(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • रणथंबोरच्या रानात – प्रवासवर्णन नव्हे

    दीपक दलाल हे नाव इंग्रजी भाषेतील साहसकथांसाठी प्रसिद्ध आहे. त्यांनी लक्षद्वीप, अंदमान, लडाख यासंबंधी साहसकथा लिहिल्या आहेत. राजस्थानातील रणथंबोर अभयारण्यासंबंधीच्या त्यांच्या साहसकथेचा अनुवाद श्री. पु. गोखले यांनी केला आहे. नावावरून हे प्रवासवर्णन वाटत असले, तरी प्रत्यक्षात ती साहसकथा आहे. गोखले यांनी इतक्या सहजतेने अनुवाद केला आहे, की हा अनुवाद आहे, हे सांगावे लागते.

      January 25, 2010


  • माझ्या पावसाळी चारोळ्या…….

    पावसावरची ही चारोळी प्रातिनिधिक आहे. कृपया माझ्या या पहिल्या प्रयत्नासाठी आपल्या काही सूचना किंवा काही प्रतिक्रिया असतील तर त्या स्वागतार्ह आहेत.

      June 7, 2011


  • नितळ चंद्रकौंस

    आपल्या रागदारी संगीताचा जेंव्हा साकल्याने विचार करायला लागतो, तेंव्हा प्रत्येकवेळी मला कुसुमाग्रजांची कविता आठवते आणि आपला विचार किती "थिटा" आहे, याची नव्याने जाणीव होते. "मुक्तायन" काव्यसंग्रहात, "मी" या कवितेतील काही ओळी या वाक्यावर थोडा प्रकाश पाडू शकतील, असे वाटते. त्या ओळीत मी थोडा बदल केला आहे!!
    "माणूस आपल्यापर्यंत पोहोचतो तो संबंधामधून, पण त्या संबंधाच्या तुकड्याहून तो केव्हढातरी अफाट प्रचंड असतो;
    खिडकीच्या काचेतून चंद्र किरणांचा कवडसा आपल्या खोलीत पडतो,
    पण कवडसाच, चंद्र नव्हे;
    हजारो कवडसे पडले तरी, आकाशातील ती शीतल घटना;
    अनोळखीच राहते आपल्या जाणिवांना."
    रागसंगीताबाबत संपूर्ण विचार जरी थोडा बाजूला ठेवला तरी, काही रागांबाबत देखील आपण, एकच एक भावना व्यक्त करणे निरातिशय जिकीरीचे आणि चुकीचे देखील ठरू शकते. इतक्या अनंत भावनांच्या छटा, त्या रागांतून, आपल्याला वेगवेगळ्या कारणाने जाणवत राहतात. काहीवेळा, काही प्रतिभावंत कलाकार त्यात, प्रत्येकवेळी स्वत:चा असा वेगळा विचार मांडून, त्या रागाची वेगळीच ओळख आपल्याला करून देतात आणि आपण मात्र, त्या रागाच्या दर्शनाने, अचंबित होतो.
    चंद्रकौंस रागाबाबत माझी अशीच थोडी भावना आहे. खरे सांगायचे तर केवळ हाच राग कशाला, प्रत्येक रागाबाबत मला असेच वाटत आले आहे. आपण रागाला एका कुठल्यातरी भावनेचा रंग देतो आणि त्या चित्रात त्याला "बंदिस्त" करतो पण प्रत्यक्षात तो राग, आपल्याला प्रत्येक क्षणी वेगवेगळ्या रंगाने मोहवून टाकत असतो. इथे या रागाला "नितळ" म्हणताना, माझी अवस्था अशी किंचित द्विधा झाली आहे.
    "अनंत शिखरे निळी शिशिरमुग्ध संध्येतली,
    मधून जडली तिला जलतरंग मेघावली;
    तुझे बहरगीत की मयुरपंखसे आरसे,
    अरण्यभर सांडला मधुर अस्त माझा दिसे".
    कवी ग्रेस, यांच्या ओळी बहुदा माझा विचार स्पष्ट करतील.
