(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • योगा …हमसे नही होगा ! ( बेवड्याची डायरी – भाग ११)

    माझा व योगाभ्यास यांचा छत्तीसचा आकडा होता पूर्वीपासून .. लहानपणी मी व्यायाम वगैरे खूप केलाय ..जोर ..बैठका .. अशा गोष्टी मी केल्या होत्या ..पुढे सगळे सुटले .. भलतेच सुरु झाले होते .. योग्याभ्यास म्हणजे ऋषीमुनींनी करायची गोष्ट असे माझे ठाम मत होते ..सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यातील या गोष्टी असल्या तरी ..आपल्याला काही मोठे योगी बनायचे नाही ..या विचाराने मी योगाभ्यासापासून चार हात दूरच राहिलो होतो ..

      February 5, 2020


  • स्वाहा……!

    टीव्हीने जनसामान्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात शिरकावच काय तर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे ढवळाढवळ सुरु केली. याचे नकारात्मक व समाजघातकी परिणाम एकूण समाज भोगतो आहे…!

      July 24, 2012


  • ब्लु मुन

    कॅनडाच्या व्हिफेन हेड पोर्ट मधुन आमचे जहाज निघणार होते. जहाजावरील सगळं ऑईल डिस्चार्ज व्हायच्या तासभर अगोदर ‘प्रोसिड टोवर्ड्स नायजेरिया’ असा कंपनी कडून मेसेज आला होता.

      January 14, 2024


  • मोबाईल आणि मी

    मोबाईल मुळे फक्त माणसेच जवळ आली पण त्यांची मने मात्र कायमची दूर गेली. पूर्वी प्रेम डोळ्यातून मेंदूपर्यत पोहचत असे पण हल्ली ते कानातून मेंदूपर्यत पोहचत असावं मोबाईलच्या माध्यमातून. सध्याच्या तरूण – तरूणी मोबाईलवर दिवस- रात्र काय बोलत असतात हाच सध्या एक संशोधनाचा विषय झालेला आहे. 

      January 20, 2016


  • पुण्याचे अत्याधुनिक जिल्हाधिकारी कार्यालय

    पुण्यातील नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाची ओळख केवळ प्रशासकीय इमारत म्हणून राहणार नाही तर पुण्याच्या वैभवात या इमारतीमुळे एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. या इमारतीच्या बांधकामावर सुमारे ६७ कोटी रुपये खर्च करण्यात आलेला आहे. ‘ग्रीन बिल्डिंग’ म्हणून या इमारतीची एक वेगळी ओळख तयार होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत या देखण्या इमारतीचे उद्घाटन नुकतेच झाले. त्या निमित्ताने पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्याशी साधलेला संवाद ...


    नवीन इमारतीची मुहुर्तमेढ कशी रोवली ?

    -कार्यालयाची जुनी इमारत ही सुमारे १३५ वर्षे जुनी होती. नागरिकांची गर्दी आणि अभिलेखांची संख्या वाढत असल्याने या कार्यालयाच्या आवारातील इमारती अपुऱ्या पडत होत्या; तसेच त्या इमारती धोकादायक झाल्याने त्या ठिकाणीच नवीन इमारत उभारण्याचे काम हाती घेण्यात आले होते. यानिमित्ताने सर्व कार्यालये एकाच छताखाली असावीत, या उद्देशाने नवीन इमारतीची निर्मिती करण्यात आली आहे. या इमारतीचे भूमीपूजन तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते.

    नवीन इमारतीची रचना कशी असेल?

    -प्रामुख्याने नवीन मुख्य इमारतीमध्ये तळमजला आणि अन्य पाच माळे आहेत. एकूण १० हजार २१५ चौरस मीटर क्षेत्रफळावर इमारत बांधण्यात आली आहे. ८ हजार २२९ चौरस मीटर जागा वाहनतळासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. त्यामध्ये एकाच वेळी २२७ चारचाकी, १ हजार १३७ दुचाकी, तर ३१० सायकली उभ्या करता येणार आहेत. यात ए, बी आणि सी विंग आहेत.

    पर्यावरणपूरक इमारतीसाठी काय केले?

    -पर्यावरणपूरक इमारत म्हणून या इमारतीची नोंद होणार आहे. त्यासाठी सोलर यंत्रणा उभारण्यात येणार असून अशा प्रकारची इमारत असलेले पुणे जिल्हाधिकारी कार्यालय हे राज्यातील पहिले कार्यालय आहे. मंत्रालयाला लागलेल्या आगीच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण इमारत अग्निरोधक बनविण्यात आली आहे. त्यासाठी विशिष्ट प्रकारच्या फर्निचरचा वापर करण्यात आला आहे. विशिष्ट तापमान झाल्यास येथील अग्निशमन यंत्रणा आपोआप कार्यान्वित होऊन पाण्याचे फवारे उडतील, अशी यंत्रणा बसविण्यात आली आहे. तसेच सहा रिश्टर स्केल भूकंपातही ही इमारत सुरक्षित राहील, याची काळजी घेण्यात आली असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

    नागरिकांना काय फायदा होईल?

    - जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीमुळे नागरिकांची एका छताखाली कामे मार्गी लागतील. शहरातील वाढता पसारा, वाढते प्रशासनातील प्रश्‍न यामुळे एकाच ठिकाणी इमारत असणे आवश्यक होते. जिल्ह्याचे क्षेत्रफळ तब्बल १५,६४२ चौरस किमी एवढे आहे. लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्याकरिता एक चांगले प्रशस्त प्रशासकीय कार्यालय हवे होते. ते यामुळे मार्गी लागेल. लोकांना विखुरलेल्या ठिकाणी जावे लागणार नाही.

    सुरक्षेच्या दृष्टीने इमारतीमध्ये काय करण्यात आले?

    -नवीन जिल्हाधिकारी कार्यालयात सुरक्षेच्या दृष्टीने विशेष काळजी घेण्यात आली आहे. त्यामध्ये तब्बल ९६ सीसीटीव्ही कॅमरे बसविण्यात आले आहेत. एक कंट्रोल रुम तयार करण्यात आली आहे. या रुममध्ये सर्व बिल्डिंगची माहिती उपलब्ध होणार आहे. या रुमला युनिक मॅनेजमेंट सर्व्हिस म्हणून संबोधले जाईल.

    आपल्या कार्यकाळात इमारत झाली त्याबद्दल काय सांगाल?

    -माझ्या कार्यकाळात ही इमारत झाली, याचा मोठा आनंद आहे. खऱ्या अर्थाने स्वप्नपूर्ती झाली आहे. कोणत्याही अधिकाऱ्याला आपल्या कार्यकाळात मोठे काम करण्याची संधी मिळणे हे देखील महत्वाचे असते. राज्य सरकारचा देखील मी खूप आभारी आहे. शासनाने वेळोवेळी निधी उपलब्ध करून दिला. पहिल्यापासून मी या इमारतीकडे बारकाईने लक्ष दिले. सार्वजनिक शौचालये कशी असावीत, इमारत बांधताना कमीत कमी झाडे तोडली जावीत, या हेतूने काळजी घेतली गेली. परिणामी देखणी इमारत उभी राहिली, असेही श्री. राव यांनी सांगितले.

    या नवीन देखण्या इमारतीमुळे पुण्याच्या सौंदर्यात आणखी भर पडणार आहे. सर्वसामान्यांची सेवा या इमारतीमधून सदैव घडो, अशी प्रार्थना करूया.

    -- दिगंबर दराडे
    पत्रकार, पुणे.

