खूप शिकलेल्या व्यक्तीला पाश्चात्य देशात ‘वेल-रेड’ (खूप वाचलेला) म्हणतात. तर भारतीय संस्कृतीत बहुश्रुत (खूप ऐकलेला).
छापखान्यांची सोय नव्हती, विद्या गुरुमुखातून शिष्याला मिळायची आणि ऐकून, पाठ करूनच ती जपली जायची तेव्हाची ही संज्ञा. म्हणून विद्वान माणसाला बहुश्रुत’ म्हणत असतील कदाचित.
October 5, 2023
February 10, 2015
रघुवंश हें एक काव्यात्मक आख्यान आहे आणि ह्याची व्याप्तता फार मोठी व ह्यांत विविध तत्वं दिसून येतात जें अन्य काणत्याही समकालीन काव्यात द्र्ष्टीगोचार होत नाही.
January 25, 2011
अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये सौ. इंदिरा दास यांनी लिहिलेली ही कविता
नतमस्तक तुझ्या चरणी हे प्रभू मी सदा
बरसणार कारे सुखाचा यंदा ।।
भिजले कारे काळी माती
होतील कारे तडे हद्दपार
उगवतील कारे टपोरे मोती
बनेल शिवार हिरवे गार
नको गुरांचे हाल अन् खेळ जिवाशी औंदा
बरसणार कारे पाऊस सुखाचा यंदा...।। १ ।।
देशील कारे आनंद आमुच्याही वाटी
भरशील कारे पैशानी झोळी मोठी
नको तो अवकाळी पाऊस
नको तो गारपिटाचा मारा
नको कर्जबाजार अन् फाशीचा फंदा
बरसणार कारे पाऊस सुखाचा यंदा...।।२।।
पेरीन मी बियाणे पांघरुन काळी माती
वाढतील रोपे शेतामंदी करतील दाटी वाटी
करीन मी मशागत अन् कापणी मळणी
भरीन माझे घरकुल धानियांच्या कणग्यांनी
नको करु देवा चुराडा सपनाचा अन् नशिबाचा सौदा
बरसणार कारे पाऊस सुखाचा यंदा...।।३।।
देवानी दिल रे परी दैवानी नेलं
सौदा कराया मंदीमंदी आला दलालं
झाला दलालं शिरीमंत, मी मात्र कंगाल
फेडू कसे कर्ज आता, झालो मी हवालदिल
देवा नको हा नशिबाचा सौदा अन् दलालीचा धंदा
बरसणार कारे पाऊस सुखाचा यंदा...॥४॥
- सौ. इंदिरा दास मैत्री गार्डन, ठाणे
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मधून)
June 24, 2022
ओरिसा भुवनेश्वर येथे लिंगराज मंदिरात गणेशाची एक अत्यंत भव्य आणि सुरेख मूर्ती आहे. हा गणेश शिवाची पार्श्वदेवता म्हणून आहे. तो चतुर्भुज नागोपवीत आहे.
June 18, 2013
हे तर पुणे आहे....
September 16, 2016
“मैत्रि” हा शब्दच नुसता उच्चारला तरी मनांत एक आनंदाची लहर आल्याखेरीज राहत नाही. ज्यांनी मैत्री कधी अनुभवलीच नाही त्यांच्यासाठी हा शब्द भलेही खुपच लहान असेल पण यांच छोट्याशा शब्दांत किती तीव्रता, भव्यता दडलेली आहे, याची प्रचिती खर्या मित्रांनाच येणार.
August 31, 2010
म्हणजे आपण लिहितो १२०२३४३२ आणि याला जर कॉमा लावला तर हि सख्या दिसतांना अशी दिसेल १२,०२३,४३२.०० आणि आपल्याला हवी असते भारतीय पद्धत म्हणजे १,२०,२३,४३२.००
October 26, 2010
मयेकराच्या शकल्याचा गेल्यावर्षीच लगिन झाला. कमनशिबी पोर... बेवडो घो आणी रोज बिनकारणाचे गाळी.... रांडेच्या ५२मोडीचा आसस वरती जोताच्या काटयेचो मार.. चार दिवसापूर्वी मायेराक ईल्ला रडान आजयेक सांगी होता... तिना कायतरी मंत्र दिल्यान... तसा ताबडतोब बाजार करून घराक गेला.... आणी सांजेक घोवाबरोबर शेंगदाण्याची भाटी करूक गेला... वायच आधिच गेला जोताच्या. ऊगाच गाळी नको म्हणान घोवान जोत बांधल्यान... चार तासा फिरली वाप्यात.. आणि नांगराच्या तासात कायतरी दिसला तेका.... बघून आराडलोच.... गो रांडेच्या वाप्यात इस्वन गावलो.... बघ तरी... मरांदे ती नडणी... तू ह्यो घे आणि घराक चल पयला.... तिनसानाक भाजून ठेव....
