(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • वळून पहा

     .

      November 1, 2013


  • विठोबा

    वर्षं किती भराभर जातात ना?दिवस तर एकामागून एक नुसते पळतच असतात…!आत्ताआत्ता पर्यंत माझे चारही नातू एवढाल्लेसे होते…बघता बघता चौघेही किती मोठ्ठे झाले..पिल्लं घरट्यातून कधी उडून गेली ते कळलंच नाही.

      July 28, 2023


  • झाड म्हणालं…

    पूर्वी अंगण मोठे असायचे. त्यात मुलांना खेळण्यासाठी जागा असायची. विशेष म्हणजे अंगणभर पुरेल अशी सावली देणारं मोठं झाडही असायचं. आजीच्या संगतीनं नातवंड झाडाखाली बसुन अनेक गोष्टी ऐकत बसायचे. ते बालपण खरच मोठे गमतीशीर आणि नशीबवान होतं.. असो…

    अंगणातून रस्त्यावर आलेल्या आणि नंतर बोन्साय बनुन घराच्या गॅलरीत आलेल्या झाडाची स्वत:ची एक कहाणी असेल का? असू शकते ना? तर अंगणातलं हे झाड बोलू लागलं, म्हणालं, मलापण जरा बोलू द्या, खुप दिवस झाले कुऱ्हाडीचे घाव मुकपणाने सोसुन. आता बोललं पाहिजे….

    जमिनीत रुजलेलं माझं बालपण अंकुरलं…. बहरलं… आणि वाढलं… उन, वारा, पाऊस अंगावर झेलतं वाढत होतं, फांद्यांचं फुटणं आणि पानांच बहरणं अनुभवलं होतं मी. जमिनीपासुन जरी उंच होत असलो तरी मुठीत माती घट्ट धरलेली होती. कधी सोडली नाही मातीची साथ. फांद्या फोफावू लागल्या, पानं बहरू लागली… मस्ती होती वाढण्याची.. जगण्याची. अशातच एक दिवस एक चिमणी उडत अलगद येऊन बसली माझ्या खांद्यावर… तिचा चिवचिवाट लोभस वाटू लागला, ऐकत रहावासा वाटू लागला. थोड्यावेळाने तिचा जोडीदारही आला. तसे क्षणभरात दोघेही उडाले.. थोड्या वेळाने दोघे परत आले. दोघांच्या चोचीत काड्या होत्या, घरटे बांधण्यासाठी. माझ्याच एका फांदीवर त्यांनी घरटं बांधलं. त्यांच चिवचिवणं मला रोज ऐकायला मिळेल हे पाहुन मनोमन समाधान वाटलं. चिमणा-चिमणीचा संसार बहरला… फुलला..

    माझ्या फांद्यां पसरत होत्या, तशी माझी सावलीही वाढत होती. या सावलीत अनेक प्रकारची माणसे येऊन बसत होती. त्यांच्या गप्पांचे विषयही वेगवेगळे असायचे. काही खलबतेही करत रात्री बसुन माझ्या आडोशाला. काही रचत डाव, माणसांचे पाय ओढण्याचे. मी मात्र सारे जाणुनही गप्प असायचो. सगळं साठवून ठेवलंय आतल्या आत…

    पुढे दिवस पालटत गेले, वातावरणात बदल होत गेले. तसे माझ्यातही बदल होऊ लागले. पानगळीचा मोसम सुरू झाला. माझ्याच अंगाचा भाग असलेली पानं मला सोडून जाऊ लागली. ज्यांच्या असण्यानं माझ्या सौदर्यांत भर पडत होती ते मला सोडून जाऊ लागले होते, त्यांचं हिरवेपण जाऊन शुष्कता आली होती. वाऱ्याच्या झुळूकीबरोबर ती माझ्यापासुन दूर जाऊन पडत होती. त्यांच्या दुरावण्याचं दु:ख होतं. पण जुनं गेल्यावरच नव्याला जागा मिळते हे मी जाणत होतो… त्यामुळे हे दु:ख क्षणभराचं होतं. ऋतू बदलला तशी नवी, हवीहवीशी कोवळी पानं पुन्हा माझ्या फांद्यांमधुन उमलू लागली. सृजनाच्या या सोहळ्याचं वर्णन तरी कसे करणार…

    हे सारं चांगलं चाललेलं असताना, कुणाची नजर लागली कुणास ठाऊक? खांद्यावर कुऱ्हाडी घेऊन आलेल्या दोघांनी कशाचीही तमा न बाळगता थेट घाव घातला माझ्या हृदयावर… असंख्य वेदनांची त्सुनामी शरीरभर पसरली… वेदनेचा हुंकार पसरला… पण तो कुणाला ऐकू जाणार होता…!

    कोण ऐकणार होत…!

    दिनेश दीक्षित, जळगाव (९४०४९५५२४५)

      May 12, 2019


  • सेंद्रिय शेती आणि फायदे

    कृषिप्रधान देश म्हणून भारताला सर्व जगात ओळखले जाते. देशानी कृषी तंत्रज्ञान आणि संशोधनात चांगलीच प्रगती केली आहे. बऱ्याच राज्यात कृषीविद्यापीठे उभारून कृषी व्यवस्थापनाचा दर्जा व्यवसायाभिमुक करण्याचा प्रयत्न चालू आहे. यावरून भारताची कृषीक्षेत्रातील वाटचाल बऱ्याच प्रमाणात स्वालंबी होण्याच्या दिशेने होत आहे. आणि हा एक चांगला मापदंड आहे !

      February 10, 2014


  • सांग सांग भोलानाथ……!!!

     

      August 7, 2013


  • आशियातील पूल – हावडा ब्रिज

    भारतातील हावडा ब्रिज

      December 10, 2012


  • जमली गट्टी

    चाफा बोलेना ….. या गाण्याच्या चालीवर रचलेली ही कविता…..

      November 15, 2010


  • मोतियाचे प्रकाशमान कंदील

    श्रावण संपला की पाठोपाठ सणाचा मौसम सुरु होतो. गणपती, नवरात्री आणि मग सगळ्यांचा आवडता सण दिवाळी.

    दिवाळी म्हटली की त्याच्यासोबत दिवे, पणत्या, आकाशकंदील या सगळ्या वस्तू येतातच. थर्माकोल, कागद, प्लास्टिक या निसर्गाला हानी पोहोचवणाऱ्या आकाश कंदिलांपेक्षा वेगळ्या वस्तू वापरून त्याचे आकर्षक आकाश कंदील बनवण्याचा निर्णय घेतला विलेपार्ले येथील नंदिनी जोशी यांनी.

    २०१४ च्या डिसेंबरमध्ये एका ठिकाणी नंदिनी यांनी मोत्याचे छोटे कंदील बघितले. त्यानंतर लगेचच त्यांनी अशा प्रकारचे मोठ्या आकारातले कंदील बनवायला सुरुवात केली. बघता बघता आठ महिन्यात त्यांनी २०० कंदील बनवून पूर्ण केले. त्यापैकी अनेक कंदील विकलेसुद्धा गेले.

    पहिला कंदील बनवायला नंदिनी जोशी यांना एक महिना लागला. त्याचा आकार कसा वाढवावा, एखादं डिझाईन त्या कंदिलात कसं बसवावं हे समजून
    घेण्यात महिना गेला. त्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून बघितलं नाही. त्यांच्या काही मैत्रिणींनीसुद्धा यात रस दाखवला. नंदिनी यांनी स्वत:
    त्या मैत्रिणींना ही कला शिकवली आणि आज त्यांच्या मैत्रिणींचा ग्रुप तयार झाला आहे. या सगळ्यांनी मिळून गेल्या काही महिन्यांत शेकडो कंदील बनवले असून त्यातले अनेक कंदील दिवाळीच्या आधीच विकले गेले आहेत.

    या आकाश कंदिलासाठी वापरलेल्या वस्तू जितक्या भन्नाट तितक्याच याच्या डिझाईन्ससुद्धा भन्नाट असतात. विमान, मासा, हंस, गोल, षटूकोन
    असे अनेक निराळे आणि भन्नाट आकार या आकाश कंदिलात बघायला मिळतात.

    आकाश कंदिलासारख्या कलात्मक प्रकारातली त्यांची ही भरारी खरोखरच प्रेरणादायी आहे.

      October 4, 2017


  • परसबाग

    फलभाज्या, पालेभाज्या ताज्या आणि स्वस्त मिळण्याचे दिवस आता संपले. तुमच्या छोट्याश्या अंगणातून तुम्हाला रोज लागणाऱ्या भाज्या ताज्या आणि स्वस्तात सहज मिळवता येतील.