    `महान्यूज'च्या सौजन्याने

      October 31, 2017


  • सारोळ्याचे वनपर्यटन

    औरंगाबाद जिल्ह्यातील जगप्रसिध्द अजिंठा-वेरुळ लेण्यामुळे जगभरातील पर्यटक येथे मोठय़ा संख्येने भेट देतात. याचबरोबर म्हैसमाळ हेही एक थंड हवेचे ठिकाण विकसित होऊन प्रसिध्दीस आल्याने तेथेही मोठय़ा प्रमाणात पर्यटक येतात. प्रति म्हैसमाळ म्हणून सारोळा वनपर्यटन स्थळ आकारास येत आहे.

      February 6, 2010


  • ब्रम्हचारी (१९३८)

    ब्रम्हचारी (१९३८)

    आचार्य अत्रे यांच्या “अत्रे पिक्चर्स” या बॅनर अंतर्गत त्याकाळात खूपच विवाद निर्माण मराठीतला “बोल्ड” चित्रपट म्हणता येईल. त्याकाळात सनतानवादी संघटनांनी बिकीनि दृश्यांवर प्रचंड आक्षेप घेतल्यामुळे चित्रपट वादाच्या भोवर्‍यात अडकला होता. पण तितकाच लोकप्रिय ठरला हे विशेष..

      May 20, 2013


  • आपल्या ग्रामदेवतेची माहिती मराठीसृष्टीला पाठवा.

    नोकरीनिमित्त अनेक चाकरमानी आपले गाव सोडून मुंबई-पुण्यात किंवा अगदी परदेशातही स्थायिक झालेले असले तरी त्यांचे मन मात्र गावात गुंतलेले असतेच. आपल्या गावाच्या काही आठवणी, फोटो, उत्सव यांची आठवण आपल्याला नेहमीच येते.

    प्रत्येक गावाची एकग्रामदेवता किंवा ग्रामदैवत असते. दिवसातून अनेकदा, अभावितपणे आपण आपल्या ग्रामदेवतेची आठवण काढत असतो. कठीण समयी ग्रामदेवतेचा धावाही करत असतो. पैशाच्या मागे धावणार्‍या आपल्यापैकी प्रत्येकाच्या पाकिटात ’ग्रामदेवते’चा फोटो असतो.

    आता आपण आपल्या ग्रामदेवतेची माहिती अणि फोटो मराठीसृष्टीच्या माध्यमातून जगभरात विखुरलेल्या मराठीजनांपर्यंत पोहोचवू शकतो “माझी ग्रामदेवता” या सदराद्वारे.

    ग्रामदेवतेची माहिती आणि फोटो पाठविण्यासाठी येथे Email करा...

      December 25, 2014


  • स्काय व्ह्यू

    फ्लाईट ने ऑनटाइम टेक ऑफ केले. टेक ऑफ नंतर जकार्ता शहराचे दोन अडीच मिनिटे हवाई दर्शन झाले आणि जकार्ता जवळील समुद्रातील लहान मोठी बेटे दिसू लागली

      September 10, 2021


  • संस्कृतीचा पुजारी

    विलासरावांच्या सहवासातून मला त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू दिसले. उत्तम राजकारणी, उत्तम प्रशासक, प्रगल्भ विचारांचा माणूस, सहृदय मित्र अशी अनेक गुणवैशिष्ट्ये विलासरावांच्या ठायी होती. महाराष्ट्राच्या बहुजन समाजाची तसेच नागरी समाजाची उत्तम जाण असणारा नेता, सरपंचापासून ते मुख्यमंत्रिपदापर्यंतचा प्रवास आणि केंद्रीयमंत्रीपदापर्यंतची ही वाटचाल अत्यंत कष्टाची होती. त्यांनी केवळ महाराष्ट्रातच नाही तर दिल्लीच्या राजकारणातही मोठ्या परिश्रमपूर्वक पद्धतीने स्थान निर्माण केले. त्यांच्या या वाटचालीचा मराठी माणूस म्हणून नक्कीच अभिमान वाटत राहील. त्यांची ही कारकीर्द आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रत्येक मराठी माणसाच्या मनात सदैव घर करुन राहील. 

    – मधु मंगेश कर्णिक, ज्येष्ठ साहित्यिक

      August 24, 2012