे पाघरुण -- पासोड्या विठोबा
एक फल देणारा दरवाजा -- पेरुगेट
बेवडा ब्रीज -- दारुवाला पूल
दगडाचा देव -- पाषाण
अरण्यात रहाणार्या देवाचे नाव -- अरणेश्वर
थकल्या भागल्यांची वाडी -- विश्रांतवाडी
पाव दरवाजा -- क्वार्टर गेट
सुखी लोकांचे गाव -- सुखसागरनगर
October 31, 2017
September 27, 2011
पेण येथे ‘चिमण्या गणपती’चे मंदिर आहे. पेण-खोपोली रस्त्यावर भव्य मंदिर असून आळीकरांनी वर्गणी गोळा करून ते बांधले आहे.
October 2, 2012
कोकणी माणूस दणक्यात होळी साजरा करून सुखावलेला असतो. चैत्राचे आगमन होते. चैत्रपालवी झाडांवर फुलू लागलेली असते.चैत्र संपून वैशाख सुरु होतो. कोकणाला उन्हाचे चटके जाणवू लागलेले असतात. मातीचा लाल रंग उठून दिसू लागतो.माती लाल,रस्ते लाल,पाणदी लाल, चिर्याची घरे लाल, कौले सुद्धा लाल,झाडांची पाने आपला मुळचा रंग दडवून लाल झालेली असतात.
July 25, 2022
भगवद् गीता या, सुमारे 5 हजार वर्षांपूर्वी सांगितल्या/लिहिल्या गेलेल्या महान ग्रंथावर आतापर्यंत हजारो विद्वानांनी भाष्य केलं आहे आणि अजूनही अनेक विद्वानांना निराळ्या दृष्टीकोनातून भाष्य करावसं वाटतं आहे. गीतेच्या 18 अध्यायात वेदोपनिषदांचं तत्वज्ञान सामावलेलं आहे. गीता म्हणजे अुपनिषदांचं सार आहे असं मानलं जातं.
गीता लिहून सुमारे 5 हजार वर्षांचा काळ अुलटला आहे. या काळात, विशेषत: पंधराव्या-सोळाव्या शतकांपासून मानवानं विज्ञानात खूपच प्रगती केली आहे. पुराव्यासहीत, अनेक अध्यात्मिक संकल्पनांचं स्पष्टीकरण विज्ञानानं दिलं आहे. पृथ्वीवरील सजीवांची अुत्क्रांती, गेल्या 3.8 ते 3.5 अब्ज वर्षापासून होते आहे. सजीवांच्या अुत्क्रांतीचा शेवटचा टप्पा म्हणजे, या पृथ्वीवर मानवाचं अवतरण. सुमारे 8 लाख वर्षांपूर्वी, बिनशेपटीच्या, दोन पायावर चालणार्या माकडांच्या प्रजातीत (होमो अिरेक्टस) अुत्क्रांती होअून आदीमानव अुदयास आला (होमो सॅपिअेन, सुमारे 70 हजार वर्षांपूर्वी) असं शास्त्रज्ञांनी, अुत्खनात सापडलेल्या मानवी अवशेषाच्या आधारे सिध्द केलं आहे.
सुमारे 15 ते 10 हजार वर्षांपूर्वी, जेव्हा मानवाला शेती आणि पशुपालनाची विद्या/तंत्र अवगत झालं तेव्हा, समूह, समाज, आणि कुटुंबं निर्माण झाली. पोटभर आहाराची सोय झाली. त्यामुळे मानवाला सभोवतालच्या निसर्गाचं निरीक्षण करायला आणि त्यापासून बरंच काही शिकायला वेळ मिळाला. मेदूचा विकास झपाट्यानं होअून तो तार्किक दृष्ट्या विचार करू लागला.
पृथ्वीवरील निसर्ग आणि आकाशातील चंद्र, सूर्य आणि तारे वगैरे पाहून त्याच्या मेंदूत पहिला विचार आला तो हा, की या सर्व वास्तव घटकांना कुणीतरी निर्माण केलं असणार आणि तोच या सर्वाचं नियंत्रण करीत आहे. हीच अीश्वराची संकल्पना. दुसरं महत्वाचं निरीक्षण म्हणजे, सर्व सजीव, त्यांच्या अिच्छेनुसार हालचाल करू शकतात. म्हणजे त्यांच्या शरीरात कोणतीतरी शक्ती, प्रेरणा, चेतना असली पाहिजे. ती चेतना शरीरातून निघून गेली की ते शरीर अचेतन होतं, मरतं. ही चेतना म्हणजेच सजीवांच्या शरीरातील आत्मा.
