(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • माता विठ्ठल ..पिता विठ्ठल ! ( बेवड्याची डायरी – भाग २२ वा )

    ..सर ईश्वरी शक्ती बदल सांगत असताना मला लहानपणी ऐकलेला संत नामदेवांचा अभंग आठवला ..ज्यातील एका कडव्यात ‘ माता विठ्ठल ..पिता विठ्ठल ..बंधू विठ्ठल ..गोत्र विठ्ठल ..गुरु विठ्ठल ..गुरु देवता विठ्ठल ..निधान विठ्ठल ..निरंतर विठ्ठल ‘ असे म्हंटले गेले होते ..म्हणजे संतानी पण निसर्ग ..नातीगोती ..गुरुजन ..समाज..यांनाच विठ्ठल म्हणजे ईश्वर मानले होते तर !

      April 19, 2020


  • मराठीपणाचं राजकारण

    जसं आपण व्यवहारात फंक्शनल इंग्रजी बोलतो, तसंच व्यवहारात फंक्शनल मराठी वापरलं पाहिजे. व्याकरणशुद्ध व्हिक्टोरिअन इंग्रजी फार थोडे लोक बोलतात. हल्ली तर इंग्लंडच्या राणीचंही इंग्रजी बिघडलंय अशी ओरड सुरू आहे. मोबाइलवरच्या एसएमएस इंग्रजीमुळे इंग्रजी लिपीवर अतिक्रमण होतंय, असेही आरोप होतायत. इंग्रजीची ही हालत तर मराठीच्या प्रमाणीकरणाचा काय पाडाव लागणार.

      July 10, 2010


  • भेसळ

    काल बायकोने ठाण्याहून खरवस मागवला होता... रात्री टी.वी . पहाता पहाता तो आम्ही चापला.
    "कसा मस्त आहे की नाही ?"
    "हो ....छान आहे". दुधात जिलेटिन घालून केलेला "चिक" व त्यापासून बनवलेला खरवस मी पहिल्या चमच्यात ओळ्खला होता. पण बायको समोर हो ....छान आहे असे म्हणावे लागले.

    आमच्या गोठ्यात ( एके काळी ) वर्षाला ४ /५ म्हशी वीत असत. आणि मग खरवस, नासकोणी, खरवसाची बर्फी असे विविध प्रकार आई / आजी करत असत.

    हे खरवस बनवणारे रोज २०० /२५०किलो खरवस बनवतात. तो दादर पर्यन्त अनेक "हाटेलात" पुरवतात.

    आता विचार करा, २०० कि. खरवस बनवायला किमान १०० कि. चीक हवा, त्यासाठी कमीत कमी ५० म्हशी व्यायला पाहिजेत, त्यासाठी किमान ५००० म्हशी गोठ्यात हव्या. असे अनेक खरवस वाले मुंबापुरीत आहेत. मला तरी हे केवळ अशक्य वाट्ते.....एवढ्या म्हशी बाळगण्या परीस तो गोठ्याची जागा विकून बक्कळ पैसा कमवेल.

    थोडा विचार + विचारपुस करता "जिलेटिन" + दुध = खरवस हा फॉर्मुला समजला.

    बाटली बंद "लोणची" आणि त्यावर तरंगणारे तेल पाहून मला असाच संशय आला. गोडेतेलाची किंमत, लोणच्यामधील तेलाचे प्रमाण व लोणच्याची किंमत ह्याचा मेळ लागेना......

    दोन चार ठिकाणी चाचपणी केली. मग उलगडा झाला. लोणच्या मध्ये वापरले जाणारे तेल गोडेतेल (शेंगदाणा) नसून सरकीचे (कापुस बी) असते.

    बाजारात लस्सी प्यायची म्हट्ले की मला आठवण होते "सायट्रिक acid" ची.
    ब्लोटिंग पेपर + सायट्रिक acid = फक्कड लस्सी.

    हेच सायट्रिक आसिड दूधाच्या भुकटी बरोबर आले की "छास " तय्यार. ताक प्यायल्यावर जिभेवर कडवट आंबट चव राहिली कि ओळखा ही सायट्रिक आसिड ची कमाल.

    हे सायट्रिक आसिड / चुन्या बरोबर "पाणी-पुरी" मध्ये सापड्ते. चुना मिर्ची म्हणून न सायट्रिक आसिड चिंच म्हणून आपण पितो .....भैय्याजी थोडा पानी और.....कारण ही दोनिही रसायने मिर्ची व चिंचे पेक्षा खूप स्वस्त आहेत.

    ऊसाचा रस ऊन्हाळ्यात चांगला. पण काही "कलाकार" ह्यामध्ये "सॅकरिन" वापरतात्..... थोड्या रसात भरपूर पाणी + सॅकरिन = भरपूर रस व भरपूर नफा. पण ह्याचा वापर एवढा सर्रास नाही.

    टोमॅटो सॉस केवळ "भोपळ्या पासून" बनवतात म्हणुनच हॉटेलातून बाटल्या भर्भरून ठेवलेला असतो व परवडतो.

    नेस्ले / एच्.एल्.एल. इ. कंपन्या टोमॅटो सॉस टोमॅटोपासून बनवत असतील ही...

    ही थोडी झलक.

    एक चुना सोड्ल्यास ह्यामधील कोणतीही भेसळ शरीरास विशेष हानी कारक नाही. फक्त फसवणुक आहे .

    शरीरास विशेष हानी कारक भेसळी विषयी परत केंव्हा तरी.

    तो पर्यन्त "वडापावाच्या" लसूण चट्णीत लाकडाचा / नारळ /खोबरे / शेंगदाणा व समप्रमाणात लाकडाचा भुसा / बारीक केलेला पुठ्ठा नाही ना ? एवढी खात्री करा झाले.

    संकलन - दिपक कोटमे, कोपरगाव

      November 12, 2016


  • सुप्रसिद्ध क्रिकेटपटू सलीम दुराणी

    सलीम अझीझ दुराणी म्हणजेच ‘ प्रिन्स ‘ याचा जन्म 11 डिसेंबर 1934 रोजी अफगाणिस्तानमधील काबुल येथे पठाण परिवारात झाला. त्यांचे लहानपण जामनगर येथे गेले. त्यांचे वडील देखील क्रिकेट खेळलेले होते. ते राजस्थानच्या टीममधून बराच काळ रणजी ट्रॉफी खेळले होते.

      April 6, 2023


  • हे माझे काम नाही

    आधी दुष्काळ मग पावसाचा कहर यामुळे भाजीपाला दुर्मिळ झाला. गृहिणींना कळेना की रोज शिजवायचे काय? असाच एका घरातला संवाद कानी पडला. आज तिसऱ्या दिवशीही तिने बटाट्याची भाजी आणि आमटी केली होती. त्याला बटाट्याची भाजी बिलकूल आवडत नसे. तिचा नाईलाज होता.

      May 20, 2024


  • आशा आणि अपेक्षा..

    आशा आणि अपेक्षा या दोन जुळ्या बहिणी....

    जिथे जिथे आशा असेल तिथे तिथे अपेक्षा भेटणारच...

    मनुष्यप्राणी आशेवरच जगतो... आणि सतत कसलीतरी अपेक्षा करतोच करतो..

    माणुसच कशाला.. अगदी कोणताही प्राणी तेच करतो..

    आपण कोणाकडूनतरी कसलीतरी अपेक्षा करतो.. आपल्याला आशा असते की आपली ती अपेक्षा पूर्ण होईल..
    कधीकधी आशा आणि अपेक्षा अगदी १०० टक्के पावतात आणि सहजगत्या प्राप्त होतात..
    पण कधीकधी अगदीच अपेक्षाभंग होतो..

    आशा कधी निराशेत परिवर्तित होते ते कळतंच नाही..
    अशावेळी अपेक्षाभंगाचं दु:ख होतं आणि ते पचवायला फार कठीण होतं..

    अशी निराशा आणि अपेक्षाभंग आपल्या जवळच्या माणसांकडून पदरी पडला तर त्याचं दु:ख जास्त होतं..

    पण मग सुखी रहाण्यासाठी काय करायचं ?

    साधं.. सोप्प आहे..

    “आशा”च करायची नाही.. म्हणजे निराशेला आपल्याकडे येण्याचं कारणंच नाही...
    “अपेक्षा” ठेवायचीच नाही.. म्हणजे अपेक्षाभंगाचं दु:ख पचवायची वेळच येणार नाही..

    मी तेच करायला सुरुवात केलेय.. तुम्हीही करुन बघा..

    आयुष्य जास्त आनंदी होईल !!

      August 17, 2016


  • किल्ले पद्मगड

    सिंधुदुर्गाचे महत्त्वाचे भौगोलिक स्थान ओळखून शिवरायांनी याच्या संरक्षणासाठी मालवणच्या सागरतीरावर तीन दुर्गांची निर्मिती केली. ते म्हणजे पद्मगड, राजकोट आणि सर्जेकोट हे होय.

      December 10, 2012


  • कृष्णभक्तीअभावीच नैतिक अधःपतन

    देवदत्त नावाच्या घोड्यावर बसून हातात तलवार घेऊन पृथ्वीवर फिरणार्‍या राजाच्या वेशातील लाखो डाकूंना ठार करतील. त्यावेळी पुढील सत्ययुगाची लक्षणे प्रकट होतील. सूर्य विवस्वान तसेच चंद्रदेवांचे पवित्र वंश पुन्हा सुरू करतील.

      January 28, 2011


  • पळवाटा.. पण.. मात्र

    मला तर सध्यस्थितीत अस वाटत की, प्रत्येक भारतीय मनुष्य "भारतीय दंड संविधानाला" घाबरेल अस वाटतच नाही.... कारण हल्ली कायद्याच्या रक्षणासाठी असलेल्या .... नेमलेल्या..... व्यक्तीच अशा अनेक कायदेशीर पळवाटा शोधुन काढतात की, त्याला सर्वौच्च न्यायालय देखील काहीच करु शकत नाही.

    पण... मात्र..

    भारतातील प्रत्येक जातीधर्मांतील श्रध्दाळु भक्तच मला जास्त आवडतात..... कारण ह्यांची ज्या-त्या देवांपाशी असलेली अपार भक्तीच अस काही यांना करुच देत नाही की ते धर्ममान्य नसेलही व कायदेशीरतर नसेलच.

    कारण काहीजण "भारतीय दंड संविधाना" तुन सहीसलामत व ब्बाईज्जत सुटतीलही..,,, पण वरच्या न्यायालयात जन्मापासुन ते मृत्युपर्यंतच्या सर्वंच गोष्टींची दखल काळजीपुर्वज घेतलीच जातीही...,

    ते ही कोणत्याही पळवाटेविना..... व अंमलबजावणी तेवढयाच कठोरात कठोरपणे होते ही..,,

    -- विवेक जोशी

      November 17, 2016


  • खडतर प्रवास

    जीवन हे माणसाला पावलापावलाला एक नवीन अनुभव देत असते परंतु, हा अनुभव घेताना यात अनेक खडतर मार्ग येतात, या मार्गांवरून जाताना स्वतःला सांभाळणे सर्वात अवघड असते.

      December 7, 2021