(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • एकत्र कुटुंब

    जर कुटूंबातील प्रत्येकाने थोडी संयमित वागणूक दाखवली तर एकत्र कुटूंब पद्धती समान सुख-सम्रुद्धीचा सागर दुसरा होणे नाही.

      November 14, 2010


  • मोबाईलचा डायबेटीस

    संक्रांतीच्या शुभेच्छा
    इतक्या वारेमाप झाल्या
    मोबाईलला माझ्या
    काळ्या मुंग्या लागल्या

    किती गोड किती गोड
    दुर दुरून बोलतात माणसं
    किती अगदी सहजपणे
    जवळून दूर जातात माणसं

    लांबचा वाटतो जवळचा
    जवळचा काय कायमचा
    कधीतरी येणाराच
    सण असतो महत्वाचा

    शुभेच्छा हव्यात कृतीत
    नको नुसत्या उक्तीत
    एकमेकांच्या असावं
    प्रेमळपणानं संगतीत

    मेसेज डिलीट करण्यातच
    अख्खी संक्रांत गेली
    मोबाईलची शु्गर लेवल
    मात्र भलतीच वाढली

      October 31, 2017


  • अजिंक्य मानवी संस्कृती

    रमजान ईद’चा दुसरा दिवस होता. पुण्याच्या सारसबागेवरून कुठेशी जात होते तेव्हा पाहिलं, तर सगळी बाग मुस्लिम बांधवांनी भरून गेली होती. नटून थटून आलेल्या बायका, मुलं आणि सगळी मिळून सणाची मजा लुटत होती. ते दृश्य पाहूनच छान वाटलं.

      December 14, 2023


  • सारसबागेतील तळ्यातला आपला लाडका सिद्धिविनायक

    समृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेले पुणे शहर ही महाराष्ट्राची ‘सांस्कृतिक राजधानी’ आहे. नामांकित शिक्षणसंस्थांमुळे पुणे हे ‘विद्येचे माहेरघर’ मानले जाते. परंतु नवसाला पावणाऱ्या ‘तळ्यातला गणपती’ने पुणेकरांसह संपूर्ण महाराष्ट्रातील भक्तांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. अगदी आत्तापर्यंत हे ठिकाण “तळ्यातला गणपती” याच नावाने ओळखले जायचे.

      June 21, 2021


  • फक्त तु आणि फक्त तु

    प्रत्येक प्रेमात पडलेल्या वक्तीला असंच वाटतं

      November 11, 2010


  • बेवड्याची डायरी – भाग ५ – “ड्रिंक्स” – दारूचे उदात्तीकरण

    मी स्वतची ओळख करून देताना नाव.. .गाव ..सांगून झाल्यावर व्यसन कोणते ते सांगताना सरळ सरळ दारू असे न म्हणता ‘ ड्रिंक ‘ असे म्हंटल्यावर सगळेजण का हसले ते मला समजेना ..त्यावर एकजण ‘ कोणते ड्रिंक ? थम्सअप की लिम्का ? असेही ओरडला परत सगळे हसले ..मला कसेतरीच झाले ..परत जागेवर येऊन उभा राहिलो .

      January 15, 2020


  • प्रेम – एक प्रश्न

    प्रेम – एक प्रश्न

      January 14, 2011


  • तगमग.. दारू.. तमाशा ! (नशायात्रा – भाग ३१)

    जवळची ब्राऊन शुगर संपल्यावर माझी चीडचीड वाढली होती , मला ब्राऊन शुगर न मिळाल्याने त्रास होतोय हे मित्रांना सांगणे देखील लज्जास्पद वाटत होते , कारण मग त्यांना समजले असते मी ब्राऊन शुगरच्या आहारी गेलोय ते ( एखाद्या व्यसनीला आपण व्यसनी झालोय हे इतरांजवळ कबुल करायला खूप त्रास होतो , त्याचा अहंकार त्याला हे करू देत नाही ) त्यांनी माझ्याशी खोटे बोल्रून माझ्याजवळचा साठा संपवला होता या बद्दल त्यांचा खूप रागही आला होता .

      May 18, 2020


  • षंढ झालय शासन

    षंढ झालय शासन,
    षंढ झालीय प्रजा,
    सैनिक सोसतोय सजा,
    अन् पाकडा घेतोय मजा...

    आम्ही लढतोय घरातच
    काढतोय मूकमोर्चा,
    टीह्वी पहात, चणे खात,
    नुसत्या बाष्कळ चर्चा......

    प्रत्येक जातीला हवे फूकट,
    हक्काचे आरक्षण.....
    गोळ्या खाउन मरतोय फूकट,
    जो करतोय मातीचे रक्षण.....

    कुणाला पडलय देशाच,
    कूणाल पडलय मातीच,
    इथ महत्वाचं आहे,
    स्थान आपल्या जातीचं.....

    तिरंग्याचे रंग वाटून
    आम्ही जपतो धर्म.....
    जातीसाठी जगणंमरणं
    हेच आमच कर्म......

    वृद्धाश्रमात राहते आई,
    बाप मागतोय भीक,
    आमचा आपला एकच धंदा,
    जमिनजुमला विक.....

    बूजत चालल्या नद्या,
    विझल्या दिव्यांच्या वाती,
    मनामनातून मिटत चाललीय,
    माणसांची ओली नाती......

    उठा मर्दहो जागे होवून,
    बलिदानांचे करा स्मरण,
    ओळखा खतरा,गेले सतरा,
    विसरु नका वीरमरण

    अजून किती मरणांची ,
    पहायची आहे वाट.....
    अजून किती वहायला
    हवेत रक्तांचे पाट.....

    फक्त सगळे थूंकलेतरी,
    वाहून जाईल सारा पाक,
    नूसत वळून बघितलतरी,
    होउन जाईल राख राख......

    कसल चरताय गु-हाळ रोज,
    कसल्या करताय बाता,
    नागड करून भर चौकात,
    ढूंगणावर घाला लाथा....

    खादीमधल्या नेत्यांनो,
    बस्स झाल्या चर्चा,
    झेपत नसेल तर सांगा,
    ऊबऊ नका खूर्च्या......

    जमत नसेल तर सांगा,
    आम्ही घालू गोळ्या....
    तूम्ही बांगड्या घालून
    लाटत बसा पोळ्या......

    ठणकावून सांगा मोदी
    आता करणार नाही माफ,
    काश्मिरकडे बघाल जरी,
    तर करून टाकू सगळ साफ

      November 11, 2016


  • इंटरनॅशनल शाळेतलं मराठी..

    इंटरनॅशनल शाळेत मराठी शिकवण्याचा अनुभव.. अमराठी मुलांचा मराठी भाषेबद्दल असलेली अढी..

      January 17, 2011