सार्वजनिक वाचनालयांचे साहित्य प्रसारातील योगदान आहे का? वाचनालये लोकांपर्यंत पोहोचण्यात अपुरी पडत आहेत का?

दरवर्षी होणार्‍या साहित्य संमेलनामधील एक लोकप्रिय घटक म्हणजे विविध परिसंवाद. या परिसंवादांमध्ये वक्ते बोलतात.. श्रोते ऐकतात. पण श्रोत्यांना आपली मतं मांडण्याची संधीच कुठे उपलब्ध नसते. आपल्याला असं नाही का वाटत…. आपल्यालाही इथं संधी मिळावी? अनेकांना वाटतंही. पण सांगणार कोणाला?

प्रत्यक्ष संमेलनाच्या व्यासपीठावर नाही तर नाही.. पण निदान आपल्या मराठीसृष्टीद्वारे हजारो वाचकांपर्यंत ही मतं मांडण्याची सोय आता उपलब्ध आहे. आपली ही मतं आम्ही थेट पोहोचवणार आहोत संमेलनाच्या आयोजकांपर्यंत.. आणि पर्यायाने या परिसंवादांच्या वक्त्यांपर्यंतही…



ठाणे येथे होणार्‍या ८४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने……….परिसंवादाचा विषय: सार्वजनिक वाचनालयांचे साहित्य प्रसारातील योगदान आहे का? वाचनालये लोकांपर्यंत पोहोचण्यात अपुरी पडत आहेत का?

राज्यभरात जवळपास प्रत्येक महत्त्वाच्या गावात सार्वजनिक वाचनालये आहेतच. या वाचनालयांची संख्या किती? त्यात पुस्तके किती? या वाचनालयांकडून साहित्य प्रसारासाठी

काही उपक्रम आयोजित होतात का?

वाचनालयात साहित्यिक कितीदा भेटी देतात? या सगळ्याचा विचार केल्यवर आपल्याला असे वाटते का क ही सार्वजनिक वाचनायले खरोखरंच लोकांपर्यंत साहित्य पोहोचवण्यात यशस्वी झाली आहेत?

याच विषयावर ठाणे येथे डिसेंबर २०१० मध्ये होत असलेल्या ८४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात एक परिसंवाद होणार आहे. आपलेही या विषयावर काही मत असेल आणि आपल्यालाही ते लोकांसमोर

मांडायचे असेल. ही सोय आता आपल्याला उपलब्ध आहे. आपले मत खुशाल मोकळेपणाने मांडा. ते परिसंवादाच्या वक्त्यांपर्यंत पोहोचवले जाईल.

— परिसंवाद

Author