सांगली जिल्ह्यातील विटा (ता. खानापूर) येथे विजयादशमी दिवशी देवांच्या पालखी शर्यतीचे आयोजन केले जाते. गेल्या १५० वर्षांची परंपरा असलेल्या देवांच्या या पालखी शर्यती संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहेत. विट्यातील श्री रेवणसिद्ध व मूळस्थान श्री रेवणसिद्ध या दोन देवांच्या पालखी शर्यती येथील विजयादशमीचे (दसरा) खास आकर्षण आहे.
दसऱ्याच्या दिवशी मूळस्थानी श्री रेवणसिद्ध देवाची पालखी विट्यातील श्री भैरवनाथ मंदिरात येते. मूळस्थान रेवणसिद्ध व विटा येथील श्री रेवणसिद्ध या दोन पालख्यांची आरती झाल्यानंतर देवाच्या सासनकाठ्या, देवांना वारे घालणाऱ्या चवऱ्या, आबदागिरी, चांदीच्या काठ्या, लाल छत्र्या, हलगी व डिमडीच्या निनादात या पालख्या शर्यतीसाठी सज्ज होतात. या दोन्ही पालख्यात देवांचा मुखवटा ठेवलेला असतो. काळेश्वर मंदिराजवळ पालख्या येतात. पालख्या शर्यतीसाठी सोडण्याचा मान विठ्ठल (आबा) पाटील यांच्या कुटुंबाकडे आहे. त्यावेळी मूळस्थानची पालखी पाहुणी असल्याने या पालखीला पाच पाऊले पुढे थांबण्याचा मान दिला जातो. त्यानंतर उजव्या बाजूला मूळस्थानचे नागरिक तर डाव्या बाजूला विटेकर नागरिक पालखी घेऊन धावण्यासाठी सज्ज होतात.
विजयादशमी दिवशी सायंकाळी 5 वाजता या दोन देवांच्या पालखींची शर्यत सुरु होते. काळेश्वर मंदिर ते खानापूर रस्त्यावरील शिलंगण मैदान हे सुमारे एक ते दीड कि.मी. अंतर कापण्यासाठी पालखीचे खांदेकरी आपले कौशल्य पणाला लावतात. शिवाजी चौक, बसस्थानकमार्गे या पालख्या शिलंगण मैदानाकडे धावतात. त्यावेळी रस्त्यात काही ठिकाणी विटेकर तर काही ठिकाणी मूळस्थान सुळेवाडीचे नागरिक विरोधी बाजूची पालखी अडविण्याचा प्रयत्न करतात. परंतु, त्यातून सुटका करुन घेत या दोन्ही पालख्या शिलंगण मैदानाकडे धाव घेतात. या मैदानात प्रथम पोहोचलेली पालखी विजयी घोषित केली जाते. त्यानंतर पाठीमागून श्री भैरवनाथ, श्री म्हसवडसिद्ध व श्री भैरोबा या देवांच्या पालख्या शिलंगण मैदानात जातात. त्याठिकाणी सीमोल्लंघनाचा कार्यक्रम होतो. आपट्यांची पाने (सोने) देऊन नागरिक एकमेकांना शुभेच्छा देतात.
विजयादशमी दिवशी देवांच्या पालख्या पळविण्याच्या शर्यतीची परंपरा विटेकरांनी गेल्या 150 वर्षांपासून जोपासली आहे. जात, पात, धर्म, गट-तट आणि राजकारणाच्या भिंती भेदून विटेकर नागरिक ही पालखी शर्यत यशस्वीरित्या पार पाडून जातीय सलोखा कायम ठेवण्यासाठी आजही प्रयत्नशील आहेत. विजयादशमी दिवशी सांगली जिल्ह्यातील विटा शहरात जोपासलेली देवांच्या पालखी शर्यतीची परंपरा महाराष्ट्रात आजही सुप्रसिद्ध आहे. या शर्यती पाहण्यासाठी राज्यातून लाखो भाविक हजेरी लावतात.
(-- `महान्यूज' मधील दिलीप मोहिते, विटा यांच्या लेखावर आधारित. )
October 23, 2015
सूर्याचा अंत!
August 17, 2010
औरंगाबादपासून अवघ्या २२ कि.मी.वर वेरूळ हे गाव असून तेथे लक्षविनायकाचे मंदिर आहे.
October 9, 2012
काँग्रेसी सरकार भ्रष्ट होते म्हणून मोदींचे सरकार निवडून दिले. त्याच्याही प्रत्येक निर्णयावर कथित बुद्धीजीवी तुटून पडताहेत.