शकला गप मासो ऊचलून पुडच्या निर्गतीक वाटेक लागला..... घो खुषीत... भरडार इस्वन गावलो मस्करी हा काय?...... तिनसाना ज्वात सोडल्यान आणि पयलो मायकडे जावन दोन क्वॉटर मारल्यान..... इस्वन आसा तर एक एक्स्ट्रा.......
ईलो आट वाजता डुलत घराक... आनी सुरवात केल्यान.... रांडेच्या जेवक वाड.... शकल्यान पिटी आणी पाल्याची भाजी समोर ठेवल्यान... बघुन भिरकाटलोच काडल्यान हसोळेची काटी आणि केल्यान पेटूक सुरवात...... बावन मोडीचा रांडेचा अक्को इस्वन आपन खाल्यान आणि माका पिटी?......
शकल्यान अक्को अवाट जमा केल्यान बोंबटान.... आणी सांगल्यान ह्यो खुळावलो हा भरडार हेका ईस्वन गावलो म्हणान सांगता... आणी मारता माका ... कंटाळलेल्या अवाटकारानी घोवाक पेट पेट पेटल्यानी... आनी गेले घराक...
शकल्यान मगे हळू घोवाक घरात नेल्यान ईस्वनाच्या भाजलेल्या तुकड्यानी भरलेला ताट पुड्यात ठेवल्यान. आणि घोवाच्या पाठीवरच्या वळांका हळद लावताना सांगल्यान माका ५२ मोडीचा म्हनतास ना?
मगे मीच पुरुन ठेवलय भरडार ईस्वन..... ही एक मोड दाखवलय... तर तुमची तर्हा बघा.... आणखी ५१ आसत, शाने आश्यात तर वापरूक लाव नको.....
आता शकला सुखान संसार करता... तसो तुमी करा.......
बापूर्झा
डॉ. बापू भोगटे
February 26, 2017
लाईफ बोट दोन प्रकारच्या असतात फ्री फॉल आणि डेव्हीट लाँच टाईप. इमर्जन्सीमध्ये मग जहाजावर लागलेली आग असो किंवा जहाज बुडत असेल अशा परिस्थितीत कॅप्टन अबँन्डड शिप म्हणून घोषणा करतो आणि सगळे जण जाऊन लाईफ बोट मध्ये बसतात. लाईफ बोट खराब हवामानात हलू नये, खाली पडू नये म्हणून जहाजावर विशिष्ट पद्धतीने हुक आणि सेफ्टी सिस्टिम लावून अडकवून ठेवलेली असते. लाईफ बोट मध्ये बसण्यापूर्वी प्रत्येकजण त्याच्या पूर्व निर्देशित ड्युटी प्रमाणे सेफ्टी सिस्टिम आणि हुक काढून बसतात. सगळे आत बसल्यावर कॅप्टन किंवा अजून एखादा जवाबदार अधिकारी लाईफ बोट मधून काढावा लागणारा शेवटचा हुक काढतो ज्यामुळे लाईफ बोट जहाजावरुन पाण्यात उतरवली जाते. फ्री फॉल लाईफ बोट पाण्यात उतरवली जात नाही, ही जहाजाच्या सगळ्यात मागील भागात असते. तिचा हुक आतून रिलीज केला की सुमारे चाळीस फुटांवरून जहाजावरील संपूर्ण क्रू सह ती खाली पाण्यात पडते. सगळ्यांसह उंचावरून पडून पाण्यात डुबकी मारून पुन्हा वर यावी अशी तिची रचना असते.
July 15, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti