न - नको
शी – शी असलेली गोष्ट
ब - बदला
(नशीब म्हणजे, “नकोशी असलेली गोष्ट” बदलणे होय”)
April 30, 2015
एक होता आंधळा. एक होता पांगळा. दोघेही एका देवळासमोर भिक मागत असत. अगदी सुरवातीला त्यांच्यात सख्य नव्हते. दोघेही वेगवेगळे बसून भिक्षा मागत. आंधळ्याला डोळे नसल्यामुळे लोक भिक्षा घालत. आंधळा अंदाजाने भिक्षा मोजत असे. पांगळा एकाच ठिकाणी बसून असे. त्याला भिक्षा कमी मिळे.
एके दिवशी पांगळा आंधळ्याला म्हणाला, आपण एकत्र भिक्षा मागू. त्यामुळे आपल्या दोघांचा फायदा नक्की होईल. तू मला उचलून घे. मी तुला कुठे जायचे ते सांगीन.
आंधळ्यांने मान्य केले. त्याने पांगळ्याला आपल्या खांद्यावर घेतला. दोघे मिळून भिक्षा मागू लागले. भिक्षा भरपूर मिळू लागली. आंधळा खुश झाला.
असे काही दिवस गेले. एकंदर दोघांचे बरे चालले होते. पण चालताना आंधळ्याला पांगळा जरा जड वाटू लागला. पांगळा चांगलाच तब्बेतीने सुधारत होता. आंधळ्याला संशय आला. आपल्याला दिसत नाही याचा फायदा तर हा पांगळा घेत नाही ना? आंधळा बैचेन झाला. कधी एकदा खांद्यावर घेतलेला पांगळा फेकून देतोय असे त्याला झाले. पण पांगळा आता आंधळ्याच्या खांद्यावरून उतरायला तयार नाही.
सहन होत नाही आणि सांगताही येत नाही .....काय करावे बरे आंधळ्याने ?
-- चिंतामणी कारखानीस
February 24, 2016
कॉलेजमध्ये असताना अर्थशास्त्राच्या अभ्यासाच्या वेळी हमखास ऐकावं लागायचं – पारलौकिक जीवनाला अतिमहत्त्व दिल्यामुळे भारतातील लोक ऐहिक उन्नती करू शकत नाहीत. भारत अविकसित राहण्याचं हे एक कारण मानलं जातं. अनिच्छेनं हे लिहावं लागायचं, पण मन हे स्वीकारायचं नाही.
November 23, 2023
लहान मुले व वृद्धांसाठी पौष्टिक खाऊ
June 10, 2010
त्याची मातृभाषा नेपाळी. तो नेपाळहून महाराष्ट्रात येतो. आई देवाघरी गेलेली. वडील गुरखा म्हणून रात्रभर जागत. गावात पहारा देत. लोकांना जागवत. एक भाऊ पाठीशी. तो जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत शिक्षण घेतो. गावातील व्यापारी , शिक्षक त्यांना मदत करतात. माणुसकी जपतात. मराठी भाषा उत्तम बोलतो. पुढे तो इंजिनीयर होतो. पुण्यामध्ये स्वत:चे वर्कशॉप चालवतो. जगण्यासाठी धडपड करतो. आता ते दोघेही भाऊ परदेशात काम करतात.
बालपणी आम्ही दोघे एकाच वर्गात होतो. गावाकडून माझा डबा यायचा. मनसोक्त जेवायचे. तलावात पोहायला जायचे असा दिनक्रम. आंतरराष्ट्रीय, अनभिज्ञ, विषयावर तो बोलायचा. उत्सुकतेने आम्ही ऐकायचो. आम्ही घडत होतो. तो आम्हास घडवत होता.
कलाटणी देणारा हा मित्र होता. भीमबहादूर लालबहादूर बम असे त्याचे नाव. त्याची मातृभाषा मराठी नसतानाही या विषयात त्याला सर्वात जास्त गुण दहावीच्या परीक्षेत मिळाले.
तीसेक वर्षांपूर्वीच्या त्याच्या सहवासातील अनेक आठवणी ताज्या आहेत. पहाटे दोन-तीन वाजेपर्यंत अभ्यास असायचा. कष्ट घेऊन, परिस्थितीशी झगडणे, यश संपादन करणे हे गुण त्याच्याकडून शिकायला मला मिळाले. शिकण्यासारखे त्याच्याजवळ भरपूर होते. त्यांचे वडील आजमितीस हयात नाहीत. माणसं आठवणी ठेवून जातात कुठे? हा निरुत्तर करणारा प्रश्न. आता त्यांची भेट नाही; पण माणूस सहवासात घडतो, तो सहवास आम्हाला लाभला.
विठ्ठल जाधव
शिरूरकासार, बीड
November 8, 2016
ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांचा रीमा लागू यांच्याबद्दलचा हा लेख
May 18, 2017
November 20, 2018
घरटे उडते वादळात
बिळा, वारूळात पाणी शिरते
कोणती मुंगी ? कोणतं पाखरू ?
म्हणून आत्महत्या करते ?
प्रतिकुल परिस्थितीत ही वाघ लाचारीने जगत नाही
शिकार मिळाली नाही म्हणून
कधीच अनूदान मागत नाही
घरकुला साठी मुंगी
करत नाही अर्ज
स्वतःच उभारते वारूळ
कोण देतो गृहकर्ज ?
हात नाहीत सुगरणी ला
फक्त चोच घेउन जगते
स्वतःच विणते घरटे छान
कोणतं पॅकेज मागते ?
कुणीही नाही पाठी
तरी तक्रार नाही ओठी
निवेदन घेउन चिमणी
फिरते का कोणत्या योजनेसाठी ?
घरधन्याच्या संरक्षणाला
धाऊन येतो कुत्रा
लाईफ इन्शुरन्स काढला का ?
अस विचारत नाही मित्रा
राब राब राबून बैल
कमाउन धन देतात
सांगा बरं कुणाकडून
ते निवृत्ती वेतन घेतात ?
कष्टकर्याची जात आपली
आपणही हे शिकलं पाहिजे
पिंपळाच्या रोपा सारखं
पाषाणावर टिकलं पाहिजे
कोण करतो सांगा त्यांना
पुरस्काराने सन्मानित
तरीही मोर फुलवतो पिसारा
अन कोकिळ गाते मंजुळ गीत
मधमाशीची दृष्टी ठेव
फुलांची काही कमी नाही
मधाच्या पोळ्यासाठी मित्रा
कोणतीच रोजगार हमी नाही
घाबरू नको कर्जाला
भय, चिंता फासावर टांग
जिव एवढा स्वस्त नाही
सावकाराला ठणकाऊण सांग
काळ्या आईचा लेक कधी
संकटापुढे झुकला का ?
कितीही तापला सुर्य तरी
समुद्र कधी सुकला का ?
निर्धाराच्या वाटेवर
टाक निर्भीडपणे पाय
तु फक्त विश्वास ठेव
पुन्हा सुगी देईल धरणी माय
निर्धाराने जिंकु आपण
पुन्हा यशाचा गड
आयुष्याची लढाई
फक्त हिमतीने लढ
फक्त हिमतीने लढ
!! आवडली तर इतरांनाही पाठवा !!
ऍड. अनंत खेळकर,
अकोला
September 14, 2016
March 1, 2014
ज्यावेळी कुठलेही भाव सरकार वाढवते त्याची अंमलबजावणी ताबडतोब होते. म्हणजे हेच आपले सरकार भ्रष्टाचार करायला मदतच करते. आता कसे
June 27, 2011
Copyright © 2025 | Marathisrushti