आपण खरं म्हणजे खुश राहण्याची आपली क्षमता गमावून बसलोय. आपली सहनशक्ती जवळपास संपत आलीय. एखादा निर्णय झाल्याबरोबर त्याचे चांगले - वाईट परिणाम दिसण्याआधीच टीकेची झोड उठवली जाते. याच कारणांमुळे बर्याच नेत्यांनी कुठलाही निर्णय घेण्याची उत्सुकता दाखवली नाही. हा व्यक्ती किमान काही निर्णय घेवून काही जनताभिमुख सुधारणा आणण्याचा प्रयत्न तरी करतोय तर बुद्धीजिवी लोक विनाकारण भ्रष्टाचारी लोकांना अनावधानाने का असेना साथ देताना दिसताय. भ्रष्टाचारी लोकांना तर मोदी नकोच आहे.
पण इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे की, मोदी स्वतः पैसे खात नाही कुणाला खाऊ देत नाही. त्या माणसाने १२ वर्षे गुजरातचे नेतृत्व केले. विकासात पिछडलेला गुजरात सर्वात पुढे नेवून ठेवला. आज प्रत्यक्ष जावून बघा गुजरात मध्ये रस्ते आणि इतर प्राथमिक सुविधा इतर राज्यांच्या तुलनेत किती चांगल्या आहेत.
आता पंतप्रधान असतानाही तो व्यक्ती १४-१६ तास काम करतो, विदेश दौऱ्यात हॉटेलात न थांबता विमानात झोप घेतो, त्याने अडिच वर्षात सुटी घेतलेली नाही, त्याच्यावर कुठलाच व्यवहारात पैसे खाल्ल्याचा साधा आरोप नाही, स्वतःच्या किंवा कुणा नातलगाच्या नावे मालमत्ता घेतल्याचे आढळलेले नाही, कुठलाही नातेवाईक लाभाच्या पदावर नाही, मंत्रिमंडळात निवडून शक्य तेवढे जादा प्रामाणिक लोक नेमलेले आहेत. सगळे नातेवाईक चरितार्थासाठी १०-१५ वर्षापूर्वी करीत होते तिच नोकरी व व्यवसाय करताहेत, त्यांच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय बदल दिसत नाही. असं यापूर्वी भारतात घडल्याचं मला तरी माहीत नाही, तरी आपण अशा व्यक्तीच्या प्रत्येक निर्णयावर तुटून पडत राहिलो तर आपण चांगला म्हणणार कुणाला?
आपण खुश आणि समाधानी कशाने होणार ? प्रत्यक्ष राम, कृष्ण किंवा शिवाजी जरी पंतप्रधान झाले तरी आपण टीकाच करणार का ? निर्णय घेताच चांगले-वाईट परिणाम दिसण्याआधीच टीका. उलट मी तर म्हणतो जनतेसाठी काहितरी करण्याची तळमळ असलेल्या अशा माणसाचा एखादा निर्णय चुकला तरी त्याच्या पाठिशी ठाम रहायला हवे, असे केले नाही तर भविष्यात कोणताही नेता जनकल्याणाच्या गोष्टीसुध्दा करणार नाही. सत्ता मिळाली की आपल्याच सात पिढ्यांचे कल्याण करुन मोकळा होईल. आजही ९९ टक्के लोक तेच करताहेत.
पण मध्यमवर्गीय बुध्दीजीवी लोकांनी आपली विचारसरणी बदलली नाही तर लवकरच पुन्हा परकिय राजवट किंवा असामाजिक विचारांचे लोक सत्ता बळकावून देशाचा बट्ट्याबोळ केल्याशिवाय राहणार नाहीत. धन्यवाद !
लेखक - डॉ. विवेक उपासनी, जळगाव.
[ कृपया लेख लेखकाच्या नावासह फॉरवर्ड करावा ]
November 21, 2016
भाद्रपद कृष्ण पक्षाला पितृपक्ष, महालय पक्ष असे म्हणतात. प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत महालय केला जातो. हा पक्ष पितृकार्याला अत्यंत योग्य आहे असे शास्त्रात सांगितले आहे.
October 9, 2012
वर्धा जिल्हा जसा गांधीजी आणि विनोबा भावे यांच्या नावाने ओळखला जातो तसाच तो येथील वन वैविध्यामुळे ओळखला जातो. यात प्रमुख आहे तो बोर अभयारण्य प्रकल्प.बोरला जायचे ठरविले अन तयारीला लागलो.
October 22, 2010
महाराष्ट्र २४ तास हे एक वेबपोर्टल आणि ऍंड्रॉइड ऍप्स आहे. विश्वातील ताज्या घडामोडी आणि विश्वकल्याणकारी विचार लोकांच्या घराघरात पोहोचविण्यासाठी व जनमानसातील विचारांना सकारात्मक दृष्टिकोन देण्यासाठी “महाराष्ट्र २४ तास” सज्ज झाले आहे.