    बाग म्हटली म्हणजे ती लहान असो, मोठी असो, त्यातून मिळणारा आनंद काही वेगळाच असतो. बागेची आवड नसणारे क्वचितच सापडतात. छोटेसे घरकुल त्याभोवती बाग असली की घराला काही वेगळेच स्वरूप येते. आवड आहे. पण जागा नाही आणि जागा आहे पण आवड नाही. असे खूप ठिकाणी आढळते. बागेची आवड असणारे मात्र डबे, बाटल्या, कुंड्यातून हे परमेश्वरांचे रूप जगवण्याचा प्रयत्न करतात. माणसांप्रमाणे झाडांतही जीव आहे. आपण झाडांवर प्रेम केल्यास ते त्याचा पुरेपूर मोबदला देते. या विषयांवर लिहावयाचे म्हटले तर खूप आहे. पण आपण नियमीत लागणाऱ्या भाज्यांचा विचार करू ऋतुमानानुसार बागेतील लागडीतही बदल करावा लागतो. हिवाळ्यात कोबी, फ्लॉवर, नवलकोल, मुळा, गाजर, टोमेटो यासारख्या भाज्या लावतात. पावसाळ्यात दोडकी, पडवळ, घोसाळी, काकडी, श्रावणघेवडा, पापडी, गवार, भेंडी, वांगी, इत्यादी तर उन्हाळ्यात भेंडी, गवार, श्रावणघेवडा, कलिंगड, इत्यादी भाज्या काढता येतात.

    बागेची आणखी माहिती
    दिवसातून एकदातरी झाडांजवळ जाऊन त्यांची मुलांप्रमाणे नीट देखभाल करावी. बाग म्हटली कि आपल्याला अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. त्यात प्रामुख्याने जमीन, भाज्यांचे प्रकार, सुशोभन, जमिनीचे क्षेत्रफळ आणी स्वतःला असलेली बागेची आवड ह्या गोष्टींचा विचार करावा लागतो. ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच नंतर बागेची व्यवस्थित आखणी करावी. जमीन कशी आहे, ह्यावर झाडाचे आयुष्य अवलंबून असते. जमीन मुरमाड, चिकट, चुनखडीची -कशी आहे ते पाहावे. जमीन दोनचार वेळा चांगली खणून घ्यावी. त्यातील दगड वेचून काढावे. नंतर शेणखत, नीमपेंड टाकून जमीन चांगली खुरसावी व सगळीकडे सपाट करावी. जमीनीत कोठेही खाचखळगा राहू देऊ नये. बागेत स्वच्छता ठेवणे हे महत्त्वाचे आहे. हे सर्व प्रथम थोडे खर्चाचे होते. परंतु नंतर मात्र ते फायद्याचे ठरते.

    झाडांची निवड झाडांची आखणी घरांच्या पुढील भागात शक्यतो फुलझाडे सीझन फ्लॉवर्स लावावी. मोगरा, जास्वंद, तगर, कर्दळ, शेवंती वगैरे, कारण यांची निगा फार राखावी लागत नाही. या प्रकारातील फुले देवाला चालणारी आहेत. या झाडांना पाणी रोज द्यावे लागत नाही. औषध मारावे लागत नाही. आठ पंधरा दिवसांनी मात्र झाडांची आळी खुरपावी. त्यात थोडासा युरिया घालावा. झाड वाढतांना एक गोष्ट मात्र जरूर लक्षात ठेवावी. झाड कोठेही, कसेही वाढते. तेव्हा त्याला आकार देऊन ते व्यवस्थित ठेवणे हे महत्त्वाचे आहे. झाडाला आकार देणे हे फुलझाडे, फळझाडे, सर्वांना लागू आहे. एकदा फुले किंवा फळे येऊन गेलेली फांदी निकामी होते. ती जर छाटली तर त्याला नवीन फुटी येतात आणि फुलाफळांचा बहर हा दुप्पट वाढतो. काही जर छाटली नाही तर ती खुरडीच राहाते.

    कोणत्या भाज्या लावणे सोयीचे ?
    एका कुटुंबाला वांगी, मिरच्या कढीलिंब, कोथिंबीर, आळू, टोमॅटो, लिंबू, पालेभाज्या इत्यादी भाज्यांची आवश्यकता असते. छोट्या कुटुंबाला चार ते सहा, वाग्यांची व मिरच्यांची झाडे, एक कढीलिंबाचे, एक लिंबाचे, एक दोन केळीची, केळीच्या खाली अळूची झाडे असल्यास पुरेशी होतात. वांच्याच्या झाडाभोवतीच्या आळ्यावर कोथिंबीर, मेथी किंवा मुळा ह्यांसारख्या पालेभाज्या घ्याव्यात. चने व मेथी दर आठवड्याला टाकली तर नियमित पणे मिळते. मिरची व वांगी यांची झाडे वर्षभर टिकणारी आहेत त्यामुळे त्यांच्या आळ्यांवर पालेबाजी होऊ शकते. ह्या झाडांवरील पीक निघून गेल्यावर त्या झाडांना छाटून टाकावे. थोडेसे खत घालावे. म्हणजे नवीन बहर येतो. लिंबाचे झाड थोडे मोठे होते. त्यामुळे जागा असली तर ते लावावे कढीलिंब कुंडीतही होऊ शकतो. भोपळा व वेलभाज्या हे घरावर, गॅलीवर चढवून त्याचे पीक घेता येते. तोंडली कंपाऊंडच्या तारेवरही होऊ शकतात. अर्थात हे मात्र शेजाऱ्यावर अवलंबून आहे.