    आता थोडे तांत्रिक भागाकडे वळायचे झाल्यास, या रागाची ओळख - "औडव-औडव" अशी करता येते. "रिषभ" आणि "पंचम" स्वरांना या रागात स्थान नाही. "गंधार" आणि "धैवत" हे कोमल स्वर तर बाकीचे तीनही स्वर शुद्ध. रागच समय, रात्रीचे पहिला प्रहर असा दिला आहे आणि त्यातूनच माझ्या मनात "नितळ" ही कल्पना आली. उत्तरांग प्रधान राग आहे आणि प्रमुख स्वर संहती बघायला गेल्यास, "सा ग म ग सा नि नि सा"; " ग म ध नि सा" अशी ऐकायला मिळते.
    किंचित अनुनासिक स्वर, अतिशय धारदार आवाज, लांब पल्ल्याचा गळा, पंजाबी धाटणीची गायकी आणि स्वरांवर "काबू" ठेवण्याची वृत्ती तसेच गाताना, अचानक "अकल्पित" स्वरस्थानांवर स्थिरावून, रसिकांना "धक्का" देण्याची आवड!! पंडित वसंतराव देशपांडे, यांच्या गायकीबद्दल असे काहीसे ढोबळ वर्णन करता येईल. वसंतराव "आलापी" गायनात फारसे रंगत नाहीत, असा एक "आरोप" त्यांच्याबाबतीत केला जातो परंतु जर का त्यांची "गायकी" जरा बारकाईने ऐकली तर त्यात फारसे तथ्य नाही, हेच आपल्याला कळून घेता येईल. खरी गोम अशी आहे, बहुतेकांना गायनात "चमत्कृती" आकर्षित करीत असते आणि तेच गायकीचे वैभव, असला चुकीचा समज करून घेतला जातो. याचाच परिणाम असा होतो, रसिकांना गायनातील "सरगम" या अलंकाराचे अतोनात असलेले आकर्षण!! वास्तविक, "सरगम" म्हणजे येऊ घातलेल्या तानेचा किंवा आधीच घेतलेल्या तानेचा किंवा आलापीचा "आराखडा" असतो परंतु या बाबीकडे दुर्लक्ष होते. वसंतरावांच्या बाबतीत, बरेचवेळा असेच घडत आले आहे.
    "येरी माई गुनिजन" या रचनेतील सुरवातीला आलेली आलापी आणि ठाय लयीतील बंदिश ऐकताना, काही बाबी अवश्यमेव ध्यानात येतात. एखादी हरकत घेऊन किंवा तान घेऊन, परत समेवर येताना, स्वरांवर "किंचित" आघात देऊन ठेहराव घेणे किंवा मध्येच एखादी खंडित तान घेताना, स्वरांना जोरकस "धक्का" द्यायचा!! कदाचित, यामुळेच बहुदा, हा गायक, आलापीमध्ये रमत नाही, असा प्रवाद पसरला असावा. स्वच्छ, मोकळा आवाज, तिन्ही सप्तकात विनासायास "विहार" करण्याची अचाट क्षमता आणि प्रयोगशील गायकी, ताना घेताना, अफाट बुद्धीगम्यतेचा परिचय करून देणारी गायकी आहे. ठाय लयीतील हरकतींचा आस्वाद घेताना, याचा आपल्याला प्रत्यय घेता येतो. गायन ऐकताना, काही ठिकाणी, "किराणा" घराण्याची छाप जाणवते. या रचनेत, बराच वेळ सरगम घेतली आहे आणि ती ऐकताना, "धैवत" स्वरावर जो "ठेहराव" घेतला आहे, तो खास ऐकण्यासारखा आहे. मी मुद्दामून ही रचना निवडली कारण ही रचना बहुतांशी "ठाय" आणि "मध्य"लयीतच सादर केली आहे.