November 19, 2013
पूर्वी आपल्याकडे विश्वाच्या सुख-शांती आणि कल्याणासाठी विविध यज्ञ केले जात. आज या यज्ञांविषयी उपेक्षेने बोलले जात असले तरी नासासारख्या जगन्मान्य संशोधन संस्थेने यज्ञांबाबत संशोधन केले आहे. त्या संशोधनानुसार यज्ञामुळे त्या परिसरातील हवेतील विषाणू व जिवाणू नष्ट होऊन वातावरणशुद्धी होते. यज्ञामध्ये धूप, वनस्पती, औषधी इ.ची किती प्रमाणात आहुती दिली. यावर यज्ञाचे कार्यक्षेत्र किती मोठे असेल ते ठरते.
March 20, 2010
November 4, 2018
बरेच विद्यार्थी प्रेमप्रकरणामुळे ग्रासलेले दिसतात तर काही इतर कारणांमुळे...
मित्रानो एक सांगावस वाटते प्रेम करा पण अभ्यासावर करा.पोस्ट मिळण्यावर प्रेम करा. सद्या Girlfriend आणि Boyfriend जसे आठवड्याचे वार बदलतात त्याप्रमाणे बद्दलतांना दिसतात. पैसा आहे तोपर्यंत तुमच्याकडे Gf आहे. किंवा तुमच्यापेक्षा जास्त चांगला मिळाला की तुम्ही मग गेले कचराकुंडीत, आज 1 उद्या 2 रा, परवा 3 रा.....हि सध्या fashion चालली.काय काय वचन, जिने मरणे के साथ, janu काय , उल्लू काय, पिल्लू काय आणि काय काय सोंग सुरु असतात .लग्न करेल तर तुझ्याशीच, पण वेळ आली आणि थोडं का तुमचं आणि तीच खटकलं कि महाभारताच्या युद्धाला सुरवात.मग आमच्या घरचे नाही म्हणतात मी लग्न नाही करू शकत, मला माफ करून द्या, काय काय बहाणे सुरु होतात, आजपर्यंतचे सगळे वचन, वायदे सगळे मातीमोल. रोज तीच किंवा त्याच ऐकलं तर खूप छान, रात्रभर फोन Engage , सकाळी लायब्ररी किंवा कॉलेज मध्ये परत रामायण सुरु.घरी सांगतात की मी अभ्यास करते, मी लायब्ररी जाते आणि आई बाबा पण विश्वास ठेवतात, पण तिकडे जाऊन काय करतात तर गार्डन किंवा इतर ठिकाणी मजा उडवतात .इकडे माय बाप तुमच्यासाठी स्वतःच्या पोटाला मारून तुम्हाला शिकवतात आणि तुम्ही लोक असले धंदे करता, थोडी लाज वाटली पाहिजे स्वतःची स्वतःला . " पहले खुद कुछ काबिल बनो फिर देखो दुनिया तुम्हारे पिछे दौडगी, तुम दुनिया के पिछे मत दौडो" सगळं काही तुम्हाला आपोआप मिळेल. Gf ला फिरवणे काय, आपला अमूल्य वेळ देऊनही एक दिवस ती तुम्हाला या मार्गावरील सगळ्या line व्यस्त आहे , आपला कॉल waiting वर आहे म्हणूनच ऐकवेल जाईल , परत तुम्ही Distrub व्हाल.म्हणून वेळ असतानाची योग्य वळणावर या.हे प्रेम वैगैरे काही नसते फक्त एक आकर्षण असते. प्रेम करायचं तर आईवर करा बहिणीवर करा, किंवा लग्न करून मोकळे व्हा आणि पत्नीवर आणि मुलामुलींवर प्रेम करा.हे असल्या प्रेमप्रकरणांच्या भानगडीत पडून आपलं आणि आपल्या घरच्या लोकांचं डोकं खराब करू नका.आज जेवढे निदर्शनास आलेत आणि बातम्यांवर ऐकलं किंवा वृत्तपत्र यांच्यावर प्रसिद्ध माहिती नुसार Love Marriage करणाऱ्यांचे बरोबर पटत नाही किंवा Divorce झालेय (काही अपवाद सोडता) आपल्या करियर कडे लक्ष द्या. स्वतःला सिद्ध करा.असल्या भांगडीतून बाहेर या. नाहीतर एक दिवस तुमचं Breakup ठरलं आहेच.आयुष्याच breakup झालं की तुम्हाला कोणीच विचारणार सुद्धा नाही .म्हणून तुमचीच line तुम्ही बदला म्हणजे कॉल waiting वर राहणार नाही. थेट जागी पोहचाल.परत एकदा सांगतोय हे प्रेम वैगेरे काही नसते हे फक्त सोंग असते.आपल्या अभ्यासाकडे लक्ष द्या आणि आपलं आणि आपल्या लोकांचं आणि देशाचं नाव मोठं करा.
या लेखबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया आपण 8275289828 या Whatsp क्रमांकावर पाठवू शकता.
@Prof_Hiteshkumar_Patle
-- प्रा. हितेशकुमार पटले
May 25, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti