(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • एकदम कड़क विनोद

    बातम्या पहाव्यात म्हणून टीव्हीसमोर सोफ्यावर येऊन बसलो. चालू होतं 'जय मल्हार '
    .

    बाजूलाच आमची म्हाळसा,
    त्या म्हाळसेच्या दु:खात बुडालेली होती....
    .

    रिमोट मागावा तर भूकंप व्हायचा....
    .

    त्यापेक्षा पेपरमधल्या बातम्या वाचाव्यात
    असा विचार करून उठत होतो....
    .
    .

    तितक्यात मुलगा तिथे आला
    आणि शोधाशोध करू लागला...
    .

    मी विचारले...." काय शोधतोस ?
    काही हरवलं का....? "
    .
    .
    " काही नाही हरवलं हो,
    .
    .
    रिमोट शोधतोय.
    कुठे आहे...? "
    .

    मी बायकोकडे बोट दाखवले.
    .
    .
    .
    .

    तर कार्ट म्हणाल " तुमचा नाही हो.....
    टिव्हीचा पाहिजे ! "

      December 6, 2016


  • डोक्याला खुराक …डायरी रायटिंग ( बेवड्याची डायरी – भाग २१ वा )

    सरांनी डायरीत लिहायला सांगितलेल्या प्रश्नाचे उत्तर लिहायला बसलो ..मात्र सुरवातीला काहीच सुचेना ..कॉलेजनंतर सुमारे २० वर्षांनी काहीतरी लिहिण्यासाठी वही घेवून बसावे लागले होते इथे ..लिहिण्याची सवय मोडलेली होती ..तसेही मला लिहायचा कंटाळा होता

      April 15, 2020


  • लेकास नको पॉकेटमनी, हवा पगार..!

       मोरुच्या मम्मीसाठी हे नवलच होतं. ओबामा साहेब एकदाचे चिंताग्रस्त होऊ शकतात पण मोरुचे बाबा चिंताग्रस्त होऊच शकत नाही,अशी त्या माऊलीची ठाम समजूत होती.या समजुतीला असा तडा जात असल्याने त्यांचे ब्लड प्रेशर हाय आणि लोच्या अधेमधे हलू लागले.

      December 28, 2013


  • आई ती आईच – भाग तीन

    २००९ साली माझ्या फार्मवर पहिली गाय आणली गेली. नंदिनी तिचे नांव. खिलार जातीची , देखण्या लांब शिंगांची, शुभ्र पांढरी , उंच , निळ्या डोळ्यांची आणि फार डौलदार. फार्मची शान होती ती.

      February 22, 2024


  • ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून शासन व्यवस्था अधिक गतिमान करण्यावर भर – नितीन करीर

    माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर यांनी राज्य शासनाच्या महान्यूज या पोटर्लला दिलेली मुलाखत खास मराठीसृष्टीच्या वाचकांसाठी.

      September 19, 2010


  • मोबाईलचा डायबेटीस

    संक्रांतीच्या शुभेच्छा
    इतक्या वारेमाप झाल्या
    मोबाईलला माझ्या
    काळ्या मुंग्या लागल्या

    किती गोड किती गोड
    दुर दुरून बोलतात माणसं
    किती अगदी सहजपणे
    जवळून दूर जातात माणसं

    लांबचा वाटतो जवळचा
    जवळचा काय कायमचा
    कधीतरी येणाराच
    सण असतो महत्वाचा

    शुभेच्छा हव्यात कृतीत
    नको नुसत्या उक्तीत
    एकमेकांच्या असावं
    प्रेमळपणानं संगतीत

    मेसेज डिलीट करण्यातच
    अख्खी संक्रांत गेली
    मोबाईलची शु्गर लेवल
    मात्र भलतीच वाढली

      October 31, 2017


  • दिवस असा एकही जात नाही

    चुंबीलाय प्रत्येक शब्द तुमचा

    ऒठ प्रियेचे चुंबणे होत नाही.

      May 7, 2011


  • आत्ताच्या बँकेबाहेरच्या पुणेरी पाट्या

    टेन्शनच्या आणि धावपळीच्या वातावरणात #पुणेरी_टोमणे कडून थोडा गमतीने दिलासा देण्याचा प्रयत्न. एन्जॉय!

    1. हि कोणाच्याही तिर्थरूपांची बँक नसून सर्वांनी लायनीत उभे राहून आत येणे

    2. "तुला माईत्ये का मी कोने?" म्हणणाऱ्यांना नोटा बदलून मिळणार नाहीत.

    3. दादागिरी करणार्यांना जुन्या 500 च्या नोटा दिल्या जातील.

    4. फॉर्म नीट भरा, दादा, तात्या, अण्णा, यांना आम्ही ओळखत नाही, कारण आम्ही आत्ता बाप आहोत.

    5. अरेरावी करू नये, कोणीही तुमच्या मदतीला येणार नाहीत कारण जुना नोटा कामाच्या नाहीत.

    6. उगाच पाणी वाटप वगैरे कार्य करुन मते ओढण्याचा प्रयत्न करू नये, आम्ही पाण्याने भरलेला माठ आणि पेला ठेवला आहे. लोकं आपापली घेतील.

    7. विनाकारण कोणी केमेरे चालू करून लोकांना तुमचे काय मते? काय वाटतंय नोटा बंद झाल्यावर वगैरे लोकांचे इंटेर्विव्यु घेत बसू नये, सरकार ने फायनल निर्णय घेतलाय, आता कोणी काही हि बदलू शकत नाही... #नोटांशीवाय

    8. घाई करू नये, हि बँक आहे लोकल ट्रेन नाही.

    9. कॅशिअर सोबत फालतू वाद घातल्यास केशिअर ला झोपायला सेपरेट बेड ची सोय आहे, विचार करून बोला.

    10. आम्ही तुमचे सेवक आहोत, नोकर नाही.

    11. हे पुणे आहे, सभ्य भाषेत अपमान करायची इंडायरेक्ट पद्धत आहे.

    12. नोट हि लक्ष्मी आहे, त्यामुळे तिच्यासोबत इथे सेल्फी काढत बसू नये...

    13. थोडा उशीर होत असलेतरी भाईगिरी न करता लायनीतच थांबावे, इथे आजूबाजूला पोलीस आहेत, आणि तुमच्याकडे 500-1000 व्यतिरिक्त दुसऱ्या नोटा नाहीत.

    14. गर्दी असल्याने वेळ लागणारच, तरी कृपया सारखं पिचिक पिचिक आवाज काढू नये... घरी पैसे साठवायला आम्ही सांगितलं न्हवते.

    15. हा परीक्षा हॉल नाही, तरी, इतरांचा फॉर्म पाहून भरू नये.

    16. अजून किती वेळ लागेल वगैरे फाजील प्रश्न विचारू नये,
    कारण त्याचे उत्तर आम्हालाही माहित नाही.

    17. इथे गाडी पार्क केली तर चालेल का वगैरे पांचट प्रश्न विचारू नये.

    18. ATM चालू आहे का हे पाहण्यासाठी ATM च्या बाहेर लाईन आहे का ते पाहावे.

    19. सरकार कडून मिळालेलेच फोटो भिंतीवर लावले आहेत, तरी आमच्या यांचा फोटो नाहीये वगैरे वाद घालू नये.

    20. "शी बाबा" म्हणून उकडणे थांबत नाही, तुमच्या इतकंच आम्हालाही उकडते आहे, आणि आहेत तेवढे सगळे फॅन्स चालू ठेवलेत.

    21. आमच्याकडे ज्या नोटा अव्हेलेबाल आहेत त्याच आम्ही देऊ शकतो, आमचा स्वतःचा नोट छापायचा कारखाना नाही.

    22. सर्वांच्या नोटा दिसायला सारख्याच आहेत, त्यामुळे विनाकारण, तुझी बघू... तुझी बघू करत वेळकाढू पणा करून गर्दी वाढवू नये.

    23. आपली संस्कृती आणि आई वडिलांची शिकवण हि आपण गर्दीत वयस्कर लोकांशी कसे बोलतो यवरूनही समजून येते.

    24. उगाच मोठ्या मोठ्या राजकर्त्यांनी बँकेत येऊन लोकांना कित्ती कित्ती त्रास होतोय याची चाचणी करत बसू नये, मोठा निर्णय आहे, थोडा त्रास तर होणारच.

    25. "अत्तापर्यंत किती काळे पैसे बँकेत जमा झाले ओ???"
    हा प्रश्न विचारू नये. कारण आम्ही एकही काळ्या रंगांची नोट घेत नाही.

    26. "काका जरा पटापट करा ना" म्हणून आम्हाला सल्ला देऊ नये, आम्ही माणूस आहोत आणि व्यक्ती नाही.

    27. 1000 च्या नोटा बंद करून 2000 ची नोट का? असले फाजील प्रश्न आम्हाला विचारू नये. त्यासाठी रात्री कुठलाही न्यूज चॅनल लावून भांडणे पहात बसावे.

    28. दारावर उभ्या असणाऱ्या शिपायाशी भांडू नये, त्याच्याकडे भरलेली बंदूक आहे.

    29. घुसखोरी केलेल्या बांग्लादेशवासीयांनी आता आमचे काय होणार वगैरे प्रश्न विचारून आमचा वेळ वाया घालवू नये, घुसायाच्या आधी आम्हाला विचारले होते का?

    30. आम्ही तुमच्या सेवेसाठी तत्पर आहोत, निशिंत रहावे

    31. किती हि गर्दी असेल तरी ही दुपारी 1 ते 4 बँक बंद.........
    ............ राहणार नाहीत, काळजी नसावी.

    आता लगेच हि पोस्ट कॉपी करून त्यात पुणे खोडून इतर शहरांचे नाव टाकून तुमच्या पेजवर टाकू नये, कारण काही गोष्टी पुण्यालाच सूट होतात...

    आणि आपल्या PuTo पेज चे नाव खोडून तुमचे नाव टाकू नये, कारण आपले जुने फॉलोवर्स आपली लिहायची पद्धत बरोबर ओळखतात, पकडले जाल... आपमानाला सामोरे जावे लागेल.

    आशा आहे की लायनीत उभे असताना हे वाचून थोडेतरी मन गर्दीतून वळले असेल....

    आपला
    #PuTo

      November 16, 2016


  • पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर

    मल्हारराव होळकर हे रत्नपारखी. मल्हाररावांची गाठ पोरसवदा अहिल्यादेवींशी पडली ती चक्क एका भांडणातुन. पण त्यांनी आपला पुत्र खंडेरावासाठी तिचा हात नि:संकोचपणे मागितला. खंडेराव होळकरांशी अहिल्यादेवींचा विवाह झाला. सासरा बनलेल्या मल्हाररावांनी आपल्या सुनेला हौसेने लिहा-वाचायला शिकवले. खंडेराव हे मल्हाररावांचे म्हनजेच मराठ्यांचे दिल्ली दरबारातील राजकीय मुत्सद्देगिरीला सांभाळत राज्यकारभारही पहात असत. मोहिमांतही भाग घेत. कुंभेरीच्या वेढ्याच्या बिकट प्रसंगी खंडेरावांचा तोफेचा गोळा लागुन मृत्यु झाला. अहिल्यादेवींनी तत्कालीन समाजव्यवस्थेला अनुसरुन सती जायची तयारी केली. त्या प्रसंगी मल्हाररावांनी जो विलाप केला तो वाचुन कोणाही सहृदय माणसाच्या डोळ्यांत पाणी आल्यावाचुन राहणार नाही. अहिल्यादेवींनी सती जायचा विचार रद्द केला.

      May 31, 2022


  • वीज निर्मिती प्रकल्प सुरू होण्यापूर्वीच निघू लागला प्रदूषणयुक्त धूर

    मोहाडी येथे प्रस्तावित असलेल्या एका खाजगी थर्मल पॉवर प्रोजेक्ट या वीज निर्मिती प्रकल्पावर आता ताशोरे ओढणे सुरू झाले आहे. हा थर्मल पॉवर प्रोजेक्ट आजूबाजुंच्या भागांकरिता प्रदूषणासाठी कारणीभूत ठरणार असल्यामुळे या प्रकल्पाच्या विरोधात संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली.

      March 11, 2012