    वास्तववादी चित्रपट निर्मितीत ज्याचा उद्भव होतो, त्या संगीतावरच भर असलेले संगीतकार म्हणून वसंत देसाई, यांचे नाव घ्यावे लागेल. हिंदी, मराठी चित्रपट तसेच मराठी नाटक, या सगळ्या माध्यमात, सहज वावर करणारे अभ्यासू व्यक्तिमत्व, असे देसायांबद्दल ठाम विधान करता येईल. याचा थोडा परिणाम असा झाला, त्याच्या रचनांत, कुठेतरी नाट्यसंगीताचा गंध राहिला, असे जाणवते. या शिवाय असेही जाणवते, पारंपारिक सांगीत चलने आणि चाली यांच्या अंगभूत सांगीत आकर्षणशक्तीवर विश्वास असल्याकारणाने त्या जागा, जशाच्या तशा व परिणामकारकतेने वापरण्यात त्यांनी मागे-पुढे पाहिले नाही. हिंदुस्थानी कलासंगीताचा आपण यथातथ्य वापर करतो असा मराठी नाट्यसंगीत परंपरेचा दावा बऱ्याच अंशी सार्थ असतो, ध्यानात घेणे जरुरीचे आहे. या परंपरेचा आणि वसंत देसाई यांचा देखील, कलासंगीतास पातळ करून वापरण्यावर भर नव्हता. आणखी एक विशेष मांडता येईल. ज्या व्ही. शांताराम यांच्याशी आणि त्यांच्या चित्रपट निर्मितीशी आयुष्यभर जवळचे संबंध असून देखील, जेंव्हा त्यांनी बाहेरचे चित्रपट निवडले, तिथे मात्र त्यांच्या शैलीचे वेगळे आणि अधिक विलोभनीय दर्शन घडते.
    "सन सनन सनन सनन, जा रे ओ पवन" हे गाणे "संपूर्ण रामायण" चित्रपटातील गाणे "चंद्रकौंस" रागाची आठवण करून देते. चंद्रकौंस रागाच्या सावलीत बांधलेले गाणे असून, चित्रपट गीतांत प्रसिद्ध असलेल्या "दादरा" तालात बांधलेले आहे.
    "सन सनन सनन सनन, जा रे ओ पवन;
    दूर देस लेजा संदेस जहां मेरा सजन;
    जा रे ओ पवन."
    "संपूर्ण रामायण" सारख्या धार्मिक चित्रपट असल्याने, चालीची रचना आणि वाद्यमेळ, यात पारंपरिकता येणे क्रमप्राप्तच ठरते तरी देखील, चालीचा जरा बारकाईने विचार केला तर लगेच आपल्याला कळेल, चालीचा ढंग "गायकी" अंगाकडे झुकलेला आहे आणि रचनेत विस्ताराच्या भरपूर शक्यता आहेत. अर्थात, गायला लताबाई असल्याने, मुळातला सांगीतिक मजकूर, तितक्याच सक्षमतेने सादर केला जातो. गाण्यातील "पॉजेस" तसेच अचानक वरच्या सप्तकात चाल जाणे, ही तर या गाण्याची वैशिष्ट्ये आहेत परंतु त्याचबरोबर, गाताना, बरेचवेळा शब्द तोडून गाण्यावर भर दिला जातो आणि याचे कारण, लयीच्या बंधनात, न बसणारी शब्दरचना. वसंत देसायांच्या रचनेत, शब्दांचे "औचित्य" या बाबतीत नेमकेपणाने सांभाळलेले दिसते.
    संगीतकार म्हणून जरी पु.ल.देशपांडे यांची कारकीर्द दीर्घकालीन नसली तरी त्यांनी आपल्या काळात, अनेक असामान्य रचना तयार करून, त्यांनी आपल्यातील "कलाकारा"चे अंग अप्रतिमरीत्या दाखवून दिले आहे. बऱ्याचशा रचना तशा सहज, कुणालाही भुरळ पडतील अशा आणि गुणगुणता येतील अशा पातळीवर वावरतात. चित्रपटातील गाणी, खासगी भावगीते या प्रांतात या संगीतकाराचा प्रामुख्याने वावर राहिला. रचनाकार म्हणून जरी फार प्रयोगशील नसले तरी देखील,रचना "प्रासादिक" तसेच "रसाळ" म्हणता येतील. त्यांच्या रचनांवर काही प्रमाणात "बालगंधर्व" गायकीचा असर होता, हे स्पष्टपणे जाणवते. "हसले मनी चांदणे" हे मराठीतील प्रसिद्ध भावगीत, चंद्रकौंस रागावर आधारित आहे.