अीश्वर आणि आत्मा या संकल्पनांतूनच अध्यात्म अुदयास आलं. या संकल्पना मानवाच्या मेंदूत, फार फार तर 15 ते 10 हजार वर्षांपूर्वी आल्या. पण त्यापूर्वी कोट्यवधी वर्षे, या पृथ्वीवर सजीवांचे सर्व व्यवहार सुरळीतपणे चालू होते.
पृथ्वीच्या आयुष्यकाळातील 5 हजार वर्षे म्हणजे नगण्य काळ आहे. या काळात मानवाची शारीरिक अुत्क्रांती फारशी झाली नाही. त्यामुळे आपले पूर्वज विचारवंत आणि रुशीमुनी यांनी जे अनुभव घेतले तेच आपण आजही घेअू शकतो. त्यांच्या अितकी किंवा त्यांच्याहून जास्त बुध्दीमान व्यक्ती आजही जन्म घेअू शकतात, नव्हे जन्मलेल्याही आहेत. आपली मुलंमुली जेव्हा आणि जशी वयात येतात तशीच त्यांचीही मुलंमुली वयात येत होती. आपण ज्या मार्गानं प्रजनन करतो त्या मार्गानंच त्यांनीही प्रजनन केलं. ज्या मार्गानं आपलं अन्नपचन होतं तसंच त्यांचंही अन्नपचन होत होतं. त्यांच्या शरीरात जे अवयव होते तेच अवयव आजही आपल्या शरीरात त्याच जागी आहेत.
पृथ्वीवर जेथे जेथे मानवसमूह भरभराटीला आले तेथे तेथे त्यांच्या संस्कृती अुदयाला आल्या. मानवसमूहाची प्रगती, पृथ्वीवर, निरनिराळ्या प्रदेशात निरनिराळ्या काळी झाली. प्रत्येक संस्कृतीत विचारवंत माणसं जन्मली आणि त्यांनी समाजाच्या भल्यासाठी धर्माचरणं सांगितली. त्या काळची माणसं आपल्यापेक्षा फारशी निराळी नव्हती. आपल्यासारखीच होती. त्या माणसांनीच धर्मग्रंथ लिहीले. जनमानसावर या धर्मग्रंथांचा प्रभाव पडावा म्हणून त्यांना देवत्व बहाल केलं, त्यातील मानवी व्यक्तींना दैवी गुण चिकटविले, अतिशयोक्तीपूर्ण घटनांचा समावेश केला वगैरे. या सर्वांवर, धर्मभीरू व्यक्तींचा आजही विश्वास आहे.
आता पुन्हा गीतेकडे वळू या. गीतेतील सर्वच अध्यायात तत्वज्ञान सामावलेलं आहे. तरीपण काही महत्वाच्या अध्यायांचा अुल्लेख करावासा वाटतो. सांख्ययोग म्हणजे गीतेचे सार, गीतेचा अर्क समजला जातो (अध्याय 2 ). कर्मयोग (अध्याय 3), ध्यानयोग, आत्मसंयम योग (अध्याय 4) विश्वरूप दर्शन योग (अध्याय 11) भक्तियोग, श्रीकृष्णाची प्रेममयी सेवा (अध्याय 12),, क्षेत्रक्षेत्रज्ञ विभाग योग अर्थात प्रकृती-पुरुष विवेकयोग (अध्यय 13) मोक्षसन्यास योग (अध्याय 18 ) वगैरे.
गीतेवर भाष्ये केलेल्या असामान्य व्यक्ती म्हणजे आद्य शंकराचार्य (ज्ञानमार्ग), ज्ञानेश्वर माअुली (भक्तिमार्ग) लोकमान्य टिळक (गीतारहस्य, कर्ममार्ग) या मानल्या पाहिजेत. त्यांनी केलेल्या भाष्यांमुळे, सामान्य माणसाला, गीतेचं खरेखुरं ज्ञान झालं. प्रा. सोनोपंत दांडेकर यांनी ज्ञानेश्वरीवर, म्हणजे पर्यायानं गीतेवर, भाष्य केलं आहे. ज्ञानेश्वर माअुलींची मराठी आपल्याला कळावी म्हणून प्रा. सोनोपंतांनी आधुनिक मराठीत भाष्य केलं आहे .हरिद्वारचे श्रीस्वामी रामसुखदासजी आणि आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघाचे भक्तीवेदांत स्वामी प्रभूपाद यांनीही रसाळ भाष्ये केली आहेत. ही सर्व भाष्ये अध्यात्माच्या दृष्टीकोनातून केली आहेत, विज्ञानाच्या दृष्टीकोनातून नव्हे.
गीतेचं तत्वज्ञान, आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास, असं आढळतं की, त्यात पुरेपूर विज्ञान सामावलेलं आहे. पण ते अध्यात्माच्या आवरणात झाकलं गेलं आहे. या आवरणाच्या आत डोकावलं तरच गीतेतील विज्ञान कळू शकेल. तोच प्रमाणिक प्रयत्न मी करणार आहे.
रुशीमुनी, महान तत्त्ववेत्ते आणि महान विचारवंत यांनी या विश्वाचं गूढ अुकलण्याचा आणि सत्य जाणून घेण्याचा, अध्यात्माच्या मार्गानं, प्रयत्न केला आहे. या मार्गानं जात असतांना, त्यांनी अनेक संकल्पना रूढ केल्या. अीश्वर, आत्मा, स्वर्ग, नरक, मोक्ष, सजीवांच्या जन्ममृत्युचे फेरे, पुनर्जन्म वगैरे वगैरे. या सर्व संकल्पना, अनुभूतीतून साकारल्या आणि त्या अमूर्त स्वरूपात आहेत. रुशीमुनींना विज्ञानाची जाणीव होती याचे अनेक पुरावे आहेत. पण ते ज्ञान, अध्यात्माच्या भाषेत सांगितल्यामुळे सामान्य माणसांना त्याची जाणीव झाली नाही असं मला वाटतं.
आता विज्ञानानं खूपच प्रगती केली आहे. विश्वाचं गूढ अुकलणं, सत्य जाणून घेणं, हाच विज्ञानाचाही अुद्देश आहे. अमूर्त स्वरूपात, विश्वाचा कोणताही घटक अस्तित्वात असू शकत नाही, अख्खं विश्वच मूर्त स्वरूपात असतं हा विज्ञानाचा पाया आहे. त्यामुळे विज्ञानानं काढलेले निष्कर्ष, योग्य परिस्थिती जुळून आल्यास, कोणाही व्यक्तीला, केंव्हाही, कोणत्याही स्थानावरून आणि कितीही वेळा पडताळून पाहता येतात.
या विश्वात कोणतीही घटना किंवा कोणताही परिणाम, कारणाशिवाय घडत नाही (कार्यकारणभाव) आणि या कारणामागं कोणत्यातरी प्रकारच्या अुर्जेचा सहभाग असतोच असतो. हे कारण किंवा हा अुर्जेचा प्रकार समजला नाही तर ती घटना किंवा तो परिणाम, चमत्कार समजला जातो. पण ते खरं नाही. विश्व हाच, या विश्वातील अेकमेव चमत्कार आहे.
विज्ञानाचा दुसरा भक्कम पाया म्हणजे, या विश्वाचे वास्तव नियम कोणतीही व्यक्ती मोडू शकत नाही किंवा त्या नियमांचं अुल्लंघन करू शकत नाही. गुरुत्वाकर्षण बल, वीजचुम्बकीय बल आणि दोन प्रकारची अणुगर्भीय बलं, या चार भौतिक मुलभूत बलांमुळेच, विश्वाचे सर्व व्यवहार चालतात. विश्वात असलेल्या विज्ञानाच्या मानानं, शास्त्रज्ञांनी मिळविलेलं ज्ञान नगण्य आहे, याचंही भान शास्त्रज्ञांना आहे.
गीतेत सांगितलेल्या संकल्पनांना, विज्ञानाच्या दृष्टीकोनातून काही स्पष्टीकरणं देता येतील असा माझा दृढ विश्वास आहे आणि तसं करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे.
'विज्ञानाच्या दृष्टीकोनातून भगवद् गीता' या लेखमालेचा हाच अुद्देश आहे.
-- गजानन वामनाचार्य
शनिवार 25 फेब्रुवारी 2017
शनिवारचा सत्संग : 14
February 25, 2017
उकड
May 25, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti