(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • आदर्शांचे चिंतन (वात्रटिका)

    आदर्शांचे चिंतन

    आदर्श शिक्षक पुरस्कार

    ही तर एक मौज आहे.

    शिक्षक दिनालाच कळते

    आपल्याकडे आदर्शांची फौज आहे.

    कुणी ओढलेले आहेत,

    कुणाच्या गळ्यात पडलेले आहेत.

    स्पर्धेत जिंकता जिंकता हरले

    असे कितीतरी दडलेले आहेत.

  • सुप्रसिद्ध क्रिकेटपटू सर जॅक हॉब्ज

    जॅक हॉब्स यांच्या खेळाचा प्रोफाइल पाहिला तर थक्क व्हायला होते. त्यांनी ६१ कसोटी सामन्यामध्ये ५६.९४ या सरासरीने ५,४१० धावा केल्या त्यामध्ये त्यांची १५ शतके आणि २८ अर्धशतके होती. त्यांची कसोटी समान्यांमधील सर्वोच्च धावसंख्या होती २११ .

  • “काव्यस्फूर्त उर्मी”

    निवृत्ती नंतर भूतकरांनी आपल्या छंदाचा व वेळेचा पुरेपूर सदुपयोग केला. ज्ञानरंजनाने परिपूर्ण असा “उर्मी” हा कार्यक्रम त्या सादर करु लागल्या या एकपात्री प्रयोगाला रसिकांनी ही भरभरून दाद दिली. त्यासोबतच विविध काव्य स्पर्धांमध्ये तसंच साहित्य संमेलनात आयोजित स्पर्धांमध्ये आत्तापर्यंत अनेकदा अव्वल व द्वितीय क्रमाकाचं बक्षीस मिळालं आहे.

  • महिलांच्या छेडछाडीला कायद्याचा लगाम !

    महिलांची छेडछाड व वाढत्या गुन्हेगारीला आळा…कमकुवत कायदा ….त्यातील पळवाटा…न्याय मिळण्यास होणारी दिरंगाई …कायदा सुव्यवस्थेसाठी कडक कायदा करण्याची गरज… त्यासाठी उपायात्मक सूचना.

  • मानवतेचा पुरस्कार करणारा महात्मा

    पांडुरंगशास्त्री आठवलेंनी अवघ्या समाजाला माणुसकीचा आणि मानवतेचा धर्म नव्याने दाखवून दिला. त्यांचे सहजसुंदर तत्त्वज्ञान अवघ्या जगात प्रसिद्धी पावले. रॅमन मॅगसेसे, टेम्पल्टन पुरस्कार, पद्मविभूषण अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले होते. आज समाजातील सौहार्द संपत असताना आणि जातकारण वाढत असताना पांडुरंगशास्त्रींच्या तत्त्वज्ञानाचा नव्याने जागर होण्याची गरज आहे. 25 ऑक्टोबर रोजी येणार्‍या त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जागवलेली आठवण.

  • पाऊस

    पाऊस धिंगाणा माजवतो,

    पाऊस तिला भिजवतो.

    पाऊस तिला उअजवतो,

    पाऊस तिला रूजवतो.

  • रामकृष्ण मिशन सेवा समिती, अलिबाग

    समाजकार्य करताना आपण जे काम करतो आहे, व ज्यांच्यासाठी करत आहे त्यांच्याविषयी मनात प्रेम, आत्मीयता व स्थिरता हवी. निश्चलपणे व आजुबाजुला असलेल्या अडथळयांची तमा न बाळगता इतरांसाठी झटणारे समाजसेवक त्यांना पदच्युत करण्याचा प्रयत्न करणार्‍या व्यक्तींना अजिबात घाबरत नाहीत. त्यासाठी लागणारे असामान्य धैर्य, स्वतःच्या तत्वांवर असलेला प्रचंड आत्मविश्वास, इतरांसाठी काहीतरी भव्य-दिव्य करण्यासाठी लागणारी जिद्द व अखंड सेवाभाग या सर्व गोष्टी अंगी बाणवण्यासाठी मनात शुध्दता व शरीरात बळ हवं असतं. जरी सर्व धार्मिक संघटना समाजातील तळागाळातील लोकांसाठी काहीतरी करण्यासाठी झटतीलच असं नाही, परंतु आध्यात्मिक व धार्मिक प्रवचनांमुळे व सत्संगामुळे आपल्याला मनाला स्थैर्य मिळत, चंचलता कमी होते, आपल्या पुढचा मार्ग अगदी धुतलेल्या काचेसारखा चकचकीत दिसायला लागतो, जीवनाच्या निराशावादी, काळोख्या कप्प्यांमध्ये सुध्दा आशेचे काजवे चमचमायला लागतात, मनाला नवी उमेद व उभारी येते, इतरांची सेवा करताना कधीतरी डोकावणारे स्वार्थी व आत्मकेंद्रीत विचारसुध्दा बंद होतात, व प्रसिध्दीच्या आर्कषणापासून मनुष्य हळुहळू लांब होत जातो.

  • उंच माझा झोका

    रमाबाई रानडे यांच्या जीवनावर आधारीत असलेल्या उंच माझा झोका या मालिकेचे शीर्षक गीत

  • वृत्तवाहिन्यांचे भान सुटले

    अलीकडे टीआरपी वाढविण्याच्या हव्यासापोटी विविध वृत्तवाहिन्या आपले तारतम्य सोडून बातम्या दाखवत आहेत असे दिसते. आणि विशेषतः जेव्हा कधी मुंबईवर अतिरेकी हल्ले किंवा बॉम्बस्फोट होतात तेव्हा ही बाब प्रकर्षाने जाणवते. या नादात वृत्तवाहिन्या आपणच ‘गुप्तचर’ असल्याच्या अविर्भावात, (जेव्हा की तपासयंत्रणा अजून घटनास्थळावरून सॅम्पल गोळा करत होत्या, त्यानंतर त्यांची तपासणी होऊन त्याचे निष्कर्ष जाहीर होणार त्याआधीच) स्फोटके कोणती वापरली गेली, या बॉम्बस्फोटामागे कोणत्या संघटनेचा हात आहे हे फक्त आपल्यालाच ‘कळले’ अशा थाटात बातम्या दाखवताना दिसत होत्या.

  • येणार्‍या काळात मराठी भाषेचं भवितव्य काय?

    मराठी भाषा टिकविण्यासाठी आणि तिच्या विकासासाठी पावलं उचलली गेली पाहिजेत… अशी प्रतिपादनं वेळोवेळी साहित्य संमेलनात तर हमखास केली जातात. भाषेचा प्रश्न केवळ महाराष्ट्रालाच भेडसावतो आहे असे नाही. भारतातील सर्व भाषिक लोक या समस्येमुळे हवालदिल झाले आहेत.