    "हसले मनी चांदणे,
    जपुनी टाक पाउलं साजणी नादतील पैंजणे".
    काहीशी पंजाबी धाटणीची पण तरीही मराठी नाट्यसंगीताचा "असर" दर्शविणारी रचना आहे. माणिक वर्मा यांचा किंचित अनुनासिक स्वर, लडिवाळ गायकी आणि कवितेचा आशय ध्यानात घेता, रचनेची चाल फारच सुंदर आहे. किराणा घराण्याची पूर्वपिठीका असल्याने, गाण्यात एकूणच "उदारता" हा विशेष जाणवतो. पंजाब अंगाची फिरत पण मादकपणाशिवाय, नखरा पण अगदी लखनवी घराण्याचा नाही तसेच बनारसी ठुमरीच्या जवळ जाणाऱ्या प्रसरणशील चालींची भावगीते, हा खास आविष्कार. मुखडा जरी खालच्या अंगाने येणारा असला तरी पहिली लकेर सफाईने खालून वर जाणार आणि अनेकदा पंजाबी वक्र वळणे घेत खाली येणार. भावपट मोठा नाही परंतु संदिग्ध गोडवा, हा स्थायीभाव. यामुळे, माणिक वर्मांची भावगीते महाराष्ट्रात प्रचंड गाजली. ताला शिवाय केलेली आलापी किंवा तालासाहित केलेली आलापी किंवा घेतलेल्या हरकती ऐकताना, इतर भावगीत गायिका आणि माणिक वर्मा यांची गायकी, यात फरक कळून येतो. याचा वेगळा अर्थ असा लावता येईल, मराठी भावगीतांत माणिक वर्मा, यांनी उत्तरेचा रंग फार सफाईने आणला आणि महाराष्ट्रात रुजवला.
    मराठी चित्रपट "पाठलाग" मध्ये असेच अनोख्या चालीचे - या डोळ्यांची दोन पांखरे हे गाणे "चंद्रकौंस" रागाची सावली दर्शवतात.
    "या डोळ्यांची दोन पाखरे फिरतील तुमच्या भवती,
    पाठलाग ही सदैव करतील असा कुठेही जगती".
    माडगूळकरांची चित्रदर्शी शैली आणि संगीतकार दत्ता डावजेकरांची अतिशय अवघड चाल, याचे अनोखे मिश्रण या गाण्यात झाले आहे. अशी चाल गायला फक्त आशा भोसले यांचाच गळा आवश्यक आहे, याची सत्यता गाणे ऐकताना सारखे जाणवत राहते. अत्यंत मोजका वाद्यमेळ आणि गायकी ढंगाची चाल, यामुळे हे गाणे, रागाचे नाते सोडून कधी स्वत:चे अस्तित्व निर्माण करते, याचा पत्ताच लागत नाही आणि हीच तर खरी सुगम संगीताची खासियत आहे.
    प्रसिद्ध संगीतकार यशवंत देवांनी या रागावर आधारित असेच एक चिरस्मरणीय गीत दिले आहे. सुधीर फडक्यांनी आपल्या भावगर्भ शैलीत हे गाणे कायमचे चिरंजीव करून ठेवले आहे.
    "त्या तरुतळी विसरले गीत,
    हृदय रिकामे घेउन फिरतो,
    इथे तिथे टेकीत."
    कविवर्य वा.रा. कातांची कविता असून, तसे बघितले तर हे गीत म्हणजे अप्रतिम भावकविता आहे पण तरीही यशवंत देवांनी त्यातील "चाल" हुडकून, इतकी सुंदर चाल लावली. या गाण्यात देखील नाममात्र वाद्यमेळ असून कवितेतील आशय, स्वररचनेतून मुखरित केला आहे. या गाण्यात, जरा बारकाईने ऐकले तर सुरवातीच्या ओळींत "चंद्रकौंस" राग सापडतो पण नंतर कवितेच्या अनुषंगाने चाल फिरते आणि आपल्या हाती असामान्य चालीची रचना ऐकायला मिळते.
    -- अनिल गोविलकर

      October 30, 2018


  • टिप्पणी – ५ : विठ्ठल-मंदिर २४ तास उघडें

    बातमी : विठ्ठल-रखुमाईचें दर्शन आतां २४ तास
    संदर्भ : ‘लोकसत्ता’ मुंबई आवृत्ती, दि. ७ जुलै २०१६

    • हिंदू देव-देवतांची एक गंमत आहे. माणसांप्रमाणेंच मंदिरातली मूर्ती दुपारीं वामकुक्षी करते, आणि रात्रीं शयन करते. (भक्तांनी दर्शनासाठी वाट पाहिती तरी चालेल !) मग, पहाटे काकड-आरती करून देवाला ज़ागवतात! काय गंमत आहे पहा : दैवत्वाचे गुण माणसाला लागण्याऐवजी, माणसाचे गुणच मंदिरातील देवाला लागले ! !

    • देव, भक्त, मंदिर आणि पुजारी या व्यवस्थेवर विदारक टीका करणारी कविता कविवर्य कुसुमाग्रज यांनी लिहिलेली आहे ; शीर्षक आहे ‘गाभारा’ . गाभार्‍यातील देव भक्ताला भेटण्यासाठी मंदिराबाहेर पडतो ; व म्हणून पुजारी ठरवतात की आतां तो परत आला तरी त्याला आंत घ्यायचें नाहीं, जयपूरहून नवी मूर्ती ऑर्डर करायची ; अखेर, ‘गाभारा सलामत तर मूर्ती पचास’ ! . जिज्ञासूंनी ती कविता मुळातूनच वाचावी.

    ( कुसुमाग्रजांशी स्वत:ची तुलना मला कदापि अभिप्रेत नाहीं. केवळ या विषयावरील एक अन्य ‘टिप्पणी’ म्हणून, मी माझ्या, ‘देव आतां पावणार नाहीं’ या गझलमधील एक शेर देत आहे -

    व्यर्थ आक्रंदूं नका, हा बंद दरवाजा पहा
    झोपलाहे देव अजुनी , जागणार नाहीं ! )

    • या सगळ्या पार्श्वभूमीवर , ही ताजी बातमी नक्कीच welcome news आहे की, आतां पांडुरंगाचें मंदिर दर आषाढी व कार्तिकी एकादशीच्या वेळी,कांहीं दिवस कां होईना, पण, २४ तास उघडें राहील. पंढरपुरला दूरवरून वारी करून येणार्‍या भक्तांच्या सोयीसाठी असा स्तुत्य निर्णय घेतल्याबद्दल, प्रांताधिकारी, विठ्ठल-मंदिर समिती आणि बडवे यांचे अभिनंदन करावें तेवढें थोडेंच. कारण, मुख्यत्वें , मंदिर उघडें ठेवण्याची बाब, ही धार्मिक नसून, ती सामाजिक प्रश्नाशी निगडित आहे, ‘ह्यूमेऽन अप्रोच’शी संबंधित आहे.

    • हरिजनांना ( दलितांना ) मदिर-प्रवेश मिळावा म्हणून साने गुरुजींनी पंढरपुरला केलें आमरण उपोषण ही घटना साधारणपणें २०व्या शतकाच्या मध्यावरली. म्हणजे, त्यानंतर फार काळ लोटलेला नाहीं. त्या बॅकग्राउंडवर, आतां मंदिर २४ तास खुलें ठेवण्याचा निर्णय , हा अधिकच उठून दिसतो.

    • विठ्ठल हें एक लोकदैवत आहे. ( त्यासंबंधीचें रा. चि. ढेरे यांचें संशोधन पहावें). ज्ञानदेव-नामदेव आणि जातीजातींमधील इतर संतांनी, कृतीतून, विठ्ठलाचें लोकदैवतपण दाखवून दिलें. शतकानुशतकें चालत आलेली वारीही हेंच दाखवते.

    • अशा या लोकदैवताला ‘बंधनांत’ न ठेवता, भक्तांना मोकळेपणानें तिन्हीत्रिकाळ त्याला भेटायची संधी प्राप्त झाली, ही फारच आनंदाची बातमी आहे. अभिनंदन, अभिनंदन .

    -----

    टीप :

     सध्या मी ‘पंढरीचा राणा’ याअंतर्गत कांहीं काव्य वेबवर पोस्ट करतो आहे. योगायोग असा की, ‘उघडें मंदिर आहे’ हे काव्य मी अगदी पोस्ट करणारच होतो, तेवढ्यात वरील बातमी वाचली. तें काव्य आतां पोस्ट केलें आहे. या काव्यामागील अध्याहृत पार्श्वभूमी म्हणजे, साने गुरुजींनी विठ्ठल मंदिर हरिजनांसाठी उघडें व्हावें म्हणून, वर उल्लेखलेलें, उपोषण. (काव्यात तसा उल्लेख नाहीं). पण, हें काव्य, ‘२४ तास मंदिर उघडें राहण्याला’ही लागूं होतें, हा एक मजेदार योगायोग .

     आतां, प्रस्तुत बातमीनंतर मी लिहिलेलें, ‘विठ्ठलमंदिर राहिल उघडें’ हें काव्यही मी वेबसाईटवर पोस्ट केलें आहे.

     वर उल्लेख केलेली ‘देच आतां पावणार नाहीं’ ही गझलही वेबवर पोस्ट होईलच.

     हें सारें आपण माझ्या वेबसाईटवर, तसेंच मराठी सृष्टीच्या वेबसाईटवरही वाचूं शकाल.

    - - -

    - सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
    सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz(W), Mumbai.
    Ph-Res-(91)-(22)-26105365. M – (91)-9869002126
    eMail : vistainfin@yahoo.co.in
    Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com

      July 12, 2016


  • केसातील कोंडा घालवणे

    केसातील कोंडा घालवण्याचे सोपे उपाय

      June 23, 2014


  • जोशी साहेब एकदम कडक ऑफिसर

    जोशी साहेब एकदम कडक ऑफिसर ................,

    स्टाफने उशिरा आलेलं त्यांना अजिबात चालायचं नाही.

    उशिरा येणार्यांनी मश्टरवर उशिर का झाला याचं कारण लिहायचं असा नियम होता त्यांचा......

    त्या दिवशी ऑफिसला आल्यावर मश्टर बघून त्यांच डोकं सटकलं...........

    तब्बल दहा जणांना केबिनमधे बोलवण्यात आलं............,

    सगळे लाइनित खाली मान घालून ऊभे होते.

    जोशी साहेबांच्या डोळ्यातून अंगार निघत होता आणि त्याची धग एसीत पण जाणवत होती.

    एवढ्यात प्यून मिठाइचा बाॅक्स घेउन आला...

    साहेब उठले ......

    जळजळीत नजर टाकत त्यांनी प्रत्येकाच्या हातात मिठाइ दिली आणि म्हणाले “खा."

    कोणाला काहीच कळत नव्हतं पण सगळ्यांनी मिठाई खाल्ली.

    "अभिनंदन" जोशी गरजले.

    "मला अतिशय आनंद आहे की आपल्या ऑफिसमधल्या दहा लोकांच्या बायका प्रेग्नंट आहेत.........

    आणि त्याहूनही आनंद म्हणजे सगळ्यांची सोनोग्राफी आजच होती"

    "मुर्खांनो मश्टरवर कारण लिहिताना ‘Same As Above' लिहीता........ ,

    अरे वरच्याने काय लिहीलय हे वाचायची तरी तसदी घ्या".

    गमतीचा भाग म्हणजे त्या दहाजणात दोन बायकाही होत्या

      June 8, 2017


  • काचेपल्याड..

    ट्रेन मध्ये आंधळी- पांगळी लहान मुलं-माणसं तर इतकी सवयीची झाली आहेत.. की लोकांना त्यांच्याबद्दल अरेरे वाटण्याइतकी सुध्दा भावना उरली नाही.. पण जाणीव नावाचा प्रकार शाबुत राहिला तर काचेपल्याडचे जग विद्रुप स्वप्नासारख उभ राहत..

      January 5, 2011


  • देवा आण्णांना तेजोमय राष्ट्रीय प्रेरणा ज्योत बनव ….

    भारत देश हा पुरातन सनातन राष्ट्र आहे या देशांनी आजवर अनेक धोके खाले आहेत ह्याची साक्ष आपला इतिहास देतो. आज पर्यंत या देशाला काणत्याही विदेशी ताकतीने पराजित केले नाही.

      September 14, 2011


  • १५० वर्षाची परंपरा असलेले नागपूरचे मध्यवर्ती वस्तुसंग्रहालय

    १५० वर्षाची परंपरा असलेले नागपूरचे मध्यवर्ती वस्तुसंग्रहालय

    कावळ्याचा रंग कोणता ? असा प्रश्न तुम्हाला कोणी विचारला तर प्रश्न विचारणाऱ्याकडे आपण नक्कीच प्रश्नार्थक नजरेने पाहू... ‘काळा’ रंग असे उत्तर देऊन मोकळे होवू.. कावळ्याचा रंग काळाच असतो मात्र पांढऱ्या रंगाचाही ‘कावळा’ असतो आणि तो आपल्याला नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयाच्या पक्षी विभागात पाहायला मिळतो.

    पांढरा कावळा हा फक्त नागपूरातील मध्यवर्ती संग्रहालयातच आहे. अनेकाविध पुरातन वस्तु, शिल्पकला, चित्रकला, अश्मयुगीन हत्यारे, कोरीव वस्तू यासारख्या दुर्मिळ वस्तूंचा संग्रह आपल्याला इथे पाहायला मिळतो. ब्रिटिशकालीन असलेले नागपूर मध्यवर्ती संग्रहालय तब्बल १५० हून जास्त वर्षांचे आहे.

    ब्रिटीशकालीन असलेले हे मध्यवर्ती वस्तुसंग्रहालय आता महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाच्या नियंत्रणाखाली आहे. विशेष म्हणजे हे संग्रहालय राज्य शासनाच्या अधिपत्याखाली असलेल्या संग्रहालयांमधील सर्वात मोठे व जुने असे आहे. या संग्रहालयात भूगर्भशास्त्र, सस्तन प्राणी, पक्षी व सरपटणारे प्राणी, पुरातत्व, शस्त्र, नाणे विषयक, नृत्त्य, चित्रकला अशी विविध प्रकारच्या पुरातन संस्कृतीची ओळख करुन देणारी दालने आहेत.

    पुरातत्व दालनात आपल्याला वाकाटककालीन शिल्पे, शिलालेख पाहायला मिळतात. याठिकाणी असलेले मांढळ येथे सापडलेले महासदाशिवाचे शिल्प उल्लेखनीय आहे. त्याचबरोबर मोहोंजदडो येथील उत्खननात सापडलेल्या दुर्मिळ वस्तु, शिल्प तसेच कौण्डीण्यपूर येथे सापडलेली अश्मयुगीन हत्यारे आपणास पाहावयास मिळतात. भेडाघाट येथे सापडलेली यक्ष व यक्षिणीची शिल्पे, कला इतिहासाच्या दृष्टीने महत्वाची आहेत.

    शस्त्र दालनात मोगल, इंग्रज, मराठा, राजपूत यांची निवडक शस्त्रे, आदिवासींची शस्त्रे तसेच चिलखत, टोप, धातूच्या साखळीच्या सहाय्याने बनवलेला अंगरखा आहे तर, कला व उद्योग विभागात हस्तीदंत, लाकूड, चांदी, संगमवरी यापासून तयार केलेल्या कोरीव वस्तु प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवून जातात.

    येथील प्राणिशास्त्र विभाग प्रेक्षकांना सर्वाधिक आकर्षित करणारा आहे. टॅक्सीडर्मी केलेले (भुसा भरलेले प्राणी) मगर, जंगली पशु,किटक,मासे,मगर असे नानाविध प्रकारचे प्राणी इथे आपल्याला भेटतात. पक्षी दालनात असलेला कावळा हा येथील आकर्षण आहे. प्रेक्षकांची पावले हमखास या पांढऱ्या कावळ्याजवळ थबकतात.

    या दालनांसोबत तुम्ही चित्रकला दालनाला नक्की भेट द्या. विदेशातील नामवंत चित्रकारांच्या कुंचल्यातून साकारलेली दुर्मिळ चित्रे इथे आहेत. जलरंग, तैलरंग अशा माध्यमातील वस्तुचित्रे, निसर्गचित्रे,व्यक्तीचित्रे नजरेचे पारणे फेडतात. धुरंधर, एस.एम.हळदणकर, एम.आर.आचरेकर, हेब्बर आदी प्रसिद्ध चित्रकारांची चित्रे या दालनात आहेत. याठिकाणी हळदणकरांचे ‘निरांजनी’ हे गाजलेले चित्र आहे. हे चित्र पाहताना चित्रकाराने साकारलेल्या रंगछटा आणि टिपलेला बारकावा यांचा अनुभव थक्क करणारा आहे. भव्य परीसरात वसलेल्या या वस्तुसंग्रहालयाचे सध्या नुतनीकरणाचे काम सुरु आहे. अभिरक्षक (क्युरेटर) म्हणून श्री.गठाणे या वस्तुसंग्रहालयाचे काम पाहत असून चित्रकार श्री.मंडपे यांचे त्यांना सहाय्य लाभत आहे. प्रेक्षकांसाठी सकाळी दहा ते सायंकाळी पाच पर्यंत संग्रहालय खुले असते.

    अनेकविध दुर्मिळ वस्तूंचा नजराणा असलेल्या या वस्तुसंग्रहालयास एक वेळ अवश्य भेट द्या.

    -- काशीबाई थोरात (संदर्भ - महान्यूज)

      April 6, 2016


  • भक्तीयोगाचा राजदूत-

    प्रभुपादांना आणि त्यांच्या अलौकिक धैर्याला सादर दंडवत प्रणाम.

      December 4, 2010