    स्वकष्टाच्या भाजीची चव आगळीच
    हे सर्व कागदावर लिहिणे सोपे आहे. परंतु प्रत्यक्ष करताना मात्र थोडे अवघड आहे. थोडे समजू लागले की मग त्याच्यासारखा दुसरा आनंद नाही. एकदा स्वतःच्या बागेतील भाजी खावयाची सवय झाली की मग बाजारातील भाजी शिळी, जून असे उद्गार तोंडावाटे नकळत बाहेर पडतात हे सर्व करताना लागणारे कष्ट, खत, बियाणे, मिळणारे उत्पन्न ह्याचा विचार करावा. भाजी विकत आणली असे समजून त्याचे पैसे पेटीत टाकावे. म्हणजे त्यापैशातच झाडांसाठी लागणारे कत, औषधे यांचा खर्च पुरा होतो की नाही, हे कळून येते. घरात निघणारा भाजीचा कचरा, उष्टे खरकटे, पालापाचोळा हा वाया न घालवता तो ३ बाय ३ बाय ३ फूटांचा खड्डा करून त्यात टाकावा. ह्याचे सुंदर कंपोष्ट खत तयार होते. त्यामुळे आपल्यला कचरा लांबवर न्यावा लागत नाही. व घाणही येत नाही. ह्यासाठी घरामागील कोणताही कोपरा निवडला तरी चालेल.

    गवार, भेंडी, श्रावणघेवडा अशा भाज्याचे बियाणे जागेवरच लावावे. वांगी, मिरची, टोमॅटो, कोबी फ्लॉवर अशा भाज्यांची रोपे गादी वाफ्यात करावी. ही रोपे तयार होईपर्यंत जागा मशागत करून, खत टाकून तयार ठेवावी रोपे तयार होण्यास साधारणपणे ३० दिवस लागतात. वेलीभाज्या लावल्यानंतर त्या एक महिन्यात मांड्यावर जातात. भाज्यांची रोपे किंवा बिया लावल्यानंतर १५ दिवसांनी त्याला तीन बोटात राहील एवढा युरिया, झाडाभोवती चार बोटांचे अंतर ठेवून, सर्कल करून टाकावा म्हणजे झाडाची वाढ लवकर होते. नंतर १५ दिवसांनी थोडे मिश्र खत संपूर्णावरील पद्धतीनेच एक टेबलस्पून घालणे. थोडे दिवसांणी परत झाडाची खुरपणी करून हा वरखताचा डोस द्यावा. नंतर मात्र खत घालू नये. झाडे लावण्यापूर्वी जमीनीत शेणखत किंवा कंपोस्टखत मिसळावे. वरखतांमध्ये सुफला. संपूर्णा पोटॅश किंवा युरिया यासारखी खते येतात.

    औषधे वापरल्यास नियमित दोन औषधांचा वापर करावा. औषध दर आठवड्याला नियमितपणे मारावे. ह्यासाठी सोपा उपाय म्हणजे शेणीची राख भुरभुरावी, तंबाखूचे पाणी , गोमूत्र ह्याचा पंपाने स्प्रे करावा. म्हणजे औषधापासून होणारा त्रास वाचेल. परंतु जर अगदीच इलाज चालला नाही तर मात्र रोगोर किंवा मॅलेथीऑन वापरावे किंवा कोरडे गंधक वापरावे. सध्याच्या दिवसात बाजारात मिळणाऱ्या भाज्या अतिशय महाग तर असतातच शिवाय त्या शिळ्या सडक्या, जूनही असतात. ताज्या भाज्या मिळणं हा एक आनंद आहे आणि ताज्या भाज्या खाणं हे आरोग्याच्या दृष्टीनं आवश्यकही अहे. तेव्हा आपल्या छोट्याशा परसात चारदोन प्रकारच्या भाज्या लावल्यात तर हा आनंद आणि आरोग्य तुम्हाला निश्चितच मिळत राहील.

      April 10, 2017


  • कुत्र्याला नशेची दीक्षा (नशायात्रा – भाग २० )

    मला लहानपणासून कुत्रा हा प्राणी फार आवडतो , रेल्वे क्वार्टर्स मध्ये रहात असताना शाळेतून येताना एखादे छान गोंडस कुत्र्याचे पिल्लू रस्त्यावर दिसले की लगेच ते घरी घेऊन येत असे आधी आई -वडिलांचा स्पष्ट नकार , मग माझा हट्ट , रडणे वगैरे सोपस्कार झाले की शेवटी नाईलाजाने ते कुत्रा घरात ठेऊन घेण्यास परवानगी देत .

      February 20, 2020