ही जपानमध्ये घडलेली अगदी खरीखुरी घटना ! एकदा तेथे एका माणसाने आपल्या घराचं नूतनीकरण करायला सुरुवात केली. असे करतना भिंत तोडून उघडायला लागते. जपानी घरांच्या भिंती लाकडाच्या बनवलेल्या असतात आणि त्यांत सहसा
पोकळी असते.
March 13, 2010
बॉनसाय ट्रेमध्ये भरण्यासाठी चांगल्या प्रतीची माती, वाळू आणि चांगले कुजलेले सेंद्रिय खत किंवा गांडूळखत १:१:२ या प्रमाणात एकत्र करतात. बॉनसाय ट्रेच्या तळाशी जादा पाणी वाहून जाण्यासाठी चार-पाच छिद्रे असतात.
October 23, 2015
आठवणीं
April 8, 2011
साहित्याचा चोर मी
तरि साहित्यिक थोर मी
थोर वाङ्मयचौर्याविरुद्ध नेहमी
पण लढतो घनघोर मी ।।
-सुभाष स.नाईक
August 22, 2018
आदौ कर्मप्रसड्गात् कलयति कलुषं मातृकुक्षौ स्थितं मां विण्मूत्रामेध्यमध्ये क्वथयति नितरां जाठरो जातवेदाः ।
यद्यद् वै तत्र दुःखं व्यथयति नितरां शक्यते केन वक्तुं क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो ॥१॥
मानवी जीवनामध्ये कर्म अनिवार्य आहेत. कर्म करायचे म्हटले की त्यात दोष येणारच. काही ना काही चूक घडणारच. त्याच्या परिणामस्वरूप फळांपासून आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पश्चात्तापापासून वाचायचे असेल तर क्षमायाचना अत्यंत महत्त्वाची कृती ठरते.
प्रस्तुत स्तोत्रात गतजन्मीच्या अयोग्य कृतींपासून आचार्य आरंभ करीत आहेत. ते म्हणतात,
आदौ कर्मप्रसड्गात् कलयति कलुषं मातृकुक्षौ स्थितं मां- पूर्वीच्या जन्मात केलेल्या कर्मांचा फळा नुसार त्यातील वाईट कर्मांनी मला मातेच्या गर्भात आणून टाकले. विण्मूत्रामेध्यमध्ये क्वथयति नितरां जाठरो जातवेदाः -
तेथे रक्त, मांस,मलमूत्र या सगळ्या घाणीत मी पडलेलो होतो.
मातेच्या उदरातील जठराग्नी मला सतत जाळत होता.
यद्यद् वै तत्र दुःखं व्यथयति नितरां शक्यते केन वक्तुं- तेथे ज्या ज्या प्रकारची अत्यंत भयानक दुःखे आहेत त्यांचे पूर्णपणे कथन कोण करू शकेल?
या सगळ्यातून सुटण्याचा मला एकच मार्ग दिसत आहे. हे भगवान शंकरा मी आपल्या चरणी शरण आलो आहे. आपणास प्रार्थना करीत आहे ,
क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो - श्री महादेव शंभो माझ्या अपराधांना क्षमा करा. आपण परमपवित्र आहात आपल्या चरणाशी मला पवित्र करा.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
July 20, 2020
कविता कशी करतात माहित नाही. पण कविता वाचताना एक अनोखा आनंद होतो. किमान मला तरी होतो. आणि आणखीन एक विचार मनात चमकून जातो.आपण का नाही करू शकत अश्या कविता? यातला प्रत्येक शब्द परिचित आहे ,त्यांचा अर्थ आपण जाणतो .मग मी का नाही करुशकत कविता? सराव नाही म्हणून? सरावाने जमेल?
June 16, 2018
मर्ढेकरांची कविता – झोपली ग खुळी बाळे – वैश्विक व दुसऱया महायुध्दकालीन संदर्भ
मर्ढेकरांची ही कविता दुसऱ्या महायुध्दाच्या पार्श्वभूमीवर आहे. ह्या कवितेत अणुबाँब आहेत. रॉकेट (बॅलिस्टीक मिसाइल) आहेत. भारतीय , अमेरीकन शास्त्रज्ञ आहेत. आंतरराष्ट्रीय शस्त्रस्पर्धा आहे. भगवतगीता आहे. जागतीक शांततेचा प्रश्न आहे. आणखी बऱ्याच गोष्टी आहेत.
Please visit my blog http://crbelsare.blogspot.com
April 4, 2011
‘त्याच्या शब्दांना सुरांची जादू आहे, कवितेतून वास्तवाचं प्रतिबिंब खुबीने उमटतं. तसंच अनेक कलांमध्ये मुशाफिरी करुनही लेखन आणि व्यंगचित्रावरचं त्याचं प्रेम कायम अग्रस्थानी राहिलंय.” रुपेरी पडदा, नाटक व मालिकेतून दर्जेदार साहित्याची पर्वणी देऊन नवरंजनाचा अनुभव देणारे सुप्रसिध्द गीतकार गुरु ठाकूर सांगत आहेत त्यांच्या कारकीर्दीविषयी खास मराठीसृष्टी.कॉम ला दिलेल्या मुलाखतीतून..
July 18, 2013
२१ फेब्रुवारी हा दिवस 'आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन ' म्हणून पाळला जातो.
बांगला देशी विद्यार्थ्यांनी उर्दूसोबत बांग्ला भाषेलाही राष्ट्रीय भाषेचा दर्जा मिळावा म्हणून १९५२ साली निदर्शने केली होती. त्यांच्यावर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात काही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्या स्मृतीप्रीत्यर्थ हा दिवस युनोस्को तर्फे आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस म्हणून ओळखला जाऊ लागला.
भाषा हा सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय. आपली भाषा ही आपली व आपल्या संस्कृतीची ओळख असते. फक्त 'एक संपर्काचे माध्यम' इतकाच भाषेचा उपयोग आणि तिची व्याप्ती नाही. मानवी भाषेला सामाजिक, सांस्कृतिक,राजकीय,वैयक्तिक असे अनेक पदर आहेत. आणि म्हणूनच ती मानवी जीवनाचे इतके महत्त्वाचे अंग आहे. आजूबाजूच्या जगातून मिळणार्या ज्ञानाला, सौंदर्याला,आनंदाला भरभरून प्रतिसाद देण्याचे एकमेव साधन म्हणजे आपली मातृभाषा. घरच्या अंगणात खेळावं इतकी सहजता आणि इतके आपलेपण मातृभाषेत बोलताना असते. म्हणूनच कदाचित सगळ्यांसाठी मातृभाषा हा इतका भावनिक पातळीवरचा विषय होऊन बसतो. 'मातृभाषा आणि तिच्यावर येऊ घातलेली संकटं' हा अनेकदा चर्चेचा विषय होतो. मातृभाषेशी नातं इतकं दृढ असतं की 'आपली मातृभाषा हरवत चालली आहे' अशा विचारानेही बहुतांश लोक अस्वस्थ होतात; आणि ते रास्तही आहे. इंग्रजीचा 'किलर लँग्वेज' म्हणून जगभर पडत चाललेला प्रभाव बर्यादच लोकांना चिंताजनक वाटतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द देऊन भाषासमृद्धीचे व्रत घेतले होते. त्यातील अनेक शब्द आज पूर्णपणे मराठमोळे झाले आहेत.
पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरीच हाल सोसते मराठी ।
हे असे असंख्य खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी ।।
असं सुरेश भटांनी सांगितलं असलं तरी आज मराठी माणसाला, मराठी माणसाशी, मराठी भाषेत बोलायला लाज वाटते, ही दुर्दैवी वस्तुस्थिती आपण महाराष्ट्रात अनुभवत आहोत. ' यू नो ' , ' यू सी ' हे शब्द मराठी वाक्यात आले नाहीत, असं होत नसतं. १९२४ मध्ये केसरीतून सावरकरांनी मराठी भाषेचे शुद्धिकरण ही लेखमाला लिहिली, त्यात त्यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली होती. याच विषयावरून दत्तो वामन पोतदार आणि त्यांच्यात झालेला वादही प्रसिद्ध आहे. ' परकीय भाषेतील शब्द आत्मसात करून ते पचवून टाकले, ही आमची विजय-चिन्हंच नाहीत का ?' , असा प्रश्न दत्तोपंतांनी सावरकरांना विचारला. त्यावर त्यांचं उत्तर होतं, ' ती काही आमची विजय-चिन्हं नाहीत ; ते तर आमच्या भाषेच्या अंगावरचे व्रण आहेत .' सावरकरांचं हे म्हणणं एका अर्थानं योग्यही आहे. आपल्या भाषेत शब्द उपलब्ध असतानाही दुस-या भाषेचा आधार का घ्यावा ?
सावरकरांनी अनेक पर-शब्दांना मराठमोळे प्रतिशब्द सुचवले. हे शब्द किचकट होते, संस्कृतप्रचूर होते आणि समजायला परभाषी शब्दांपेक्षाही कठीण होते अशी टीका काहीजण करतात. पण दिनांक, नगरपालिका, महापालिका, महापौर, हुतात्मा, दूरदर्शन, दूरध्वनी, प्राध्यापक, नेतृत्त्व हे सावकरांनीच शोधलेले, सुचवलेले शब्द आहेत. आज ते सर्रास वापरले जातात. मराठी भाषेचं सौंदर्यही त्यातून जाणवतं.
आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन निमीत्त सावकरांनीच शोधलेले, सुचवलेले शब्द*
क्रमांक (नंबर)
बोलपट (टॉकी)
नेपथ्य
वेशभूषा (कॉश्च्युम)
दिग्दर्शक (डायरेक्टर)
चित्रपट (सिनेमा)
मध्यंतर (इन्टर्व्हल)
उपस्थित (हजर)
प्रतिवृत्त (रिपोर्ट)
नगरपालिका (म्युन्सिपाल्टी)
महापालिका (कॉर्पोरेशन)
महापौर (मेयर)
पर्यवेक्षक ( सुपरवायझर)
विश्वस्त (ट्रस्टी)
त्वर्य/त्वरित (अर्जंट)
गणसंख्या (कोरम)
स्तंभ ( कॉलम)
मूल्य (किंमत)
शुल्क (फी)
हुतात्मा (शहीद)
निर्बंध (कायदा)
शिरगणती ( खानेसुमारी)
विशेषांक (खास अंक)
सार्वमत (प्लेबिसाइट)
झरणी (फाऊन्टनपेन)
नभोवाणी (रेडिओ)
दूरदर्शन (टेलिव्हिजन)
दूरध्वनी (टेलिफोन)
ध्वनिक्षेपक (लाउड स्पीकर)
विधिमंडळ ( असेम्ब्ली)
अर्थसंकल्प (बजेट)
क्रीडांगण (ग्राउंड)
प्राचार्य (प्रिन्सिपॉल)
मुख्याध्यापक (प्रिन्सिपॉल)
प्राध्यापक (प्रोफेसर)
परीक्षक (एक्झामिनर)
शस्त्रसंधी (सिसफायर)
टपाल (पोस्ट)
तारण (मॉर्गेज)
संचलन (परेड)
गतिमान
नेतृत्व (लिडरशीप)
सेवानिवृत्त (रिटायर)
वेतन (पगार)
असे शेकडो शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी भाषेला दिले आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
February 21, 2018
एका पुस्तकात ‘प्लँचेट’ म्हणजे मृत आत्म्याला बोलावण्याचा विधी सांगितला होता व त्या आत्म्याला जर आपण प्रश्न विचारले तर तो त्याची उत्तरे देतो असे लिहिले होते… हे करणे मात्र मला शक्य होते साधने देखील फारशी लागणार नव्हती, म्हणजे फक्त एक गुळगुळीत पाट, स्टीलचे पाणी पिण्याचे फुलपात्र, खडू, उदबत्ती आणि तीन जण .
January 18, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti